गावापासून दूर राहणारी आजी म्हणजे चालतं-बोलतं विद्यापीठ | काय आहे तिच्या निरोगी दीर्घायुष्याचं रहस्य?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • वयाच्या शंभरी कडे झुकलेल्या ह्या आजी गेली ४० वर्षे रानात एकटी कशी राहते. गावापासून दूर राहणारी आजी म्हणजे चालतं-बोलतं विद्यापीठ | काय आहे तिच्या निरोगी दीर्घायुष्याचं रहस्य आणि साक्षात ज्ञानाचं भांडार कशी आहे ही माउली, जाणून घेऊया. RUclips Mi Vatsaru.
    How does this grandmother live alone in the forest for 40 years?
    कमरेत वाकली परंतु कधी नाही झुकली.
    वयाचं शतक करण्याच्या मार्गावर असून देखील कोणत्याही प्रकारचा आजार नाही, चष्मा नाही, सांधे दुखी नाही आणि शुगर बीपी तिला माहित सुद्धा नाही. अशिक्षित असुन देखील जगाची इतंभुत माहिती आहे.
    आजीचा व्हिडिओ क्रमांक २ पब्लिक केला आहे. लिंक 👇👇
    • वेळ आली होती पण काळ आल...
    आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
    आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
    मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
    मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
    मोबाईल नं. 7620137852
    #maharashtra_village_life
    #marathinews
    #life_in_the_wilderness
    #dhangarijivan
    #graminjivan
    #abpmajha
    मिलिंद भोसले, मी वाटसरू
    Email : milindrajebhosale@gmail.com‪@Mivatsaru‬

Комментарии • 965

  • @subhashgajare-jt3rm
    @subhashgajare-jt3rm 2 месяца назад +164

    छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आपण आहोत ..नाहीतर आज पण आपण आल्ला आल्ला करीत आसतो...काय वाक्य बोलुन गेल्या आज्जी...❤❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +10

      हा खरा इतिहास आहे जो इतिहासकार सांगत नाहीत आणि पाठ्यपुस्तकांमध्ये छापत नाहीत परंतु आजीने एका वाक्यात सांगितला.
      मनःपुर्वक धन्यवाद

    • @mahammadshahabhendigiri9076
      @mahammadshahabhendigiri9076 2 месяца назад +7

      🕉❤️🕋 शिवाजी महाराज हे विश्व महाराजा आहेत ते कधीही ईश्वर अल्ला भेद करत नाही 🙏

    • @shauryagadekar648
      @shauryagadekar648 2 месяца назад +3

      khup chan bolya aajji❤️❤️❤️

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +5

      @@shauryagadekar648 आजीने खरा इतिहास सांगितला, तो सुद्धा एका वाक्यात. 👍

    • @subhashgajare-jt3rm
      @subhashgajare-jt3rm 2 месяца назад

      @@mahammadshahabhendigiri9076 सर्व धर्माचा आदर हा केलाच पाहीजे...पण आज रायगडावर गेल्यावर मंदीरा बाहेरील नंदीची तोडलेली मुर्ती हेच सांगते कि त्यावेळेस खरी लढाई ही धर्माचीच होती...जर धर्माची नसती तर मंदीरे पाडुन त्यावर मस्जिदी ऊभ्या राहील्याच नसत्या... काल पर्वा वैष्णोमाता ला जानार्या बसवर आतंकवाद्यांनी हल्ला केला त्यात ९ निष्पाप लोकांचा बळी गेला ...त्यात 1 वर्षाचं बाळ पण होतं....ह्या हमल्याची जबाबदारी आई ऐस आई ने घेतली आहे...त्यातील ऐका आतंकवाद्याला जिवंत पकडल...त्याचा ईंटरविव पाहीला त्यात तो बोलत होता ..कि हींदु सब काफीर है..और ईनको हम मारते रहेंगे.....भाई मुझे ऐक बात बता कि किसी मुस्लिम हज यात्रा पर कभी भी हींदुओ ने आतंकि हमला किया हो तो बता देना......हम हींदु शात प्रिय लोग है..ईसलिऐ तुम और तुम्हारे परीवार ईस देश मे सुरक्षित है....पाकिस्तान मे मुस्लिम मेजोरीटी में है वहा के हींदुओं का क्या हाल है ...ऐक बार पता कर लेना....तुम अपने तरफ से धर्म कि लडाई लढ रहे हो...लेकीन हमारे हींदु भाई सोऐ हुऐ है...ऐ तब तक नही जगेंगे ..जब तक ईनके घर पर मुसिबत ना आऐं🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sindhusarode9671
    @sindhusarode9671 2 месяца назад +121

