Sohala, सोहळा | Marathi Full Movie | Sachin Pilgaonkar, Vikram Gokhle | Fakt Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2021
  • Sohala | सोहळा | Marathi Full Movie | Sachin Pilgaonkar, Vikram Gokhle | Fakt Marathi
    नात्यांमधील होणाऱ्या बदलावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. सिनेमाची गोष्ट सुरु होते ती; भर पावसात पन्नाशीतील गिरीश (सचिन पिळगांवकर) आपल्या पहिल्या बायकोच्या घरचा पत्ता शोधत असतो. गिरीशची पहिली बायको विद्या (शिल्पा तुळसकर) शहरात वास्तव्यास असते. गिरीश आणि विद्या यांनी सुरुवातीला लग्नाच्या वेळी गावाकडे घेतलेली जमीन बँकेच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी गिरीश प्रयत्नशील असतो. म्हणूनच तो विद्याची स्वाक्षरी आणि इतर न्यायालयीन मदतीसाठी तिच्याकडे येतो. परंतु, विद्या त्याला मदतीसाठी नकार देते. मोठ्या मिनतवारीनंतर विद्या मदत करायला तयार होते आणि न्यायालयीन कामकाज पूर्ण करण्यासाठी ती गिरीशसोबत गावाकडे येते. भूतकाळात बरेच काही घडून गेलेले असते, ज्यामुळे प्रेमविवाह करूनदेखील गिरीश आणि विद्यामध्ये आता दुरावा आलेला असतो. त्यांना एक मुलगी देखील असते. सिनेमा जसजसा पुढे साकारतो तसा तो भूतकाळातील काही प्रश्नाची उत्तर देऊ लागतो. गिरीशच्या वडिलांच्या (विक्रम गोखले) झालेल्या अपघाती मृत्यूला तो विद्याला जबाबदार मानत असतो. म्हणूनच तो तिचा द्वेष करत असतो. विद्यादेखील आपल्या हातून झालेल्या निष्काळजीमुळे मनातल्या मनात कुढत असते. या चलबिचलीमागचे नेमके कारण काय आहे त्यासाठी पहा पूर्ण चित्रपट फ़क्त आणि फ़क्त मराठीवर.
    Star Cast : Sachin Pilgaonkar
    Shilpa Tulaskar
    Vikram Gokhale
    Lokesh Gupte
    Mohan Joshi
    For more Marathi Interesting Movies , Please Subscribe to our channel and Enjoy all Movies
    / @faktmarathitv
    Please take a moment to like and subscribe our RUclips channel
    Visit Facebook page : / faktmarathitv
    Visit Instagram page : / faktmarathitv
    Visit Twitter page : faktmarathitv?lan...
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 573

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 2 года назад +12

    एक स्त्री असून सुद्धा बेजबाबदार . सिनेमा छान आहे .सचिनजीची भूमिका उत्कृष्ट . दोघांना एकच शब्द बोलायचा होता (साॅरी) अहंकारा मुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले .तरूण पिढीसाठी प्रेरणादायी सिनेमा आहे.

  • @govindmehtre2647
    @govindmehtre2647 3 года назад +14

    विद्याला दुसरा लग्न करून घेणं योग्य नव्हतं,
    तिला गिरीष चा विचार करायला पाहिजे होता, त्यांच्या मुलीचा विचार करायला हवा होता,
    तिच्या निष्काळजी मुळे, गिरीष चे वडील गेले,
    उलट, विद्याला गिरीष ला सॉरी बोलायला पाहिजे होत.

  • @Big....B1976
    @Big....B1976 2 года назад +17

    खूप काही शिकवून गेला हा चित्रपट,वेळेवर सर्व झाले पाहिजे,ज्या त्या वेळेला,म्हणजे पश्चाताप करण्याची वेळ येत नाही ,👍👍👍👌

  • @smitabandivadekar4742
    @smitabandivadekar4742 2 года назад +33

    खूप छान मूव्ही ..! वडीलांचा ( विक्रम गोखले ) अपघाती मृत्यू अंगावर काटा आणतो . "पाण्याशिवाय होडीला अस्तित्व नसतं . पाणी होडीला बुडवीत नाही. होडीला वादळ बुडविते. दोष मात्र पाण्याच्या कपाळी येतो . आयुष्य सुंदर आहे . त्याचं सौंदर्य जपायला हवं ." 🌹 अप्रतिम दिग्दर्शन ...🌹

  • @gauravbagve4738
    @gauravbagve4738 3 года назад +36

    असे चित्रपट का नाही दाखवत नाट्यगृहात कळकळीची विनंती आहे असे चित्रपट दाखवा टीव्ही ला सुध्धा दाखवा तेव्हा कुठे मराठी चित्रपट सृष्टी पुढे जाईल

    • @navnathzade4314
      @navnathzade4314 3 года назад

      बरोबर आहे

    • @jyotisakpal6684
      @jyotisakpal6684 3 года назад

      अगदी बरोबर आहे असे चित्रपट प्रत्येकाने बघायलाच पाहिजे

  • @rameshshelake7151
    @rameshshelake7151 3 года назад +11

    हा चित्रपट एवढा आप्रतिम आहे की नव्याने जगायला शिकवणारा आहे
    खुप छान आभिनय सचिन सर

  • @vijaypunase6144
    @vijaypunase6144 3 года назад +27

    हा सिनेमा खरोखरंच ग्रेट आहे. सचीन पिळगांवकर ईज दी ग्रोट अभिनेता आहे. हि ईज दी ग्रेट ACTOR आहे. SORRY हा शब्द वेळेवरच म्हणायला पाहीजे नाही तर फक्त पश्चाताप उरतो.या सिनेमा पासुन खुप छान मॉरल निघते.

