पनवेल वरून तळीये गावी केला रात्रीचा प्रवास 🙏 | मदत कार्याचा पहिला दिवस - Taliye, Mahad (Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • पनवेल वरून तळीये गावी केला रात्रीचा प्रवास 🙏 | मदत कार्याचा पहिला दिवस - Taliye, Mahad (Konkan)
    आम्ही मित्रांनो तुम्हाला आवाहन केलं होतं की आपल्या कोकणातील पूरग्रस्त बांधवांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून मदत करू. केवळ दोन दिवसांमध्ये तुम्हाला आवाहन केल्यानंतर आमच्याकडे तुम्ही जी काय मदत दिली ती सगळी मदत गोळा केली. त्या आलेल्या मदतीच्या रकमेतून आपण जीवनावश्यक वस्तू खरेदी केल्या. 29 जुलै रात्री आम्ही मदत घेऊन तलीये गावी निघण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री आमच्या सोसायटीतील माणसांनी सुद्धा खूप मदत केली. आम्ही त्या वस्तूंचे प्रत्येकी कीट तयार केले. प्रथम पनवेल वरून महाड तालुक्यातील तळीये गावी जाण्याचा निर्णय घेतला. आमचा रात्रीचा प्रवास सुरू झाला. मी कोकणी निखिल आणि कोकणकर अविनाश हे माझे दोन मित्र माझ्या सोबत होते. माझ्या गावावरून मित्र हितेश आणि त्याचे बाकी काही साथीदार महाडकडे निघाले होते. सकाळपासून मुसळधार पाऊस होता. या मुसळधार पावसामध्ये आम्ही महाड ते तळीये गावचा प्रवास केला. तळीये गावी जाऊन आमचं मन एकदम गहिवरलं. तुमच्या सगळ्याकडून आलेली मदत आपण तळीये या गावातील आपल्या बांधवांना दिली. त्यांचं सांत्वन केलं. तेथील किशोर दादा आणि सचिन दादा यांच्याशी आमचे हितगुज झाले. किशोर दादा यांनी त्यांचं म्हणणं आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडलं आहे. आम्ही तळीये गावी भेटी देऊन पुढे महाड आणि खेडच्या प्रवासाला निघालो. खेडमध्ये आपले केळशीतील मित्र भेटले. मदतीची खरी गरज कुठे आहे हे तुमच्यापैकी बऱ्याच आपल्या सबस्क्राईबरने सांगितलं. आम्हाला त्यामुळे योग्य ठिकाणी मदत पोहोचवता आली. खेड वरून आम्ही रात्री चिपळूनकडे निघालो. चिपळूणमध्ये पोहोचायला आम्हाला रात्रीचे अकरा वाजले. रात्री आम्ही चिपळूण मध्ये पोहोचून फ्रेश झालो. जेवण केलं. ब्राह्मण सहाय्यक संघ चिपळूण यांनी अतिशय छान असा उपक्रम राबवला आहे. चिपळूण मध्ये मदत करायला आलेल्या माणसांना येथे राहण्याची सोय आहे आणि जेवणाची सुद्धा सोय आहे. एकंदर पहिला दिवस आमच्या धावपळीत केला. कोणालाही थकवा जाणवत नव्हता तुमच्याकडून आलेली मदत योग्य ठिकाणी पोचली याचं आम्हाला समाधान वाटत होतं. ही मदत नव्हे हे आपलं कार्य आहे, आपली जबाबदारी असे आपण समजतो. हा व्हिडीओ तुमच्यापर्यंत घेऊन यायचं कारण हेच की तुम्ही दिलेली मदत ही योग्य ठिकाणी पोचली हे तुम्हाला समजावं. चुकभूल माफी असावी. पुढील व्हिडिओमध्ये चिपळूण मदत कार्याची अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तुम्ही आम्हाला सहकार्य केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. #PanvelToTaliyeRatrichaPravas #TaliyeMahad #MahadFlood #sforsatish
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इंस्टाग्राम वर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Комментарии • 265

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 года назад +25

    खुप छान चांगले काम करत आहात अशीच माणूसकीच्या नात्याने पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात देत जावा देव तुम्हाला या कामात यश देवो

