आईने शिळ्या भाकरी खाण्यापासून ते फौजी आणि बिझनेस मॅन होईपर्यंतचा प्रवास|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 сен 2024
  • दोन्ही फौजींचा लोकांच्या शिळ्या भाकरी मागुन खाण्यापासून ते फौजी आणि बिझनेस मॅन होईपर्यंतचा प्रवास
    #sakkhhyabahinisakkhhyajava
    #vlog
    #fauji
    #lifetylestory
    #imotinalstory

Комментарии • 618

  • @pratibhaghemud2008
    @pratibhaghemud2008 11 часов назад +490

    गवर्नमेंट जॉबचा कुठेही नाही माज,हा तर आहे आमचा खरा साज, सख्या बहिणी सख्या जवांचा पोहचला घरा घरात आवाज ,तुम्ही जगाला दाखवून देताय स्त्री शक्तीचा खरा राज ,आणि म्हणूनच भारती ताई स्वाती ताई तुमच्यावर आहे सर्वांना नाज❤❤❤

    • @Smitaik-v
      @Smitaik-v 11 часов назад +9

      👍👌

    • @SUNWOODIND
      @SUNWOODIND 10 часов назад +8

      Bharti Swati doghinvar keleli kavita khup chhan zali ahe, abhinandan Tai.

    • @PMarkad-wu5tl
      @PMarkad-wu5tl 10 часов назад +3

      खूप छान ❤❤❤

    • @PoojaBundele-r6n
      @PoojaBundele-r6n 10 часов назад

      👍👌

    • @parmeshwarshinde873
      @parmeshwarshinde873 10 часов назад +8

      😭😭😭😭😭 एकीचं बळ महत्त्वाचा आहे ताई या पाठीमागे

  • @anitasune4273
    @anitasune4273 10 часов назад +45

    दोन्ही फ़ॉजी ना खूप मनापासून सलाम🙏🙏त्याचा जीवन प्रवास ऐकून खूपच काही शिकल्या सारखे वाटले मेहनती शिवाय फळ नाही हे खरंच खुप खुप सलाम त्यांच्या मेहनतीला,,🙏🙏

  • @VinitLoke
    @VinitLoke 11 часов назад +43

    तुमच भावा भावाच नात बघुन खुप छान वाटल सगळयांना असाच भाऊ लाभु दे हिच शंकराच्या चरणी प्रार्थना

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 9 часов назад +60

    ऐकुन खूप वाईट वाटले सांगीतल्या पेक्षा खूप कष्ट केलेले असतील एवढे हलाखीचे दिवस काढून सुद्धा एट अक्षरही वडिलांविषयी वाईट बोलले नाही किती मनाचा मोठेपणा आहे शब्दच नाही सलाम आहे तुमच्या कष्टाला त्यात दोघी लक्ष्मुम्यांनी कष्टाची जाणिव ठेवून आक्का आणि बाबांवर खूप प्रेम करतात जीव लावतात काळजी घेतात असेच सर्व कायम आनंदीत आणि आरोग्यमय राहो हिच भोलेबाबांकडे प्रार्थना सर्वांचे विचार खूप चांगले आहे म्हणून चांगलेच होणार

  • @mangalgovilkar1233
    @mangalgovilkar1233 10 часов назад +25

    राजू फौजी चे बरोबर आहे त्याचा ड्युटी चा त्याना अभिमान आहे 🙏हॅट्स ऑफ आहे मुठे फॅमिली ला जीवन प्रवास ऐकून पाणी आले डोळ्यात 🙏

  • @rupalidevgade7505
    @rupalidevgade7505 10 часов назад +47

    😢😢झालं आता सगळ्याच समाधान. I hope सगळ्यांना ज्याचे त्याचे उत्तर मिळाले असतील. खुप कष्टाने मोठे झालेत देव तुमाला यापेक्षाही उंच शिखरावर पोहचवो हीच हीच आई भवानी चरणी प्रार्थना.

  • @swatihirave1643
    @swatihirave1643 10 часов назад +18

    दोन्ही फौजींचे कष्ट आणि बाबा आणि आशीर्वाद होता म्हणून शून्यातून विश्व निर्माण केले. दोन्ही फौजी ना आणि तुम्हाला दोघींना हॅट्स ऑफ🎉

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 10 часов назад +17

    भारती आणि स्वाती, आजच्या व्हिडिओ मध्ये फौजीचा जीवन प्रवास ऐकून डोळे भरून आले, आईचे कष्ट, दोन्ही फौजीनी आई वडील चे नाव मोठे केले, त्याच्या कष्टाचे चीज झाले , तुम्ही दोघी बहिणी नी त्यांना छान साथ दिली, बाबाची आणि अक्काची छान काळजी घेता तुमच्या दोघींचा स्वभाव खूप छान आहे , प्रेमळ आहे, तुमचे व्हिडिओ खूप छान असतात

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 10 часов назад +22

    दाजी तुमच्या कष्टांना तोड नाही तुमच्या आईचा बी कौतुक केलं पाहिजे फायनली छोटे फौजी आले म्हणायचं व्हिडिओ मध्ये तुम्हास चौकांना बघून भारी वाटतं

  • @madhuribhambare904
    @madhuribhambare904 9 часов назад +21

    रडले आज 😢😢😢😢 स्वामी केलेल्या कष्टाचं फळ नेहमी देतातच आज खुप मनापासुन प्रार्थना करते नेहमी या फँमीलीच्या प्रयत्नांना यश दे खुप काम करा खा प्या नेहमी आनंदी रहा निरोगी र हा समाजसेवा करा खुप खुप खुप खुप खुप खुप खुप आनंदी रहा खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप शुभेच्छा तुम्हांला ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @swatilondhe112
    @swatilondhe112 8 часов назад +27