    • @sindhuthakur9115
      @sindhuthakur9115 3 года назад +1

      अतिशय सुदंर मुव्ही।योग्य निर्णय योग्य वेळी घेता आला पाहिजे ।आयुष्य फार सुदंर आहे।साभाळता आलं पाहिजे।ऊत्तम कलाकार
      कलाकारअवश्य पाहा।

  • @hrishikeshkarekar3863
    @hrishikeshkarekar3863 3 года назад +41

    गजेंद्र अहिरे हा अतिशय द्रष्टा दिग्दर्शक आहे. प्रत्येक भावनेचा पदर अतिशय तरलतेने उलगडून दाखवलात. पाऊस आणि समुद्र या गोष्टींचा अतिशय चपखलपणे उपयोग केला गेलाय या चित्रपटात. खूप सुंदर कलाकृती.👍👌 ‛‛वेळेवर सॉरी म्हणता आलं पाहिजे.’’

  • @chandrakantgholap696
    @chandrakantgholap696 2 года назад +24

    अप्रतिम कथा, दिग्दर्शन आणि अभिनय...पुर्ण चित्रपटात 90% दोघांचेच संभाषण तरी शब्द न शब्द ऐका वसा वाटतो...🙏🙏

    • @Sarkar0312
      @Sarkar0312 2 года назад

      मी ऐकलंय आणी पाठ केलाय जगलो हा चित्रपट

  • @poojamota1435
    @poojamota1435 2 года назад +3

    अप्रतिमच...speechless ..
    सरतेशेवटी डोळ्यात अश्रू आलेच..
    उत्तम अभिनय....सचिन हा एक उत्तम अभिनेता आहे...हे खूप वर्षानी अनुभवले...

  • @user-ib1tq1ys5w
    @user-ib1tq1ys5w 5 месяцев назад +2

    निशब्द खरंच खुप मनाला वेदना देऊन जातो.हा सोहळा

  • @gajendrawahewal4004
    @gajendrawahewal4004 2 года назад +5

    साधा आणि सरळ पण खूप काही सांगून जाणारा चित्रपट सचिन सरांचा अभिनय अप्रतिम

  • @arundhatikolhatkar8638
    @arundhatikolhatkar8638 3 года назад +10

    एक नितांतसुंदर चित्रपट पाहिल्याचे समाधान मिळाले। 😊👌👌👌👍👍👍👍

  • @user-li1zh4ce5p
    @user-li1zh4ce5p 8 месяцев назад +1

    अतिशय सुंदर चित्रपटाचे कथा असून बरेच वर्षांनी चित्रपटाचे स्टार भूमिका चांगली जमली होती परंतु या चित्रपटासाठी ज्या कोणी प्रेस व्यक्तींनी मनापासून मेहनत घेतली होती या चित्रपटाचे शेवटी जागा मोटी आसून नावाचा फॉन्ट मोठा वापरला पाहिजे होता इथे मात्र सर्वोच्च स्थानी चिकटपणा केला आहे या चित्रपटातील नावेच वाचता येत नाही.

  • @ravindrabarate7651
    @ravindrabarate7651 2 года назад +7

    जन्माची मिरवली पालखी ..दुःखाचा सोहळा केला.. nice line

  • @mansaramsonawane6882
    @mansaramsonawane6882 Год назад +3

    अत्यंत संवेदनशील व हळूवारपणे मानवी जीवनाचे भावनिक कंगोरे दाखवून मराठी चित्रपटाचे वेगळेपण दाखवल्या बद्दल धन्यवाद

  • @kamalakarmaha5319
    @kamalakarmaha5319 2 года назад +2

    अवर्णनीय अनुभव आहे ! शब्दातीत !!
    पण..... .. ,
    खूप वाईट वाटत राहतं . इतका उशीर केला हा सिनेमा पहाण्यासाठी याचं! आणि आमच्या मनोवृत्तीचा राग येत राहतो . इतक्या श्रेष्ठ कलाकृतींना आम्ही योग्य तो प्रतिसाद देत नाही याचं ही ! अजून एकदाही असं घडलं नाही की आपले कोणीही मराठी कलाकार (मुद्दाम कलाकार हा शब्दप्रयोग केला आहे . कारण त्यात दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, संगीतकार, गायक आणि सर्वच कलाकार यांचा अंतर्भाव होतो . सांघिक निर्मिती असते ती म्हणून ! ) कधीही आणि कुठल्याही बाबतीत कमी ठरत नाहीत . आणि तरीही ते परग्रहावरील ही वाटत नाहीत हे विशेष ! (खरं तर) उगीचच आपल्यातील एक वाटत रहातात . आपल्या सारख्यांच्या सुखदुःखाची जणू त्यांना जाण आहे असं वाटत राहतं . मनापासून खूप खूप आभार आणि अभिनंदन, इतका छान अनुभव दिला त्या साठी ! 👃
    आधी *शब्दातीत* असं लिहून पुढे इतकं लिहिलं . पण तो शब्दप्रयोग सिनेमाबद्दल होता . बाकीचं जे लिहिलं आहे ती एकाच वेळी खंत ही आहे आणि अभिमान ही !