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 3 года назад

    खूप खूप आभार तुम्ही सगळ्यांनी माणुसकी चा नात्याने मदत केली सगळ्यांना धनयवाद तुमचा सगळ्या चॅनल मित्रांना पुढचा प्रवासाला शुभेच्छा

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 3 года назад

    खुप छान काम करत आहात तुमच्या कर्तव्याला सलाम 🙏🙏 खुप बघून वाईट वाटत 😭 लवकर परिस्थिती सुधारु दे अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो 🙏🙏 सर्वांनी मदत करत रहा 🙏

  • @rajeshreegangawane9504
    @rajeshreegangawane9504 3 года назад +9

    सतीश अविनाश निखिल तुम्ही तिघांनी खूप चांगलं काम केलं त्याबद्दल खूप खूप थँक्स.

  • @deepakgorivale5930
    @deepakgorivale5930 3 года назад +1

    खूप छान काम सतीश भाऊ सॅल्युट

  • @manoharpachkale6843
    @manoharpachkale6843 3 года назад

    बघुन फार वाईट वाटल
    छान काम करत आहात
    येकच विनंती आहे की कुठल्या पन गाड़ी वर रजकारन्यानचे फोटो बैनर लावू नए
    सर्व सामान्य मानसानीच जास्त मदत केली आहे

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 года назад +1

    मित्रा तुमच्या कामाला मनापासून सलाम

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 года назад +7

    सतिश खूप छान काम आणि मेहनत केली आहे तुम्ही सगळ्यांनी. सगळ्यांना खूप खूप आशिर्वाद 🙏🙏🙏🙏

  • @sujataskitchen6776
    @sujataskitchen6776 3 года назад +1

    Dada kharach tume he kam kartay salute tumhala he sarv aikun far wait watle dev tyana takat devo parat sanasr ubha rahude aamhi asha prakare madat karu he vel kona var pan yeu shakte sarvani manuski dakavli pahije aapan hya sarvana maddat karu 🙏

  • @lajarijadhav5232
    @lajarijadhav5232 3 года назад +1

    महाडकरांकडून तुमच्या संपुर्ण टीमचे खुप खुप आभार 🙏💕

  • @shilpamahajan3616
    @shilpamahajan3616 3 года назад +6

    तुमच्यासारख्या लोकांमुळे मदत कार्य सुरळीत होतात, असेच नेहमी रहा

  • @roshanpol1332
    @roshanpol1332 3 года назад +1

    खूप खप धन्यवाद भाऊ आमच्या पर्यंत मदत पोहचवल्या बद्दल🙏🙏🙏🙏रोशन पोळ(तळिये)

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      ❤️❤️🙏 nakkich sobat aahot tumchya

  • @dipitinalawade3015
    @dipitinalawade3015 3 года назад +2

    छान काम करताय देव तुमची सदैव मदत करो

  • @sandeshmorye4147
    @sandeshmorye4147 3 года назад +7

    ऐकेमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ....खुप छान अजून उत्तम कार्य घडो तुमचा आमचा हातून

  • @jda8508
    @jda8508 3 года назад +1

    खूप चांगले काम करत आहात आपण मी आपले व्हिडिओ नियमित पाहतो तसा मी मराठवाड्याचा आहे आपला आवाज खूप नम्र आहे असेच छान काम करत रहा👍

  • @ganishaikh9501
    @ganishaikh9501 3 года назад +1

    Tya shetat na jane tya kiti tari lokani kam kela asel.bhat lagvad keli asel,pan aaj tyatil kiti tari log aaj nahi yet khup dukhachi ghatna aahe .🙏🙏

  • @sujatam9447
    @sujatam9447 3 года назад +1

    Tumche kam baghun khup khup dhanyawad madnatipaksha aaple kartavyach ashe ase sanmjune tounhi sarvlajjan jam kartay tyabadhal lakhlakh dhanyavad tumche🙏🙏🙏