    हे सत्य आहे कि जिजाऊ होत्या म्हणून आपण आहोत
    काय अप्रतिम विचार आहे 👏👏👏👏👏👏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +1

      ह्या आजीने आयुष्यातील 50 पेक्षा जास्त वर्ष निसर्गाच्या सान्निध्यात घालवल्यामुळे बहुदा तिला अशी एक प्रकारची दैवी शक्ती प्राप्त झालेली असावी त्यामुळे विचार करण्याची शक्ती तिला देवाने दिलेली असावी.
      मनःपुर्वक धन्यवाद

  • @deepakkadam8759
    @deepakkadam8759 2 месяца назад +286

    विडियो बनवून दाखवणे सोपे असेल पण त्या माऊलीच्या सोबत बसून गप्पा मारल्या वर तिच्या एकटं या जंगलात राहणे स्वतः दिवसभर अंगण साफसफाई करुन मानाने कष्टाने जगणे आजही सुईत दोरा घालताना तरुणांना हि लाजवेल परमेश्वराने निर्माण केले त्याला वाघाची काय भीती जिजाऊ मातेच्या पोटी शिवाजी महाराज आले हे सांगायला आजी इतिहासाची आठवण आज जाणवते अशा माऊलीला साष्टांग दंडवत

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +30

      मी म्हणेल ही माऊली एकटी नसते तिच्यासोबत निसर्ग आहेत, झाडं आहेत, त्या झाडांवर तिने मनापासून प्रेम केलं आणि एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्यांना जपलं त्यामुळे हे जंगलातले प्राणी, पक्षी तिच्यावर सुद्धा तेवढेच प्रेम करतात त्यामुळे किंबहुना तिला संरक्षण मिळालेला असावं.
      निसर्गाकडून एखादी अद्भुत शक्ती तिला मिळालेली असावी म्हणूनच तिचं या वयात सुद्धा ज्ञान आणि स्मरणशक्ती ठणठणीत आहे.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

    • @suvarnapatilkupachchan276
      @suvarnapatilkupachchan276 2 месяца назад +1

      भ२

    • @rahulnikam9287
      @rahulnikam9287 2 месяца назад +1

      Lai.....Bhari

    • @nandugo5343
      @nandugo5343 2 месяца назад +1

      @@Mivatsaru
      \

    • @NandkumarThorat-o5z
      @NandkumarThorat-o5z 28 дней назад

      .
      wi fiy
      0.

  • @gajananwankhede2994
    @gajananwankhede2994 2 месяца назад +85

    ही आजी,या युगातील शबरी माता आहे.🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +5

      अगदी बरोबर.
      नऊवारीतील ही प्रेमळ पिढी दिवसेंदिवस नाहीशी होत चालली आहे. बहुदा ही शेवटची पिढी असणार जी पिढी आपल्याला माया कर, प्रेम करा आणि माणसं एकमेकांशी जोडा असे शिकत राहिली ती पिढी नष्ट होत चाललेली आहे.

  • @Jyoti89700
    @Jyoti89700 2 месяца назад +51

    एका घरात चार चार भावांना पाच घर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मिळवणारे लोक आणि जंगलातील कच्च्या घरात राहणाऱ्या आजीचे पाय धुऊन तीर्थ घेतले पाहिजे....

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +5

      ही जुनी लोकं धना पेक्षा समाधानाला महत्त्व देत होती त्यामुळे ते आनंदी होती आणि सुखी होती.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @rameshjadhav7390
    @rameshjadhav7390 2 месяца назад +115

    धन्य ती जुनी माणसे. अगदी निर्मळ मनाची. खरं जीवन जगणारी. या माऊली ला वंदन. नसानसात जीआऊ शिवबा. महाराजांविषयी प्रेरणा देणारी माय.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +6

