कॉलेजच्या पोरापोरींना गंडवून eBIZ ने ५००० कोटींचा घोटाळा कसा केला | ebiz frauds | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • कॉलेजच्या पोरापोरींना गंडवून eBIZ ने ५००० कोटींचा घोटाळा कसा केला | ebiz frauds | Vishaych Bhari
    साधारण सात आठ वर्षापूर्वीची गोष्टय. एक जवळचा मित्र इंजिनियरिंग पूर्ण करून पुण्याला जॉबला गेला. तिथं त्याला महिना दहा हजाराची नोकरी लागली. पण रूम भाडं, मेस आणि ट्रॅव्हलिंगचा खर्च मिळून त्याचा महिन्याचा एक्सपेन्स 6 हजार रुपये जाऊ लागला. उरलेल्या चार हजारातले घरी किती पाठवायचे अन स्वतःजवळ किती ठेवायचे या टेन्शनमध्ये त्याचे दिवस चाल्ले होते. नवी अंडरवेअर घ्यायची म्हणलं तरी तो दहा दिवस विचार करायचा. त्याच्या भाषेत सांगायचं झालंच तर तो मन मारून जगत होता. पण त्याच्याचं रूमसमोर राहणारं एक बारावी पास पोरगं मात्र रोज सुटाबुटात कुठंतरी कामाला जायचं . घरी आलं की पोरांना त्याच्या कंपनीतल्या मोठंमोठ्या गप्पा सांगायचं. मी दोन महिन्यात यू एस आणि तीन महिन्यांनी युकेला जाणारय, वर्षभरात स्वतःची फोर व्हीलर अन् एखांदी स्पोर्ट्स बाईक दारात उभी करणारय. पुण्यात स्वतःचं घर विकत घेणारंय , लाखो कोटी रूपये कमवणारंय. हे सांगायच्या आधी आणि नंतर तो गुडमाॅर्निंग असंही जोरात ओरडायचा. . त्ये ऐकून आमचा इंजिनियर भाऊ पाघाळला अन त्याला म्हणला, तू बारावी पास असून सुद्धा तुला तुझी कंपनी एवढा पगार कसा काय देतेय . तर त्या बारावी पास वाल्यानं त्याला त्याच्या कंपनीची स्कीम समजावून सांगितली वर असंही म्हणला, तू तर इंजिनियरिंग केलंय, तू फक्त 1० हजार रुपये भरून आमची कंपनी जॉईन केलीस ना तर तू माझ्यापेक्षा डब्बल पैसा छापशील. मग काय झाला ना भाऊ रेडी, दुसऱ्याचं दिवशी तो इंजिनिअर मित्र त्या बारावी पास पोराच्या कंपनीत इंटरव्युव्हला गेला. रिसेप्शनला सगळ्या सुटाबुटातल्या पोरी इकडून तिकडून वावरत होत्या. त्यांनी आपल्या भावाकडून गोड बोलून 1० हजार रुपये गोळा केले अन त्याचं शिक्षण, डिग्री काहीच न विचारता, कॉम्प्युटर कोर्सचं एक किट त्यांच्या हातात ठेवलं. अन किलर स्माईल देत म्हणाल्या वेलकम टू ebiz.गुडमाॅर्निंग. गुडमाॅर्निंग यासाठी की दिवस असू नायतर रात्र इबिझरनं नेहमी जोशात असलं पाहिजे.‌ जब जागो तब सवेरा. हे त्यांचं तत्वज्ञान. असो. पण या पठ्यानं तिथल्या वातावरणात आपण सूट व्हावं म्हणून एक नवाकोरा सूटबी जवळच्या टेलरकडं लगेच शिवायला टाकला.
    आता ह्यो इंजीनियरवाला बिचारा जुन्या कामानं आणि सदा रिकामा असलेल्या खिश्यानं पिचलेला दुष्काळी गडी. तिथल्या पोरींची स्माईल पाहून त्यो सपशेल इरघाळला व्हता . पुढं त्या पोरी त्याला म्हणाल्या आता फक्त एक काम करायचं, तूम्ही आणखी काही गरजवंत पोरं शोधायची अन त्यांना आपल्या डाऊनलिंक मध्ये जोडायचं. . जेवढी जास्त पोरं पोरी तुमच्याखाली जोडाल तेवढी तुमची कंपनीत ग्रोथ वाढत जाणार. एक दिवस तूम्ही 10 रुपयचा बिस्कीट पुडा आणण्यासाठी सुद्धा 10 लाखाच्या फोर व्हीलरमधनं जाणार. झालं, आपला भाऊ Ebiz वाल्यांचे ते मोटिव्हेशनल सेमिनार ऐकून चार्जअप झाला अन शेवटी कामाला लागला. पण पुढं जाऊन ebiz चं मार्केटिंग करता करता कधी स्वतःचं धंद्याला लागला ते त्याचं त्यालाचं कळलं नाय. आता ते कसं घडलं,त्यो इंजिनिअर मित्र सध्या काय करतो , त्याचं करोडपती व्हायचं स्वप्न पूर्ण झालं का? ह्येच आपण आज या व्हिडीओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊयात. नमस्कार मी प्रथमेश अन तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #ebiz
    #ebiz frauds
    #ebiza
    #ebizseminarvideo
    #ebiznetworkmarketing
    #ebizcomprivatelimited
    #ebizcompany
    #ebizmotivationalvideo
    #ebizfunnyvideo
    #ebizrilportal
    #ebizfiling
    #ebizseminar
    #ebizscamcasestudy
    #ebizconvention2019

Комментарии • 1,4 тыс.

  • @utkarshkesarkar5116
    @utkarshkesarkar5116 11 месяцев назад +584

    बळी पडताना वाचलो. आठवल तरी खूप राग येतो. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 पर्यंत नुसत good morning म्हणून घेतल हरामखोरांनी तेव्हापासून good morning शब्दा मला आवडयचा बंद झाला. खरच अक्कल विकत मिळाली. आपला पाठलाग सोडत नाहीत शेवट पर्यंत घरापर्यंत येतात घरामखोर. खूप प्रेशराइज्ड करातात त्यांच्या जाळ्यात अडकायला‌.