  • @amolbhokare8073
    @amolbhokare8073 3 года назад +1

    खुप छान काम करताय तुम्ही सर्व...🙏

  • @niks_niks0112
    @niks_niks0112 3 года назад +5

    सतीश दादा आपल महाड़ च खुप नुकसान झाल रे😰तुझ्या video चा माध्यमातून बघायला मिलतय😒😞लवकरात लवकर सगल ठीक हो अशी गणपति
    बाप्पाला 🙇प्रार्थना🙏😔

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +1

      होय सगळं ठीक होईल, हळूहळूA

    • @niks_niks0112
      @niks_niks0112 3 года назад

      व्हायलच हाव

  • @sandeepbhagade6857
    @sandeepbhagade6857 3 года назад

    खूप छान वाटले आपण जे काही काम करत आहेत.आपले हे योगदान पाहून बरे वाटले.

  • @geometryworkspace9300
    @geometryworkspace9300 3 года назад +6

    समाधी म्हणून सिमेंट चे चौथरे न बांधता त्यांचे स्मारक निसर्ग संवर्धन तून व्हावे जे पूर्ण जगासाठी मार्गदर्शक होईल

  • @vidyalondhe9221
    @vidyalondhe9221 3 года назад +2

    Je khare adachanit aahet tyanach madat dya.
    Karan rastyavar ji tolaki ubhi rahun khote bolun madat ghet aahet.
    Va jyana madatichi garaj aahe te bichare gharatil chikhal kadat basale aahet.
    Aatach batami milali.
    Gharaparyant jaun madat dhya 🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      प्रत्यक्ष पीडितापर्यंत जाऊन आपण सगळी मदत पोहचवली आहे 🙏 तुमचं सहकार्य कायम असुद्या

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 3 года назад +1

    सतिश दादा तुम्ही आणि तुमचे दोन मित्र तुम्हा सगळ्याचे कौतुक करायला पाहिजे देव तुमच्या पाठीशी आहे चांगले पुण्याचे काम करीत आहात

  • @nirut2152
    @nirut2152 3 года назад +1

    तुम्ही जी मदत करत आहात खूप मोठे कार्य आहे, तुमची मदत कोंकणी बाधंवना मिळत आहे का हे तुम्ही लक्ष पूर्वक पहा कारण काही लोकांनी केलेली मदत godown मध्ये ठेवण्यात आली आहे. आणि ती godown मध्येच पडून राहू नये. प्रत्येक मदत की कोकणी माणसांच्या घरा पर्यत पोचली पाहिजे. तुमच्या या कार्याला सलाम👍👍👌

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +1

      ❤️🙏🙏

    • @nirut2152
      @nirut2152 3 года назад

      @@SFORSATISH ❤️🙏🙏👍👍

  • @pratiksharasam8648
    @pratiksharasam8648 3 года назад +1

    Khup chan madat karat what tumhi dev tumhala khup Pudhe gheun Jael khup mot puny tumhi kamaval

  • @Pooja-jr2zk
    @Pooja-jr2zk 3 года назад

    Satish dada avi dada ani nikhil tumi tighehi एकजुटीने kam kelat khup chan watay ani khup khup bless milave tumhala sglyankdun

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 3 года назад

    मित्रानो खूप छान काम करत आहात. हिच माणुसकी कायम राहावी

  • @shraddhatawde6587
    @shraddhatawde6587 3 года назад +2

    खुप वाईट वाटले दादा विडीयो पाहुन सतिश दादा आम्हाला समजले तुम्ही सर्व जण छान काम करता आहात धन्यवाद तुम्हाला तुम्हाला कधी काही कमी पडणार नाही ईश्वर चरणी प्रार्थना करते सर्व जण काळजी घ्या

  • @riyasawant3739
    @riyasawant3739 3 года назад +1

    खरे समाज सेवा केली आहे. आणि हे तेवढे सोपे काम नाही. God bless you and take care

  • @sunilchalke5787
    @sunilchalke5787 3 года назад +1

    खूप छान काम करत आहात तुम्ही

  • @aakshayreturns4872
    @aakshayreturns4872 3 года назад +1

    Khup chan Kam karatos bhava........khup khup ashirwad milatil tumha sarwana.....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ....jay shivaray

