shahapur rain : पावसाचा हाहाकार नदीला पूर अख्खा पूल गेला वाहून bharangi river flood | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 июл 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #shahapur #bharangi #bharangi_river #flood #heavy_rain
    shahapur rain : पावसाचा हाहाकार नदीला पूर अख्खा पूल गेला वाहून bharangi river flood | Hello Baliraja
    ठाणे जिल्ह्यात काल रात्रभर मुसळधार पाऊस झालाय. या पावसामुळं नदीला पूर आला आणि जवळच असलेल्या इमारतीमधील गाड्या वाहून गेल्याची घटना घडलीये. तसेच दीडशे पर्यटक अडकल्याचं समोर आलंय.
    ठाण्याच्या शहापूर तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळं भारंगी नदीला पूर आला. या पूराच्या पाण्यात जवळच असलेल्या इमारतीच्या खाली पार्किंग केलेल्या गाड्या वाहून गेल्या. तसेच गुजराती बागेत पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आलं. याशिवाय खर्डीच्या बागेचा पाडामधील पूल वाहून गेलाय. आसनगाव स्थानकानजीक पाणी साचल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद झाली.
    मुसळधार पावसामुळं शहापुरात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. भातसा नदीच्या कडेला असलेल्या वाशिंद येथील सृष्टी फार्म हाऊस वर दीडशे पर्यटक अडकल्याचं समोर आलं. पर्यटकांची सुटका करण्यासाठी NDRF ची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झालीय. ट्यूब बोट मधून पर्यटकांना बाहेर काढण्यात येत आहे.
    -------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии •