Madhu Makarand Gad : Maratha Fort near Pratapgad | Mahabaleshwar | Jawali Forest | Koyna | Harifi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 мар 2024
  • #mahabaleshwar #Koyna #sahyadri #fortsofmaharashtra
    पुणे - मधु मकरंदगड अंतर - 151 Km
    कसे जायचे -
    पुणे - महाबळेश्वर - पार गावाचा फाटा - चतुरबेट - घोणसपुर फाटा - घोणसपुर गाव - मधुमकरंद गड
    -------------------------------------------------------------------------
    सह्याद्रीमध्ये का फिरावं याचं खरं तर क्रमिक असं उत्तर नाही.
    एकीकडे निसर्गाने भरभरुन दिलेलं दान, तर दुसरीकडे इतिहासात असलेले मानाचं स्थान...
    याच सह्याद्रीतला एक दुर्गम आणि आडवाटेवरचा किल्ला गेले अनेक दिवस साद घालत होता आणि ट्रेकचा योग काही येत नव्हता.
    अखेर एक दिवस ती वेळ आली आणि जावळीच्या खोऱ्यात, कोयनेच्या जंगलातला
    तो किल्ला सर करायला आम्ही निघालो.
    हजारो किलोमीटर पसरलेल्या कोयनेच्या जंगलात हा किल्ला वसलाय तो सातारा, रत्नागिरी जिल्हाच्या सीमेवर..
    मध्यरात्रीची वेळ, कच्चा रस्ता, आक्राळ विक्राळ झाडं भिती दाखवत होती, झुडुपांमधली खसखस अंगावर काटा आणत होती..
    पण सह्याद्रीमध्ये भटकण्याची हीच तर खरी गंमत नाही का...
    पश्चिम घाटातल्या एका रांगड्या किल्ल्याच्या अफलातून ट्रेकची ही गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे.. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमचं हरिफी चॅनेल सबस्क्राईब करा
    ---------------------------------------------------------------------
    पसरणी घाटातून निघालो आणि महाबळेश्वरचा गारवा जाणवू लागला. रस्ता हळूहळू सुनसान होऊ लागला होता.
    महाबळेश्वरवरुन पोलादपूरच्या दिशेने निघाले की वेण्णा लेक बोटींग सेंटर पासून बरोबर १७ किलोमीटरवर डाव्या हाताला एक कमान लागते.
    या कमानीतून एक रस्ता जावळीच्या खोऱ्यात शिरतो. लगेचच एक शिवकालीन पूल लागतो. हा पुल ओलांडला की अंधार आणि जंगल आता दोन्ही गडद होऊ लागले होते.
    त्या अंधाऱ्या रस्त्यावर सगळ्यांचेच डोळे उगाचच काहीतरी शोधत होते.
    अत्यंत खराब रस्त्यामुळे आमचं वेळेचे गणित पुर्ण कोलमडलं. घोणसपुर या पायथ्याच्या गावात आम्हाला पोचायला रात्रीचे २ वाजले. अंधारात चुकत मुकत
    आम्ही व्हिडिओत दिसणाऱ्या मंदिरात पोचलो.
    अत्यंत स्वच्छ अशा मंदिरात आम्ही टेंट लावले आणि कडकमध्ये झोपून गेलो.
    सकाळी उठल्यानंतर आम्हाल कळलं की आपण सह्याद्रीच्या किती गाभ्यात पोचलो आहोत.
    समोर महाबळेश्वरच्या पठारावार सुर्यकिरण चमकत होती. मधल्या दरीत धुक्याची दुलई पसरली होती आणि मंदिराच्या मागे उभा होता तो मधु मकरंद गड…
    मधुमकरंद गडाच्या पायथ्याशी भैरीमल्लिकार्जुनाचे मंदिर आहे. या मंदिरात गावकऱ्यांच्या परवानगीने राहण्याची उत्तम सोय होते. अतिशय स्वच्छ आणि मनाला प्रसन्न करणारी ही जागा आहे.
    महाबळेश्वरच्या सनसेट पॉईंटला जो डोंगर दिसतो तोच मधुमकरंद गड. या गडाचा आकार घोड्याच्या खोगीरासारखा आहे त्यामुळे त्याला सॅडलबॅक असंही म्हणतात.
    या किल्लाला २ शिखरं आहेत. दुसऱ्या शिखराचा नावं मधुगड आहे पण तिथे जाण्याची वाट काळाच्या ओघात नष्ट झाली आहे.
    किल्ला चढायला जरी सोपा असला तरी आजूबाजूला असलेले कोयनेच दुर्गम जंगल हेच या किल्ल्याचे संरक्षण....
    पहिला टप्पा चढून गेलं की कोयनेच्या जंगलाचा एक मोठा पट्टा आपल्याला दिसू लागतो. मधु मकरंद गडाच्या डाव्या अंगाला कोंडनाळ आहे. या नाळेतून खाली कोकणात बिरमणी गावात उतरता येतं.
    या टप्प्यावरुन उजव्या हाताला मधु मकरंद गडावर जाण्याची वाट आहे. डोंगऱ्याच्या पोटातून पुढे जाणारी निमुळती वाट आणि उजव्या बाजूला खोल दरी आणि हिरवेगार जंगल....हीच वाट मधु मकरंद गडाच्या माथ्यावर घेऊन जाते.
    पायथ्यापासून निघाल्यानंतर अर्ध्या तासात आम्ही गडाच्या माथ्यावर पोचलो.
    गावातल्या रिवाजानुसार गावातले पुजारी रोज न चुकता गडावर येतात आणि भैरी मल्लिकार्जुनाची पूजा करतात. दुध आणि गुरगुट्या भाताचा प्रसादही रोज गडावर केला जातो.
    निबड रानातला तो देव आणि माणसाचे ते अबोध नातं थोडा वेळ अंर्तमुख करुन गेलं अर्थात प्रत्येकाच्या श्रध्देचा हा भाग पण सह्याद्रीच्या गाभ्यात जिथं दूरदूर पर्यंत मनुष्यवस्ती नाही अशा ठिकाणचं हे मंदिर, मंदिरात रोज डोंगर चढून येणारा तो पुजारी आणि त्यात घुमणारा तो शंखनाद हे सगळंच भारावून टाकणारं होत
    बराच वेळ सह्याद्रीची शिखरं न्याहाळतं राहिलो आणि परतीच्या वाटेला लागलो. पण ट्रेक जरी संपला तरी अजून थरार संपला नव्हता.
    खरं तर भैरी मल्लिकार्जुनाच्या मंदिरापाशी आलो तेव्हा चढाई उतराईचा भाग हा संपला होता. पण आदल्या रात्री आम्हाला गाडी खराब रस्त्यामुळे गाडी अर्ध्यातच सोडावी लागली होती.
    मध्यरात्री अंधारामुळे आम्हाला जंगलाची अजिबातच कल्पना आलेली नव्हती. पण दिवसाउजेडी जेव्हा काल रात्री पार केलेली वाट बघितली तेव्हा आम्हाला त्या जंगलाची निबिडता जास्त जाणवली.