  • @aparnathakur425
    @aparnathakur425 3 года назад +5

    तुमच्या सर्वांच्या कार्याला त्रिवार वंदन..🙏🙏🙏

  • @priyakhadye2116
    @priyakhadye2116 3 года назад +2

    Kokan chi manase sadhi bholi ..kalajat tyanchya bharali shahali....he gane aaj umagale kharach....💕😘

  • @renukavartak1893
    @renukavartak1893 3 года назад

    Khup mast kam kelat tumhi mala abhiman aahe mee sudha kokani aslyacha pan deva konavar ashi vel yeu naye evdhach 🙏🙏🙏😭😭😭😭😭

  • @user-ox5tb4uu8k
    @user-ox5tb4uu8k 3 года назад +2

    खूप छान दादा खूप मोठं काम करत आहे तुम्ही खूप तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @vandanarohekar6191
    @vandanarohekar6191 3 года назад +2

    चांगल्या कामाची फळ नेहमी चांगले च मिळते 👍

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 года назад +2

    सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद व राहूल इतका मोठा प्रवास पार करत आहे त्यासाठी धन्यवाद व खरच ती परिस्थिती पाहून मन भरून आलंं शब्द ही कमी पडतील म्हणून फक्त एकच मनापासून आभार

  • @rakeshringe
    @rakeshringe 3 года назад +1

    खुप छान वाटले..मी पण पोलादपूर मधून आहे..माझ्या गावाकडे पण परिस्थिती चांगली नाही. आम्ही पण सेवा देत आहोत. youtube चॅनेल च्या माध्यमातून तुम्ही केलेली सेवा लक्षणीय आहे. गावाकडची परिस्थिती बघून खूप वाईट वाटतेय..देव सर्वांना दुःख पचविण्याची शक्ती देवो ..
    सतीश भाई अगोदर माहीत असत तर माझा पण खारीचा वाटा देता आला असता पनवेल ल येवून यूट्यूब च्या माध्यमातून... 🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      Thank you, nakki bhetu pudhe

  • @mohinichourase3896
    @mohinichourase3896 3 года назад

    Chan must kam krt ahe tumhi sagle khup khup abhinandan tumch👏👍

  • @parthekawade708
    @parthekawade708 3 года назад +1

    खुप छान काम करताय तुम्ही सर्व तुमच्या कार्याला सलाम. 🙏🙏🙏

  • @karangawand6253
    @karangawand6253 3 года назад +1

    खूप चांगलं काम करता दादा खरच आम्ही पण गेलो होतो तीथली परस्थिती पाहून खूप वाईट वाटते

  • @dishakadam8355
    @dishakadam8355 3 года назад +1

    खूपच छान कुठल्या ही पक्षाची मदत न घेता केलेले उत्तम कामगिरी करता यातच तुमची माणुसकी दिसून येते. 👌👌👌🙏🙏

  • @vidyasrecipe2191
    @vidyasrecipe2191 3 года назад +1

    धन्यवाद

  • @poojatrimbakkar2332
    @poojatrimbakkar2332 3 года назад +2

    Hatts of to u satish bhavu. Tumchya sarvanche karya far mahaan ahe. Pan hi madat jyana kharch garaj ahe tyanch milunde.

  • @sunitavishwarupe7611
    @sunitavishwarupe7611 3 года назад +2

    सर्व जण मिळून चांगले काम करताय. देव तुम्हाला यश देवो. 👍

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 3 года назад +1

    अभिमान वाटताेय तुम्हा सर्वांचा. खुप छान काम करताय तुम्ही सर्व

  • @SP-zs7wr
    @SP-zs7wr 3 года назад +1

    He prem Ani apulki aplya bandhu prem he fakt Maharashtra madhe pahayala milte hats off to all...tya saglaynna garjecha vastu milat ahet pan shabdik aadhar pan tyanna detay tyanna kharach ekta vatnar nahi.