  • @ushatambe1453
    @ushatambe1453 3 года назад +13

    अप्रतिम व्यक्तीमत्व सचिन पिळगावकर सर्. पिक्चरची रूपरेषा हृदयाला भिडणारी भावनास्पर्शी कथा. मन सुन्न करणारे कथाकथन.

  • @alkaombase9958
    @alkaombase9958 3 года назад +32

    दोघांनीही वेळेतच मागे घ्या यला पाहिजे तरच जीवन आनंदी आहे हे शिकविणारा चित्रपट.

    • @snehalkshirsagar5714
      @snehalkshirsagar5714 2 года назад +1

      जिवनाची सत्यतता ज्वलंत आहे खरंय हे

    • @shobhanapatil5727
      @shobhanapatil5727 2 года назад

      @@snehalkshirsagar5714 aaaaaaaaaqqaqaqqaaqqaqaaaqaaaqqqaqaqaaaqaaaaaaaaaqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqaqqaqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqaqqqqqqqqaqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqaqqqqqqqqqqqqqqqqaqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqaaaaaqqaqaaaaqaaaaaaaaaAq

  • @The-earh
    @The-earh 3 года назад +74

    जबरदस्त चिञपट.....चटका लावून जातो.....पण ....सासर्याला विमनस्कपणे न्हाणीघरात टाकून जाणारी सून.....उथळ विचारांची वाटते....आपली जबाबदारी टाकून....मिञाची मदत करायला का बरं धावावं.....पहीलं तिथली परिस्थिती विचारली पाहीजे होती . नवर्याने काय चुक केली....? उलट आयुष्यभर ....त्याला वडीलांचे असे जाणे बोचत राहीले असते. माफी बायकोने मागायला हवी होती अगोदर.....! कारण तिने.....उथळपणे मिञाच्या मदतीला जाण्याचे कारणंच काय ? इतका प्रेमळ नवरा असताना....दुसरं लग्न कशाला बरं....? समर्पण बायकोने का नाही केलं. नवरा तर बेचिराख झाला. मुलीचे माञ खुप हाल. एकंदर अप्रतिम चिञपट....काही सांगून जाणारा....!🙏🙏🙏🙏

    • @dinkarniswade3828
      @dinkarniswade3828 2 года назад +4

      योग्य प्रतिक्रिया

    • @adv..jayshrichavan1943
      @adv..jayshrichavan1943 10 месяцев назад

      मार्मिक दृष्टिकोनाचं मत👌👌

    • @The-earh
      @The-earh 10 месяцев назад

      @@adv..jayshrichavan1943 thank you 🙏

    • @The-earh
      @The-earh 10 месяцев назад

      @@dinkarniswade3828 thank you 🙏

    • @AmolSalunkhe-uf2tl
      @AmolSalunkhe-uf2tl 3 месяца назад +1

      Khup vistrut pane lihila ahe saheb khara ahankar Vidya madam cha manat ala shevat cha udaharan chan ahe pani hodila budvat nhi vadle budvatat dosh Matra panyala lagato....... Prem he sankalpana Girish sahebani uttam nibhavliy samarpan jas ki ghasarat hote Karan saglyat jast nukasan tyancha ani minu cha zala khula vichar sarni balagnarya stre ne shevati fayada cha sauda kela

  • @manoharbaviskar3955
    @manoharbaviskar3955 18 дней назад

    लय जबरदस्त स्टोरी आहे सचिन सरांची ऐकटिंग लय भारी ❤❤❤👌👌👍👍

  • @dileep1678
    @dileep1678 21 день назад

    फारच सुंदर असा चित्रपट आहे मनाला भिडणारा फारच छान

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 3 года назад +3

    अतिशय सुंदर चित्रपट.सर्वच कलाकारांनी अतिशय सुंदर काम केले आहे. आजच्या काळात अशा चित्रपटांची खरी गरज आहे.

