Shahir Sable Biography | शाहीर साबळे संपूर्ण माहिती | महाराष्ट्र शाहीर मराठी | Maharashtra Shaheer

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • #maharashtrashahir #shahirsabale #shahirSable #ShahirPowada #Powada #ankushchaudhary #ankushchaudhari #kedarshinde #Maharashtrachilokdhara #marathidarshan #MarathiMovie #marathiFilm #maharashtrashaheer
    Please subscribe Marathi Darshan RUclips Channel for more videos.
    " मराठी दर्शन " हा एक मराठी युट्युब चॅनेल आहे. हा चॅनेल मराठी कविता , कथा , नवीन चित्रपट , नाटक , नवीन पुस्तक वाचन ,टेकनिकल बातम्या , चालू अपडेटस , राजकारण , इतिहास , मनोरंजक विडिओ , विनोद आणि माहिती यावर पोस्ट करत राहील.
    या चॅनलवर अपलोड होणर्‍या नवनवीन विडीयोचे अपडेट / नोटीफिकेशन मिळविण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब (Subscribe) करा . या चॅनलवरील विडीयो पाहतांना आपल्या मनात आलेले प्रश्न आम्हाला कॉमेंट ( Comment) करून विचारा.
    आमचा ई-मेल आहे - marathidarshan20@gmail.com
    Images and videos used from an Internet sources, Pixabay, Unsplash, Pexels
    Disclaimer :
    The video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
    NOTE: ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.
    I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWN IN THE VIDEO
    १ कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांचे भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत शाहीर म्हणून फार मोठे योगदान आहे.
    सातारा जिल्ह्यातील वाईमधील पसरणी या छोट्या खेड्यात कृष्णराव साबळे यांचा जन्म झाला. घरची परीस्थिती बेताची होती व एकत्र कुटुंब असल्याने त्यांचे शिक्षण व्हावे म्हणून त्यांना आईने अमळनेरला आजीकडे पाठविले. २ तिसऱ्या इयत्तेत असताना साबळे अमळनेरला गेले. तेथे गेल्यावर आपल्याला चांगला आवाज आहे, हे त्यांच्या ध्यानात आले. आजी हिराबाई बडोदेकर यांनी तेथे साबळे यांचे गाणे.... योगायोगाने ऐकले व साबळेच्या बालपणी त्यांच्या आवाजाचे कौतुक केले होते.
    शाहीर साबळे यांनी सामाजिक कार्यात बालपणीच सहभाग घेतला. त्यामुळे त्यांचे शिक्षण केवळ सातवीपर्यंतच झाले. अंमळनेरला असताना साबळे यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. ३ पुढे मोठेपणीही चळवळीत त्यांना गुरुजींचा आशीर्वाद मिळाला. साने गुरुजींच्या अनेक सामाजिक कार्यात साबळेचा सक्रिय सहभाग असे. पसरणी गावात भैरवनाथाच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश देण्यासाठी गावातील तरुण मंडळींबरोबर त्यांनी पुढाकार घेतला. यावेळी साने गुरुजींबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील, सेनापती बापट व क्रांतिसिंह नाना पाटील हे सारे मंदिरप्रवेश प्रसंगी उपस्थित होते. साने गुरुजींच्या सहवासात आल्याने साबळे यांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळाली. त्या प्रेरणेतून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतही भाग घेतला.
    ४ शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असताना, आईने साबळे यांना मुंबईला चुलत्याकडे गिरणीकाम शिकण्यासाठी पाठविले. तेथेही त्यांच्यातील कलाकार त्यांना स्वस्थ बसू देईना. लीलाबाई मांजरेकर यांच्या संगीत बारीवर जाऊन त्यांनी त्यांच्याकडून "हिरा हरपला‘ हे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरील नाटक बसवून घेतले. पुतण्या तमाशाच्या बारीवर जातो, हे जेव्हा चुलत्यांच्या ध्यानात आले, तेव्हा त्यांनीही शाहिरांना पसरणीचा मार्ग दाखवला. पुन्हा एकदा पोटासाठी फिरणे सुरू झाले.
