टकमक किल्ला विरार || takmak fort | संपूर्ण माहिती || पावसाळी भटकंती २०२४ || moonsoon trek VLOG २४

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024
  • टकमक किल्ला विरार || takmak fort | संपूर्ण माहिती || पावसाळी भटकंती २०२४ || moonsoon trek VLOG २४
    ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यात, सकवार गावाच्या मागे टकमक किल्ला आपल्या अंगाखांद्यावर पुरातन अवशेष बाळगत आजही उभा आहे. गडाचा डोंगर नैसर्गिकरीत्या मुख्य डोंगररांगेपासून वेगळा झालेला आहे, तसेच गडाभोवती असलेल्या दाट जंगलाने त्याच्या दुर्गमतेत भरच टाकलेली आहे. अशा दुर्गम स्थानी १२ व्या शतकात टकमक गडाची उभारणी करण्यात आली होती. माहिम (महकावती) या राजधानी पासून घाटावर जाणार्‍या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी , त्याचे संरक्षण करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती.
    बिंबदेव राजाचा पुत्र, राजा भीमदेवाने १२ व्या शतकात टकमक गडाची उभारणी केली. त्यानंतर गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात हा गड गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोहज- अशेरी या गडांबरोबर हा गड ही जिंकला असावा. शिवाजी महाराजां नंतर किल्ला पोर्तुगिजांच्या ताब्यात गेला.
    चिमाजी आप्पांनी वसईची मोहिम काढल्यावर टकमक गडाला महत्व आले. मराठ्यांनी १७३२ मध्ये टकमक गड पोर्तुगिजांकडून जिंकून घेतला. परंतु मराठे आणि पोर्तुगिज यांच्यात झालेल्या तहाप्रमाणे हा गड परत पोर्तुगिजांच्या ताब्यात गेला.
    ८ एप्रिल १७३७ रोजी पंताजी मोरेश्वर यांनी हा किल्ला पोर्तुगिजांकडून जिंकून घेतला. १८ व्या शतकात इंग्रजांनी या किल्ल्याचा वापर कैदखाना म्हणून केला. त्यानंतर इंग्रजांनी इतर अनेक किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्यावरील टाकी आणि जाण्याचे मार्ग यांची नासधूस करण्याचा प्रयत्न केला.
    ...............................................................................................................
    सकवार गावात जाण्यासाठी
    सकवार गावात जाण्यासाठी पश्चिम रेल्वे वरील विरार स्थानकात उतरावे. येथून शेअर रिक्षाने किंवा बस ने मुंबई - अहमदाबाद महामार्ग वर यावे.महामार्गावरून सकवार गावातील"रामकृष्ण मठला" जाण्यासाठी रिक्षा मिळतात. मठा जवळ उतरून सकवार गावात चालत १५ मिनिटात आपण सकवार गावात पोहचतो.
    गडावर जायला किती वेळ लागतो ?
    सकवार गावातून टकमक गडावर पोहचायला ४ तास लागले.
    ...............................................................................................................
    takmak fort trek in monsoon
    takmak fort trek
    takmak fort marathi vlog
    how to reach takmak fort
    takmak fort history in marathi
    takmak fort one day trek near mumbai
    takmak fort hiking point
    best trekking place in palghar
    history of takmak fort in marathi
    best trekking fort in monsoon
    takmak fort in virar
    takmak fort in monsoon
    takmak fort virar
    #takmakfort
    #takmakforttrekinmonsoon
    #takmakforttrek
    #takmakfortmarathivlog
    #howtoreachtakmakfort
    #takmakforthistoryinmarathi
    #takmakfortonedaytreknearmumbai
    #takmakforthikingpoint
    #besttrekkingplaceinpalghar
    #historyoftakmakfortinmarathi
    #besttrekkingfortinmonsoon
    #takmakfortvirar
    #takmakfort
    #takmakkillla
    #टकमक
    #टकमक किल्ला
    #ट्रेकिंग
    #trekking
    जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर liie comment करा आणि channel ला subscribe करा
    THANk YOU FOR WATCHING...... धन्यवाद 🙏🏽🙏🏽
    (Avinash sharad shigvan)

Комментарии •