    • @rohitdhayagude2083
      @rohitdhayagude2083 11 месяцев назад +26

      Ashyaveles Sarala tya lokana dharun thokayacha bilkul magcha pudhacha vichar nahi karayacha..me he kelela ahe ekala rakt yevo paryant Marla hota

    • @Techno_Fans_14
      @Techno_Fans_14 11 месяцев назад +9

      😂😂😅😅.....bhava amchyakade tar mamari zali hoti...patlag kelyamule 😂😂😂

    • @believewithgnaso...5610
      @believewithgnaso...5610 11 месяцев назад

      😂😂

    • @venkateshjagdale9759
      @venkateshjagdale9759 11 месяцев назад +5

      Good morning 🤣🤣🤣🤣

    • @dipaksormare3361
      @dipaksormare3361 11 месяцев назад +1

      Company name

  • @akshayrate9799
    @akshayrate9799 11 месяцев назад +41

    भावांनो लवकर मिळालेली success, हि scam असते...मोठया गोष्टीसाठी वेळ लागतो त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा , मेहनत घ्या आणि कर्तुत्ववान व्हा ... पैसे automatic आपल्या हातात येतात.........(ebiz वाले माझ्या कडे आले होते. .. पण घरचांच्या मार्गदर्शनाने मी त्यात अडकलो नाही)

  • @Realitiesfun
    @Realitiesfun 11 месяцев назад +150

    मी नुकताच बारावी (२०१२ साली) pass करुन पुणे आलो होतो. घरच्यानि mobile घेण्या साठी ८,००० दिले होते. part time Income मिळेल म्ह्णून ९,००० Ebiz la भरले😅 पुढे २ वर्ष मला mobile विकत घेता आला नाही 😂😂😂 घरच्यानि शिव्या दिल्या त्या वेगळ्याच😂

  • @gani6436
    @gani6436 11 месяцев назад +75

    जो माझा ebiz चा लीडर होता
    तो आता माझा हॉटेल ला दारू प्यायला येतो 😂, पहिल्या पेक्षा बेकार परिस्थिती झालीये त्याची 😂

  • @NK-rv8eu
    @NK-rv8eu 11 месяцев назад +134

    फेक असत ते सगळ मागच्या १०-१२ वर्षात खूप जणांनी सेमिनार ला बोलावले पण मी नाही गेलो आणि जे गेले ते पस्तावले

    • @ash-h1v3b
      @ash-h1v3b 11 месяцев назад +2

      Amhi jaun yaycho as a trip, thodya bhari pori bagun parat yaycho amhi

    • @yogeshsurve1938
      @yogeshsurve1938 11 месяцев назад +2

      Malapan maza friend ghevun gela hota Mich tyala yeda banavla

    • @shubham2104
      @shubham2104 11 месяцев назад +2

      Mi gelto pn tith jaun tyanchich mapp kadhun aalo😂

    • @divyachiwande5000
      @divyachiwande5000 11 месяцев назад +2

      Mai bhi jaati thi seminar but kabhi join nhi Kiya

    • @sushilkulkarni8434
      @sushilkulkarni8434 5 месяцев назад

      @@ash-h1v3b Kharay

  • @ThePurist141
    @ThePurist141 11 месяцев назад +76

    I too was a victim of this scam. I'm happy for those who didn't fall into this trap and those whom I approached and who rejected me😊

    • @mangeshgaidhar8738
      @mangeshgaidhar8738 11 месяцев назад +5

      me sudha. Herbal life sudha ashich ahe

    • @niharprabhu3604
      @niharprabhu3604 11 месяцев назад

      Thankfully I am one of those who didn't fall in this shit because of my father who told me the real story of these people.

    • @siya6325
      @siya6325 11 месяцев назад

      Ok me too
      Public applogy to all friends i preached....i am so sorry i was not in right mind....

    • @startupyogi602
      @startupyogi602 9 месяцев назад

      मी पण या स्कॅम मादे फसलो 30000 गेले माझे😢😢😢😢😢😢😢

    • @rushikeshvaidya1384
      @rushikeshvaidya1384 9 месяцев назад

      I am also victim

  • @abhijeetdpatale4298
    @abhijeetdpatale4298 11 месяцев назад +39

    शॉर्ट कट मुळे पैसा कमवायची इच्छा नसल्या मुळे आणि सुरुवातीला १०,००० रु. भरण्या पेक्षा स्वतःवर खर्च केलेलं बर या करणान मुळे या पासून मी खूप लांब राहिलो..

  • @rameshchaudhari7460
    @rameshchaudhari7460 11 месяцев назад +11

    खूप छान सांगितलं सर तुम्ही लोकांनी नेटवर्क मार्केटिंग चे parameter समजून घेतले पाहिजे.खरंच सांगतो सामान्य माणसाला असामान्य बनविण्याची संधी आहे नेटवर्क मार्केटिंग.पण एक नक्की हे ओळखता आलं पाहिजे.पोलिसांचा पोशाख घातलेला नेहमी पोलिसच असतो असे नाही.तसाच नेटवर्क मार्केटिंग चे सुध्दा आहे

    • @radhikaphotographynighoj6909
      @radhikaphotographynighoj6909 Месяц назад

      नक्कीच सर...
      नेटवर्क मार्केटिंग मुळे खाली तळागाळातील लोकांना वरती येण्याची संधी नक्कीच मिळते

  • @ibrahimbobade4845
    @ibrahimbobade4845 11 месяцев назад +10

    सुंदर माहिती साहेब, सामान्य लोकांपर्यत ही माहिती पोहोचली पाहिजे, मी पन अशा फ्रॉड मधे फसलों आहे 2008 ला, पन माझे मित्र चांगले होते त्यानी मला बाहेर काडले

  • @shivamkurhekar
    @shivamkurhekar 11 месяцев назад +31

    काहीही न केल्याने तुमचा बचाव होऊ शकतो. माझ्या आयुष्यातील हा महत्त्वाचा धडा मला मिळाला 😅

  • @sanketsuryawanshi8666
    @sanketsuryawanshi8666 11 месяцев назад +50

    From 2018 to till now, still I regretting on my decision 😂😂..
    Such a worst experience in my entire life 😶

