टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ पापड |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • उपवासाचे पळी पापड साबुदाण्याचे पापड करण्याची सगळ्यात सोपी पद्धत आपण बघणार आहोत उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला काही मेहनत लागत नाही यातच सगळ्यात अगोदर आपण बटाट्याचे चिप्स कसे बनवले ते बघितलेला आहेत चीज बनवत असताना दोन-तीन पाण्यामध्ये आपण चीज होत असतो त्यात तुरटी किंवा मीठ टाकून ते पाणी आपण चीफ साठी बनवत असतो चिप्स त्यात टाकल्यानंतर खाली जे स्टार्च उडतो ज्याला आपण बटाट्याचा चीक म्हणतो तर हा चीक फेकून न देता आपण एका भांड्यामध्ये जमा करून ठेवायचे आहे दोन-तीन पाण्यामध्ये चिप्स धुतलेलं पाणी हे थोडावेळ आपण तसेच राहू द्यायचा आहे आणि वरचं पाणी फेकून द्यायचा आहे त्यानंतर खाली जो गार्ड्स असतो ते असतं बटाट्याचा चीक तर हा चीक फेकून देता यापासून आपण आज भरपूर अशा पापड बनवणार आहोत हा चीक आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे त्यात सुद्धा हलवून पाणी स्वच्छ टाकायचा आहे आणि हे पाणी शांत झाल्यानंतर त्यात सुद्धा चीक बसून राहतो त्यानंतर ते पाणी काढून हा चिक आपण वापरण्यासाठी घ्यायचा आहे दोन-तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घेतलेला अतिशय पांढराशुभ्र होतो त्यासाठी आदल्या दिवशी एक वाटी साबुदाणे मी भिजत टाकलेले होते हा दोन वाट्या चीक आहे यासाठी आपण एक वाटी साबुदाणे पुरेसे आहेत त्यानंतर एका मोठ्या पातेल्यात आपण एक तांब्या पाणी टाकायचा आहे म्हणजेच चार ग्लास पाणी कडकडीत गरम करून टाकायचा आहे त्यात एक चमचा मीठ टाकून हे पाणी व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे त्यानंतर यात टाकायचे आहे साबुदाणे आणि हा बटाट्याचा चीक सुरुवातीला हा बटाट्याचा चीक थोडासाच वाटेल त्यानंतर जसं जसं हा चीक शिजेल तसं तसं हे पीठ भरपूर असं होत जाईल त्यात जर अजून पाणी लागलं तर अजून दोन ग्लास पुन्हा लागलं तर दोन ग्लास असं करत करत मी आठ नऊ ग्लास पाणी टाकलेला आहे हे तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकत राहा साबुदाणे छान ट्रान्सपरंट होतील आणि हे मिश्रण जे आहे ते घट्टसर होईल जास्त घट्टसर करू नका जितके पळी पापड टाकता येतील असंच बनवा जास्तही पातळ झालं की याचे पापड व्यवस्थित होत नाही म्हणून आपल्या अंदाजाने हे पीठ व्यवस्थित दहा ते पंधरा मिनिटे शिजवून घ्यायचा आहे साबुदाणे ट्रान्सपरंट झाले की बंद करायचा आहे गॅस बंद करून आपण टेरेस वरती किंवा गच्ची वरती एक ट्रान्सपरंट पेपर किंवा ओढणी टाकून त्यावर पडी पापड टाकायचे आहेत बघा चीक अगदी छोटासा दिसत असला तरी भरपूर असे पापड झालेले आहेत उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे एका दिवसात छान कडकडीत आपण वाळले त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा ऊन दाखवले आणि हे पापड तळून दाखवते अगदी छान ट्रान्सपरंट असे पापड आपले तयार झाले आहेत हा चीक जर फेकून दिला असता तर इतके पापड झालेच नसते तर अशा पद्धतीने टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ पापड आपण तयार केलेले आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद
    #टाकाऊवस्तुपासूनटिकाऊपापड #साबुदाणापापड #उपवासाचेपापड #साबुदाणापळीपापड #पळीपापडरेसिपी #साबुदाणापापड #रेसिपी #घरगुतीपापड #वाळवणाचेपदार्थ #उन्हाळीवाळवणाचेपदार्थ #वाळवण #वाळवणरेसिपी #वाळवणपदार्थ #उन्हाळास्पेशलरेसिपी #घरगुती #उपवासाचेपळीपापड #साबुदाण्याचेपापड #साबुदाणा
    ‪@MasalaKitchenbyPoonam‬

Комментарии •