    तुम्ही दोघींनी या खडतर प्रवासातून तावून सुलाखून निघालेले हे दोन जवान फौजिना इतक्या सुंदर पद्धतीने साथ देताय ....हिरा तेव्हाच चमकतो जेव्हा त्याला सुंदर कोंदण मिळतं....तर तुम्ही दोघींनी त्यांच्या आयुष्याला 4 चांद लावलेत....तुमच्यातील प्रेम ,अक्का बाबा प्रती असणारी आदरयुक्त भावना....तुम्ही दोघी सुशिक्षित, समंजस आणि कष्टाळू असल्यामुळे घराला सुंदर पद्धतीने एकसंध ठेवलेत.....अशाच रहा...कुणाची नजर न लागो....मला तुमचा प्रत्येक ब्लॉग खूप आवडतो....very honest and pure❤😊🎉

    • @swatilondhe112
      @swatilondhe112 8 часов назад

      Pl.vacha Mazi comment n reply

    • @nstutorials8347
      @nstutorials8347 8 часов назад

      खूप छान comment

    • @pratibhapatil8488
      @pratibhapatil8488 6 часов назад +1

      स्वातीताई खूप सुंदर लिहिलं तुम्ही. 👌🏼👌🏼आहेतच गुणवान दोघी. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. सासूबाई भोळ्या आहेत आजारी असतात पण दोघी बहिणींना कोणी सांगणारे व शिकवणारे नसून कशा हुशारीने वागतात. सर्व व्रत वैकल्य नीटनेटके करतात. मला पण भारी आवडतात. त्यांना भरभरून प्रेम मिळत आहे महाराष्ट्राचे 👌🏼

  • @sunitashrigadi6750
    @sunitashrigadi6750 10 часов назад +13

    दोन्ही फौजीनां मनापासून सलाम ❤❤❤❤त्यांची जीवन कहाणी ऐकताना डोळ्यात पाणीच आलं 🙏🙏🙏🙏

  • @NamrataVagal
    @NamrataVagal 10 часов назад +14

    भारती, स्वाती फौजींचे त्यांच्या आईचे खडतर जीवन प्रवास ऐकुन डोळयात पाणी आल.खरच speechless.

  • @pratibhasarmalkar2504
    @pratibhasarmalkar2504 10 часов назад +26

    शरीरावर झालेली जखम भरून निघते. पण मनावर झालेली जखम कधीच भरून येत नाही.अनुभव आहे. दोन्हीं फौजिना सलाम .Iam fauji wife and fauji girl.👍

  • @श्रीस्वामीसमर्थ-र4झ

    तुम्ही आककाची गोष्ट सांगत होते तेव्हा मला नकळतपणे आपोआप हुंदके बाहेर पडत होते खरचं आक्का सलाम तुम्हाला असे हिरे पोटाला घालून देशाची सेवा करायला पाठवले 😊❤

  • @AjitKate-o9s
    @AjitKate-o9s 8 часов назад +14

    खरंच आज मनापासून सॅल्युट फौजी ना आणि त्यांच्या आदर्श अशा विचारांना आणि त्या माऊलीला जन्म दिला तुम्हाला 😊

  • @indumatibhamare2505
    @indumatibhamare2505 10 часов назад +12

    आज दोन्ही जावई आणि दोन्ही लेकीना एकत्र पाहून खुप छान वाटले सलाम मोठे फौजी लहान फौटी

  • @vaishaliwagh6051
    @vaishaliwagh6051 7 часов назад +23

    खूप छान ताई धन्य ती माता तिच्या उदरी असे दोन रत्न जन्माला आले खूप नशीबवान आहात तुम्ही दोघी की अशी फॅमिली संस्काराने फॅमिली मिळाली मोठे दाजींचे विचार खूप छान आहे 👌👌 कलियुगात खूप मोठा आदर्श आहे तुमचं आशिष व्हिडिओ टाकत राहा जेणेकरून आताच्या पिढीला काहीतरी नवीन संस्कार मिळतील भारतीताई खूप नशीबवान आहे असा जोडीदार मिळाला तुला❤❤❤❤❤

  • @Mykitchenmytalent
    @Mykitchenmytalent 10 часов назад +20

    खरंच सिंधू मावशींनी खूप कष्ट केले आणि दोन्ही पण भावांनी मिळून आईच्या कष्टाची जाणीव ठेवली.... आणि राजू दाजी पहिल्यापासूनच खूप शांत आहेत शाळेमध्ये पण खूप शांत होते कधीच कुणाच्या भांडणामध्ये वगैरे काय पडत नव्हते... जास्त कोणामध्ये मिक्स पण होत नव्हते मी चांगल ओळखते त्यांना कारण राजू आणि मी एकाच क्लासमध्ये होतो..