    • @virubhai1997
      @virubhai1997 10 месяцев назад

      मग आता काय krtoy.. 😂 😂 Sod ना येड्या... का tusryanna gandvu laagla

  • @shubhamkulaye1022
    @shubhamkulaye1022 11 месяцев назад +14

    नेटवर्क मार्केटिंग चा नीट अभ्यास करणं गरजेचं आहे. मी पण एक नेटवर्कर आहे 👍🏻. पण प्रथमेश सर / भाई 🥳 खूप भारीच माहिती दिली 👍🏻👍🏻

    • @dr.ashii11
      @dr.ashii11 11 месяцев назад

      Tera bhi time aayega 😂😂 nashsmukti kendre jawalach aahe😅

    • @pradeepmore4902
      @pradeepmore4902 10 месяцев назад

      Tumhi kontya company madhe ahat

  • @umeshone47
    @umeshone47 11 месяцев назад +30

    बाबांनो नेटवर्क मार्केटिंग कमावून पण देईल पण शेवटी वेळ आणि पैसे (आणि समाजात आपली लायकी)ची वाट लागेल हे नक्की

  • @tejasmohite8500
    @tejasmohite8500 11 месяцев назад +36

    तो आला splender घेऊन आण अम्हाला BMW चि स्वप्न दाखवून गेला....😂

  • @Don-pc7yt
    @Don-pc7yt 11 месяцев назад +26

    मी पण यांच्या सेमिनार ला गेलो होतो ज्याने नेल त्याच्यकडून च 100 रुपये घ्येतले.....

    • @Aboveboard-hy8cj
      @Aboveboard-hy8cj 11 месяцев назад +1

      Me 40 rs , mazyach frnd ni chuna lavayla bolvl hot😂

    • @omkarkhanawale6723
      @omkarkhanawale6723 11 месяцев назад

      मी पण 200rs ला फसलो

  • @omkarkulkarni1846
    @omkarkulkarni1846 11 месяцев назад +17

    जर कुठल्या मित्राचा fb वर 10 वर्षाने मॅसेज आला की कसा आहेस phone no de की समजायचं की भावाला घोडा लागलाय आणि त्यो आता तुम्हाला लावणार आहे😂😂😂

  • @solkarsuraj26
    @solkarsuraj26 11 месяцев назад +22

    आयुष्यभराची जिरवली ह्या स्कीमने 😢

  • @abhijitkandekar213
    @abhijitkandekar213 11 месяцев назад +28

    मला म्हणायचे तुला BMW,Audi घ्यावी वाटत नाही का... आपका वो सपना नही है..... मी म्हणायचो नाही 😂😂😂 4,5, पोरं त्यांच्या तावडीतून वाचवली आहेत

  • @sujeetjadhav719
    @sujeetjadhav719 11 месяцев назад +37

    आम्ही हि सेमिनारला गेलो
    पार मस्त जेवलो
    पार नाष्टा केला
    बर्गर हि खाल्ला
    चुतिया एजंट लोकांचे पैसै खर्च करून मज्जा मारली
    पण एक झाट पैसा भरला नाहि 😂

  • @amitkatkar8286
    @amitkatkar8286 11 месяцев назад +13

    Me pan 7500 bharle hote, pan 1-2 month nanter mala samjale hey fake ahe. Pan me jyachya under join kele hote, tyachyakadun 7500 kadhun ghetale.

  • @dilippalsamkar6124
    @dilippalsamkar6124 11 месяцев назад +23

    मी 2017 फसलो आहे 😢ebiz ला
    देवाच्या कृपेने परत भेटुदे
    Ed त्याचा चागला सोक्षमोक्ष लावुदे

    • @jnvdays3912
      @jnvdays3912 10 месяцев назад

      Bhava punyala fasla ka?

    • @shreepatil2396
      @shreepatil2396 9 месяцев назад

      मी पण फसलो भाऊ satar मधे 😢

  • @MahendraSaket-f4v
    @MahendraSaket-f4v 11 месяцев назад +8

    विषय भारी यांना.. माझी विनंती आहे की.. पुण्यात एक.. कंपनी आहे.. तिचा पण परदा farsh करा... विवा aayush नवी सांगवी इथे त्यांचं ऑफिस आहे.. त्यांना पण घोडे नाही.. बैल लावा बैल 😢😢😢

  • @sankalprane9545
    @sankalprane9545 11 месяцев назад +12

    ह्याच कारणाने कधी ही आठवण न काढणारे....जुने पुराणे मित्र फोन करून आम्हाला सांगत होते चला तुम्हाला करोडपती बनवतो😂😂😂

  • @abhinaysanas9953
    @abhinaysanas9953 11 месяцев назад +24

    मी आणि गल्लीतले माझे मित्र मिळून आम्हाला एक लाख रुपयांना घोडा लागला, वेळ वाया गेला तो वेगळाच. आई, आजी ने रानात काम करून जमावलेल रुपये मला दिले होते, देताना या पैशांचा चांगला कामास उपयोग करतोय ना, असे विचारत. मी हो म्हणून ebiz मध्ये वापरले, खूप खूप वाईट वाटतंय. 😢😢😢माझ्यामुळे एका मित्राचे पैसे बुडाले म्हणून माझी जबाबदारी म्हणून एक दोन वर्षांनी मी त्याला स्वतःचे निम्मे पैसे दिले.

  • @yashmirashi2956
    @yashmirashi2956 11 месяцев назад +25

    मला, "IT वर Seminar आहे खुप मोठी माणसं येणार आहेत" सांगून बोलवलेलं 😂

    • @rohit_884
      @rohit_884 10 месяцев назад +1

      Same, mala pan. Jyame bolavalo hota, to mhanat hota Punyat sunday la ek khup motha manus yenar aahe. Mala tyacha photo pan dakhavala ani ekdum shock madhe mhanala tula hya mansabaddal kahi mahit kas nahi, akkha India tyachi demand kartoy 😂😂. Me mhanta baghu bc kon aahe. Gelyavar kalala kay circus mandun thevlay yanhi. Sala, sandhyakal paryant picha sodla nahi tya porane maza. Akkha sunday waste gela. BC shaletlach porg hota..lai wait hota...ani he ebiz sathi bhau/dada lai request karat hota.😂

    • @yashmirashi2956
      @yashmirashi2956 10 месяцев назад

      @@rohit_884 😆😆

    • @yashmirashi2956
      @yashmirashi2956 10 месяцев назад

      @@rohit_884
      "" ...तुला या माणसाबद्दल काहीच माहीत नाही....?"" ;
      BC वेगळ्या च नशेत होते हे लोक....😆 seriously मला सुध्दा असाच बोलणारा भेटलेला.