  • @ujwalaandhare1746
    @ujwalaandhare1746 Месяц назад +1

    चाललो पांथस्थ मी...अप्रतिम

  • @rupalimusale8485
    @rupalimusale8485 3 года назад +3

    खूप nice मूवी . वेळेवर सॉरी म्हणता आलं पाहिजे खूप छान msg.
    पण चूक दोघांनीच होती एकाने तरी पटकन पुढाकार घेऊन माघार घेतली असती तर आयुष्य दोघांचं च सुरळीत पार पडलं असतं .बऱ्याच दा आई वडिलांच्या अशा वागण्याने मूल एकटी पडतात. आजच्या पिढीला खूप काही शिकवणारा movie. आज छोट्या छोट्या गोष्टी वरून divorce होत आहेत व आयुष्य दोघांचे उध्वस्त होत आहे शेवटी काय एकमेकांचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे .
    पाण्याशिवाय होडीला अस्तित्व नसत , पाणी होडीला बुडवत नाही , होडीला वादळ बुडवत असत पण दोष मात्र पाण्याच्या कपाळी येतो , वेळ सांभाळली थोडा धीर धरला तर वादळशी झुंज देण शक्य आहे , आयुष्य खूप सुंदर आहे त्याच सौंदर्य जपता आलं पाहीजे
    खूप खूप छान msg

  • @PrabhakarPathade
    @PrabhakarPathade 11 месяцев назад +1

    मराठीतील टॉपमोष्ट कास्ट,जबरदस्त डायलॉग,आजच्याच जमाण्यातील कथा सार कस उत्तम जमलय.लोकेशन तर प्रथमच पहावयास मिळाली,मराठी सिनेमात.
    सचीनसाब का तो जवाबही नही,लाजवाब सबकुछ.😢

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 Год назад +1

    Hats off to गजेंद्र अहिरे, सचिन आणि शिल्पाष तुळसकर...सोहळ्याचे शेवटचं काव्य, ते मोहन जोशींबरोबरचे संवाद अफलातून ....अभिनयाची उधळण..दिग्दर्शन सारंच बहारदार..विक्रम गोखले तर सम्राटच...जबरदस्त खिळवून ठेवणारा सिनेमा...

  • @rajnandinikadam8425
    @rajnandinikadam8425 2 года назад +1

    मराठी सिनेसृष्टीची लाज बाळगणारा हा चित्रपट... सध्या च्या युवकांनी याचं अनुकरण करावं....emotions, expressions, n बरच काही.... खूप सुंदर रीतीने पडद्यावर आणलात.... पाय स्तब्ध करणारे, रडू आणणारे ते seen, ती चित्रपट मधील शांतता मला खूप च आवडलं... ❤️

  • @madhurathorat5268
    @madhurathorat5268 Год назад +1

    खूप छान आहे पिचर ....माणसाचा इगो किती नुकसान करू शकतो ...त्याच उत्तम उदाहरण

  • @nilimaskakade1924
    @nilimaskakade1924 3 года назад +3

    खुप छान भावपुर्ण चित्रपट
    खरच वेळेवर साॅरी म्हटल पाहिजे

  • @anilmore9231
    @anilmore9231 2 года назад +1

    निव्वळ अप्रतिम.
    जगण्या कडे पाहण्याचा एक नवीनच दृष्टिकोन मिळाला...
    सर्वांचेच अभिनंदन.
    🙏🙏🙏

  • @harishdeo5578
    @harishdeo5578 Год назад +2

    छान चित्रपट. वेळेवर सॉरी म्हणता आल पाहिजे. इगोप्रॉब्लेम्समुळे वादळ घोंगावत राहते हेच खरे.

  • @sforbhosale
    @sforbhosale 3 месяца назад +1

    . खूप वर्षांपूर्वी ही फिल्म बघितलं होती आणि परत मी 12/04/ 2024 खूप सुंदर फिल्म आहे सचिन सर आणि सहा अभिनेत्री खूप सुंदर अभिनय केला आहे मोहन जोशी यांनी खूप सुंदर अभिनय केला आहे पुर्ण फिल्म खूप खूप सुंदर मेसेज द्या जीवन खूप सुंदर आहे. पाणी ⛵ बुडवूत नाही तर हवा निर्माण झालेल्या वादळ ⛵ बुडवूत आणि पाणी दोषी ठरवलं जातं. आपल्या सर्वांच्या आयुष्यात शेवटी असं आहे आपण एकमेकांना दोषी ठरवलं पेक्षा प्रेम राहण्याची प्रयत्न केला पाहिजे हेच खरं आयुष्य ओळख आहे

    • @sharyu3539
      @sharyu3539 3 месяца назад +1

      13/4/2024
      Amhi tv ver bhagtoy
      Vidya cha khup rag alay

    • @sforbhosale
      @sforbhosale 2 месяца назад

      @@sharyu3539 खूप छान वाटलं

  • @VaibhavMulik-ib4vv
    @VaibhavMulik-ib4vv 3 месяца назад +1

    हा चित्रपट बरंच काही शिकवून जातो मन सुन्न करणारा चित्रपट आहे

  • @user-mh1dy4gh2t
    @user-mh1dy4gh2t 9 месяцев назад

    आपले मराठी चित्रपट आणि मराठी कलाकार किती उत्कृष्ट आहेत , अविस्मरणीय चित्रपट आहे 💐

  • @pushparokade636
    @pushparokade636 3 года назад +1

    खूप सुंदर movie सचिन सर अप्रतिम काम केलंय तुम्ही.विद्या ने जी चूक केली ना अशी बेजबाबदार स्त्री म्हणजे कळस होता .खरोखर राग येतो बघताना .

