अतिशय सुंदर ❤आचार्य अत्रे बद्दल फार सुंदर नेमकी माहिती सांगितली मधुराताई तुम्ही खूप छान मराठी बोलता पण क्षमा मागून असे सुचवावे वाटते एका ठिकाणी थोडी मराठी खटकली 1930 सालच्या इंग्रजांच्या मराठी शाळेतील पुस्तकांना घेऊन असाच वाद झाला होता या ऐवजी मराठी शाळेतील पुस्तकांवरून असाच वाद झाला होता अशी वाक्यरचना हवी असे वाटते
आचार्य अत्रे यांचे सर्वच साहित्य प्रकार केवळ "अप्रतिम"! त्यास त्रिखंडातही तोड नाही. झेंडूची फुले कवितासंग्रह अभ्यासनीय आहे.अशा व्यक्ती " दहा हजार" वर्षात एकदाच जन्म घेतात.
मधुराताई हा आचार्य अत्रे यांच्या वरचा भाग अतिशय सुंदर झाला आहे..👌👌👌👌👌हे ऐकल्यावर मन अगदी प्रसन्न होऊन जाते बघ म्हणजे माहिती नसलेले बरेच काही सोप्या शब्दांत,सुंदर लयीत,हसऱ्या चेहऱ्याने तू छान सांगतेस, माहिती असलेल्या,ऐकलेल्या व्यक्तीच्या अनेक माहिती नसलेल्या आणि आदर्श गोष्टी तू सांगतेस..ज्या समजल्यावर आनंद गवसतो आम्हाला..तुझा हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे🎉🎉
मधुरा, फारच सुन्दर परिपूर्ण माहिती. तुझं स्पष्ट, शुध्द बोलणं आणि गोड आवाज यामुळे सादरीकरण देखणं होतं. आजीचं घड्याळ ही मनातली कविता कमाल सादर केलीस. अत्र्यांमुळे बहिणा बाईंच्या कविता प्रकाशात आल्या. मनाने मोठा आणि विचाराने समृध्द माणूसच असं काम करतो. मधुरा, विविध माध्यमांतून तुझ्याकडून मराठीची सेवा घडत राहो. 👍 वंदनीय श्री प्र. के. अत्रे यांना वंदन 🙏
अत्रे साहेबांचि थोरवी सांगणारा हा भाग अतिशय उत्तम झाला आहे, या थोर माणसाची महती तुम्ही खूप उत्तम प्रकारे सादर केलीत या बद्दल तुमचे अनंत धन्यवाद 🌹🌹त्यांचे घरगुती नाव बाबुराव असावे असं पुसटस आठवतेय 🙏🏾
सौ. मधुरा ताई , Incredible मराठीचे आजवरील सारेच भाग मी आवडीने आणि अधिरतेने ऐकतो ! माय मराठीचे गुणगान ऐकताना मनास विलक्षण प्रसन्नता मिळते ! आपली या अध्यायां मागील अभ्यासू वृत्ती , अथक मेहनत आम्हां सर्व श्रोत्यांस आपल्या भाषेचे विविध पैलू आणि महानता लक्षात येते ! प्र. के . अत्रे या थोर अष्टपैलू व्यक्तिमत्वरील हा अध्याय , त्यांच्या विषयीच्या बऱ्याच अनभिज्ञ गोष्टी सांगून गेला ! अर्थात याचे श्रेय आपल्यालाच आणि सौ. समीरा ताईंनाही जाते ! खूप खूप धन्यवाद !
छान ❗अजून एक 'गेल्या 10हजार वर्षात झाला नाही "इतका सुंदर व्हीडिओ 😊अग ही अत्रे special अतिशयोक्ती नाही कारण U ट्यूब सारखी माध्यमे हल्लीचीच नाही का श्री चव्हाणनाही गप्प करणारे, खरोखर अफलातून व्यक्तिमत्व उलगडलेस शिक्षण क्षेत्रातील कामगिरीचा उल्लेख, खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
नेहमीप्रमाणे सुंदर विषय आणि भाष्य. केवळ एक प्रयोग आणि तोही मराठी भाषेविषयी बोलताना खटकला. 'मराठीची पुस्तके होती,त्यांना *घेऊनही* असाच वाद झाला होता' हे हिंदी प्रभावित वाक्य झाले. मराठीत हे वाक्य - मराठीच्या पुस्तकांविषयी वाद झाला होता. पण त्याचबरोबर वाहिनीला पसंती द्या, तिचे सभासद व्हा हे like, subscribe ऐवजीचे मराठी शब्द चपखल आणि गोड वाटले.