  • @sameeralhat3538
    @sameeralhat3538 3 года назад +1

    Nice video satish uncle❤️

  • @sachinkachare8400
    @sachinkachare8400 3 года назад +1

    Khup chan satish da

  • @prafullnarvekar6421
    @prafullnarvekar6421 3 года назад +1

    Great job👍

  • @sujataphanse644
    @sujataphanse644 3 года назад +1

    Khup chaan kaam kartaay tumchya kamala yash yeo hich prarthana 🙏🏻🙏🏻

  • @usnaik4u
    @usnaik4u 3 года назад +2

    तुमच्या सर्वांच्या या कार्याला सलाम 🙏🏻

  • @chandrakantpanchal1496
    @chandrakantpanchal1496 3 года назад +1

    Tumchi help khupch jhali tya lokansathi. Aamhi aahot tumcha sobat.

  • @amitjoshi8666
    @amitjoshi8666 3 года назад +1

    Good job

  • @balkrishnasawant452
    @balkrishnasawant452 3 года назад +1

    दादा खरंच खुप छान सामाजिक काम करत आहात तुम्हाला सर्वांना सलाम

  • @apurvamohite1504
    @apurvamohite1504 3 года назад +1

    दादा तूम्ही सगळे खूप खूप खूप great आहात 🙏🙏🙏🙏

  • @pratibhakamble9291
    @pratibhakamble9291 3 года назад +1

    Nice 🤟✌👍🙏

  • @geetaghadge9414
    @geetaghadge9414 3 года назад +2

    खूप छान काम कराता दादा तूमच्या कामाला सलाम 👏👏🙏🙏

  • @shilpamahajan3616
    @shilpamahajan3616 3 года назад +2

    खूप रडू आलं आजचा विडिओ बघताना, खूप वाईट झालं

  • @gauravikadam5774
    @gauravikadam5774 3 года назад +1

    Such a great work and great efforts ...really salute ....bappa bless u all ✨

  • @sanjitpatil6006
    @sanjitpatil6006 3 года назад +2

    अतिशय सुंदर विचार व सामाजिक कार्य

  • @siddheshbandekar_mh0160
    @siddheshbandekar_mh0160 3 года назад +9

    खूप छान... चांगले काम करता आहात🙏🙏🙏

  • @sureshkolekar2004
    @sureshkolekar2004 3 года назад +1

    खूप छान काम केलं तुम्ही आणि टीम ने देव त्यांच्या आत्मस शांती दे.

  • @savang8283
    @savang8283 3 года назад

    Great work dada ani avinash bhau👌👌👌

  • @priyankasawantparab5464
    @priyankasawantparab5464 3 года назад +1

    🙏🙏

  • @rekhajadhav8514
    @rekhajadhav8514 3 года назад +1

    खूप छान कार्य आहे तुम्ही केलेलं धन्यवाद 🙏 अशीच तुमची एकत्र कार्याला साथ राहो 🙏

  • @dineshsarfare2816
    @dineshsarfare2816 3 года назад +1

    Jay Maharashtra

  • @kishorsabale1388
    @kishorsabale1388 3 года назад +1

    खुप छान भाऊ एक हात मदतीचा

  • @vishwanathgaikwad631
    @vishwanathgaikwad631 3 года назад +1

    बौध्दवाडीला ही मदत करा.

  • @rajendrakedari7004
    @rajendrakedari7004 3 года назад +1

    Khup chan team work Ishwar aapanas khup sar bal devo aani aaplya sarvancha hatun piditan sathi uttrottar changla karya ghado hich parme shwara charni prathna 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐

  • @ganeshagham4908
    @ganeshagham4908 3 года назад +1

    खूप छान काम केले दादा आपल्या कार्याला सलाम

  • @santoshdumbre2919
    @santoshdumbre2919 3 года назад +1

    खूप छान भाऊ सद्गुरू कृपेने सगळं व्यवस्थित होईल

  • @chaitalihardas3641
    @chaitalihardas3641 3 года назад +1

    Tumachya karyala salam👏👍👍....

  • @ajaygothal607
    @ajaygothal607 3 года назад

    खुप छान काम.