  • @smitabarve6703
    @smitabarve6703 8 часов назад +11

    🙏दाजींचे विचार अप्रतिम आहे. दोन्ही ही फौजींना स्वतःच्या परिस्थितीची खूप जाणीव आहे. त्यामुळे त्यांचे हे विचार फार प्रेरणादायी आहेत. गरीबीत, कष्ट करीत आयुष्य गेल्यावर परमेश्वराने भरभरून सुख दिले आहे. ईश्वर तुम्हा सर्वांना खूप सुखी व आनंदी ठेवो. परत एकदा फौजींना मानाचा नमस्कार 🙏🙏🙏

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 10 часов назад +39

    मुठेंच्या जादुच्या पेटीत खूप अनमोल असा खजाना आमच्या समोर आला खरच राजु फौजी तुम्ही कधीही मोठया फौजींना दुख देऊ नका त्यांनी वडील नपेक्षा तुमच्या गरजा पुरवल्या तेही कशा परिस्थितीत आज स्वताच्या कानाने ऐकले आज कळाले मोठ्या फौजींना वृद्धाश्रम का काढायचे आहे ते कोटी कोटी प्रणाम दोन्ही फौजींना

  • @CSCBarsing
    @CSCBarsing 9 часов назад +7

    आजची मुलाखत खूपच प्रेरणादायी आहे. सर्वांनी तुमच्या कुटुबाचा आदर्श घेतला पाहिजे . आदर्श कुटुंब आहे दोन्ही फौजीना सलाम .👏👏

  • @HarshadaPowar-f7z
    @HarshadaPowar-f7z 8 часов назад +10

    मोठ्या फौजीचा स्वभाव खूप छान कीती समजूतदार आहेत आदर्श कुटुंब आहे तुमच खूप काही घेण्यासारखे आहे मी तर मुलीला रोज सागंत असते सासरी असच एकीन राहायचं घराचं स्वर्ग केलाय तुम्ही सर्वांनी

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 10 часов назад +42

    मोठ्या भावाचे सगळे कर्तव्य खुप छान पार पाडताय तुम्ही .राजु पण तुमचा खुप मान ठेवतात एक आदर युक्त भिती आहे त्यांना खुप छान आणी तुमच्या बायका त्यांचा पण खुप पांठीबा आहे .आस घर चालवत राहा .एक मेकांचा आदर ठेवा .

  • @BhartiGokhe-y7c
    @BhartiGokhe-y7c 10 часов назад +14

    आज चा व्हिडीओ भूप भावनीक होता अक्षशः डोळ्यात पाणी आल दाजी ची स्टोरी ऐकून आणि वृध्दाश्रम सप्न कोणत्या कारणांनी मनात आल आज कळलं दाजिंचा अभिमान वाटतो आज असा मुलगा व असा भाऊ मिळायला नशीब लागतो म्हणून ताई म्हणतात की दाजिनी शून्यातून त्याचं विश्व निर्माण केलंय अशी जिद्द व चिकाती प्रत्येक नव युवकात असावी काही तरी शिकावं या आजच व्हिडीओ तून आज चा पिढी ने खूपच छान व्हिडीओ होता आजचा❤😢👏🙏

    • @madhurisathe8649
      @madhurisathe8649 10 часов назад

      खरच डोळ्यात पाणी आले तुम्हाला देवाचे वरदान आहे खूप मोठ्या व्हा ❤❤

  • @shitaldhadge3349
    @shitaldhadge3349 10 часов назад +15

    तुम्ही चौघेही खूप समजदार आणि हुशार आहात अत्यन्त सुलभतेने तुम्ही तुमच्या मनातील भावना एवढा त्रास काढून कोणाला ही ना दुखावता व्यक्त करणे सोपे नाही म्हणतात ना माणूस शिक्षणाने नाही तर अनुभवाने मोठा होतो तसेच दोनी दादांच्या बाबतीत झाले त्याचा मोठं मन त्यांनी एवढं सहन करूनही कोणाला दोषी नाही ठरवलं खरंच मनापासून सलाम ❤️😍❤️

  • @rekhapawar3835
    @rekhapawar3835 6 часов назад +5

    दोघेही भाऊ खूपच कष्टाळू आणि मेहनती आहेत कारण त्यांच्या आईची शिकवणच अतिशय चांगली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे मुलांना त्याची जाणीव आहे म्हणूनच तर मुलं घडली.त्या आईला माझे शतश नमन🙏माझे वडीलही वयाच्या सतराव्या वर्षी भरती झाले होते त्यांनी तीस वर्ष आर्मीची नोकरी केली आणि दोन युद्ध ही त्यांच्या काळात लढले मला आर्मीवाल्यांचा खूप अभिमान आहे कारण ते खूपच कष्टातून दिवस काढतात 🇮🇳 एवढी प्रगती तीच मुलं करू शकतात जे सर्व गोष्टींची जाणीव ठेवतात आणि कष्ट करतात👏 👍

  • @vaishaliwagh593
    @vaishaliwagh593 9 часов назад +7

    भारतीताई / स्वातीताई आफ्कांना व बाबांना सलाम एवढ्या कष्टातून पोराना शिकवन संस्कार देण फार अवघड आहे पण ते त्यांनी करून दाखवले आणि त्या दोघ फौजीना पण सलाम कि कष्टातून विश्व तयार केले एवढे सोपे नसते ते त्यांनी त्यांच्या वडिलांना सिद्ध करून दाखवले आहे खूप भारी तुम्ही दोघी बहिणी खूप नशीब वान आहात कि अशे भारी नवरे मिळाले आहेत सॅलूट फौजीना नक्कीच खूप शिकण्या सारखे आहे फौजीकडे ❤❤❤❤❤

  • @BhartiPatil-r9j
    @BhartiPatil-r9j 11 часов назад +19

    खूप कष्ट केले दोघांनी त्यांना सलाम

  • @SakshiFashionCollection
    @SakshiFashionCollection 10 часов назад +6

    मोठे फौंजी खूप महत्वाकांकशी, उद्योगी आहे त आणि छोटे फौंजी पण मोठया फौंजी सारखे मिल्ट्री भरती झाले 👍🏻👍🏻

  • @alkapagare8594
    @alkapagare8594 10 часов назад +6

    🙏🏻स्वाती आणी भारती मी रोज व्हीडीओ बघते लाईक करते कमेंट खूप कमी करते .पण आज माझ्या डोळ्यात पाणी आल. फौजींची कहाणी ऐकुन सलाम दोन्ही फौजींना 🙏🏻🙏👏