श्री. आचार्य अत्रे याची आज नव्याने ओळख झाली. अनेक विविध प्रकारच्या लेखनात पारंगत असलेल्या अत्रे यांना मराठी माणसाच्या मनात अत्यंत मानाचे स्थान आहे व कायमच राहील. पण कवी मनाचे अत्रे आज समजले. त्यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील सहभाग कोण विसरू शकेल? असे एक महान व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही! मधुरा ताई हा उपक्रम खूप छान आहे व तो निरंतर चालू राहील ही अपेक्षा व खूप शुभेच्छा. अनिल राणे
आमचे किंवा आमच्या पिढीचे भाग्य की आम्हाला शाळेत मराठी भाषेच्या अभ्यासात पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकासोबत आचार्य अत्रे संपादित नवयुग वाचनमाला सुद्धा Rapid Reader म्हणून अभ्यासावे लागत असे. नवयुग मधील गद्य आणि पद्य यांची मांडणी फारच उत्तम आणि आकर्षक असे. ❤❤❤
आपण एक सुंदर कलाकार तर आहातच पण आपण चांगल्या व्याख्यात्या सुद्धा आहात. आपल्याला विषय रंजकतेने कथन करण्याची विलक्षण हातोटी आहे. याच मुळे हे सर्व मनोरंजक आणि अभ्यासपूर्ण होते. खूपच छान.
मधुरा....आजचा भाग अतिशय सुंदर झाला आहे....नेहमी प्रमाणेच....कमी वेळात खूपच नेमकेपणाने....रोचक....तरीही परिपूर्ण आणि अभ्यासपूर्ण माहिती देता तुम्ही....अशा भव्य आणि दिव्य व्यक्तीमत्वांना इतक्या कमी वेळेत मांडणे हे खूप कौशल्यपूर्ण व कठीण काम आहे....कुठेही असे वाटत नाही की काही तोडलय किंवा गाळलंय....आवाज आणि भाषेची जाण उत्तम....पुढच्या भागाची उत्सुकता लागून राहते...खूप खूप धन्यवाद
आचार्य अत्रे यांचा अतिशय सुंदर परिचय तुम्ही करून दिला.विशेषता आजच्या तरुणाईला आणि मराठी लिहीता येत नाही,वाचता येत नाही हे कौतुकाने सांगणाऱ्या अनेक पालकांना, मुलांना आचार्य अत्रे नावाच्या व्यक्तीमत्त्वाची ओळख करून दिली आहेत. खूप खूप धन्यवाद! आणि शुभेच्छा पुढील प्रत्येक व्हिडिओ साठी.🎉🎉
छान माहिती सांगितली आहे . नवयुग वाचनमाला ही पाच भागात असलेली पुस्तके ५-६ वर्षापूर्वी मी परचुरे प्रकाशन मधून घेतली होती. परचुरे प्रकाशनची ही पुस्तके बहुधा उपलब्ध असतील तर ४थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना द्यावीत.
सुंदर 👌👌आमच्या KKNA group वर आम्ही तुमचे videos share करतोय आणि मुलांना अशा तर्हेने माहिती द्यावी अशी विनंती करतो. आपल्या मराठी साहित्याची आणि अत्रे आणि अनेक थोर लेखक, साहित्यिकांची मुलांना ओळख करून देण्याची गरजच आहे.आजच्या काळाची ही गरजच आहे. ताई तुम्ही हे छान कार्य हाती घेतले आहे. ❤❤👏👏
इंग्रजांच्या मराठी शाळेत जी पाठ्यपुस्तके होती, त्यांना घेऊनही... ही, त्यांना घेऊन.. छापाची वाक्यरचना मराठीत कधीच नसते. सरळसरळ हिंदी वाक्याचे शब्दशः भाषांतर आहे. मराठीत त्यांच्याबाबतीतही किंवा त्यांच्याबद्दलही किंवा त्यांच्याविषयी इ. पद्धतीने म्हणता येईल.
