कोकणातील रहस्यमय गाव- "तळेवाडी,श्रावण "। रहस्यमय - तळे,गुहा,दगडांचे स्तंभ,| विचित्र प्रथा | भाग-1

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • कोकणातील रहस्यमय गाव- तळेवाडी,श्रावण । रहस्यमय - तळे,प्रथा,गुहा,दगडांचे स्तंभ, । Episode-1। भाग- 1
    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रावण गाव आणि या गावाला आहे एक छोटीशी तळेवाडी...गावापासून जेमतेम २ कि.मी. वर डोंगराच्या कुशीत वसलेली. तळेवाडीत. या वाडीत क्षेत्रापाल देवतेचे मंदिर अत्यंत रमणीय ठिकाणी आहे. देवळात जायला शेतातून वाट... तळेवाडीत संध्याकाळनंतर कुणालाही रडायला परवानगी नाही. मोठा आवाजही करायचा नाही. आरडाओरडा अजिबात नाही. जो काही आवाज होईल तो घरातल्या घरात. श्रीक्षेत्रपालाला संध्याकाळनंतर कुणीही रडलेले चालत नाही. कुणाच्या घरात काही दुर्घटना घडली तरीही सूर्योदयापर्यंत शांतता राखायला हवी. अगदीच असह्य झाले तर गावाच्या वेशीबाहेर जाऊन रडायचे. तसेच इथे कुठल्याही प्राण्याचे रक्त सांडलेले क्षेत्रपालाला चालत नाही. त्यामुळे तळेवाडीत मास मटण करत नाहीत. जे करायचे ते गावाच्या हद्दीबाहेर जाऊन करायचे. इथे पशु-पक्ष्यांचा मोठा वावर असतो, पण क्षेत्रपालाची जरब एवढी की त्यांचा कुणालाही त्रास होत नाही आणि कुणी माणसानेही त्यांना त्रास द्यायचा नाही. अजून एक निसर्गचमत्कार इथे बघायला मिळतो. श्रीक्षेत्रपालाच्या देवळाशेजारी एक मोठे तळे आहे. देवाचेच तळे हे...कितीही महामूर पाऊस झाला तरी ते भरत नाही. मात्र जसजसा उन्हाळा वाढू लागतो तसतसे तळ्याचे पाणी वाढत जाऊन ओसंडून वाहायला लागते. इतके वाहते की तळेवाडीतले लोक त्या पाण्यावर उन्हाळ्यात शेती करतात. परत पावसाळा येऊ लागला की हे पाणी कमी होत जाते. सगळेच खरेतर विपरीत. पण हीच तर कोकणाची खासियत आहे.त्याच वाडीच्या सड्यावर आहे वाघबाव म्हणजेच एक गुहा.. आणि तिकडेच पुढे एक गणपती च मंदिर आहे आणि तिकडे आपल्याला त्या मंदिर समोर खूप सारे दगडांनी बांधलेले दीपस्तंभ पाहायला मिळतात.. गुर राखणारे जुने लोक तिकडे ते दीपस्तंभ बनवून देवाकडे नवस मागायचे.. गणपती आणि गौरी यांची पाषाणी मूर्ती आहे.. ह्या दोन्ही मूर्ती बद्धल मी वलोग मध्ये सांगितलं आहे.. गुहा आणि खालची तळी ही पांडवांनी बांधली आहे ती पण एका रात्री अस तिकडचे लोक सांगत... वलोग नक्की पहा .. कसा वाटला नक्की सांगा.. share करा आणि like करायला विसरू नका..
    Location - Shri Kshetraphal Mandir
    Talewadi, Shrawan, Taluk Malvan, Dist, Shrawan, Maharashtra 416616
    maps.app.goo.g...
    My vlogging setup -
    Gorrila Tripod - amzn.to/3qhz135
    Selfie stick with tripod - amzn.to/3ecdEOs
    Mic1 - amzn.to/3kONhz3
    Mic 2 - amzn.to/3bibBpU
    Vlogging Mobile - amzn.to/3ec0m4n
    Tripod - amzn.to/2O5aRf1
    follow us -
    Instagram
    / sanchitthakurvlogs__
    Facebook - / sanchit.thakur1
    Twitter -
    Sa...
    #mysteriousvillage #konkan

Комментарии • 749

  • @punekarpg6039
    @punekarpg6039 3 года назад +12

    तुझी बोलण्याची पद्धत मस्तच ! अगदी रसाळ वाणी !

