जे मागाल तेच मिळेल... Ask & you will get it...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • The Sanskrut word Niraamay implies ‘free from defects’. Good health is the very basis of all human endeavours. In our new series - Mann Niraamay - we will learn about the Swayampurna Upchar method and importance of right conditioning of the mind for removing the accumulated negative emotions and defects in the body. Believers always say that one gets what one intensely asks for with the Parameshwar (cosmic consciousness). What is the science behind this statement?
    What does the Law of Attraction indicate? What is the impact of our thoughts on our future and the surroundings? Why is it said in the Bhagvad Gita that cynics perish? What is the role of positive thoughts in achieving the right things at the right time? Why does the Indian tradition insist on expressing good thoughts? What is the meaning behind the maxim that one’s dwelling grants one’s wishes? Dr Yogesh and Dr Amruta Chandorkar from Niraamay unravel the answers to many such questions.
    Do watch this candid discussion to understand the role of the mind in attaining lasting happiness on the path of action (Karmayog). Do not forget to share it with your friends and relatives.
    -----
    निरामय म्हणजे दोष विरहित स्थिती. चांगले आरोग्य तर सर्व यशस्वी उपक्रमांचा पाया आहे. साठलेल्या नकारात्मक उर्जेचा निचरा व शरीरातील दोष नष्ट करणारी स्वयंपूर्ण उपचार पद्धती आणि मनावरील संस्कारांचे महत्व आपण ‘मन निरामय’ या नवीन मालिकेत समजून घेणार आहोत. सश्रद्ध लोकं म्हणतात की देवाकडे जे मनापासून मागाल ते मिळते. काय आहे या विधानामागचे शास्त्र?
    लॉ ऑफ अॅट्रॅक्शन काय दर्शवितो? आपल्या विचारांचा आपल्या भविष्यावर व आजूबाजूच्या परिस्थितीवर नेमका काय परिणाम होतो? ‘संशयात्मा विनश्यति’ असे भगवद गीतेत का म्हटले आहे? योग्य गोष्ट योग्य वेळी मिळण्यासाठी सकारात्मक विचारांची काय भूमिका असते? नेहेमी शुभ बोलावे असे आपल्याकडे का सांगितले आहे? ‘वास्तु म्हणते तथास्तु’ या मागचा अर्थ काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देत आहेत निरामयचे डॉ योगेश व डॉ अमृता चांदोरकर.
    कर्म मार्गावर शाश्वत सुख मिळविण्यात मनाची भूमिका समजून घेण्यासाठी या दिलखुलास गप्पा नक्की पहा. तुमचे आप्तेष्ट व मित्रांना पाठवायला विसरू नका.
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #Positivethinking #future #gloriousfuture #freefromdefects #niraamay #niraamaywellnesscenter #pune
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Комментарии • 305

  • @hemantsonawane13
    @hemantsonawane13 Год назад +8

    तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम , ब्रम्हांडा ला धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.

  • @vidyakashid3510
    @vidyakashid3510 2 года назад +12

    मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण .. हे फक्त वाचुन माहीत होते...विस्ताराने त्यातले सत्य तुमच्या चर्चेतुन लक्षात आले .... धन्यवाद..

  • @poonamgirgaonkar8133
    @poonamgirgaonkar8133 23 дня назад

    खूप छान.... मानसिकता पूर्ण change होऊन positive उर्जा भेटली...तुम्ही देव तुमच्या रूपाने भेटला...thank you so much

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  21 день назад

      सश्रद्ध लोकं म्हणतात की देवाकडे जे मनापासून मागाल ते मिळते. योग्य गोष्ट योग्य वेळी मिळण्यासाठी सकारात्मक विचारांची महत्वाची भूमिका असते.

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 Год назад +5

    पेरावे तसे उगवते. ते हेच आहे.
    तसे विचार तशी प्रचिती! 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      पेरावे तसे उगवते अगदी तसच जे मागाल तेच मिळेल. आपल्या विचारांचा आपल्या भविष्यावर व आजूबाजूच्या परिस्थितीवर परिणाम होत असतो.योग्य गोष्ट योग्य वेळी मिळण्यासाठी सकारात्मक विचारांची भूमिका महत्वाची असते . नेहेमी शुभ बोलावे असे आपल्याकडे सांगितले आहे. 🙏🙏