  • @MakarandJadhav-qb4dw
    @MakarandJadhav-qb4dw 10 часов назад +7

    आक्का बांबाची मेहनत मोठे फौजी छोटे फौजीची मेहनत बघून दुःख झाल डोळे भरून आले भावा भावातील प्रेम बघून कौतुक वाटले परिस्थितीची जाणीव

  • @BhartiGokhe-y7c
    @BhartiGokhe-y7c 11 часов назад +9

    आज खुप वाट पहावी लागली. ताई व्हिडीओ ची काही नाही सब्र का फल मिठा होता है. राजू दाजी ला पाहून खुप वाट पहिली व्हिडिओची हे विसरून गेले. खुप आनंद झाला दोन्ही फौजी ल एकत्र पाहून. ❤

  • @asharaote249
    @asharaote249 10 часов назад +18

    दोन्ही फोजींना सलाम, great achievement. उच्च विचारसरणी. तुमच्या आक्का, आजोबांना मुजरा.

  • @AlkaWani-sg8th
    @AlkaWani-sg8th 9 часов назад +10

    2हि फौजिना सलाम. आणि विशेष आक्कंना. व्हिडिओ 1नंबर.

  • @manishaparekar1353
    @manishaparekar1353 10 часов назад +10

    दोन्ही भावांचे बॉण्डिंग छान आहे.खुप प्रगती होईल तुम्ही जेवढं सांगितले त्यापेक्षा जास्त हाल अपेष्टा अक्काने भोगले असेल म्हणून आत्ता त्यांना चांगले दिवस आले

  • @suyashkasar7109
    @suyashkasar7109 10 часов назад +6

    प्रत्येक घरी देवाला जाता येत नाही. पण आक्का बाबा च्या रूपात ते घरी आहेत. त्यांच्या कष्टाची जाणीव मोठे दादा व छोटे दादा ठेवतात. आणि तुम्ही दोघी तरी त्यांच्या मुली च आहात . माणसाने दिलेले पुरत नाही आणि देवाने दिलेले सरत नाही. तुमच्या सर्वा ना शुभेच्छा तुमची अशीच भरभराटी होवो तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्या हीच स दिच्छा🌹🌹👍👍

  • @mangeshthakare4877
    @mangeshthakare4877 10 часов назад +7

    परिस्थिती माणसाला नेहमी आहॆ त्यापेक्षा मोठच करते. फक्त माणसाची आहॆ त्या परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी पाहिजे. आणि मला तरी वाटतं ती तयारी भारती ताई, स्वाती ताई, दाजी, छोटे फौंजी आणि तुमच्या आक्कामध्ये पण आहॆ. सलाम तुमच्या जिद्दीला...... 🤗👌👌❤️❤️❤️❤️❤️

  • @UjvalaJejurkar-xi6ju
    @UjvalaJejurkar-xi6ju 7 часов назад +7

    खूप कष्ट केले तुमच्या अक्का आणि दाजी ने दोन्हीपण म्हणूनच तुमच्यासारख्या सुना मिळाल्या त्यांना

  • @amarpatil722
    @amarpatil722 7 часов назад +8

    स्वातीताई भारतीताई व्हिडिओ बघताना मला रडू आलं सगळी माणसं माझ्या मोठ्या दाजी सारखे असावेत दोन्ही फोजन ला सलाम उदंड आयुष्य लाभो अक्काचा आणि बाबांचा आशीर्वाद आहे तुम्हाला

    • @asavarichonkar2117
      @asavarichonkar2117 6 часов назад

      हो लहान फॉजी कसे येणार व्हिडीओत ते ऑन duti आहेत व्हिडियो बगतना खुप रडु आले

  • @kavitagaoture4481
    @kavitagaoture4481 8 часов назад +4

    दोन्ही फौजी दादांना सलाम तुमची स्टोरी ऐकून डोळ्यात पाणी आलं आणि तुम्ही दोन्ही बहिणी सर्व गुण संपन्न आहात तुमचे व्हिडिओ मी रोजच बघते ❤

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 10 часов назад +4

    दोन्ही फौजींना खूप मनापासून सलाम ❤ शुन्यातून विश्व निर्माण केले तुमच्या कडून खूप शिकण्यासारखे आहे फौजींचा जीवनप्रवास ऐकून डोळ्यात पाणी आले अभिमान वाटतो तुमच्या फॅमिलीचा मोठ्या दाजींचे विचार खूपच छान ❤ छोटे फौजी व्हिडिओत आले खूप छान वाटले

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 9 часов назад +5

    दोन्ही फौजींना सलाम.खूप त्रास सहन करून लहानाचे मोठे झालात.सगळ्याची जाणीव ठेवून आजचं तुमचं वागणं वाखाणण्याजोगी आहे.अशेच रहा दैवी साथ सदैव तुमच्या पाठीशी आहे.तुमच्या कुटुंबाला उत्तम आरोग्य व आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏❤️ सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा असंच
    वाढत जावो.खूप प्रेरणा देणारा व्हिडिओ 👌
    धन्यवाद सगळ्यांना 🙏🙏❤️❤️

  • @PoojaHagawane-g3o
    @PoojaHagawane-g3o 10 часов назад +4

    दोन्ही फोजी दाजींना मनापासून सलाम.दोन्ही दाजीचा जिवन प्रवास ऐकुन खरंच डोळयात पाणी आल