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 3 года назад +12

    खूपच छान चित्रपट..
    सचिन सर खूपच छानच...
    शिल्पा तुळसकर नेहमीच सुंदर काम..
    गजेद्र अहिरे तुमच्याबद्दल काय बोलू?
    एक उत्तम पण.. उपेक्षित दिग्दर्शक...
    गाणी श्रवणीय आहेत...
    नेहमी प्रमाणे पाऊस सुद्धा आहेच.
    माणसाला "साॅरी" म्हणता यायला हवे.
    वा! छान शिकवणारा अनुभव..

    • @latahumane1838
      @latahumane1838 2 года назад

      सॉरी म्हणून कुणाचा जीव वाचवता येत नाही ना

  • @sandeeppaunikar
    @sandeeppaunikar 3 года назад +3

    काल्पनिक घटना (accident ई.) चित्रपटात सत्यात दाखवायला सुद्धा तेवढी सत्य वाटली पाहिजे. फक्त एक घटना घडली आणि त्या भोवती चित्रपट उभा केला हे जूनच मराठी चित्रपट परीघ आहे.
    कथा म्हणून फार काहीच पाहण्या सारखे नाही, काही ठिकाणी वाक्य सुद्धा शब्द बांबळ वाटतात.
    फक्तं इतक्या चांगल्या कलाकारांसाठी चित्रपट पाहिल्या गेला.
    भावनिक द्वंद्व, नाती, कलह यातून करमणूक जरी होत नसली तरी काही नवीन असायला हवे होते.
    गाणी, अभिनय, संवाद उत्तम.
    कथा तेवढी नाही जमली.
    मराठी चित्रपटाला शुभेच्छा
    * २/५

  • @sureshWankhade-sy5vs
    @sureshWankhade-sy5vs 2 месяца назад

    काळजाला पिळवून गेले हे कथानक, माझी च कथा वाटली,.. जबरदस्त अभिनय सचिन चा...

  • @mhaskar3660
    @mhaskar3660 10 месяцев назад

    एवढा अप्रतिम आशय आणि विषय असलेला चित्रपट लोकांसमोर असा आडून youtube वरती यावा हे दुर्दैवी आहे. जबरदस्त कलाकार असताना देखील या चित्रपटाची आवश्यक तेवढी पब्लिसिटी का झाली नाही?
    सचिन बद्दल काय बोलावे... आम्ही कळायला लागल्या पासून त्याला पाहतोय. Gr8 👍 स्मिता तुळसीकर यांना पहाताना चित्रपट नाही तर आपल्या समोर काही घडतेय असे भासत होते... सलाम आपल्या सर्व कलाकारांना आणि दिग्दर्शक आणि सर्व टीमला. ❤

  • @vaishalisalvi2654
    @vaishalisalvi2654 2 года назад +7

    Superbly acted by Sachin sir and mam... Vikram sir... he speaks through his eyes... mind blasting... superb story 👏... very heart touching...

  • @shrirangpashtekar5162
    @shrirangpashtekar5162 7 месяцев назад

    सचिन पिळगांवकर सरांनी खूपच सुंदर अभिनय केला. आणि कोकण खूप सुंदर टिपला आहे संपूर्ण सिनेमात. खूप छान movie 🎥.

  • @priyankadalvi2313
    @priyankadalvi2313 3 года назад +3

    अप्रतिम व्यक्तिमत्व सचिन पिळगांवकर 👍👌👌👌awesome movie 💯💯💯

  • @yashpatil6571
    @yashpatil6571 2 года назад +1

    अप्रतिम अभिनय, कथा, खूपच मार्गदर्शन करणारा सुंदर चित्रपट

  • @user-hn8qo7cr7d
    @user-hn8qo7cr7d 2 месяца назад

    ते शेवटी म्हणतात जेव्हा सॉरी
    तेव्हा समजते खरी दुनियादारी
    सचिनचा अभिनय लय भारी

  • @user-od2ew9tk3i
    @user-od2ew9tk3i 2 года назад +3

    प्रेमात अडथळे का येतात.शिल्पा नावाच्या मुलीवर मी खुप प्रेम केले होते.लग्न जमलं होतं आमचं. सहा महिने मन मोकळं झालं होत.दोघांची परिस्थिती सारखीच.ऐन दिवाळीच्या दिवशी तिच्या वडिलांचा एक काॅल सर्व उध्वस्त करून गेला.त्यांचा ईगो आणि मी सरकारी नोकरी असूनही गरीबीवर ठेवलेले त्यांच बोट या रागात मी पण प्रयत्न कमी केले.विसरता येणं तरी शक्य आहे का ? तिने खुप समजून घेतले असते मला.बारा वर्षे झाली या गोष्टीला. कशी आहे देव जानो !