  • @shardasonawane1724
    @shardasonawane1724 Год назад +7

    शांतता प्रिय..व रक्त, दारू न चालणारा ऐकमेव देव,भगवान बुद्ध आहेत रे बाबांनो 😊🤗

    • @BusinessHub-tm3ov
      @BusinessHub-tm3ov Год назад

      😂😂 कुठे कुठे अतिक्रमण केले आहे बौध्दांनी

    • @nileshghadage4830
      @nileshghadage4830 6 месяцев назад +1

      हि.माहिती.पुर्णपणे.चुकिची.आहे.भरपुर.धार्मिंक.जागा.शांत.आहेत.शाकाहारी.आहेत.

    • @sharadbhosale8795
      @sharadbhosale8795 3 месяца назад

      😅 6:35

  • @avinashdhurat3065
    @avinashdhurat3065 3 года назад +9

    माहिती फारच कष्ट करून मिळवलेली आहे. तुम्हाला आणि तुमच्या उपक्रमात सहभागी झाले त्यांना धन्यवाद!

  • @hemlatapatil5218
    @hemlatapatil5218 3 года назад +15

    संचीत ठाकूर अभिनंदन 💐
    कोकण चे रहस्यमयी गाव श्रावण ,क्षेत्रपाल चे मंदिर,रहस्यमयी तळे,आणि दीपमाळा दाखवलेस . तुझ्या श्रमाचे चीज झाले ,आणि आम्हाला कोकण चे गूढ उमगले .धन्यवाद संचित

  • @radhikaalashi1520
    @radhikaalashi1520 3 года назад +6

    खुप छान वाटला व्हिडिओ श्रावणगावावर आमी आपण त्या साठी खुप मेहनत घेतली आहे येथिल तळी आणी गुंफा तसेच देवाचं मंदीर .व त्यावर श्रद्धा पाळणे .असवाटतेय प्रत्यक्षच तीथे जाऊन आलोय.तीथलादेव सदैव तुमच्या पाठीशीअसो.तुमच्या कार्यातमदतकरो.धन्यवाद.

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 3 года назад +17

    अश्या अद्भूत गुढ कथा कोकणात खूप ऐकायला मिळतात आणखी ऐकायला आवडेल असे नवीन व्हाडीओस् दाखवावेत जावेत
    धन्यवाद.....🙏

  • @surekhapataskar96
    @surekhapataskar96 3 года назад +29

    खूप सुंदर , कोकणात अशी भरपूर ठिकाणे आहेत ,त्याची माहिती जगभर प्रसिद्ध व्हायला हवी ...Best of luck ...येवा कोकण आपलोच असा👍👍

    • @sangitanimhan3207
      @sangitanimhan3207 3 года назад

      खुपच छान

    • @snehangikoltharkar9310
      @snehangikoltharkar9310 3 года назад

      Hmm

    • @anaghamanjrekar5696
      @anaghamanjrekar5696 3 года назад

      छान माहिती सांगितली कोकणात रहस्यमय व मनमोहक भरपूर ठिकाणे आहेत, छान vatle

  • @megharane5683
    @megharane5683 3 года назад +8

    खूपच सुंदर आहे आणि हो असेच नविन शोध घेत व्हीडीओ बनव आणि आमचा आनंद द्विगुणीत .पुढील वाटचाल करण्यास खूप खूप शुभेच्छा.

  • @manmohanroge
    @manmohanroge 3 года назад +6

    चांगली माहिती दिली. दुर्दैवाने पूर्ण आणि खरी माहिती मिळत नाही, संशोधनसुध्दा होत नाही.