    • @manishpatil331
      @manishpatil331 9 месяцев назад +1

      मला safe shop वाल्यांनी धार्मिक कार्यक्रम आहे असे सांगून invite केले होते😅

    • @VBL16
      @VBL16 9 месяцев назад +1

      khup mothi celebrity yenar ahe asa bola hota mala😂

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 11 месяцев назад +9

    Rummy time,rummy culture,A23, junglee rummy ,rummy circle यावर एखादा vedio बनवा

  • @anurupkhambalkar2474
    @anurupkhambalkar2474 11 месяцев назад +3

    Khup changlya topic vr video banavlay tu mitra ...thanks 😊
    Ya video chi kharya arthane khup garaj hoti ...hazaro students adakle astil yat ..he me dolyane pahila ....pn sudaivani me yanchya jalyat adaklo nahi ....he ashe haram khor loka aplya maharashtrar yetat Ani Marathi mansana loottat . He loka scam karnare tr besanskaari astatch sobatch besharm astat .....
    Ajun ek mahatvachi goshta sangto me Marathi tarunana va tyanchya parents na pn ....ki tumchya jamini viku naka ajibaat ....gair Marathi mansana tr ajibaat viku naka ....sheti karaycha Kona la vaitaag ala asel tr Jamin jr tumchi plotting chi aset tr swata plotting kashi padaychi , Kay kay karav lagta yachi mahiti ghya n swata malak banun jamini che plot paadun vika ......pn dusrya lokana Jamin viku naka ....🙏🏻💐

  • @ashishhundre93
    @ashishhundre93 11 месяцев назад +44

    एक व्हिडीओ ऑनलाईन स्कॅमर्स वर बनवा. अमेरिकेत भारतीय स्कॅमर्स ने धुमाकूळ घातलाय म्हणे😅

    • @skk2359
      @skk2359 11 месяцев назад

      😂😂

    • @pranit77299
      @pranit77299 11 месяцев назад

      Jamtara webseries😂

    • @surajbiradar9827
      @surajbiradar9827 10 месяцев назад +1

      Indian म्हणजे scammer अशी समज झाल्या दादा... भारताच्या image ला घोडा लावला ह्या scammers नी

  • @licinsuranceadvisordhananj3367
    @licinsuranceadvisordhananj3367 11 месяцев назад +1

    खुप छान सर नक्कीच तुमच्या या व्हिडिओ मुळे भविष्यात आपल्या बऱ्याचशा गोर-गरीब भावा बहिणीचे किती तरी करोडो रुपये बुडन्या पासुन वाचतील.

  • @vaishnavimedicalgeneralsto9950
    @vaishnavimedicalgeneralsto9950 11 месяцев назад +1

    बोलावलं होतं ऐकून लय भारी वाटलं, बाहेर जाऊन जयहिंद जय महाराष्ट्र

  • @manoharmali8381
    @manoharmali8381 11 месяцев назад +1

    खूपच छान रित्या समजवलं आहे दादा तु मि पण अशाच नेटवर्क मार्केटिंग मधे फसलो होतो Galway कंपनीत २०१८ साली ते फक्त मोटिव्हेशन करून ब्रेन वॉशिंग करायचे आणि असं दाखवायचे कि नोकरी करून काहीच उपयोग होत नाहीत

  • @popatkedari9044
    @popatkedari9044 11 месяцев назад +10

    2007-08 च्या दरम्यान मला पण एक एजन्ट भेटला होता.... तो मला गुंतवणूक करायला सांगत नव्हता.... पण मला इतर लोकांकडून पैसे जमा करायला सांगायचा.... माझ्यावर लोकांचा विश्वास होता म्हणून.... मोठी स्वप्न दाखवायचा.... दारात आलेल्या लक्ष्मीला लाथ का मारतोस असं म्हणायचा... पण मी एक दिवस त्याला भयंकर दम दिला.... मग तो परत आला नाही... पॅनकार्ड कंपनीचा एजन्ट होता तो 😂😂😂😂😂

  • @mayurthukural1167
    @mayurthukural1167 10 месяцев назад +3

    जुन्या आठवणी जाग्या झाल्या, माझ्या मित्राने त्याच्या विधवा आई ची चैन मोडून दहा हजार या scheme मध्ये घातले. मी घरच्यान च्या विरोधामुळे आणि पैसे नसल्या मुळे वाचलो, नाही तर मी पण त्या motivational speeches ला बळी पडलो असतो.

  • @sachinmadhale2373
    @sachinmadhale2373 11 месяцев назад +6

    सर क्रिप्टोकरन्सी बद्दल माहिती सांगा आमच्या मित्रांना लय खाज आहे क्रिप्टोकरन्सी ची

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy 11 месяцев назад +19

    जून झालं आता हे, इथं मोदीच कुणी ऐकत नाही ते कोण chain मार्केटिंग वाले, ते फक्त आता youtube content झालाय 😂😂

  • @yashmirashi2956
    @yashmirashi2956 11 месяцев назад +7

    आजचा विषयंच भारी!!
    भाऊ लयभारी👌🏽😅 प्रेझेंटेशन! आधी video आला असता तरी किती भाऊ वाचले असते या धंद्याला लागण्यापासून...