  • @pallaviparandekar6001
    @pallaviparandekar6001 Год назад +2

    किती प्रचंड अध्यात्मिक अभ्यास करून तो सामाजिक कार्यासाठी किती चांगल्या पद्धतीने उपयोगात आणले आहे. हे फारच कौतुकास्पद आहे. स्वतःकडे किती छान विचाराने पहायला शिकवत आहात. मन-शरीर सदैव कार्यरत प्रसन्न आनंदी सकारात्मक ठेवायला शिकवता. 🙏🙏💐 धन्यवाद

  • @user-es8cs7jt7s
    @user-es8cs7jt7s 4 месяца назад +1

    प्रथमच तुमचे कार्यक्रम पाहिले आणि खूप छान वाटलं...विचार बदलायला चालना देणारे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @nilkanthtapole1044
    @nilkanthtapole1044 Год назад +1

    खुप छान सर आणि मॅम खुप खुप आभार 🙏निरामय च्या ऊर्जा रुपी उपायामुळे मी मृत्यूच्या दाढेतून परत आली आणि मी आता एकदम छान निरोगी आणि खुप सकारात्मक, प्रसन्न आयुष्य जगत आहे. मी आयुष्यभर आभारी असेन 🙏🌹

  • @shailendrapatil7111
    @shailendrapatil7111 Год назад +3

    🌻🙏🌻
    गुरु मां को शतषः प्रणाम
    सद्गुरु को शतषः प्रणाम

  • @sujatanaphade3611
    @sujatanaphade3611 Месяц назад

    Sunder video.👌👌

  • @saritaambavane4854
    @saritaambavane4854 2 года назад +2

    सर आणि मॅडम तुम्ही दोघेही उपचार तर करताच पण त्याच बरोबर समाजप्रबोधनाचे सर्व श्रेष्ठ कार्य करता यातुन एक नविन सुजाण नागरिक घडत आहे खुप खुप शुभेच्छा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +1

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, मनःपूर्वक धन्यवाद.🙏

    • @ganeshpansare2380
      @ganeshpansare2380 2 года назад

      खूप छान माहिती सांगितली मॅडम..सर .धन्यवाद

  • @yashashrimoghe5956
    @yashashrimoghe5956 2 года назад +4

    खूप आभार तुमचे 🙏महत्त्वाचा विचार तुम्ही आमच्या पर्यंत पोहचवताय ...

  • @smitapatwardhan9864
    @smitapatwardhan9864 2 месяца назад

    खूप छान. माहिती

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @mangaladeore630
    @mangaladeore630 2 года назад +4

    खुप छान सांगितले आपण.
    खरं आयुष्य जगायचा प्रयत्न करतोय. धन्यवाद 🙏

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 2 года назад +3

    खुप सुंदर 🙏
    तुमच्या प्रत्येक भागातील विचारामुळे
    माझी विचार करण्याची दिशा बदलते
    आहे . सकारात्मक विचार यायला
    लागतात . खुप धन्यवाद

  • @kirankandekar9294
    @kirankandekar9294 2 года назад +2

    खूप छान माहिती भेटली , नक्कीच आम्ही विचारांनी बदल करून सुखी होऊ, आणि दुसऱ्यांना पण सुखी होण्यास मदत करू तुमच्या या विचारांनी thanks 👍 tai

  • @Anandachesecret
    @Anandachesecret 2 года назад +5

    Wow Sir & Mam तुमच्या कार्याला माझा सलाम.
    Thank you so much🙏.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @pallaviparandekar6001
    @pallaviparandekar6001 Год назад +1

    आपण ही संतांची शिकवण नित्य ऐकतो पण आचरणात आणत नाही. अध्यात्मिक प्रवचनातून केलेला सुंदर बोध. 🙏💐

  • @vidyabhandare7271
    @vidyabhandare7271 5 месяцев назад

    तुमचा व्हिडीओ प्रथमच बघीतला आणि मुद्रा करून बघीतली आणि आश्चर्य काय की माझे मान पाठ खांदे दुखायचे तर ते लगेच बरे वाटायला लागले आणि मी तुमचा प्रत्येकच व्हिडीओ बघते आहे जसा वेळ मिळेल तसा आणी ह्या व्हिडीओ मध्ये जे तुम्ही सांगता आहे ते खरं आहे माझ्या सोबत नेहमी घडलं आहे असं की मी विचार केला होता आणी काही काळानंतर तो खरा झाला
    Thanku मॅडम तुम्ही फारच छान सांगता मी तर फॅन झाली तुमची तुम्हाला भेटायला नक्की आवडेल मला अशी चांगल्या विचारांची माणसं फारच थोडी आहे जगात

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 месяцев назад

      वा! फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. असेच नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @vaishalikulkarnirachana5447
    @vaishalikulkarnirachana5447 2 года назад +1

    खूप छान....तुमची समजावून सांगण्याची कला ही आवडली...दिल तो बच्चा है......