  • @ashamurkar5292
    @ashamurkar5292 3 года назад +5

    अश्या अद्भुत गुढ कथा ऐकायला बघायला भारी वाटत तुमचे प्रत्येक व्हिडीयो खुप छान सुंदर आहेत 🙏

    • @vitthaljadhav8687
      @vitthaljadhav8687 3 года назад

      हे ठिकाण कोठें आहे व त्या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातून कसा प्रवास करता ,येईल याचे मार्गदर्शन करणेची विनंती करीत आहे

    • @sureshbhosale8384
      @sureshbhosale8384 3 года назад

      Stte

  • @jig4r-775
    @jig4r-775 3 года назад +3

    सुंदरच संचीत...
    संचीत माझं माहेर बिडवाडी आहे.. आज तु श्रावण गावची विलोभनीय दृश्य दाखवलीस ..... त्याबद्दल खरच धन्यवाद..

  • @radhikaalashi1520
    @radhikaalashi1520 3 года назад +5

    असेच व्हीडिओ पाठवतरहा .खुप रहस्यमय आहेत .

  • @abhasuresh7848
    @abhasuresh7848 17 дней назад

    " एक्स्प्लोअर कोकण " असे नाव द्या सिरीजला ..नाविन्यपूर्ण सुंदरतेने नटलेले गाव ,रोमांचक दृष्ये , दुर्मिळ मुर्त्या ...सगळंच विलक्षण ,सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद .

  • @abhayborkar3523
    @abhayborkar3523 3 года назад +4

    अप्रतिम , तुझ्या मेहनतीला सलाम. आपल्या कोकणात अनेक रहस्य ठिकाणी आहेत पण ती unexplored आहेत. जुन्या जाणत्या पिढीने नवीन पिढीला जर माहिती दिली तर तुझ्या सारख्या हौशी व मेहनती तरुण पिढीकडून आपले कोकण explore होईल व पर्यटनाला चालना मिळेल. स्वामी समर्थ तुला चांगले आरोग्य देवोत. अभय बोरकर ,माटुंगा पश्चिम, मुंबई ( भडे ,लांजा , रत्नागिरी )👌👍

  • @shreeprasadkulkarni2309
    @shreeprasadkulkarni2309 3 года назад +4

    Dev aahe re🥺❤️❤️😌🙏🙏Dev aahe...mhanun he Jag suruye... mhanun sagla vyavasthit ahe.❤️❤️🙏🙏🙏Kshetrafal Maharaj ki Jai...Jai Shreekrishna❤️🙏

  • @prachidicholkar5813
    @prachidicholkar5813 3 года назад +3

    खुप छान विडियो आहे खरच रहस्यमय तळ क्षेत्रफळ मंदिर गणपती मंदिर

    • @hemalatachogle4582
      @hemalatachogle4582 3 года назад +1

      क्षेत्रफळ नाही क्षेत्रपाल

  • @monaliparab6810
    @monaliparab6810 3 года назад +15

    मलाही भटकंती ची खूप आवड आहे. मला नवीन ठिकाणी जायला, तेथील स्थानिक लोकांच्या कडून माहिती जाणून घ्यायला खूप आवडते.😊 एकूण वर्णन सुरेख 🙏

  • @shobhatriratne5896
    @shobhatriratne5896 3 года назад +29

    हे तथागत भगवान बुद्धाचे ठिकाण आहे. तिथे बुद्धाच्या मूर्ती ठेवलेल्या स्पष्ट दिसत आहेत. बुद्धाची अहिंसा असल्यामुळे प्राण्यांचे बळी दिले जात नाहीत. तुमचा हा व्हिडिओ खूप छान आहे पण त्यात ही माहिती सुद्धा ॲड करा.

  • @jaywantbilaye8127
    @jaywantbilaye8127 2 года назад +1

    चांगले काम करीत आहेस तू... खुप छान माहिती सांगतोस देव तुझे भले करील यात शंका नाही...
    कारण देवाची इच्छा असल्या शिवाय असे काम होणार नाही. असेच व्हिडिओ बनवून आपल्या कोकण चे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहच..... धन्यवाद.
    खर तर मला असे व्हिडिओ बनवायचे असे वाटले होते पण देवाची इच्छा नव्हती त्यामुळे ते राहून गेले. पण ते करतोस म्हणून तुला खुप खुप शुभेच्छा...