  • @pragikeskar6140
    @pragikeskar6140 3 года назад +13

    One of the best movies will full of best performances

  • @panchalsir8135
    @panchalsir8135 2 года назад +3

    केवळ आणि केवळ अप्रतिम....चित्रपटातील सर्वांनाच कोटी कोटी धन्यवाद...🙏

  • @abhilashaghuse4668
    @abhilashaghuse4668 3 года назад +3

    फार सुंदर चित्रपट, तितकच सुंदर संगीत, नी :शब्द केलं.

  • @ganeshkhade9652
    @ganeshkhade9652 3 года назад +2

    खूप छान मूवी आहे मी पाहीला काही तरी घेन्या सारख आहे सय्यम ठेवला तर नातं टीकतं ,,,,, रागात निर्णय घेऊ नका ,,,आयुष्य खूप छान आहे,,,परीवाराला थोडा वेळ द्या खूप छान 👌👌👌👌👌👌👌🌻🌻🌻🌻🌻🎎

    • @sandhyagupte2388
      @sandhyagupte2388 2 года назад

      खूपच छान चित्रपट.. 👍👍

  • @gauravbagve4738
    @gauravbagve4738 3 года назад +4

    अतिशय सुंदर चित्रपट आहे सुंदर लेखन काव्य रचना उत्तम काळजाला भिडणारा चित्रपट आहे

  • @govindmehtre2647
    @govindmehtre2647 3 года назад +7

    काळजाला लागणारा चित्रपट ❤️

  • @pravinbramhane
    @pravinbramhane 2 года назад

    अद्वितीय अप्रतिम काय बोलणार खुप मस्त हा चित्रपट आहे सुरेख कथा आणि खऱ्या आयुष्याची व्यथा आपण मांडली

  • @minakshivyapari9715
    @minakshivyapari9715 3 года назад +5

    खूप छान मुवि आहे
    Massage pn khup chan ahe वेळेवर sorry. म्हणता आले पाहिजे 😘😘😘

  • @sumanbhandare6884
    @sumanbhandare6884 3 года назад +8

    खूपच छान चित्रपट गाणी ही अगदी साजेशी

    • @ganeshrnarsale669
      @ganeshrnarsale669 3 года назад

      योग्य वेळेत च स्वारी म्हणता आल पाहिजे

    • @ganeshrnarsale669
      @ganeshrnarsale669 3 года назад

      माझ्या आयुष्यातील मी पाहिलेल्या सर्व चित्रपटांमध्ये हा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे...
      मनाला भावलेल या चित्रपटातील वाक्य

  • @user-po4rq3dj3f
    @user-po4rq3dj3f 3 года назад +1

    फारच सुंदर चित्रपट व खूप काही शिकण्यास सारखे आहे ,कलाकार सर्व छान व वाक्ये ,अर्थपूर्ण ,आहे मनापासून आवडला ,मस्त आजच्या मुलांना मुलींना शिकण्यासाठी सॉरी व इगो हे शब्द खूप काही सांगून जातात ,धन्यवाद

    • @vaishaligawad6185
      @vaishaligawad6185 2 года назад

      आजची पिढी असा चित्रपट पाहून सुद्धा ना सुधरणारी आहे ,"इगो issues gheun जगणारी "

  • @user-kj9kk7lf7v
    @user-kj9kk7lf7v Год назад

    वेळेवर माफी मागितली जाणं आणि वेळेवरच क्षमा केली जाणं यामुळेच दोन्ही कृतीला अर्थ राहतो
    खरं आहे

  • @vaishali1234ful
    @vaishali1234ful 15 дней назад

    What a movie !! What a nice acting of all the actors ! Marathi movies r best among all languages

  • @subhashdesale1830
    @subhashdesale1830 2 года назад +2

    पती पत्नी मध्ये नेहमी सुसंवाद महत्वाचा मुद्दा आहे,नाहीतर
    नात्यात खूप दुरावा निर्माण होते,,,धर्मेच अर्थच कामेच नातीचरामी नातीचरामी,, ह्या सम्पूर्ण जीवनात एकत्र सुख दुःख त साथ देणार नाते हे पती पत्नी चे नाते आहे,,

  • @bestisbest3569
    @bestisbest3569 3 года назад +5

    tq for uploading this movie.... aaj yach paristhititun jatoy mi. pan majhi suruvatichi stage ahe. ya movie madhun khup shikayla milale. ata mi majhe kutumb vachavnar

  • @sangitakatre8879
    @sangitakatre8879 Месяц назад

    Khup Chan movie ahe mind-blowing 👍👌

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 Год назад +1

    पहिली 55 मिनिटे उत्सुकता वाढवणारा सिनेमा, पुढे अगदीच *बंडल* आहे, *शेवटपर्यंत पहावासाच वाटला नाही मला* 😫..... एव्हढ्या मोठ्या बंगल्यातल्या बॉयलर ला थर्मोस्ट्रॅटेड ऑफ् / ऑटोमॅटिक ऑफ् नसावा? माणूस भाजून निघेल एव्हढं गरम पाणी येतच नाही मुळात?!?!.... काय गोष्ट आहे पण?!?! आहाहाहाहा🙆☹️😲

  • @somnathkb
    @somnathkb 2 года назад +6

    Sachin sir and Madam both character....great play.....simply great

  • @sadashivmanjrekar4910
    @sadashivmanjrekar4910 2 года назад +2

    सचिन तुला लाख लाख शुभेच्छा. अतिशय सुरेख असा हा तुझा अभिनय.सोबत शिल्पा पण आहेच. अभिनंदन.