आचार्य अत्रे ह्यांना प्रणाम 🙏.. अत्रें सारखे अनेक लेखक आपल्या महाराष्ट्राला लाभले हे आपले भाग्यच...🙏...मधुरा तुझं निवेदन पण खूप छान ❤. अत्रेंच घरगुती नाव नाही माहित. प्लीज सांगशील का?❤
ज्या ठिकाणी मराठीचे प्रमोशन करणे हा विषयच नव्हता तेथे त्यावर वेळ घालवून कार्यक्रमाच काय केल.english मिडीया मधे शिकवणे हा वैयक्तिक विचार आहे. तेथे तावातावाने मराठीच ""प्रमोशन हो प्रमोशन "" आदरणिय भाऊ दाजिंची तुलना वा आपल्याला मराठीत नमस्कार
मधुरा,तुझी आई ती इयत्ता ९वीत असताना १ऑगस्टला आचार्य आत्रे यांच्या "मराठा प्रेस" येथील घरी त्यांना प्रत्यक्ष भेटली आहे .तिच्या वर्गातील सगळी मुलं त्यांच्या आवती भभोवती बसली होती.हे तिला आठवलं असेल .
आचार्य अत्रे यांना विनम्र कोटी कोटी अभिवादन
खूप सुंदर अशी आचार्य अत्रे ह्याच्या विषयींची महिति आपण दिलेली आहेत त्या बद्धल धन्यवाद.
अतिशय सुंदर ❤आचार्य अत्रे बद्दल फार सुंदर नेमकी माहिती सांगितली मधुराताई तुम्ही खूप छान मराठी बोलता पण क्षमा मागून असे सुचवावे वाटते एका ठिकाणी थोडी मराठी खटकली 1930 सालच्या इंग्रजांच्या मराठी शाळेतील पुस्तकांना घेऊन असाच वाद झाला होता या ऐवजी मराठी शाळेतील पुस्तकांवरून असाच वाद झाला होता अशी वाक्यरचना हवी असे वाटते
मधुराजींच्या मधुर वाणीत
खूप आहे गोडी !
एकेक शब्द ऐकताना
फुलते मराठी थोडी !❤👍👌👌👌
खूप छान मधुराजी .
सौ.सविता उर्फ प्रतिभा पोतदार
#परिसस्पर्श
14 /8/2024
आचार्य अत्रे यांचे सर्वच साहित्य प्रकार केवळ "अप्रतिम"! त्यास त्रिखंडातही तोड नाही. झेंडूची फुले कवितासंग्रह अभ्यासनीय आहे.अशा व्यक्ती " दहा हजार" वर्षात एकदाच जन्म घेतात.
मधुराताई हा आचार्य अत्रे यांच्या वरचा भाग अतिशय सुंदर झाला आहे..👌👌👌👌👌हे ऐकल्यावर मन अगदी प्रसन्न होऊन जाते बघ म्हणजे माहिती नसलेले बरेच काही सोप्या शब्दांत,सुंदर लयीत,हसऱ्या चेहऱ्याने तू छान सांगतेस, माहिती असलेल्या,ऐकलेल्या व्यक्तीच्या अनेक माहिती नसलेल्या आणि आदर्श गोष्टी तू सांगतेस..ज्या समजल्यावर आनंद गवसतो आम्हाला..तुझा हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे🎉🎉
खूपच छान.
Khup chan
अतिशय सुंदर, आचार्य अत्रेंच्या कार्याचा लेखनाचा यथार्थ गौरव.
छान माहिती दिलीये तुम्ही. 🙏
Thanks madhura for the info about versatile p.k.atre.keep it up
बाबुराव?
अतिशय सुंदर निवेदन
खूप खूप शुभेच्छा
Wah Wonderful
मधुरा,
फारच सुन्दर परिपूर्ण माहिती. तुझं स्पष्ट, शुध्द बोलणं आणि गोड आवाज यामुळे सादरीकरण देखणं होतं. आजीचं घड्याळ ही मनातली कविता कमाल सादर केलीस.
अत्र्यांमुळे बहिणा बाईंच्या कविता प्रकाशात आल्या. मनाने मोठा आणि विचाराने समृध्द माणूसच असं काम करतो.
मधुरा, विविध माध्यमांतून तुझ्याकडून मराठीची सेवा घडत राहो. 👍
वंदनीय श्री प्र. के. अत्रे यांना वंदन 🙏
अत्रे साहेबांचि थोरवी सांगणारा हा भाग अतिशय उत्तम झाला आहे, या थोर माणसाची महती तुम्ही खूप उत्तम प्रकारे सादर केलीत या बद्दल तुमचे अनंत धन्यवाद 🌹🌹त्यांचे घरगुती नाव बाबुराव असावे असं पुसटस आठवतेय 🙏🏾
उत्तम सादरीकरण . अप्पा नाव होते.