  • @gautamjadhav1409
    @gautamjadhav1409 5 месяцев назад

    अत्यंत छांन शोधलाउण जनमानसात कोकण चे रस्य व्हिडिओ माध्यमातून. पोचवत आहात त्याबद्दल अभिनंदन. जयभिम❤

  • @jaysingshinde7182
    @jaysingshinde7182 Год назад +1

    फार छानच माहिती मिळाली,धन्यवाद.

  • @kanchansawant4188
    @kanchansawant4188 3 года назад +2

    खूप खूप छान केवळ तुमच्या मुले हे पाहता आले असेच नवनवीन विडीओ पाटवत रहा धन्यवाद

  • @suryakantmulye4507
    @suryakantmulye4507 3 года назад +2

    फारच छान, आपले अनुभव लोकांन पर्यन्त पोहचावी ही ईश्वर चरणी प्रार्थना. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा...

  • @shreejamohite0914
    @shreejamohite0914 3 года назад +1

    व्हिडीओ मस्त होता माझ माहेर पाणलोस. सडयावरचा गणपती लहानपणी पाहिले होते, आता खूप सुधारणा झाली आहे मस्त वाटले

  • @nileshghadage4830
    @nileshghadage4830 6 месяцев назад

    फारच छान आहे असे वाटते की आपण खरंच काय माहीती.देता.हि.फारच.नविन.आहे.आपले.अभिनंदन

  • @varshachavan6432
    @varshachavan6432 3 года назад +2

    Awesome VDO.. Khup bare wattle ki Tumhi kokanbaddal mahiti dili.. Malvani bhasha ekayla khup chan watle..

  • @bansilalpawar6470
    @bansilalpawar6470 3 года назад +1

    खुपच छान नवीन काहीतरी बघायला मिळाले

  • @jaimatadi2691
    @jaimatadi2691 3 года назад +2

    Khup Chan mahiti dili gavchya lokani ani gav hi Chan aahe🙏

  • @deepalisawant6762
    @deepalisawant6762 3 года назад +10

    खुपच छान ❤location आणि माहिती ..अप्रतिम vlog👌
    keep it up Sanchit✌

    • @pandurangkhot526
      @pandurangkhot526 3 года назад +1

      खूप अनोखा विडीवो फार उत्सुकता पूर्वक.

    • @shankarbagwe6990
      @shankarbagwe6990 3 года назад

      असेच रेड्डी चा गणपती या विषयावर एकदा लिहा

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 3 года назад +2

    अभिनंदन या गावाच तुम्हाच ही सुंदर माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार आता तुमच्या सारख आम्हांला हे गाव बघायला येणार आहे तुम्हचे आणि गावकरी लोकांचे खूप अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा माझ्या कडून हे खूप मोठे गावांचे सुंदर आर्दश आहे धन्यवाद नमस्कार

  • @shreyasgosavi320
    @shreyasgosavi320 3 года назад +2

    सुंदरच भाऊ, असेच अजुन व्हिडीओ बनव, खूपच छान

  • @shrutikaparab6465
    @shrutikaparab6465 Год назад +1

    VA khupch chan video aahe mahiti khupch milali Thank you

  • @vinitarawal7588
    @vinitarawal7588 3 года назад +3

    खूप सुंदर वर्णन छान माहिती 👍🏻

  • @user-tq1vy3tt3k
    @user-tq1vy3tt3k 3 года назад +3

    Great bhai. Dhnaywad amchysathi evdhi mehant gheun mahiti deto. Abhyas khoop changla ahe👌👌👍🙏🙏🌾🌾🌴🌴🌾🌴🌴🌴🌴🌴🌴🙏

  • @Saurabhkadam7
    @Saurabhkadam7 3 года назад +3

    Ekdum bharich bhava 😊 khup chan information

  • @poonamchavan4322
    @poonamchavan4322 3 года назад +7

    Great job ... दुर्लक्ष असलेले काही प्रदेशांची तुझ्यामुळे माहिती मिळतेय ..खूप छान ..दमतोयस खूप थोडं श्वासांवर नियंत्रण ठेव 👌👌

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад

      हो प्रयत्न चालू आहेत..