    पुढे मधल्या काळात पुण्यात अरुण फिल्म कंपनीत वाद्यांचा सांभाळ करण्याची नोकरी मिळाली व पुन्हा एक नवा सूर गवसला. थोड्या फार प्रमाणात रेकॉर्डिंगच्या वेळी कोरस गाण्याची संधी मिळाली; ५ पण तेथेही मन जास्त रमले नाही. म्हणून शाहीर साबळे यांनी पुन्हा एकदा मुंबई गाठली.
    पुढे शाहीर साबळे स्वदेशी मिलमधे नोकरीला लागले, पण तिथेही रमले नाहीत. त्यांनी नोकरी सोडली आणि १९४२ची चलेजाव चळवळ, गोवा व हैद्राबाद मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा अनेक आंदोलनांसह दारुबंदीचा प्रचार, लोककलाकारांचा सांभाळ अशा सामाजिक कामांतही त्यांंनी स्वतःला झोकून दिले. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या कलापथकाने अनेक दौरे केले.
    ६ शिवसेनेच्या विस्ताराची पार्श्वभूमी तयार करण्यात त्यांचा स्वतःचा तसेच त्यांच्या 'आंधळं दळतंय' या प्रहसनाचा मोलाचा वाटा होता.
    शाहीर साबळे
    समाजाची दुखणी, व्यथा व सत्यस्थिती याचा अभ्यास करून शाहीर साबळे यांनी अनेक प्रहसने लिहिली.
    ७ लहान वयात लोककलांचा आणि लोकगीतांचा संस्कार शाहीर साबळे यांच्यावर झाला होता. मुंबईला आल्यावर या लोककलेचे नेटके रूप विशिष्ट संहितेसह समाजासमोर आणायचे, असा विचार शाहिरांनी केला आणि महाराष्ट्राची लोकधारा या लोककलेच्या देखण्या रूपाचा जन्म झाला. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी आणि मॉरिशसलादेखील मराठी माणसासमोर आपल्या महाराष्ट्राची परंपरा त्यांना दाखविता आली. अभंग, वाघ्या-मुरळी, शेतकरी नृत्य, लावणी, जोगवा, चिपळुणी, बाल्याचा नाच, भारूड, कोळीगीते अशा कलाप्रकारांतून मराठी संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडविणाऱ्या या ८ 'महाराष्ष्ट्राची लोकधारा' कार्यक्रमाने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली.
    ’गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा’ हे त्यांचे गीत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले.
    आठशे खिडक्‍या नऊशे दारं , अरे कृष्णा हरे कान्हा, दादला नको ग बाई , मल्हार वारी मोतीयाने द्यावी भरून, या विठूचा गजर हरिनामाचा , विंचू चावला याच्यासारखी गण, भारूड, भक्तिगीतं, लोकगीतं,कोळीगीत, कोळीगीत बरीच त्यांची गाणी लोकप्रिय झालेली आहेत.

Комментарии • 12

  • @surajmagar2111
    @surajmagar2111 Год назад +17

    संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे साठी महत्त्वाचा लढा साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी दिलेला आहे...;!

  • @maheshkamble5082
    @maheshkamble5082 Месяц назад

    Jay Lahuji Jay Anna

  • @daulatgaikwad13
    @daulatgaikwad13 10 месяцев назад +2

    जय लहुजी

  • @veerrao977
    @veerrao977 3 месяца назад

    Maharashtrat Harijan kon aahe......

  • @fjwjjhfjwuisiur1161
    @fjwjjhfjwuisiur1161 Год назад +1

    आम्ही पण साबळे आहोत

  • @_shubhamraje
    @_shubhamraje Год назад +1

    Anna bhau sathe..... Visarle ka........?

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 Год назад +1

    Maharastra aapalyala kaayam aatawanit tewel shahirji

  • @govindmagdum4902
    @govindmagdum4902 Год назад +1

    Great. खूप छान

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 Год назад +1

    Great

  • @sambhajibhalekar8988
    @sambhajibhalekar8988 Год назад

    Great

  • @s.m.8218
    @s.m.8218 Год назад

    What's him cast, nd it's must in Maharashtra,...