  • @shantigolatkar929
    @shantigolatkar929 Год назад +2

    अतिशय सुंदर विश्लेषण.👌👍

  • @nitinmalvadkar6937
    @nitinmalvadkar6937 Год назад

    अतिशय सोप्प्या भाषेत जीवनाचे सार सांगितले..
    सकारात्मक व नकारात्मक यातील फरक आज समजला..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      धन्यवाद 🙏,
      निरामयच मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @paurnimabhange3132
    @paurnimabhange3132 2 месяца назад

    Kiti chan pdhtine smjaun sangitlat sir madam❤thank you❤🙏😊

  • @raginijagtap-mt9nk
    @raginijagtap-mt9nk 5 месяцев назад

    खुप छान संवाद....खुप छान माहिती देत आहात आणि बरं करत आहात...धन्यवाद

  • @rameshshere45
    @rameshshere45 2 года назад +1

    खूपच छान माहीती सकारात्मक दृष्टीकोन मिळाला . आपले मनापासून धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @wono1390
    @wono1390 Год назад +1

    Law of attraction che khoop videos baghitlay .tumhi khoop deeply samjhun sangta thank you very much

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      आपण हे सर्व Episode बघत आहात आणि आम्हाला जे सांगावयाचे आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात खरच खूप मनापासून धन्यवाद 🙏. आपले भविष्य हे आजचे विचार व भावना यांवर अवलंबून असते. आजची कृती महत्त्वाची असते, कारण ती याच नाही, तर पुढील जन्माची दिशासुद्धा ठरवित असते.
      निरामयचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
      धन्यवाद 🙏.

  • @ranjanajagtap5902
    @ranjanajagtap5902 6 месяцев назад

    Tumhi dokhehi samajache khup changle kar kart ahat khup dhyanyvad

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 месяцев назад

      मनःपूर्वक आभार 🙏 आपला स्नेह असाच कायम राहू दे.

  • @vandanaakotkar9869
    @vandanaakotkar9869 Год назад +1

    खूप खूप छान माहिती मॅडम

  • @deepalirane4295
    @deepalirane4295 6 месяцев назад

    हे खुपच सुंदर विचार आहेत

  • @supriyarevandkar6010
    @supriyarevandkar6010 3 месяца назад

    Tai sunder vichar nandini 🙏🙏👍👍👌👌

  • @anaghaphalke1325
    @anaghaphalke1325 2 года назад +1

    खरं आहे.
    खरच तुम्ही खुब छान सांगता.

  • @SwaraSayss
    @SwaraSayss Год назад +1

    खूप सुंदर.

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 2 года назад +6

    Doctor Madam khup sundar information milali Dhanyawad, be positive. Me hya stage madhun gelo aahe , meditation karun mann prasanna karato, tya sathi T.V newspaper cricket 🏏🦗, family drama bagaya che sodun dile aahee Past madhye zhale lya goshti sodun Dene Vartaman kala madhye rahane he uttam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +1

      आपणांस आनंदाचे गमक कळले आहे त्यामुळे आपण आनंदी आहात. फक्त कोणतीही गोष्ट सोडून देणे हा उपाय नसून जे समोर येईल त्याचा आनंद घेणे हा त्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

  • @shilpaghode9180
    @shilpaghode9180 2 года назад +1

    खूप मस्त 👌

  • @veenaulman6334
    @veenaulman6334 2 года назад +2

    डाॅ तुमचे खुप खुप आभार

  • @supriyakarhadkar2977
    @supriyakarhadkar2977 Год назад

    खूपच छान. साध्या सोप्या भाषेत सांगत आहात. खूप खूप आभार. 🙏🙏🙏

  • @TheYogitabansude
    @TheYogitabansude 2 года назад +2

    खूप छान माहिती.

  • @satyavatiburaje8744
    @satyavatiburaje8744 2 года назад

    हॅपी थॉट्स मध्ये पण हेच सांगतात खूपच सुंदर

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      जगाच्या पाठीवर कुठेही आपण गेलो तरी सगळ्याचे मूळ तत्व हे एकच आहे.