  • @pradnyaerande5169
    @pradnyaerande5169 3 года назад +2

    छान. छान माहिती मिळाली. अजूनही काही ठिकाणे पहायला आवडतील.👌👌💐💐

  • @creativeworld5146
    @creativeworld5146 3 года назад +4

    khupach sundar darashan kelat. thanks.

    • @sunitamanjarekar2872
      @sunitamanjarekar2872 2 года назад

      खूप खूप खूप छान माहिती मिळाली

  • @anilnamdevkadamlanja5988
    @anilnamdevkadamlanja5988 3 года назад +9

    खूप छान माहिती दिली तू मंदिर व तळे 👌👌गांव व तेथील मंडळीला माझा नमस्कार आपलं कोकणही छान त्या गांवाचा आदर्श द्यावे

  • @sushilyadav5260
    @sushilyadav5260 2 года назад +2

    Khup chan

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Год назад +1

    खुपच छान नवीन माहिती मिळाली 💯💯💯👌👌👌👌👌👌

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 3 года назад +2

    first like.. first kament.खूप छान video एका नवीन गावाची माहिती मिळाली...धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏

  • @maheshtodankar7238
    @maheshtodankar7238 2 года назад +2

    Hi Sanchit Thakur Amazing Temple nice information Om Namo Kanika Aditya

  • @aashirvaadasudya7096
    @aashirvaadasudya7096 8 месяцев назад

    Sanchit excellent work. Metkyachi wadi madhe nathpanthi che ek stan aahe. Adbhut stan ahe. Please explore

  • @madanrawool2906
    @madanrawool2906 3 года назад +2

    सुंदर खरच सुंदर .धन्यवाद .

  • @shirishgangawane6533
    @shirishgangawane6533 3 года назад +1

    👌👌Chan mast 1no. Gav khup mast.

  • @जयमहाराष्ट्र-भ2ध

    खुप छान कदाचित स्वर्ग यालाच म्हणतात,,तसा सर्व कोकणंच स्वर्गा सारखा आहे,,

  • @pramodkhairnar8789
    @pramodkhairnar8789 3 года назад +1

    फारच सुंदर माहिती मिळाली आहे धन्यवाद 👍

  • @pranayagupte9285
    @pranayagupte9285 3 года назад +4

    Khup sunder..👍😊..sir asach ek video maleshet wadi vr.pan banwa plz .....mhanje tithepan sudharna hoil naa

  • @prachipurohit7161
    @prachipurohit7161 3 года назад +2

    खूप गूढ मस्त निसर्गरम्य!!

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 3 года назад +7

    या गावात मी गेलो आहे पण तुम्ही जे काही सांगितले ते मला आता माहिती होतं आहे ,परब आडनाव ची लोक जास्त आहेत छान विडिओ 👍🙏

    • @chinmayparabcp
      @chinmayparabcp 2 года назад +1

      Koknat Parab yanchi sankhya sarvat jast aahe karan Parab he koknatle mul rahivashi... Pratham Mankari.

  • @avanidhamanskar7335
    @avanidhamanskar7335 2 года назад +1

    Lay bhari shodh ani mahiti dili Dada 👌🙏

  • @samihavanage9096
    @samihavanage9096 3 года назад +2

    Great Sachit sir🙏chan mahiti🌹🌹

  • @netranagesh5561
    @netranagesh5561 3 года назад +1

    छान video आहे. ऑल the बेस्ट.