  • @rajendrasurve4513
    @rajendrasurve4513 3 года назад

    Very nice good hard work satish

  • @HPCreationbyhitesh
    @HPCreationbyhitesh 3 года назад +1

    Khup Bhari Kam dada aani tumchi all team

  • @Meenakshikamble2292
    @Meenakshikamble2292 3 года назад +1

    खुप छान दादा, सर्वजण चांगले काम करत आहेत 🙏

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 3 года назад +1

    खूप छान काम करत आहात धन्यवाद

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 3 месяца назад

    😢 MAANUSKI ZAPLEET🙏

  • @kalguderajesh8538
    @kalguderajesh8538 3 года назад +1

    खूप खूप छान कार्य करीत आहेत

  • @deepakkamblekamble8374
    @deepakkamblekamble8374 3 года назад +3

    खुप छान चांगले काम करत आहेसा 👍👍

  • @sapnasutar8272
    @sapnasutar8272 3 года назад +1

    👍👍👍khup chan kam kalat tumhi

  • @anandvolvoikar1217
    @anandvolvoikar1217 3 года назад +1

    👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 3 года назад +1

    अरे वा!खूप छान मस्त! साथी हाथ बढाना!@सतीश तुझ्या सोसायटी मधील रहिवाशांचे कौतुक👌👌👌🤗🙏🙏🙏अविनाश.v निखिल v सतीश खूपखूप कौतुक व आशीर्वाद🤗 बापरे 😳😳 खूप भयानक परिस्थिती 😏😌😒😕 तलीये गावातील दुर्दशा पाहून खूप वाईट वाटलं 😒 निसर्गाचा भयानक कोप 😏😏⛈️⛈️⛈️ मृत व्यक्ती ना श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      खूप खूप आभार तुमचे, अशीच साथ असुद्या

  • @narayanwakhare3696
    @narayanwakhare3696 3 года назад +2

    खुप छान दादा चांगले काम करत

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 3 года назад +1

    Khoop chhan tumhi sarvanni tumche bldg madhle tumchi sagle video banavnare kharach tumha sarvana patil family tarfe salute ahe

  • @mahendrak4057
    @mahendrak4057 3 года назад +1

    खूप चांगलं काम करतात

  • @sheetalpatil1470
    @sheetalpatil1470 3 года назад

    Khup chan dada👍👍

  • @suchitrajadhav1115
    @suchitrajadhav1115 3 года назад +1

    Khup chan kam kele 🙏🙏🙏❤

  • @swatinaik6322
    @swatinaik6322 3 года назад +2

    खुप छान. 👌👌👌

  • @newapalakokan5937
    @newapalakokan5937 3 года назад

    Maza mitracha bhau ahe pol

  • @monikaovhal1204
    @monikaovhal1204 3 года назад +1

    Bhau kharach tu aani tumchi team khup great aahe, bappa bless you 🙏🙏🙏 aani thank you hi 😊😊😊

  • @j.mjyotsnamakeover9314
    @j.mjyotsnamakeover9314 3 года назад +2

    Khupch chan bhau.... great work❤️👍👍🙏🙏

  • @ajayhulalkar4420
    @ajayhulalkar4420 3 года назад +1

    खूप खूप छान काम करताय🙏🙏🙏

  • @nikitatoke8178
    @nikitatoke8178 3 года назад +1

    Ase changale kam karat raha Sarvana Aashirvad

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 года назад +1

    तुमी आणी लोकानी खूप जीवाभावानी मदद करत आहे । बघुन खूप अभिमान वांटते । देवा पण तुमचा बरोबर आहे । आमची पण शुभेच्छा आहे । करा करा तुमाला नककी पूण्य मिलेल । 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ज्यानी ज्यानी मदद केली तिला पण 🙏🙏🙏🙏

  • @radhagovind257
    @radhagovind257 3 года назад +1

    Khup chaan kam krtay tumhi God bless you sgle khed la maj ghar ahe chaan vatl

  • @meenakshishelar1140
    @meenakshishelar1140 3 года назад +1

    खुप छान काम करत आहात🙏🙏🙏👍👍

  • @b01_karanadhav71
    @b01_karanadhav71 3 года назад

    Great work Dada

  • @yogeshshelke2370
    @yogeshshelke2370 3 года назад +1

    Dada khup mast Kam kartay tumhi sgle 🙏🙏