  • @shrikrishnaabhyankar4332
    @shrikrishnaabhyankar4332 2 года назад

    खूप छान!. हे मी आधी करायचो. नंतर राहून गेलं. तुमच्यामुळे सगळं आठवलं. आता परत 24 तास सकारात्मक विचार ......

  • @kalpanaadbale7532
    @kalpanaadbale7532 2 года назад +1

    ताई तुमचे किती धन्यवाद मानु कळत नाही खुप खुप धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jaywantlawand1300
    @jaywantlawand1300 2 года назад

    प्रणाम उभयताना.🙏🙏फार छान विस्लेषण.मी आयबीएस (पचन संस्थेची अस्वस्थता) त्रस्त आहे ॲलोपथी आयुर्वेद आता फक्त होमिओपथी घेत आहे.सकारात्मक विचार खरच प्रेरणा मिळाली.धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      आयबीएससाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरतील, निरामयमध्ये अनेकांचे आयबीएसचे प्रॉब्लेम्स दूर झालेले आहेत. आपण लवकरच स्वयंपूर्ण उपचार सुरु करा आणि लवकर बरे व्हा.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 2 года назад

    धन्यवाद
    खूप छान माहिती मिळाली
    मलाही असे काही थोडे फार अनुभव आले आहेत
    सकारात्मक बोलण्याचा खूप छान वाटते

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      नियमित सकारात्मक बोलत रहा. आपण जे मागाल तेच आपल्याला मिळते, त्याचा कालावधी कमी अधिक प्रमाणामध्ये असू शकतो.

  • @shashikalanaik145
    @shashikalanaik145 2 года назад

    Tay
    तुमचे बघून mi
    पृथ्वी मुद्रा व तुमची हसरी मुद्रा करते खुप खुप धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      वा! खूपच छान. नक्की करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 2 года назад

    अगदी मनातला विचार सांगितला आहे madam तुम्ही खूप दिवस विचार होता हे कळाव तुमच्या कडून

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 2 года назад

    सर-मॅडम माझ्या मनातलं बोललात मी प्रयत्न करत आहे मनातील विचार बदलण्याचा धन्यवाद 🙏

  • @ushagojame1655
    @ushagojame1655 2 месяца назад

    ❤❤❤❤❤

  • @happyeducation8261
    @happyeducation8261 2 года назад +1

    Beautiful. खूप खूप छान.

  • @nishabangalkar4525
    @nishabangalkar4525 Год назад +3

    Thank you sir and madam for conversation

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      मनःपूर्वक आभार 🙏

    • @adhirajmuley2441
      @adhirajmuley2441 Год назад

      खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद दोघांना पण 🙏🙏

    • @anujapatil5805
      @anujapatil5805 6 месяцев назад

      ❤khup chan

  • @vandanakulkarni4786
    @vandanakulkarni4786 2 года назад

    किती सुंदर सांगितले मॅडम आपण दोघांनी आज मी खूप टेन्शन मधे आहे पण हे एकून खूप शांत d आणि सकारात्मक वाटले खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @mirakorde9463
    @mirakorde9463 2 года назад +1

    खुप खुप छान माहिती दिली आहे
    धन्यवाद

  • @payalshidhaye6124
    @payalshidhaye6124 Год назад

    Khup Sonya Shabbat samjavaly Atish chan mahitidhanywad😊

  • @anjubarve8551
    @anjubarve8551 2 года назад +1

    तुमचं बोलणं ऐकून मी नक्कीच प्रयत्न करीन. ऐकतानाच सकारात्मक आतून वाटू लागतं. खूप धन्यवाद.

  • @rupaliyadav7221
    @rupaliyadav7221 2 года назад +1

    खुप छान वाटले.

  • @sujatapatankar3395
    @sujatapatankar3395 2 года назад +1

    खुप छान माहिती सांगितली थँक्यू

  • @amrutasawant1284
    @amrutasawant1284 2 года назад

    Kiti sunder conversation aahe he. 👌. Sir & Mam Asech different topics gheun conversation baghayla and aikayla aavadtil.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      नक्कीच, यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडीओ आपण पाहू शकता.

  • @PrashantBKadu
    @PrashantBKadu 2 года назад +1

    सर्वोत्तम 👌

  • @TheKool11
    @TheKool11 2 года назад +1

    Khup sunder mahiti dilit....aabhar!!