  • @smitakadam9000
    @smitakadam9000 3 года назад +6

    वा खूप छान मूंबईला राहुन आम्हाला गावच्या देवांनच दर्शन मिळत तूमच्या मूळे खूप खूप धन्यवाद

  • @prajaktachavan2566
    @prajaktachavan2566 3 года назад +2

    Khup sundar.....👍🏻👌👌

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 3 года назад +2

    खूप छान video बनवलं

  • @giridharpednekar5477
    @giridharpednekar5477 3 года назад +24

    भावा व्हिडिओ नं. १ पण तुका दम खूप लागता हा 🙏🏻 आधी काळजी घे. बाकी खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीक🙏🏻👍

  • @mahadeokumbhar2250
    @mahadeokumbhar2250 3 года назад +4

    मी 1 डिसेंबर ,1983 ते 5 मे, 1985 च्या दरम्यान मोंड ता. देवगड जि.सिंधुदूर्ग या गावाक रवात होतय. म्हणान या ठिकाण बघूची माका लय इच्छा झाली हा.

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад

      या एकदा भेट द्या.. ☺️

    • @vibhawaribhure3182
      @vibhawaribhure3182 Год назад

      .

    • @ramraojadhav7117
      @ramraojadhav7117 5 месяцев назад

      ङङङ😊ङङङङङङङङङङङङङङङङ😊😊ङम​@@SanchitThakurVlogs

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 года назад +4

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि त्या गावातल्या लोकांला मनापासून सलाम त्यांनी आपली कोकणी जुनी परंपरा जपून ठेवली आहे. मित्रा discovery चॅनेलवर expedition unknown हे एपिसोड लागतात ते बघत असल्या सारखा वाटलं आणि मित्रा तू ते एपिसोड बघ आणि तू तसे एपिसोड बनवलेस तर तुला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल आणि त्याच्यात ते इतिहास जपतात आणि टिकून ठेवतात. आणि तास संदेश तू गावातल्या लोकांला देत जा तरच आपल्या कोकण देव भूमीच रक्षण होईल. आणि आपली कोकण संस्कृती टिकून राहील मित्रा तू खूप खूप छान काम करतो आहेस कोकणासाठी आणि कोकणातल्या लोकांसाठी

  • @kalpanasakpal8492
    @kalpanasakpal8492 2 месяца назад

    Mastach ❤😊

  • @Amit-su3kw
    @Amit-su3kw 3 года назад +3

    😊😊👌👌👌छान

  • @madhukargogate47
    @madhukargogate47 Год назад

    छा न नावीन महिती मिळाली धन्यवाद

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 3 года назад +6

    ह्या श्रावण गावात मोघे व महाजनी असै आमचे सोयरे आसत.

  • @VijayGurav-cw2dt
    @VijayGurav-cw2dt 5 месяцев назад

    छान व्हिडिओ

  • @sharadpatade5403
    @sharadpatade5403 3 года назад +1

    खूप छान व्हिडिओ कणकवलीत kasarde गावी सुद्धा अशी रहस्य मय जागा आहेत

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад

      ओके... नक्की जाऊन बघतो मी..

  • @jyotipawar9143
    @jyotipawar9143 3 года назад +2

    Khupach bhari

  • @neelampatil195
    @neelampatil195 3 года назад +2

    Aamhi kokanvasi, bhava kokanatil ashyach goshti ekayala maza aali. Keep it up.

  • @manishab4305
    @manishab4305 3 года назад +1

    Khup khup khup chhan video aahe..khup sarya shubhechha..

  • @jiaenterprises585
    @jiaenterprises585 3 года назад +2

    मस्त आम्ही अशा बरीच गाव बघितली.

  • @savitachavan6366
    @savitachavan6366 3 года назад +1

    Khup. Mast video hota

  • @sangeetajamgade3039
    @sangeetajamgade3039 3 года назад +2

    कोकणात अशा कथा फार रंगवून सांगतात,

    • @darshanadhuri1542
      @darshanadhuri1542 2 года назад

      तुम्ही पण सांगाआम्ही वाचु पण टीका करणार नाही

  • @manjirigawde9114
    @manjirigawde9114 3 года назад +3

    खूप छान कोकणची माणस साधी भोळी पैशाने क्षीमंत नसली तरी मनाने क्षीमंत.