  • @sardarlohar5547
    @sardarlohar5547 11 месяцев назад +14

    2016 ला मला पण एक जण clg. रोड वर भेटला होता, त्यानं मला त्या सेमिनार मद्ये नेल होत.😂 लय बेकार तापवत्यात तिथं. पोरी तर एक smile करून खुळ करून सोडत्यात, मला 15000 चा DD करायला सांगितला होता. त्या सेमिनार मद्ये 17 वर्षाचं 1 मुलगा महिन्याला 3 लाख कमवत होता. 😂🤣😂

  • @igtoxic6814
    @igtoxic6814 10 месяцев назад +1

    Mi hi adaklo asto around 2016 2017 majha ek friend mala hya scheme madhe gheun ala hota tyani khup Chan explanation dila amchi company ashi ahe tashi ahe and kind off hypnotize kela ki tumhi amche package ghya the package was around 16k something mipn khush jhalo success chya navakhali and then mummy la bolo mi majhya mummy ne samjun sangitla ki asa kahihi nast because sgl kahi aplya manasarkh hoilch asa nahi but mi aikla nahi ani paise denarch hoto teva punha vichar ala ki mummy ne bolay mhnje nakkich kahitri asnare ani mi RUclips vrti bgitla tr fraud nighala ani mi ani amche kashtane kamavlele paise donhi vachle😂❤

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy 11 месяцев назад +4

    नवीन मसाला पाजेल असणं तर आपला विषयच भारी,

  • @rohitdake9673
    @rohitdake9673 10 месяцев назад

    मी पण गेलो होतो सेमिनार ला मित्राचं ऐकून पण मला देखील घरच्यांनी नकार दिला होता १०००० द्यायला. आज मी स्पर्धा परीक्षेची तयारी करून सेंट्रल रेल्वे मुंबई येथे नोकरी करत आहे. त्यावेळी नकार देणाऱ्या माझ्या आई वडिलांचे अणि माझ्या बहिणीचे आभार

  • @chandrashekharmhaskar
    @chandrashekharmhaskar 11 месяцев назад +7

    प्रत्येक वर्षी 2 करोड नोकर्‍या?
    कोणीतरी देणार होते. 😅

    • @3382Sagar
      @3382Sagar 11 месяцев назад +1

      Same here

  • @chetanjagdale8480
    @chetanjagdale8480 11 месяцев назад +5

    Please make a video on deusoft scheme also. This was also the same kind of structure like ebizz.

  • @amarganbavale4844
    @amarganbavale4844 11 месяцев назад +3

    भाई आता सद्या पामोसा म्हणून कंपनी सुधा अशी आहे सद्या मार्केट मद्ये त्यांच्यावर सुधा एक व्हिडिओ बनव....काही माहिती विचारायची असेल तर रिप्लाय द्या भाई मी पूर्ण सांगेन ....

  • @HeartEarnMoney3
    @HeartEarnMoney3 11 месяцев назад +4

    Ebiz ने अनुभव दिला.. प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने घेतला.. काही जणांनी पॉसिटीव्ह वे तर काय जणांनी निगेटिव्ह वे मध्ये...

    • @palpa9614
      @palpa9614 11 месяцев назад +7

      तू ebiz वाला दिसतोय 😂😂

    • @hp8873
      @hp8873 11 месяцев назад

      ​@@palpa9614😂

    • @sushilkulkarni8434
      @sushilkulkarni8434 5 месяцев назад

      How was your experience? Elaborate if positive.

  • @deepaklaxmanshinde4953
    @deepaklaxmanshinde4953 6 месяцев назад

    खूप छान माहिती मिळाली..... Osmose Technology pvt ltd बद्दल माहिती द्यावी...

  • @SatyamevaJayate_JaiHind
    @SatyamevaJayate_JaiHind 10 месяцев назад +2

    माणसं ओळखायला शिकवल त्या कंपनीने. माझ्या ओळखी मध्ये एका पोराचे वडील पोलिस ऑफिसर होते, तो पोरगा सुद्धा eBiz मध्येच काम करायचा घरच्यांचा support होता त्याला 😂😅

  • @rahulchouri7973
    @rahulchouri7973 11 месяцев назад +6

    चांगलंच अनुभव घेतलं आहे मी😢

  • @adityanevase8156
    @adityanevase8156 10 месяцев назад +2

    Webseries yeu शकते ह्या topic var. 😅🎉 @Balki

  • @PayalSP3110
    @PayalSP3110 11 месяцев назад +2

    Sir, Osmos technology baddal sanga

  • @wwetrendhindi
    @wwetrendhindi 11 месяцев назад +4

    mi lifestyle mlm compony vishayi sang bhava

  • @kalyanibibave3324
    @kalyanibibave3324 11 месяцев назад

    खुप खुप छान माहिती आहे आम्ही सुद्धा असेच फसलो

  • @satishbadve4831
    @satishbadve4831 11 месяцев назад +19

    गरिबांचा खाऊ माणूस कधी सुखी नाही होतं शेवटी तोही रस्त्यावर आला

  • @DIGPRANGEBLR
    @DIGPRANGEBLR 11 месяцев назад +1

    1)Forever living products
    2)Safe shop
    hi pm company tashich aahe pn Yana laj vatat nahi judnaryana tyanchya mule product 4 te 5 patine jast mahag viklya jate aani sarv chorun selling chalu aste

  • @pramodkhatake8715
    @pramodkhatake8715 10 месяцев назад

    असाच नवीन व्हिडिओ एक सर बनवा तरुण मुलांसाठी ती फक्त मटका याच्यामध्ये पोरं खूप वाया जात आहेत

  • @eknathkhandagale5009
    @eknathkhandagale5009 11 месяцев назад +1

    सर पुणे, मुंबई येथे पण अशी एक नेटवर्क मार्केटिंग कंपनी आहे ते पण मोठे स्वप्न दाखवून तरूण मुलांची फसवणूक करत आहे त्या कंपनीचे नाव internacia आहे तुम्ही ज्या प्रकारे explain केल तशाच प्रकारे ते मोटीवेशन देत असतात

  • @akashwaiker2976
    @akashwaiker2976 11 месяцев назад +4

    Great info for young generation

  • @dineshsah6161
    @dineshsah6161 9 месяцев назад +2

    2007 and 2008 was peak time during which i too became victim in Pune but thank god tht i did not left job otherwise ....