  • @krishnavanire4035
    @krishnavanire4035 2 года назад +1

    सर/मँडम अतिशय सुंदर माहिती दिलीत

  • @sunitagore7
    @sunitagore7 2 года назад +1

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद👍👍

  • @dhanashrinigade1091
    @dhanashrinigade1091 2 года назад +1

    Madam sir khupppp chan mahiti sangitali ....thank u🙏

  • @medhapatil9598
    @medhapatil9598 2 года назад

    🙏🙏Dr. ani Mam tumche vichar eikun khup bare watale man prasanna zale ani positive vichar manat yayala lagale. 15 diwas zale me mazya gudgha dukhi sathi tumchya Niramay wellness center la yeyun treatment ghet aahe, Dr. na me bolale maze he dukhane khup june aahe bar wayala vel lagel aase bollywar Dr. mala aasech bolale june kahi nahi tumhi lavkar bare honar aasa manat vichar kara, ani eitke bare watle ki aata 8 diwas zale, mazya gudghya maddhe khup farak padla, ani me purna bari honar aase mala vatu lagale maza aatmavishwas vadhala, very very Thankyou Dr. me aapli kruni aahe. Thankyou Niramay wellness centre madhil sarva Dr.ani staffla suddha.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @ameyrane8955
      @ameyrane8955 4 месяца назад

      Khup chhan mam

  • @pravinkhairnar6427
    @pravinkhairnar6427 Год назад

    Thanks dr saheb khuop Chan mahiti dili

  • @vaishnavighadge4840
    @vaishnavighadge4840 7 месяцев назад

    Thanks you so much madam and sir

  • @neetapatel1157
    @neetapatel1157 Год назад

    Thanku thanku thanku tumha doghanha...

  • @kaverikhande7960
    @kaverikhande7960 Год назад

    Sir,madm khup Sundar. Dhnywad 🙏🙏

  • @mayathatte1428
    @mayathatte1428 2 года назад

    डॉ. अमृता मॅडम, नमस्कार.
    लोकांना आरोग्य आणि आनंद देण्याचे महान कार्य तुम्ही करत आहात, हे मला व्हिडिओ च्या माध्यमातून समजले. ह्या तुमच्या कामात मी मदत करू इच्छित आहे. तरी मला तशी संधी द्यावी ही विनंती. आपला पत्ता कळवल्या स मी भेट घेऊ शकेन.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      नमस्कार ,
      अपॉईंटमेंट घेऊन मॅडमना भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏

  • @SwatiKadole-cj9gy
    @SwatiKadole-cj9gy 2 месяца назад

    Khup ch sunder mahiti dilit sir & mam.
    🙏🙏
    Online treatment Kashi ghyavi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 месяца назад

      नमस्कार,
      अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटून उपचार सुरु करु शकता.
      यासाठी पेशंटचे पूर्ण नाव, वय, जन्मतारीख, सध्याच्या फोटो, चालू आजार, पत्ता, संपर्क क्रमांक आणि काही रिपोर्ट असतील तर. रुग्णाची हि माहिती आपण ७०२८७०१३२३ या नंबर पाठवून उपचार सुरु करता येऊ शकतात. परंतु उपचार सुरु करण्यापूर्वी सविस्तर माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा. : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏.

  • @rupeshmhapankar7114
    @rupeshmhapankar7114 4 месяца назад

    Excellent 👍 thanks

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 2 года назад

    अतिशय सुरेख

  • @shailajatilay5337
    @shailajatilay5337 Год назад

    मनापासून धन्यवाद

  • @sonalipatangrao7798
    @sonalipatangrao7798 2 года назад

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 6 месяцев назад

    Khup Chan 🙏🙏🌹🌹

  • @ushakashalkar2036
    @ushakashalkar2036 2 года назад +2

    Be positive be Happy.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +1

      धन्यवाद🙏
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

    • @jaymalakulkarni2169
      @jaymalakulkarni2169 Год назад

      @@NiraamayWellnessCenter 1

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 2 года назад

    खूप छान.सहज समजावले

  • @kalpanadaware8367
    @kalpanadaware8367 Год назад

    Khup khup chaan mahitti

  • @pallavighanekar9279
    @pallavighanekar9279 2 года назад

    Khup Sundar 👌 dada vehinii 🙏🏼😊 thanks 😊🙏

  • @meenanavale3753
    @meenanavale3753 2 года назад

    Ghup premal aahat tumhi 🙏🙏

  • @padmajakulkarni4145
    @padmajakulkarni4145 2 года назад

    Khupa mahtvachi mahiti sangitle. Madam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद.