  • @geetagaikwad6354
    @geetagaikwad6354 3 года назад +1

    Khup chan video banvlay shetrepal devas amcha namskar

  • @mamataballary2151
    @mamataballary2151 3 года назад +1

    Khupach Chaan mahiti mast video

  • @archgurav2467
    @archgurav2467 3 года назад +3

    Mast mysterious journey nice video👌Mandir pan👌

  • @konkanRanatalyaAdbhutShakti
    @konkanRanatalyaAdbhutShakti 2 года назад +1

    अति सुंदर खूप छान.

  • @ShaileshRandive-ji3zg
    @ShaileshRandive-ji3zg 5 месяцев назад

    ATI Sundar, khoop mehnat Keli , worth it

  • @vedikapawar8674
    @vedikapawar8674 3 года назад +1

    Khup Chan mast 👌

  • @anantchavan9026
    @anantchavan9026 2 года назад +1

    Khup chaan bhaava

  • @kishorachrekar3342
    @kishorachrekar3342 Год назад

    मस्त 1 नंबर भावा. शेवटी मालवणी.

  • @vinayakkargutkar3435
    @vinayakkargutkar3435 3 года назад +3

    छान दादा एका नविन गावाची माहिती मिळाली🙏😊

  • @hemakale5475
    @hemakale5475 Год назад

    खूपचछान आहे.आवडला व्हिडिओ

  • @krupamhapralkar619
    @krupamhapralkar619 3 года назад +2

    Khupach chan mahiti dilit sir.....pudhchya video sathi all the very best 👍

  • @poonambhavsar2055
    @poonambhavsar2055 3 года назад +2

    खूप छान

  • @nehamalkar7446
    @nehamalkar7446 3 года назад +3

    Khup Mast Dada me Hyach Gav chi aahe Thanku Very much

  • @yashikaagawane7452
    @yashikaagawane7452 3 года назад

    खूप सुंदर..कोकणात असे पण आहे हे माहीत नव्हते . Thank you 🙏🙏

  • @seemapatil6915
    @seemapatil6915 3 года назад +1

    Khupch Sundar ahe tu chaan mahiti dilis 👍 very nice 🙏

  • @bhupeshlondhe1303
    @bhupeshlondhe1303 3 года назад +1

    Kup chan.... Naki amhi Jau bagayla 🙏👍Tnq 🙏

  • @sakshisatam5023
    @sakshisatam5023 3 года назад +2

    आपलं कोकण आहेच भारी

  • @swatishinde5198
    @swatishinde5198 Год назад +1

    Good

  • @babajiloke5849
    @babajiloke5849 3 года назад +3

    खुप छान मित्रां ,👍

  • @minun7828
    @minun7828 3 года назад +2

    Kokanputra Sanchit👍
    Puratatv vibhag ya videonchi dakhal ghetil.explore kartil nakkich👍

  • @nageshzore8362
    @nageshzore8362 3 года назад +6

    कोकनात भूटाटकि आहे असे लोक म्हनतात्, खरे असेल तर purawya सहित दाखवा,
    नसेल तर, ही बातमी पसरवणारे कोन ते सांगा

  • @harshuskitchen
    @harshuskitchen 3 года назад +3

    Informative

  • @sunilbait1628
    @sunilbait1628 3 года назад +3

    Nice श्रावण गाव माझे माहेर

  • @deepalikhandekar2726
    @deepalikhandekar2726 3 года назад +1

    मस्त खूप छान 👍👍

  • @sushmapadvi5328
    @sushmapadvi5328 3 года назад +1

    Khup chan mahiti sangitli tumhi...me 1 time pahate tumche video...khup mehnat lagate video banvayla..thnks itke Sunder nisarg ramy tikan dakvlya baddal...

  • @mahendrasitaram7843
    @mahendrasitaram7843 3 года назад +2

    Video very Nice,& good

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 3 года назад +6

    कोकणात एक गोष्ट मात्र वाईट आहे ते म्हणजे देवापुढे एक दिवा तेवत नसतो