  • @UshaDesai-j9j
    @UshaDesai-j9j 10 часов назад +5

    खरंच आहे गरीबी तून माणूस मोठा होतो दोघांना सलाम फौजी आमच्या घरी हे मोठे त्यांनी असे च दिवस काढले दोन भावांना काही कमी पडू दिले नाही शहरात मुलं मोबाईल वेड आहे

  • @SomaKatte
    @SomaKatte 8 часов назад +4

    गरीब परिस्थितीत शिकलेल्या दोन्ही फौजी च अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दोघी बहिणींना हार्दिक शुभेच्छा आपले विचार ऐकून डोळ्यात पाणी आले❤❤

  • @dipalipandit3659
    @dipalipandit3659 8 часов назад +6

    खरचं खूपच छान होता आजचा व्हिडीओ, ऐकून डोळ्यात पाणी आले, राजूफौजींचे बरोबर आहे, ते ड्युटी मध्ये आहेत, तोपर्यंत व्हिडीओ मध्ये नाही आले पाहिजे, आम्हा युट्यूब फँमिलीला आज खूप गर्व वाटतो आहे की, तुमच्या फँमिलीमध्ये आम्ही सहभागी झालो आहोत ,भारती आणि स्वाती, तुमच्या आईवडीलांचे सुध्दा कौतुक आहे की, त्यांनी त्यांच्या मुलींची लग्न या दोन्ही फौजींशी लावून , एक मोठी देशसेवाच केली आहे, खूप खूप सलाम आणि अभिमान आहे सर्व फँमिलीचे...😊😊👍👍👌👌❤❤

  • @PragatiPawar-t3m
    @PragatiPawar-t3m 8 часов назад +14

    परिस्थिती रडवते पण आयुष्य घडवीते❤❤

  • @nilamj1453
    @nilamj1453 10 часов назад +7

    हे बरोबर आहे वडिलांच्या संपती वर मूल बिघडतात स्व त मेहनती मूल पुढे जातात मला असे मूल आवडतात सलाम दादा ल दादा च विचार बरोबर आहे वडिलांची संपती बघून मुली देऊ नये

  • @vilaspowalekar1135
    @vilaspowalekar1135 9 часов назад +4

    सख्या बहिणी आणि सख्या जावा आणि दोन भाऊ यांचे मनापासून अभिनंदन दोन्ही बहिणी आपली सासू म्हणजे काय यांचे इतका चांगल्या प्रकारे सांभाळ करतात देव तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही

  • @nstutorials8347
    @nstutorials8347 10 часов назад +5

    किती great आहेत दाजी खुप छान video किती कष्टातून दिवस काढले आहेत इतके सगळ वाईट दिवस काढून सुधा वडीलांविषाई आदर आहे आणि video बघून खूप काही शिकायला मिळाले ते म्हंजे कुनविषयी मनात वाईट ठेवायचे नाही कुणी कसेही असले तरी किती possitive thinkiking आहे दाजिंची छोटे फौजी ना बघून खुप छान वाटले असेच सतत खूष रहा 😊😊

  • @chhayavidhate2274
    @chhayavidhate2274 10 часов назад +5

    तुमची कहाणी ऐकून डोळे भरून आले मोठ्या दादांच खूप कौतुक छान जबाबदारी साभाळून घर उभारल त्या च फळही खूपच गोड दिल परमेश्वरानी❤❤🎉🎉

  • @akshaypatil5255
    @akshaypatil5255 11 часов назад +80

    आवडीचा विडीओ आलाचा अन् दुसरी खुशी मनजे छौटे पौजी विडीओ मध्ये ❤❤

  • @VijayaSawant-c7k
    @VijayaSawant-c7k 7 часов назад +6

    भारती आणि स्वाती तुम्हाला देव भेटले आहेत
    खूप नशिबवान आहात❤

  • @KomalChopade-nj5ew
    @KomalChopade-nj5ew 8 часов назад +4

    सर्व स्टोरी एकदम भावनुक करून गेली पण ताई ..तुमच्या सासऱ्यानी अक्काना दोन मुलांना सांभाळण्यासाठी आर्थिक मदत द्यायला पाहिजे होती

  • @manishadeshpande8478
    @manishadeshpande8478 10 часов назад +2

    दोन्ही ही फोजींचा जीवन प्रवास सगळा खडतर पण जिद्दीने मेहनतीने कष्टाने तो आज सुवर्ण क्षण केला त्यात तुम्हा दोघीही बहिणीने तितक्याच हुशारीने त्यांना साथ दिली 👍🏻अशीच आपली उतरोतर प्रगती होवो व आपले सगळे स्वप्न पूर्ण व्हावेत ही मनापासून सदिच्छा 🌹खूप छान फॅमिली आहे तुमची … सलाम तुमच्या कार्याला👍🏻ग्रेट आहात तुम्ही..

  • @SurekhaDubukwad
    @SurekhaDubukwad 10 часов назад +5

    ताई मि पन फौजी मिसेस आहे गर्व फौजी भावाणा सलाम संघर्ष खुप कठिन होता तुमची आई साक्षात जगदंबा देवी आहे

  • @NavanathBandgar-qf3po
    @NavanathBandgar-qf3po 11 часов назад +10

    टाकीचे घाव सोसल्याशिवय देवपण मिळत नाही ताई

  • @hinalad4159
    @hinalad4159 10 часов назад +2

    दोन्ही फौजी भाऊंना 🙏🙏 खुप च कष्टातुन सर्व मिळवलंय तुम्ही. आणि आई बाबा च्या कष्टाची जाणीवेनी मन भरून आले. आज तुम्हाला असं मोठं झालेलं बघून त्यांना समाधान लाभल. फौजी भाऊ देशाची सेवा तर करतातच पण इतर थोरामोठ्यांच्या मनाची काळजी पण घेतात. देशाला तुमचा अभिमान तर आहेच पण आम्हाला पण तुमचा सार्थ अभिमान आहे.तुमच्या सर्व ईच्छा देव पुर्ण करोत. तुम्हा सर्वांना निरामय स्वास्थ आयुष्य.आरोग्य लाभो. जय महाराष्ट्र जय शिवराय जय हिंद 🚩🇮🇳🇮🇳🚩🙏 सर्व कुटुंबीय असेच एकत्र रहा. एकता हिच आपली शक्ती आहे.