  • @mugdhakulkarni3921
    @mugdhakulkarni3921 2 года назад

    खूप सुंदर विचार

  • @vanitasonawane1488
    @vanitasonawane1488 2 года назад

    Dhanyawad Tai 🙏🌹🙏

  • @dmd1769
    @dmd1769 4 месяца назад

    Mam khup lok as mhantat
    Jasa aapn vichar karto tasa kadhich ghadat nahi
    Khup lokanch anubhav ahe ....kitihi positive vichar kela tari te purna hot nahi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 месяца назад

      नमस्कार,
      ते ही कधी ना कधी आपणच भूतकाळात केलेले विचार असतात. आपले भविष्य हे आजचे विचार व भावना यांवर अवलंबून असते. आजची कृती महत्त्वाची असते, कारण ती याच नाही, तर पुढील जन्माची दिशासुद्धा ठरवित असते.

    • @dmd1769
      @dmd1769 4 месяца назад

      @@NiraamayWellnessCenter thank you for your reply 🙏🙏❤️❤️❤️❤️

  • @rekhavishwekar2758
    @rekhavishwekar2758 Год назад

    खूप खूप धन्यवाद

  • @vaishalinene4958
    @vaishalinene4958 2 года назад

    khupch upyogi mahiti aste

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      धन्यवाद 🙏
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @ushakadam578
    @ushakadam578 2 года назад

    Thank's maam. very nice 🌹🌹

  • @rameshkulkarni8936
    @rameshkulkarni8936 2 года назад

    Kiti chan sangta

  • @sangitajoshi4549
    @sangitajoshi4549 2 года назад +1

    Thanks madam

  • @rajanikoli9512
    @rajanikoli9512 2 года назад

    खूपच छान माहिती मिळाली मँडम

  • @360degreephoto
    @360degreephoto 2 года назад

    Khup chhan👌👌👍

  • @dilipkamane1333
    @dilipkamane1333 2 года назад

    खूप छान वाटले धन्यवाद.

  • @bharatipatil5721
    @bharatipatil5721 2 года назад

    खुप छान वाटले

  • @suvidhadhuri3188
    @suvidhadhuri3188 2 года назад

    खूपच छान

  • @ushakadam578
    @ushakadam578 2 года назад

    Thank-you So much 🌷🌷👍👍

  • @ranjanasupare7910
    @ranjanasupare7910 Год назад

    Changle arogya asan he sarvat moth sukh cancer hospital bhet dya healthy manus sukhi hoil

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      चांगले आरोग्य तर सर्व यशस्वी उपक्रमांचा पाया आहे. साठलेल्या नकारात्मक उर्जेचा निचरा व शरीरातील दोष नष्ट करणारी स्वयंपूर्ण उपचार पद्धती आणि मनावरील संस्कारांचे महत्व ‘मन निरामय’ या नवीन मालिकेत समजून सांगितले आहे.
      योग्य गोष्ट योग्य वेळी मिळण्यासाठी सकारात्मक विचारांची महत्वाची भूमिका असते.

  • @vishalsawant3449
    @vishalsawant3449 Год назад

    pharach sunder

  • @jaydippatil8188
    @jaydippatil8188 Год назад

    Very nice madam

  • @suvarnapotdar4847
    @suvarnapotdar4847 Год назад

    Very nice

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 2 года назад

    Khup chan🙏🙏🙏

  • @omkarlate8770
    @omkarlate8770 Год назад

    Nice

  • @vaishalishastri9940
    @vaishalishastri9940 2 года назад

    Osm,

  • @preranaunde6332
    @preranaunde6332 2 года назад +1

    👌👌🙏🙏same here🙏🙏
    Best conversation that I ever heard from Niramay wellness Drs.👍

  • @shailanangare524
    @shailanangare524 Год назад

    0 मॅडम खूप खूप सुंदर माहिती सांगतात माहिती ऐकूनच निम्मा टेन्शन कमी मला सहा वर्ष झाले आम्लपित्ताचा त्रास आहे डायजेशन व्यवस्थित 0 होत नाही 0 ऍलोपॅथिक करून आता आयुर्वेदिक चालू पण सतत विचार करायची सवय आहे तरी कृपया मार्गदर्शन द्यावे मी आपल्या पासुन खुप लांब आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार ,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com