Madhura tai, you are the best. Thanks a lot for such an informative channel.
खूप छान
कै. थोर आचार्य अत्रे यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
Chan mahiti sangitali tumhi❤
सौ. मधुरा ताई , Incredible मराठीचे आजवरील सारेच भाग मी आवडीने आणि अधिरतेने ऐकतो ! माय मराठीचे गुणगान ऐकताना मनास विलक्षण प्रसन्नता मिळते !
आपली या अध्यायां मागील अभ्यासू वृत्ती , अथक मेहनत आम्हां सर्व श्रोत्यांस आपल्या भाषेचे विविध पैलू आणि महानता लक्षात येते !
प्र. के . अत्रे या थोर अष्टपैलू व्यक्तिमत्वरील हा अध्याय , त्यांच्या विषयीच्या बऱ्याच अनभिज्ञ गोष्टी सांगून गेला ! अर्थात याचे श्रेय आपल्यालाच आणि सौ. समीरा ताईंनाही जाते !
खूप खूप धन्यवाद !
आजचा भाग खूप सुंदर झाला मधुरा , छान माहिती समजली . प्रत्येक भागातूनच चांगली माहिती समजते . आचार्य अत्रे यांना खरच , मन : पूर्वक कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
खूप सुंदर सादरीकरण !
न उलगडलेले अत्रे अगदी सहजतेने,पण बारकाव्यांसहित पहायला मिळाले.
छान ❗अजून एक 'गेल्या 10हजार वर्षात झाला नाही "इतका सुंदर व्हीडिओ 😊अग ही अत्रे special अतिशयोक्ती नाही कारण U ट्यूब सारखी माध्यमे हल्लीचीच नाही का श्री चव्हाणनाही गप्प करणारे, खरोखर अफलातून व्यक्तिमत्व उलगडलेस शिक्षण क्षेत्रातील कामगिरीचा उल्लेख, खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
छान भाग.
आजीच्या जवळी घड्याळ.... कायम आठवतं.😊
ताई खूप छान माहिती सांगतेस तू
❤❤❤❤
नेहमीप्रमाणे सुंदर विषय आणि भाष्य. केवळ एक प्रयोग आणि तोही मराठी भाषेविषयी बोलताना खटकला. 'मराठीची पुस्तके होती,त्यांना *घेऊनही* असाच वाद झाला होता' हे हिंदी प्रभावित वाक्य झाले. मराठीत हे वाक्य - मराठीच्या पुस्तकांविषयी वाद झाला होता.
पण त्याचबरोबर वाहिनीला पसंती द्या, तिचे सभासद व्हा हे like, subscribe ऐवजीचे मराठी शब्द चपखल आणि गोड वाटले.
आजीचे घड्याळ -खूप सुंदर, अजूनही आवडणारी कविता. 👌🏻👌🏻
अत्यंत सखोल माहितीपर, अप्रतिम झाला आहे हा भाग....! इतकी छान माहिती मिळाली. धन्यवाद.
श्री. आचार्य अत्रे याची आज नव्याने ओळख झाली. अनेक विविध प्रकारच्या लेखनात पारंगत असलेल्या अत्रे यांना मराठी माणसाच्या मनात अत्यंत मानाचे स्थान आहे व कायमच राहील. पण कवी मनाचे अत्रे आज समजले. त्यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील सहभाग कोण विसरू शकेल? असे एक महान व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही!
मधुरा ताई हा उपक्रम खूप छान आहे व तो निरंतर चालू राहील ही अपेक्षा व खूप शुभेच्छा.
अनिल राणे
छान माहिती. कै. आचार्य अत्रेंना जन्मदिनी, विनम्र अभिवादन 🙏
दुर्दैवाने कदाचित आजच्या शिक्षकांनाही आचार्य अत्रे किती माहिती असतील शंकाच आहे.
आमचे किंवा आमच्या पिढीचे भाग्य की आम्हाला शाळेत मराठी भाषेच्या अभ्यासात पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकासोबत आचार्य अत्रे संपादित नवयुग वाचनमाला सुद्धा Rapid Reader म्हणून अभ्यासावे लागत असे. नवयुग मधील गद्य आणि पद्य यांची मांडणी फारच उत्तम आणि आकर्षक असे. ❤❤❤
अप्रतिम, आचार्य अत्रे यांची खूप छान माहिती दिली, खूप धन्यवाद
फारच छान! इंग्रजी आणि इतर परके शब्द न वापरताही मराठीत इतकं सहज सोपं बोलता येऊ शकतं याचा वस्तुपाठ आहे हा भाग.