  • @sujatasagare972
    @sujatasagare972 13 дней назад

    सचिन पिळगावकर यांचा अभिनय अप्रतिम

  • @funnychannel9544
    @funnychannel9544 3 года назад

    खुपच सुरेख चित्रपट
    सगळ्यांची काम विलक्षण भावुक व सुन्न करणारी
    कमी संवाद देहबोलीतुन संवाद व गाणीही अर्थपुरणच
    फक्त चे मनापासुन आभार

  • @leenadhorje7614
    @leenadhorje7614 8 месяцев назад

    Kup chan movie....shabdda सुंदर.....गाणी छान विक्रम गोखले...सचिन अभिनय....kupach मंनाला स्पर्शून गेले

  • @purnimapalimar279
    @purnimapalimar279 Год назад +2

    What a classic movie, Sachin is our gem, even heroine was good enjoyed whole movie different end 👍👌👏👏😍

  • @siddharthkamble9822
    @siddharthkamble9822 3 года назад +8

    काळजला लागणार पिक्चर आहे. खरच जगायला शिकवणारी स्टोरी

  • @sonugiri73
    @sonugiri73 3 года назад +7

    सर्वात छान आहे चित्रपट आहे

  • @sunilkamble7093
    @sunilkamble7093 3 года назад +1

    फारच सुंदर मराठी चित्रपट आहे. सचिन सरांचा कसदार अभिनय. सर्वच कलाकारांनी सुंदर कामे केली आहेत.वेळेवर चूकीची जाणीव झाली तर पुढील अनर्थ टळला असता, .जीवनाचा आनंद घेणे ऐवजी तिचाशी स्पर्धा केली त्याचा परिणाम काय होता हे चित्रपटाने दाखविले आहे. समझोता व वेळेवर चुकीची जाणीव होऊन माफी मागने हि महत्वाची शिकवण या चित्रपटातुन मिळते. हॅट्स ऑफ गजेंद्र अहिरेसर आपल्या दिग्दर्शनाला. 👍👍🙏🙏

  • @Saavi...........
    @Saavi........... Месяц назад

    अप्रतिम चित्रपट आणि मेसेज

  • @sitaramringe7849
    @sitaramringe7849 3 года назад +1

    अतिशय सुंदर सिनेमा

  • @vikasnagargoje7173
    @vikasnagargoje7173 8 месяцев назад +1

    पुरुष बिघाड झाला तर तो संपतो...
    बाई...साठी कितीही पुरुष उभा राहतात...
    मला म्हणाली ही शर्यद नाहीये... अन शेवटचा घाव तीच घालून गेली...

  • @engmrugjal
    @engmrugjal Месяц назад

    प्रेमाचा form कधी बदलत नसतो आणि ज्याचा बदलतो ते प्रेम नसतं. दुसऱ्यावर अवलंबून राहायला लावतं ते प्रेम असू शकत नाही. दुःखाच्या गर्तेत लोटत ते प्रेम असू शकत नाही. तो खरा स्वार्थ आहे. जे सापेक्ष बनवतं ते प्रेम नसतं, प्रेम तर त्या निरपेक्ष तत्वाचं नाव आहे ज्याचा लवलेश प्राप्त झाला तरी जीवन धन्य करून टाकतं. वयाच्या २२ व्या वर्षी समाधी घेण्याची योग्यता, बळ जे देतं ते प्रेम आहे. त्या अलौकिक प्रेमाची कल्पना तरी आपण करू शकू काय ?

  • @kavitakaur2365
    @kavitakaur2365 3 года назад +5

    Sachin hamesha parfect hote hai na kum na jyada 👌👌

  • @ratunawartejas
    @ratunawartejas 3 года назад +1

    अती द्वेष , राग आयुष्याचा शेवट विनाशने होऊ शकतो..

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 3 года назад +6

    वा!!
    जन्माची मिरविली पालखी।।
    दुःखाचा "सोहळा" केला ।।
    अफलातून ओळ.

  • @smitamali8054
    @smitamali8054 3 года назад +5

    खुप सुंदर विषय कलाकार अप्रतिम जीवनात चुका खुप होतात पण त्या समजून घेऊन माफ़ करायला शिकले पाहिजे इगो असावा असतोच पन तो वेळेवर पुसून टाकायला शिकले पाहिजे तरच जीवन हलकफुलक होईल

  • @smitakulkarni1029
    @smitakulkarni1029 2 года назад +1

    अतिशय अप्रतिम
    अप्रतिम पकड घेणारी कथा
    सूंदर दिग्दर्शन
    आणि पावसाचे अस्तित्व
    अप्रतिम पद्धतीने कॅमेरा बद्ध केलय
    hat's off for all team
    अप्रतिम टीम वर्क

  • @masaanath77077
    @masaanath77077 3 года назад +13

    After Long days I saw A master piece of beautiful moive...... 2 v. Strong (#truly experience ones)actors ...what an acting .....❤

  • @aartikatariya687
    @aartikatariya687 3 года назад +15

    Purn pane vidya chi chuk ahe ,tichya halgarji mule Girish Che vadil off zale ani tila tyacha regret pn nahi vatay ,ulat divorce ghetala tine ,Girish chi Kay chuk hti ,konihi asa Ch react hoil tya situation madhe

    • @anupamabhat1646
      @anupamabhat1646 3 года назад

      Exactly.
      Why should Girish say sorry, when his wife Vidya has killed a man who is so helpless, in such a brutal way.
      Nothing was so important, the accident had happened. Vidya could do nothing there. She could have gone after some time.