  • @satishdhanokar6637
    @satishdhanokar6637 6 месяцев назад

    मी पण फसलो या घोटाळ्यात , कष्टाशिवाय पर्याय नाही , प्रकरणातून धडा घेऊन स्पर्धा परीक्षा अभ्यास केला, रेल्वेत नोकरी मिळवली,

  • @pravinbidkar7188
    @pravinbidkar7188 11 месяцев назад +2

    Ek number bhawa 😂😂😂 Baghitlay amhi ha phase 2010 te 2013. Ekta college madhe sinhgad campus madhe firtama disal ki lagech ebiz vale pakdayche. Amchya campus madhe dhahshat hoti ebiz valyanchi 😂😂😂

  • @User3_1.2_Na
    @User3_1.2_Na 11 месяцев назад +6

    मी पण या मधे फसलो आहे. खूप सारे चांगले मित्र गमावले 😢
    50000rs गेले पूर्ण खर्च काढला तर.
    ते दिवस आठऊन धडकी भरते.
    Beware of such scams.

  • @stitchintimesaves9405
    @stitchintimesaves9405 11 месяцев назад +2

    आयुष्यातली महत्त्वाची 2 वर्ष वाया घालवली.... , आजही शेकडो नेटवर्क मार्केटिंग कंपन्या लुटत आहेत.... त्या पेक्षा पोरांची वेळ वाया घालवत आहेत..

  • @MundheSarkar
    @MundheSarkar 11 месяцев назад +1

    मला माझ्या मैत्रिणीने बोलावलेलं सेमिनार साठी. 50 रुपये घेतले तेव्हा माझ्याकडून. तेव्हाच मी समजून गेलो की काहीतरी चुकतंय आणि तेव्हा घेतलेला निर्णय योग्य ठरला....😅😊😊

  • @priteshsurve757
    @priteshsurve757 11 месяцев назад +19

    I have also gone for the seminar but the main sir who was going to take the seminar i have seen him traveling in the local 2nd class coach and he in the seminar he was telling i own the ford ecosport car and r15 bike but i was knowing the reality and in whole seminar i was laughing by just seeing his acting skills so i was not trapped in that scam i was lucky 😂

    • @nileshgujar07
      @nileshgujar07 10 месяцев назад

      Same here bro

    • @kuldeepsankpal6443
      @kuldeepsankpal6443 10 месяцев назад +1

      Bhava seminar madhe bolayla pahije hotas
      Sir mag sakali local mahe kay krat hota 😂

    • @adishinde
      @adishinde 10 месяцев назад

      Me pan gelo hoto.. to main sir mhanala Rolex watch ghetli last month.. Ani baher Yeun splendor he ghari gela.

    • @devilshanky534
      @devilshanky534 9 месяцев назад

      ​@@kuldeepsankpal6443 problem hech ahe k te lok seminar madhe konala bolu det nai.

    • @kuldeepsankpal6443
      @kuldeepsankpal6443 9 месяцев назад

      @@devilshanky534 accha

  • @drshankey8043
    @drshankey8043 11 месяцев назад +1

    Thank God! Somebody made video of this MLM multi level marketing scheme.
    भरपूर pora yedi zhali hoti tevha! Marketing chi height mhange तेव्हा pora asa mhanaiche ki PM Manohansingh is a EBizer...😂

  • @akshayraut1317
    @akshayraut1317 10 месяцев назад

    2017 साली मी यामध्ये investment kela hota pan 1 ch id kadnar hoto, kahi diwasani he loka evade force karta hote ghari ale hote 3 I'd banvuch getel maze total 50k investment ahe but 1 I'd asta tar tychya seminar madhyun kahi experience Milala pan

  • @suyashmahajan4153
    @suyashmahajan4153 7 месяцев назад

    2007 साली या इबिज मध्ये काम केलं होतं एक वर्ष पण नंतर हे फ्रॉड आहे हे समजल्यावर शेवटी तो गाव सोडावा लागला.. खूप मनस्ताप झाला सावरायला 1 ते 2 वर्ष लागली.. देवाची कृपा की आता स्टेबल आहे चांगली नोकरी आहे.. माझं एकच सांगणं आहे की अशा स्कीमना कुणीही भुलू नये.. 🙏🏻

  • @KiranMohite-v9z
    @KiranMohite-v9z 10 месяцев назад +1

    15 वी झाल्यावर आम्हला पण पंजाब ला नेल.
    आणि फसवल पण कुणी जवळचा दोस्तान.
    तवापासून दोस्त म्हणजे दुस्मन वाटायला लागतो.

  • @manmohanb501
    @manmohanb501 11 месяцев назад +1

    नमस्कार मिञानो मी सोलापूरचा ebiz मध्ये मीही पैसे गुंतविले पण दोनच दिवसानी सेमिणार मध्ये एका वाघाने motivation देणाऱ्या माणसाला कानाखाली वाजवली मग प्रकरण मोदी पोलिस चोकीत तक्रार दाखल करण्यात आली तर ते त्या वाघावर मी तेव्हा विचार केला कुठलीही MLM कंपनी मध्ये पैसे गुंतविणार नाही 😢😢😢

  • @shaikhsohail0021
    @shaikhsohail0021 11 месяцев назад +5

    4-5 वेळा मी यांचा ebiz च्या fucntion ला गेलो होतो नुसता dj वाजवाईचा आणि भाषण देयच आणि भोळ्या भल्या पोरानं कडून पैसे उपटायचे खूप लुटलं येडं बनुवावून पन एक होत की मेहनत करून पैसे जे कमावतो तेच बरं नुसतं बसून खा न जिरत नाय.