अनेक शुभेच्छा !!
विनम्र अभिवादन 🙏🙏 खूपच महान व्यक्तीमत्व बहुगुणी शिक्षक🎉
आचार्य अत्रेंच्या आज साजऱ्या होत असलेल्या १२५ व्या जयंती च्या पार्श्वभूमीवर हा सुरेख भाग. आपले खुप खुप अभिनंदन!!!
खूप छान माहिती मिळाली.कवितेच सादरीकरण उत्तम.धन्यवाद.
अप्रतिम , खूपच छान माहिती दिली. त्या बद्दल धन्यवाद
फारच अप्रतिम विवेचन केलेत.
धन्यवाद 🎉
असेच भेटत जा.
आपण एक सुंदर कलाकार तर आहातच पण आपण चांगल्या व्याख्यात्या सुद्धा आहात. आपल्याला विषय रंजकतेने कथन करण्याची विलक्षण हातोटी आहे. याच मुळे हे सर्व मनोरंजक
आणि अभ्यासपूर्ण होते. खूपच छान.
आचार्य अत्रेंनां केशवकुमार ही म्हणायचे. अति सुंदर मधुराजी धन्यवाद.❤
मधुरा....आजचा भाग अतिशय सुंदर झाला आहे....नेहमी प्रमाणेच....कमी वेळात खूपच नेमकेपणाने....रोचक....तरीही परिपूर्ण आणि अभ्यासपूर्ण माहिती देता तुम्ही....अशा भव्य आणि दिव्य व्यक्तीमत्वांना इतक्या कमी वेळेत मांडणे हे खूप कौशल्यपूर्ण व कठीण काम आहे....कुठेही असे वाटत नाही की काही तोडलय किंवा गाळलंय....आवाज आणि भाषेची जाण उत्तम....पुढच्या भागाची उत्सुकता लागून राहते...खूप खूप धन्यवाद
खूप छानमाहिती , आणि आचार्य अत्रे ना नमन
आचार्य अत्रेना बाबुराव म्हणत असत ❤
आचार्य अत्रे यांचा अतिशय सुंदर परिचय तुम्ही करून दिला.विशेषता आजच्या तरुणाईला आणि मराठी लिहीता येत नाही,वाचता येत नाही हे कौतुकाने सांगणाऱ्या अनेक पालकांना, मुलांना आचार्य अत्रे नावाच्या व्यक्तीमत्त्वाची ओळख करून दिली आहेत.
खूप खूप धन्यवाद! आणि शुभेच्छा पुढील प्रत्येक व्हिडिओ साठी.🎉🎉
Ati sundar. Grand depicted.
Love. Thanks.
Remembering experience.
Please.
खूपच सुंदर माहिती, व सादरीकरण 👏👏
Khup chaan mahiti dili madhura tai acharya atrebaddal
अप्रतिम माहिती आणि सादरीकरण !
छान माहिती सांगितली आहे . नवयुग वाचनमाला ही पाच भागात असलेली पुस्तके ५-६ वर्षापूर्वी मी परचुरे प्रकाशन मधून घेतली होती. परचुरे प्रकाशनची ही पुस्तके बहुधा उपलब्ध असतील तर ४थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना द्यावीत.
अतिशय सुंदर झाला आचार्य अत्र्यांवरील भाग.
खूपच छान माहिती आणि मधुरा तुझे सादरीकरण 🌹🌹
मधुरा ताई खूप खूप छान माहिती दिली 👌👌👍👍
खूप चांगला कार्यक्रम खूप चांगलं प्रेझेंटेशन या मीडियाचा असा चांगला उपयोग व्हायला पाहिजे तुम्ही तो करत आहात उत्तम
शतशः दंडवत।🙏🏽👏🏽👏🏽👏🏽🤗
खूपच माहितीपूर्ण ❤❤❤
खूप सविस्तर आणि चांगली माहिती.
अतिशय सुंदर, या विषयावर अजून एक एपिसोड व्हायला हवा
छान माहिती आणि उत्तम सादरीकरण.