  • @PratikshaGAIKWAD-zp3wt
    @PratikshaGAIKWAD-zp3wt 11 часов назад +10

    ताई आज माझ्या मनात विचार आला होता की आज हा वीडियो नक्की येईल ❤😂
    खरच आज आला वीडियो हा

  • @manishapagare8588
    @manishapagare8588 9 часов назад +4

    दोन्ही फौजी दादांना सलाम खूप छान आजचा व्हिडिओ

  • @Maharashtrian_Mulga72
    @Maharashtrian_Mulga72 9 часов назад +6

    डोळ्यासमोर तुमचा आदर्श ठेवुन.मी पण तुमचा सारखा माणुस बनुन दाखवतो. खुप छान विडिओ.

  • @prashantnagragoje2547
    @prashantnagragoje2547 10 часов назад +3

    काय खरंच तुमच्या दोघांचा अभिमान वाटेल असा प्रवास आहे

  • @shitallondhe-mw2yr
    @shitallondhe-mw2yr 11 часов назад +7

    आज आवडीचा व्हिडिओ बघायला मिळाला खूप छान वाटले

  • @SuryakantMhetre-o3t
    @SuryakantMhetre-o3t 9 часов назад +1

    स्वाती भारती ताई तुम्ही फैजी आक्का बाबांची काळजी घेतात पण त्यांचा आधी चा प्रवास एकलाना तेव्हा डोळे भरून आले त्यांची खूप खूप कळजी घे ताई दोन्ही दादांना पण सलाम❤

  • @PriyankNikshe
    @PriyankNikshe 8 часов назад +2

    खुप मोठा फौजी संघर्ष केली अभिमान वाटते मला सगळ्या गोष्टीचं ऐकून पण खूप असं डोळ्यात पाणी आले

  • @manishadeshpande8478
    @manishadeshpande8478 10 часов назад +4

    सगळे ऐकताना मन खुप भरून आले

  • @kavitahande5056
    @kavitahande5056 8 часов назад +1

    दोन्ही फौजी ना सलाम खरच खुप कष्ट करावे लागतात आर्मी भर्ती साठी माझा भाऊ पन आहे आर्मी मध्ये आहे.पण प्रत्येक जण जाणीव नाही ठेवत आपल्या आई वडिलांच्या कष्टाची नोकरी लागली की लग्न केले ते पण कोर्ट marriage दोन वर्ष माहिती सुद्धा होऊ नाही दिले.. आज दोन्ही दाजीना पाहून रडू आले की माझा पण भाऊ असा असता 😢😢 खरंच.. शेवटीं रडू आवरले नाही..
    आज चा ब्लॉग खरंच खुप छान होता god bless you too all

  • @AnnapurnaBamankar
    @AnnapurnaBamankar 8 часов назад +6

    त्याची जीवन कहाणी ऐकताना डोळ्यात पाणीच आलं दोन्ही फौजीनां मनापासुन सलाम

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775 8 часов назад +2

    खरंच तुमचा हा प्रवास आजच्या पिढीला सांगण्या जोगा आहे,सलाम आहे तुमच्या स्ट्रगल ला🙏🙏

  • @swarangpednekar1248
    @swarangpednekar1248 7 часов назад +2

    SALUTE दोन्ही फौजींना
    तुमची अशीच भरभराट, भरभराट होऊ दे. मनातील सर्व चांगल्या ईच्छा पुर्ण होऊ दे. तुमची मुलं सर्वगुणसंपन्न होऊन टॉपला जाऊ दे आणि तुमचा संसार खुप सुखाचा होऊ दे हिच विठ्ठलचरणी चरणी सद्गुरू चरणी प्रार्थना.

  • @sonamkumbharkar8904
    @sonamkumbharkar8904 7 часов назад +2

    हो ताई पुर्वी असं असायचं माझ्या आजोबांनी असं लोकांचं ऐकून दूसरे लग्न केलेहोते होताईखूप कष्ट केले दाजी नी अगदी बरोबर दाजी बोले मलापण हे पटतंय की मुलगा चांगला पाहिजे राजू भाऊ चागलेचत.खरच गरिबीतून वरती जाणारया माणसांना परिस्थितीची जाणीव असते आणि अशीच मुलं चांगले नागरिक होतात.आक्का बाबांना छान सांभाळता तुम्ही कौतुक चे नाहीतर आजकाल ची मुलं खूप वाईट वागतात. मोठे दादा मुलांना जो संदेश तुम्ही दिला खूप छान दिलात मला खूप आवडले.हो ताई खर्च दोन्ही दाजी खूप छान त त्यांचे विचार पण खूप छान त खर्च ताई तु बरोबर बोलते शून्यातून विश्व निर्माण केले.खरच खूप रडू येत.विडिओ पाहताना.तुम्ही खूप छानजिवन साथी मिळाल्यात फौजी दाजी दोघं भी खरच राम लक्ष्मना सारखे रहातात.खरच दादा एवढा खडतर प्रवास करून सुद्धा नाव दिले आता तुम्ही कष्ट करा वडलान विषयी किती आदराने बोले.खरच आता आक्काबाबाना खूप छान वाटत असेल तुम्ही बहिणी पण खूप छान साथ दिली दाजी ना.