  • @MSB-zh5ww
    @MSB-zh5ww 11 месяцев назад

    आपणच जबाबदार असतो अशा कंपण्या मोठ्या करण्यात .shortcut पाहीजे असतो आजच्या पिढीला पैसा कमवायचा, मेहनत करायला रो@ ग येतो

  • @ajitk1569
    @ajitk1569 11 месяцев назад +2

    😂😂.. मी दोन सेमिनार अटेंड केले होते..engineering करत असताना Ebiz che. पण सुदैवाने घरी पैसे मागितल्यावर वडीलांनी काठीने मारले होते... आणि वाचलो... 😅😅

  • @VishnurajVBh
    @VishnurajVBh 10 месяцев назад +1

    माझे पण खूप मित्र-मैत्रिणी होती eबीज करणारे पण मी अक्षरशा त्यांना एकेक तास जीवाला कौटाळून सांगितले अरे करू नका करू नका, लगेच श्रीमंत काय नसतं असला तरी पन ऐकले नाही, आता ते रडत आहेत....आत आधी मधु प्यायला बसतो तेव्हा मी हसतो त्यांच्यावर...अक्षरशः अब्रू काढतो त्यांची 🤣🤣🤣

  • @Janvi_wari_45
    @Janvi_wari_45 10 месяцев назад +1

    Saddhya navi mumbai madhe BIOSASH khup chaltoy part time aani fulltime bolun khot sangun 24000 bharle mi pn tya nntr mla he smjl kiti pressurized krtat hi lok join kra aani gharatle pn boltat jevha he structure mla kalal tevha mi tyatun baher pdle 😢 paise gele te kdhitri kmvta yetil 😢 pn ekhadyala aapn fslo he mahit asun jr dusrya konala 200-500 sathi fsvl tr to kiti motha vishwasghat tharel 💔

  • @jayeshbhoi6126
    @jayeshbhoi6126 10 месяцев назад

    चुना लागता लागता वाचलो... माझ्याकडून Half DD म्हणून 4,000 रू. घेतले होते.. पण मी ते upline वाल्यांना भरायला लावले... घरच्यांनी शिव्या दिल्या... मी Ebiz चा नाद सोडला... 😢😢 म्हणून अशी कोणतीही scheme नेहमीच सर्वसामान्यांच्या नुकसानीची असते..

  • @Raigadala_ali_jag
    @Raigadala_ali_jag 11 месяцев назад +14

    Year 2011 - 1 st year engineering
    Ek couligue ebizz cha course gheun ala tyacha mate ebizz madhe tyane Kam Karun Avenger ghetli hoti😂
    To murkha hota tyane baryach janana murkha banawale asel pan mi nahi banlo yatach dhanya watata Ani jyanche 10 hajar gele Tyanna rip😢

    • @shreejagroupcarrierpath9003
      @shreejagroupcarrierpath9003 11 месяцев назад

      आता आपण काय करता?😂

    • @Raigadala_ali_jag
      @Raigadala_ali_jag 5 месяцев назад

      Ata engineer ahe Ani stock market che knowledge ahe tyawar kamai chalu ahe 😊​@@shreejagroupcarrierpath9003

  • @RMM940
    @RMM940 11 месяцев назад

    मी पण फसलो आणि सोन्याची चैन ठेवून पैसे भरले 30 हजाराला लुटला मला तिथपासून असल्या फालतू लोकांवर विश्वास नाही ठेवत मेहनत करावी आता जरी आठवलं ना तरी राग येतो त्या गोष्टीचा, तेंव्हा का कोणी मला थांबवलं नाही तेंव्हा घराचे नाही म्हणत असताना पण पैसे भरले तर काय गाडी बंगला आणि पैसा 😢 तिन माणसे जोडा 😅 आता ऐकलं तरी दोन कानाखाली द्यावं अस वाटत 😅

  • @madhukarshivmore9574
    @madhukarshivmore9574 11 месяцев назад +1

    Swadeshi ya scheme संबंधि video banava.

  • @tonguetwisters7319
    @tonguetwisters7319 11 месяцев назад +2

    मिही यात पडलो पण पॉसिशन विकून 5000 काढून घेतले

  • @pravin272
    @pravin272 10 месяцев назад +1

    Ebiz मुळे अक्कल मिळाली..पुन्हा कधीच कोणत्या स्कॅम मध्ये अडकलो नाही...

  • @Amol_ajit
    @Amol_ajit 10 месяцев назад +3

    I was victim and I done lot of hardwork 😢

  • @mohanayare
    @mohanayare 10 месяцев назад

    दुर्दैवाने आणि लोभाने स्वतः फसलो पण देवाच्या कृपेने, अक्कल लवकर ठिकाणावर आली आणि कोणालाही member बनवलं नाही.

  • @Wellvvisherr
    @Wellvvisherr 5 месяцев назад

    EBiz साठी घेतलेले पैसे Bitcoine मध्ये टाकले आज करोडपती आहे ❤️

  • @dika921
    @dika921 11 месяцев назад +1

    Kharach dada me ajun kunala comment keli navti but aaj mana pasun comment karte 😢😢😢 maze 51000 gele plus Wednesdays meeting 30-40 rupees entry fees, plus Sunday seminar 50 rupees entry fees khup paise weast zalet maze me chuk keli mazya mule khup lokanch nuksan zal mazya bahin bhavala pn gheun gele me , pn nanatr maze pappa off zale 😢😢😢😭😭😭😭😭 nantr dole ughadle dada maze , me pan 2019 madhe new delhi la gelte tya seminar madhe khup loss zala dada maza, me mazya relative na pan khup mothe aashvasacn det hote pan nantr maze doghe ughadle ,😢😢😢😢asech videos banun lokanche dolhe ughad dada .

    • @dika921
      @dika921 11 месяцев назад

      17000 per DD fees hoti , 😭😭😭😭me tyancha Aikun loan kadhal aani 3 DD banvle 51000 bharle hote😢😢😢😢😥😥😥😥😭😭😭😭khup loss zala tya mule khup family issus zalet ratri 1-2 vaje paryant gharatun baher asayche meeting vagere customer shodhne sagla karat kadhi ardhi ratr hoich kalat navt , ghari yayche jeun zopayche tech sakali punha 6 :00am gharatun nighayche pan fayda kahich nahi khup loss zala dada maza 😢😢😢😢😢 literally mazi family pan nit mazya sobat bolat nahi aata khup nuksan zal aani gharat me mothi aahe aadhi Mala Vichare decision gyayche , aata 😢😢😢😢 tranche decision Mala sangtat hya eBIZ mule mazi family pn mazya pasun Duravli Purna pagal kelt hya ebiz ne, but aso aata maz lagn zalay aani maze husband khup supportive aahet , hya saglyatun tyani Mala Baher kadhal , plz dada ase videos banun lokanche dole ughad 🙏🙏🙏🙏🙏khup aashirwad milel tula 😊😊😊

    • @aju125
      @aju125 11 месяцев назад +1

      Tai Mee pn 30000 laa faslo😢😢 mazya aai ne...gold विकून ते पैसे मला दिलेलं होते..मी खोटे बोलून जास्त पैसे मिळतील mhnun te paise ghetel ह्यांच्या madhyvr घातले...आणि फसलो..
      अजून ते आठवले तरी त्रास होतो🥹🥹🥹

  • @Nilesh18390
    @Nilesh18390 10 месяцев назад

    E bez मुळे कितीतरी पोर अभ्यासापासुन दूर झाले....
    ऐन अभ्यासा चा काळ सेमिनार अटेंड करण्यात गेला...
    स्वतःच्या करियर च वाटोळ करुण बसलेत.....