सुंदर 👌👌आमच्या KKNA group वर आम्ही तुमचे videos share करतोय आणि मुलांना अशा तर्हेने माहिती द्यावी अशी विनंती करतो. आपल्या मराठी साहित्याची आणि अत्रे आणि अनेक थोर लेखक, साहित्यिकांची मुलांना ओळख करून देण्याची गरजच आहे.आजच्या काळाची ही गरजच आहे. ताई तुम्ही हे छान कार्य हाती घेतले आहे. ❤❤👏👏
खूप छान उलगडले अत्रे
व्वा! सुरेख झालाय आजचा भाग 👌
अप्रतिम!
सुंदर, अप्रतिम, मधुरा खूब छान
एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे आचार्य अत्रे!👍
Chan chan
उत्तम सादरीकरण
खूप छान माहिती दिलीत.
खूप खूप छान 🎉🎉❤😊🎉❤
खूप छान मधुरा ताई.. ❤❤
सीताबाई वर्णू किती तव गुण,एकादशीला उपवास करूनी खाशी कांदा लसूण..अशी एक विनोदी कविता आहे त्यांची
पप्पा या नावाने घरी त्यांचीओळख होती असे वाटते.
खूप छान माहिती
इंग्रजांच्या मराठी शाळेत जी पाठ्यपुस्तके होती, त्यांना घेऊनही... ही, त्यांना घेऊन.. छापाची वाक्यरचना मराठीत कधीच नसते. सरळसरळ हिंदी वाक्याचे शब्दशः भाषांतर आहे. मराठीत त्यांच्याबाबतीतही किंवा त्यांच्याबद्दलही किंवा त्यांच्याविषयी इ. पद्धतीने म्हणता येईल.
आचार्य अत्रे ह्यांना प्रणाम 🙏.. अत्रें सारखे अनेक लेखक आपल्या महाराष्ट्राला लाभले हे आपले भाग्यच...🙏...मधुरा तुझं निवेदन पण खूप छान ❤. अत्रेंच घरगुती नाव नाही माहित. प्लीज सांगशील का?❤
Very informative 😊 thank you for this treasure
त्यांचे नाव प्रल्हाद केशव अत्रे पण घरगुती नाव बाबू किंवा बाबुराव
अप्रतिम विवेचन ❤️🙏👌
Jaysadaguru ❤❤❤❤❤
सुंदर व्हिजिडओ
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व.
❤
आचार्य अत्रे यांचे घरगुती नाव बाबूराव होते.
अप्रतिम! माझ्या कल्याण गावांत "आचार्य अत्रे नाट्यगृह आहे. पण दुर्दैवाने
तेथे खूप कमी कार्यक्रम होतात.
य
य
बाबुराव हे त्यांचे घरगुती नांव
अत्र्यांना " साहेब '' म्हणत असत सर्व असं वाटतं.
जोडाक्षर विरहित मराठी पुस्तक लिहिले आचार्य अत्रे यांनी.
Chhan
अत्रे यांच्यावर आणखी माहिती प्रसारित करा
परंतु ते लंडन वरून shikun आले hote त्याबद्दल पण jara सांगितले असते तर ajun ya bhagachya शीर्षकाला समर्पक झाले असते
ज्या ठिकाणी मराठीचे प्रमोशन करणे हा विषयच नव्हता तेथे त्यावर वेळ घालवून कार्यक्रमाच काय केल.english
मिडीया मधे शिकवणे हा वैयक्तिक विचार आहे. तेथे तावातावाने मराठीच
""प्रमोशन हो प्रमोशन ""
आदरणिय भाऊ दाजिंची तुलना
वा
आपल्याला
मराठीत नमस्कार
ओरडा खाल्ला.... असंही हल्ली सहज म्हटलं जातं....पण ओरडा खाल्ला...हे सुध्दा पूर्णपणे चुकीचं आहे
मकरंद या टोपण नावाने ओळखले जायचे.
Pahili cha pustakatali navin kavita mhanaje swapnat pahili rani chi bag la modun todun keleli kavita vatate.
असा ओरडा.....असा शब्द नाहीय...अशी ओरड झाली होती... असं पाहिजे..🎉
मधुरा,तुझी आई ती इयत्ता ९वीत असताना १ऑगस्टला आचार्य आत्रे यांच्या "मराठा प्रेस" येथील घरी त्यांना प्रत्यक्ष भेटली आहे .तिच्या वर्गातील सगळी मुलं त्यांच्या आवती भभोवती बसली होती.हे तिला आठवलं असेल .
ते अफाट तर आपण केलं चाट.
शिरीष पै चा उल्लेख पाहिजे होता. आठवीला ‘ खरी ओळख ‘ मस्त धडा होता.
Baburao means atre
हो. हि कविता मला होती. 12:43