  • @suvarnakale3564
    @suvarnakale3564 5 часов назад +1

    खर तुमचे कुटुंब कष्टाची जाणिव ठेवून पुढे गेले आहे त्यामुळे तुम्हाला सलाम🙏

  • @sunitagotsurve6560
    @sunitagotsurve6560 8 часов назад +2

    मोठ्या दाजींचे विचार खूप छान आहेत

  • @mangeshnagare5193
    @mangeshnagare5193 10 часов назад +1

    चला बुवा एकदाचे छोटे फौजी आले व्हिडिओ मध्ये खुप स्ट्रगल करावा लागला तुम्हाला दोघांना आणि आक्का बाबा ना पण आणि खूप समजदार आहेत तुम्ही दोघीही आणि छोटे फौजीना एखाद्या वेळेस व्हिडिओ मध्ये यायला काय हरकत नाही मोठ्या दाजी बर आहे ना लाजतात ना काय महत्वाचे म्हणजे जे मनात आहे ते बोलतात सगळ्यात जास्त स्ट्रगल आक्का बाबा नी केल आहे सलाम त्यांच्या कष्टाला 🙏🏻🙏🏻🤎🤍🖤🤍👌👍

  • @sunitadalavi8961
    @sunitadalavi8961 8 часов назад +2

    दादा तुमचा संघर्ष ऐकून डोळ्यात पाणी आले आम्ही निलेश लंकेचे पाहूने दळवी हंगा राहतो पुणे आपल्या गावाचे व्हिडिओ बघायला खूप छान वाटते

  • @vilaspowalekar1135
    @vilaspowalekar1135 9 часов назад +1

    तुमच्या संपूर्ण कुटुंबाला देवाचे सुखात ठेव हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @sonpariimmates1400
    @sonpariimmates1400 10 часов назад +2

    खूप छान प्रगती केली संकटावर मात करून सलाम तुम्हा दोघांना

  • @swatiyadav7776
    @swatiyadav7776 5 часов назад +1

    आज काय बोलावे कळेना किती सहन केलंय आक्का आणि दोन्हीं फौजी नी . माऊली साठी पाणी आले डोळ्यात. असो पण त्या दिवसांची जाणीव आहे म्हणून आज हे दिवस आहेत .तुमची फॅमिली वेगळीच आहे.❤❤🎉🎉

  • @pramilasarkate5422
    @pramilasarkate5422 8 часов назад +1

    छोटे फौजी व्हिडिओ दिसले चांगलं वाटलं पण त्यांचंही म्हणणं योग्य आहे की सरकारी नोकरीत आहेत त्यांना व्हिडिओमध्ये येण्याचा आग्रह करू नका तुम्ही किंवा कोणी फार काटे त्यांनी खरंच चांगले दिवस आले देवाची साथ आहे तुम्हा सर्वांना

  • @vaishaligulhane9624
    @vaishaligulhane9624 10 часов назад +1

    गेलेले दिवस कधीच विसरू नये आणि तुम्ही सगळे येवढे मोठे होऊन चागले दिवस आले तरी जुने दिवस आणि आई नि केलेले कष्ट विसरले नाही असेच आई बाबा सर्व जन सोबत रहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 10 часов назад +3

    ताई आज किती किती किती किती वाट पाहिली डेली ब्लॉग ची शेवटी कंटाळा आलाहोता वाट बघुन बघुन आज छोटे राजु फौजी बरे गप्प. बसले नाहीतर लगेच डेली ब्लॉग मधे पळतच सुटतात आज मोठ्या फौजीमुळे चुपचाप 😂😂😂😂😂😂😂😂 फार हसु येते छोटे फौजींना बघुन 😂😂😂😂😂😂

  • @ravindragaiyakwad2654
    @ravindragaiyakwad2654 10 часов назад +8

    तुमच्या बोलण्यात खरं पण आहे भाऊ खरचं मनापासुन कौतुक करते तुमचं ❤❤👍👍👍

  • @vandanasalunke363
    @vandanasalunke363 10 часов назад +1

    मोठे फौजी खूप खूप समजदार आहेत विचार तर खूपच भारी जयहिंद:

  • @vandanabhosale6138
    @vandanabhosale6138 9 часов назад

    दोन्ही फौजीची प्रवास कहानी ऐकून डोळे भरून आले स्वाती भारती तुमच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे भाऊजींचे विचार खूप छान आहेत❤❤

  • @savitagodage9734
    @savitagodage9734 5 часов назад

    खर सांगू ताई मी
    Video पाहायच्या अगोदर मी कमेंट वाचते खुप छान वाटत मनाला
    किती छान विचार आहेत तुमच्याबद्दल लोकांचे
    किती मन भरुन भरून आर्शिवाद देतात
    सर्वाचा आर्शिवाद लाभो तुमच्या फॅमिलीला हीच भोलेबाबा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

  • @pritambhosale353
    @pritambhosale353 8 часов назад +4

    फौजींना सलाम 🙏 माझ्या मिस्टराना पण दोन आई आहेत. त्यांचा भरतीची प्रवास असाच खडतर होता. तुमच्या सासूबाई सारखे माझ्या सासूबाईंनी खूप कष्ट केले आहेत मुलांच्या साठी, त्यामुळे आईना नमस्कार 🙏.