  • @prashantmore3361
    @prashantmore3361 3 года назад +4

    Khupach sunder . Pahun Khup antarmukh zalo

  • @rakeshpatil2439
    @rakeshpatil2439 2 года назад

    Masterpiece....sorry mhanane garajech..pan velevar khup mahatvache...👌👌👌

  • @kiransawant8501
    @kiransawant8501 Год назад +2

    चुक तिचीच होती.तरीहि तडकाफडकी डिओरस घ्यायची काय गरज होती. वेळ गेली असती सर्व नीट झाल असत.वेळेवर सोरी बोलता यायला हवे हेच खरे.

  • @madhurijoshijoshi3222
    @madhurijoshijoshi3222 2 года назад

    Khup chan cinema. Sachin sir is best.shilpa cha abhinay apratim. Vikram gokhale farch chan..great film...thanks to gajendra ahire.

  • @ramharikadam5598
    @ramharikadam5598 3 года назад +7

    Khup chaan sachin sir acting 👍👍👌

  • @muskan.221
    @muskan.221 3 года назад +5

    Khupch sundr 🥺🙏🙏

  • @shwetakatkar9671
    @shwetakatkar9671 3 года назад +1

    खूपच सुंदर चित्रपट आहे 👌

  • @manishapotdar7198
    @manishapotdar7198 8 дней назад

    अतिशय सुंदर

  • @madhurijoshijoshi3222
    @madhurijoshijoshi3222 2 года назад

    Marathi madhalya top actors cha top cenema.thanks to top director and music director.and all team...cinematalya pavasachi bhumika farch chan.

  • @rajeshdandge4231
    @rajeshdandge4231 2 месяца назад

    Jabbar dast ego problem
    Pan perma samor zukavcha lagat hech satta ahe
    Prem khup sundar aahe pan te samajayala soodha vel yavi lagate he tya doghacha dur bhag ahe jya doghancha premat velela Ani kalala mahatv detat. Karan prem fakt doghech asat tyat tesara konihi yeun deu naka na natevaik aani mitr Ani vel kal.
    Love is forever 💞💞💞

  • @humanoid87
    @humanoid87 Год назад +2

    Sachin sir cha avtaar paahila... Mala mich dislo.... ७ दिवसाची ३० ₹ पगार मिळायची मला.... आज माझ्याकडे आई आहे बहीण आहे भाऊ आहे ... पण सगळे मला संपवायची वाट पाहत आहेत.... माझा ३yr चा. Mulgaa आहे.... मी कसाबसा जगतोय.... माझ्याकडे जे काही होते ते मी कुटुंबावर खर्च केले.... आज मी रिकामा आहे ... मला lathadnyat येत aahe... मला आणि माझ्या बायकोला मारहाण केली.... घरातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.... Lockdown che २ वर्ष की रस्त्यावर काढले.. रस्त्यावर पडलेला प्लॅस्टिकचा डबा धुऊन घ्यायचा... आणि जिथे कुठे खिचडी वाटली जायची... तिथपर्यंत पोलिसांपासून लपत पोहोचायच... मी काय काय सांगू.... माझं दुःख पाहून मला सुद्धा रडू येत नाही....

  • @hiralalkokate7341
    @hiralalkokate7341 Год назад

    खुप सुंदर आणि बरेच काही सांगून जाणारा चित्रपट

  • @celinefernandes9872
    @celinefernandes9872 11 месяцев назад +1

    Superb movie..Sachin 's acting was awesome amazing mind blowing ❤God bless him

  • @user-ph7fe2hs7n
    @user-ph7fe2hs7n 5 месяцев назад

    निशब्द.होतो.पांथस्त मी एकूणच अप्रतिम.

  • @shabanashareefsheikh882
    @shabanashareefsheikh882 11 месяцев назад

    खूपच सुंदर, भावनिक चित्रपट

  • @madebykshitijmadeinindia6632
    @madebykshitijmadeinindia6632 3 года назад +5

    अप्रतिम, अर्थपूर्ण

  • @anilacharekar2207
    @anilacharekar2207 3 года назад +1

    Mindblowing movie. Sachin, Shilpa greate acting. Dialogue ek number.

  • @joeynamdar3357
    @joeynamdar3357 3 года назад +2

    Super movie in this world what you have to take property or true Love Sachin polvker Excellent Acting And to entire team