Комментарии • 19

  • @gaurijoshi8317
    @gaurijoshi8317 4 месяца назад +1

    छान.. माहिती पूर्ण .. श्रवणीय आणि प्रेक्षणीय.. अर्थात ऐतिहासिक

  • @vijayjoshi1805
    @vijayjoshi1805 4 месяца назад +1

    मस्त

  • @Dr.NeelGiri-yx3rh
    @Dr.NeelGiri-yx3rh 4 месяца назад +1

    खूप छान प्रस्तुति व दर्जेदार

  • @manjirikarambelkar6572
    @manjirikarambelkar6572 4 месяца назад +1

    अप्रतिम ❤

  • @adriftrider84
    @adriftrider84 4 месяца назад +1

    superb...

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 4 месяца назад

    ......AWESOME.....💓

  • @mrinalinirokade7335
    @mrinalinirokade7335 4 месяца назад

    Wah! 👌

  • @unknown_gamerz-bb8dh
    @unknown_gamerz-bb8dh 3 месяца назад

    This is my Village

  • @ajthingsvlog3812
    @ajthingsvlog3812 4 месяца назад

    😍 Kamaal Keep Going 👏

    • @Harifi_
      @Harifi_  Месяц назад

      Thanks ✌️

  • @harshad1951
    @harshad1951 4 месяца назад

    Subscribe and like done

    • @Harifi_
      @Harifi_  Месяц назад

      Thank you very much

  • @unknown_gamerz-bb8dh
    @unknown_gamerz-bb8dh 3 месяца назад

    How is my Village

    • @Harifi_
      @Harifi_  Месяц назад

      Your village is just beautiful

  • @sandeshsardekar8239
    @sandeshsardekar8239 3 месяца назад

    तुमचे व्हिडिओ छान असतातात नेहमी आम्ही बिडिओ बघत असतो व्हिडिओ आवाज छान आणी त्यापेक्षा माहिते अप्रीतम असते
    खरंच आई व्हिडिओ नेहमी माहितीपूर्ण देत जा आम्ही तुमच्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहतो मनाला एक प्रश्न पडतो की तुमच्या चायनल च नाव हरिफी आहे त्याचा अर्थ काय आहे ते समजेल का ❤❤

    • @Harifi_
      @Harifi_  3 месяца назад +1

      आमच्या चॅनल चे नाव हरिफी का आहे ते explain करणार एक व्हिडिओ आम्ही लवकरच करणार आहोत !!!!
      तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले याबद्दल खरंच खूप आभारी आहे.
      धन्यवाद !!!

  • @sandeshsardekar8239
    @sandeshsardekar8239 3 месяца назад

    तुमचे व्हिडिओ छान असतातात नेहमी आम्ही बिडिओ बघत असतो व्हिडिओ आवाज छान आणी त्यापेक्षा माहिते अप्रीतम असते
    खरंच आई व्हिडिओ नेहमी माहितीपूर्ण देत जा आम्ही तुमच्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहतो मनाला एक प्रश्न पडतो की तुमच्या चायनल च नाव हरिफी आहे त्याचा अर्थ काय आहे ते समजेल का ❤❤

    • @Harifi_
      @Harifi_  Месяц назад

      आमच्या आडनावाचा एक इतिहास आहे तो कधी तरी व्हिडिओ च्या माध्यमातून मांडू त्यामुळे हरिफी हे नाव ठेवलेले आहे