संविधान जागृती वादन कला स्पर्धा मेळावा 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 июл 2024
  • अण्णाभाऊ साठे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,(बार्टी)पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान जागृती वादन कला स्पर्धा मेळावा वर्ष ७७ वे समारंभ मंगळवार दिनांक २ जुलै २०२४ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन ,मंगळवार पेठ,पुणे या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचे निमित्ताने सालाबाद प्रमाणे वादन कला स्पर्धा मेळावा १५ जून १९४७ पासून गेली ७७ वर्षे संस्थेतर्फे दरवर्षी आयोजित केला जात आहे.कलाकारांच्या कलेचे उत्तम प्रदर्शन व्हावे त्यांना प्रतिसाद देऊन वादळ वादन कलाक्षेत्रात वाव मिळावा या उद्देशाने सनई, हलगी, ढोलकी,ढोल, ताशा,तबला,हार्मोनियम इत्यादी पारंपारिक तसेच आधुनिक वाद्यांच्या वादन कला स्पर्धेमध्ये सादर करण्यात आल्या. संविधानामुळे आपल्याला निर्भयपणे कलेच्या माध्यमातून आपलं म्हणणं,आपली भूमिका, आपल्या संस्कृतीची ओळख जगासमोर सादर करण्याची संधी आज उपलब्ध आहे असे प्रतिपादन अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे आजीव सभासद प्राध्यापक डॉ.राहुल नरंगलकर यांनी अण्णा भाऊ साठे फाउंडेशनच्या विद्यमाने आयोजित संविधान जागृती वादन कला मेळावा कार्यक्रमात प्रस्तावना प्रसंगी व्यक्त केले.
    मेळाव्याचा समारोप बक्षीस वितरण समारंभाने करण्यात आला.समारंभाचे स्वागत अध्यक्ष मा.ॲड.विठ्ठलराव सोनावणे यांच्या शुभहस्ते विविध आठ प्रकारातील सन्मानार्थ अशी एकूण वीस बक्षिसे देण्यात गुणवंत कलाकारांना देण्यात आली. मेळाव्यात संविधानाचे सामुहिक वाचन करण्यात आले. स्पर्धेच्या परीक्षकाची जबाबदारी संगीतकार राम साळवे, ह.भ.प.माधवराव शेंडगे (कासारसाईकर) आणि प्रसिद्ध वादक मा.चंद्रकांत इंगवले यांनी पार पाडली. निवेदन प्रा.संतोष नेटके यांनी केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते मा.वसंतराव साळवे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रशिक्षक मा. ह.भ.प.माधवराव शेंडगे यांनी रंगमंचाला नारळ वाढवून केले. सुत्र संचालन मुख्य कार्यवाह राजेंद्र सोनावणे यांनी केले.वादन कला मेळाव्याचे संयोजन माहिती व जनसंपर्क प्रवक्ता जयदीप सोनावणे,सचिन बगाडे,राहुल अवघडे,श्रीमती सरिता सोनावणे,सौ.निर्मला सोनावणे,संतोष पवार,अशोक सोनावणे,आशिष भोईवाडे,आतिष गायकवाड,प्रदीप मोहिते,शंकर खंदारे यांनी केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Комментарии • 2

  • @RajSuryawanshiOfficial
    @RajSuryawanshiOfficial 20 дней назад

    ❤❤

  • @priyanapte1180
    @priyanapte1180 20 дней назад +1

    👍 ग्रेट. सर्वच वाद्य वादन कलाकारांनी आपली उत्कृष्ट कला सादर केली याबद्दल सर्व कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन. पारंपरिक वाद्ये वादन कला जपली पाहिजे व तीच संवर्धन केलं पाहिजे. वाद्य वादन कला संवर्धन करण्याच काम कलाकारांना मंच उपलब्ध करून त्यांना प्रोत्साहन देत त्यांना सन्मानित करण्याच काम अण्णाभाऊ साठे फाउंडेशन करत आहे याबद्दल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे मनपूर्वक अभिनंदन व त्यांच्या कार्यास सलाम. जय लहुजी 💐🙏- प्रिया नप्ते