  • @dnyaneshvarsanap4854
    @dnyaneshvarsanap4854 11 часов назад +3

    खूप वाट बगत होते विडिओ ची ताई ❤सुखी राहो तुमचा परिवार 👌👌👌👌

  • @prachicakesvlog8026
    @prachicakesvlog8026 9 часов назад +1

    खूप छान संदेश दिला कारण आजची मुलं आई-वडिलांना त्यांच्या म्हातारपणात फारशी बघत नाही👌👌👌

  • @Indiaking2010.
    @Indiaking2010. 10 часов назад

    Bharttal दोन्ही भावांना मनापासून सलाम कारण त्यांनी शून्यातून जे विश्व निर्माण केले आणि त्याबरोबर dajinche आश्रमा बद्दलचे विचार ऐकून खूप प्रेरणा मिळते तसेच आजच्या जगात वृद्ध माणसाबद्दल एवढी जाणीव ठेवणे आणि त्यांच्यासाठी आश्रम चालू करणे हे काही साध्या माणसाचे काम नाही तर त्यासाठी फार मोठे आणि दिलदार मन असावे लागते आणि त्यात आणखीन तुमच्या दोघी बहिणीची जोड एकूणच काय तर तुमच्या पूर्ण फॅमिलीला आमचा सलाम व आशिर्वाद.

  • @sahilrupeshthange1731
    @sahilrupeshthange1731 8 часов назад +1

    जसा तुमच्या फौजीचा खडतर प्रवास होता तसेच आमच्या फौजी ने खूप वाईट दिवस काढले आहेत जशी तुमच्या फौजीची जीवनशैली होती सेम ती जीवनशैली आमच्या दोन फौजीची होती खूप वाईट दिवस पाहिले आहेत त्यांनी पण तुम्ही लक्ष्मीच्या पावलांनी येऊन घर कसं माणसाने नव्हे तर फुल पक्षी प्राणी या सर्वांनी घर कसं फुलून गेले मी ही तुमच्या शेजारच्या गावातच राहत आहे खूप छान व्हिडिओ असेच आतुरता लागते तुमच्या व्हिडिओची

  • @vandanaunkule6890
    @vandanaunkule6890 5 часов назад

    दोन्ही फौजींचा जीवन प्रवास ऐकून आपोआपच डोळे भरून येत होते सलाम त्यांच्या मातेला सलाम दोन्ही फौजींना आणि सलाम त्यांच्या पत्नींना अशा आदर्श फौजी पती - पत्नींची मुलेही त्यांचा आदर्श घेतील यात शंकाच नाही कुणाचीही नजर न लागो तुमच्या कुटुंबाला हिच ईश्वर चरणी प्रार्थना❤🥰🙏🙏

  • @subhangiugale7878
    @subhangiugale7878 6 часов назад

    खूप छान चांगले विचार आहे मोठे भाऊजींचे आणि तुमच्या सर्वांचे तुमचं बोलणं ऐकून असं मन भरून येते खूप छान

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 9 часов назад +3

    आक्कांचा जीवन प्रवास खुप खडतर झाला आहे एवढे वाईट दिवस पाहून एवढे छान संस्कार दिले दोन्ही मुलांना आणि सुना पण लाखो करोडो मधुन शोधुन सापडणार नाही एवढ्या छान आहेत त्या माऊलीला कोटी कोटी प्रणाम . खुप कष्टाने हे विश्व निर्माण केलं आहे तुमच्या पुर्ण फॅमिली ने. आगोदर पासुनच अभिमान वाटतं होता आता अजुन jyast वाढला आहे राजु दाजी सॉरी आम्ही हा विचार कधीच केला नाही इथुन पुढे व्हिडिओ मध्ये या ही कमेंट मी करणार नाही खुप मोठे विचार आहेत तुमचे परत एकदा सॉरी

  • @vilaspowalekar1135
    @vilaspowalekar1135 9 часов назад

    दोन्ही फौजीची व्यथा ऐकून विशेषता मोठ्या फौजीची व्यथा आणि दिनचर्या ऐकून माझ्या डोळ्यात अक्षरश पाणी आलेला आहे कारण इतक्या कठीण परिस्थितीतून त्यांनी दिवस काढलेले आहे हे काही कमी नाही आणि त्यांनी त्या काळात आणि नंतर आणि आतापर्यंत जो आईचा सांभाळ केलेला आहे त्याकरिता त्यांचे खूप खूप आभार

  • @AlkaBendkule-i7z
    @AlkaBendkule-i7z 9 часов назад

    आजचा व्हिडिओ खूप काही बोध घेण्या सारखा आहे तुम्ही दोन्ही फौजी नी आपले बालपण आणि शिक्षण कष्या परिस्थीत केले ते समजले तुम्ही दोघांनी आणि तुमच्या अक्का आणि बाबा यांनी शून्यातून विश्व निर्माण केले अशेच म्हणावा लागेल खूप खूप धन्यवाद तुम्हाला आणि तुमची फॅमिली सद्येव आनंदी आणि समाधानी गुण्या गोविंदाने रहा अशी परमेश्र्वराकडे प्रार्थना

  • @madhuri6550
    @madhuri6550 8 часов назад +3

    Vadila na dosh na deta khup positive ly sarv face kel khrch khup salam daji tumhala.

  • @seemabornare5761
    @seemabornare5761 10 часов назад +1

    आमच्या भाऊंनी आणि आक्कानी खुप कष्टानंतर सुखाचे दिवस आले

  • @ChhayaPawar-i2p
    @ChhayaPawar-i2p 7 часов назад +1

    मोठ्या दाजीचे खूप चांगले विचार आहेत ताई

  • @poonamkenjale2974
    @poonamkenjale2974 5 часов назад

    मस्त छान दाजिंच बोलन आवडल भरपूर प्रेरणा मिळाली दाजी एवढे जमिनीवर राहून जगतात तुमच्या मुलांना पण हेच संस्कार द्या