  • @prakol478
    @prakol478 11 месяцев назад

    ए.एस् ट्रेडर्स ने अशीच 30 हजार कोटी ते 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करवून घेतली आहे . पण ए.एस ट्रेडर्स संचालक अजून मोकाटच आहेत . त्यांचे वर कारवाई कधी ? त्यांच्या मालमत्ता जप्त केल्या जावेत . आणि लोकांचे पैसे परत मिळावेत .

  • @NitinSatpute-7007
    @NitinSatpute-7007 7 месяцев назад

    मी गॅलवे कंपनीला फसलो जळगाव भुसावळ ला सगळ्या गाबड्यानां सर म्हणायच
    आणि काय काय गडी 150 पॅन्ट 100 शर्ट 50 कोट घालुन येयची
    फक्त 15 दिस होतो आणि फक्त 2 वेळा अंघोळ केली होती
    आणि मी तर ट्रेलर ड्रायव्हर होतो ड्रायव्हिंग सोडून मोटारसायकल विकुन गेलो होतो
    आणि त्यांनी एक ड्रेस दिला होता शिवुन रोज घालायचा सेम टू सेम HP पेट्रोल पंपावरच्या कांमगारासारखा

  • @rajkumarkunde980
    @rajkumarkunde980 10 месяцев назад

    आम्ही 6/7 मित्र यामध्ये गुंतलो गेलो होतो. माझ्या काही मित्रांनी जमीन विकून पैसे अरेंज केलेले. आणि 1 मित्र तर 3 वर्ष पागल झाला होता . त्याला हॉस्पिटल साठी 5/10 लाख रुपये खर्च आला. पैश्यासाठी दुसऱ्या सोबत वाईट वागतात त्यांचं कधीच भल नाही होत

  • @madhavaarotale4578
    @madhavaarotale4578 11 месяцев назад +3

    Thanks making video about this
    I was also joined and with me 50 other my friends and later on everyone was angry on me
    That was really bad feeling
    I lost many of my friends due to this Bullshit

  • @atulkatkar216
    @atulkatkar216 11 месяцев назад +1

    mla pn ek bhetla hota khup try kela tyani mi pn faslyasarkh dakhvl ani mazi bhangar zaleli without documents bike tyalach vikun bamboo lavla😊

  • @anandapatil3568
    @anandapatil3568 10 месяцев назад

    आमच्या इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये पण काही मुलं मुली होती.. जी ह्या स्कीम मध्ये involve होती...
    मी गंडलो नाही सुदैवाने
    फार पूर्वी एक कंपनी होती.. कल्पवृक्ष
    .. आमच्या गावातील बऱ्याच लोकांचे पैसे बुडाले होते.
    मी तर MLM पासून चार हात लांब राहतो..

  • @mrpranay9370
    @mrpranay9370 10 месяцев назад +1

    मी पण बळी पडणार होते...पण माझा कडे तेव्हा पैसे न्हवते म्हणून वाचलो आता वाटते बर झाले नव्हते म्हणून🤣

  • @kishorbhaud3393
    @kishorbhaud3393 9 месяцев назад

    ho aathvtoy majhe 2016 la mi pan 10000 ru bharle hote ,aani 7 seminar attend keya,last la samjle ki kahitari gadbad aahe. aani ti manse paise sudha det navhte ,shevtil paise nahich bhetle 😔

  • @RN_Edits_3755
    @RN_Edits_3755 10 месяцев назад

    माझ्या पण मित्राने mi life style join करायला सांगितले होते सेमिनार ला बोलावले आणि 30000 मागू लागले त्या बदल्यात product देऊ असे सांगितले 3 माणसे जोडल्या नंतर तुम्हाला income सुरु होईल लाखात असे म्हटले 😂😂😂

  • @siddheshanaokar2739
    @siddheshanaokar2739 9 месяцев назад

    भावा "RMP" नावाने सुद्धा एक scheme आली होती. पण कमीत कमी त्यांनी "suit" शिवायला कपडा दिला होता.

  • @Smiling-Monk
    @Smiling-Monk 11 месяцев назад +1

    मी एक मित्र गमावला अजूनहि तो ऑनलाईन दिसतो पण बोलायच होत नाही 😔

  • @tusharwaghmare5326
    @tusharwaghmare5326 11 месяцев назад

    Mazya lahan bhavala ek mulagi tula bolvat ahe mhanun tuition varun nele tyachya mitrane😂

  • @vikramsolanke423
    @vikramsolanke423 6 месяцев назад

    Amway chain बद्दल सुद्धा कृपया माहिती द्या ती पण यासारखी चैन आहे

  • @vijaydevkar8321
    @vijaydevkar8321 11 месяцев назад

    Rmp company che mahit sanga kashe band padli

  • @nileshlokhande3678
    @nileshlokhande3678 11 месяцев назад

    भरपूर शिव्या खाल्या मी घरातल्यांचा पण फ्रण्ड्स चा पण फसवे गिरी खूप लेट समजली ही 😡

  • @impreranathakare
    @impreranathakare 11 месяцев назад

    Forever Living Products madhye 1 varsh kam kel. Sagli saving sampli. Sagle products use kele. But kuni join zal nahi. Finally sodun dil. Tyamde sudha same motivation deun deun lokana emotional blackmail kel jat ani 25k che products purchase karayla lavtat. Lok vedya sarkhe 3-4 varsha pasun supervisor level var ch kam karat ahet. Svatache kharch nighat nahi tyanche loan fedat ahet but lokana motivation dyaych band nahi hot tyanch.