      ही जुनी माणसं म्हणजे 24 कॅरेट सोनं आहे. ही जुनी म्हातारी माणसं ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी त्यांचे देवघरातील निरंजना सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं त्यामुळे ती जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांना जपणं हे आपलं कर्तव्यच आहे.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @SunitaDhebe-bq6ik
    @SunitaDhebe-bq6ik 2 месяца назад +69

    हात दमवायचं आणि पोटभर खायचं ह्या आजीच्या वाक्याने जीवनाचं अटळ सत्य समजलं. आजी ला सुदृढ आरोग्य लाभू दे हिच स्वामी चरणी 🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +1

      या जुन्या लोकांचं बोलणं इथं इतका मार्मिक असतं की एका शब्दात त्यांना ते सांगायचं असतं ते सांगून जातात.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @meenasurve7253
    @meenasurve7253 2 месяца назад +44

    खरंच अशी माणसं पुन्हा दिसणार नाहीत...शेवटची पिढी🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +1

      नऊवारीतील बहुदा ही शेवटची पिढी असावी आणि नऊवारी मध्ये जी माया प्रेम असतं ते आजकालच्या जिम पॅन्ट मध्ये नसतं.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @nandabhosalevlogs299
    @nandabhosalevlogs299 2 месяца назад +79

    खूपच गोड आहेत आजी अगदी बरोबर बोलले जिजाऊ होत्या म्हणून आपण आहोत धन्य त्या जिजाऊ धन्य ते शिवराय😊

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +3

      खरं सांगायचं तर आजींनी आज खरा इतिहास सांगितला जो इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये सांगितला जातो किंवा लपवला जातो.
      ताई मनःपुर्वक धन्यवाद 🙏

    • @mamatalk1693
      @mamatalk1693 2 месяца назад +2

      जिजाऊंमुळे महाराज घडले. खरे आहे आज्जींचे.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +2

      @@mamatalk1693 खरा इतिहास एका वाक्यात सांगितला आजीने.
      धन्यवाद

    • @ankushsapkal8184
      @ankushsapkal8184 2 месяца назад

      अतिशय हृदयस्पर्शी

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      @@ankushsapkal8184
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @akshaybotrepatil3002
    @akshaybotrepatil3002 21 день назад +5

    म्हतारीच्या डोक्यावरचा पदर हटेना काय सांगू राणी मला गाव सुटेना ❤️ 😢

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад +1

      ही आजी म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ, ज्ञानाचं भांडार.
      तिच्या सहवासात राहिलं की, काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळतं. 🙏

  • @S.R1432
    @S.R1432 2 месяца назад +17

    लुगडं नेसायच पन बेबाट उघड नाही ठेवायचं 🙏👍 खुप छान आजी

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      आजकालच्या पिढीला सुसंस्कृत बनवण्यासाठी आजीचा थोडाफार सल्ला घेतलाच पाहिजे कारण आजकालच्या पिढीला हे असे सल्ले देणारे वरिष्ठ लोक आजकाल आपण पाहत नाही.
      नऊवारीतील ही संस्कृती आता लोप पावत चाललेली आहे, ही समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @sonuwalgude7069
    @sonuwalgude7069 2 месяца назад +20

    त्या आजी एवढ्या वयस्कर आहे त्यांच्याकडून शिवाजी महाराज जिजाऊ याचा विषयी प्रेम बगून भारी वाटले
    बावळ्या तु दात काढतोय

  • @sanchalprabhu178
    @sanchalprabhu178 2 месяца назад +18

    ते म्हणतात ना देव कोणत्या ना कोणत्या तरी रूपात आपल्या सोबतच असतो फक्त त्याला पाहण्याची ती श्रद्धा नजर असायला हवी, ह्या आजी कडे पाहून हे पटलं ❤, आशा करतो सर्वाना माझं म्हणणं उमगल असेल 👍

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      मी तर म्हणेन किंबहुना निसर्गाच्या रुपाने देवच तिच्या सोबत असणार आहे कारण तिला हे ज्ञान, हे शरीर हे काही साधारण नाही हे सगळं अद्भुतच आहे.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @ushadeshmukh6781
    @ushadeshmukh6781 2 месяца назад +53

    माझी आई अशीच आहे.निसर्ग आणि शेती काम यांचं अतूट नात निभावणारे आई वडील. नातवंडं आणि मुले मुली सुना जावई नातेवाईक माहेर हीच तिची खरी संमप त्ती. आई n उलगडणार कोड आहे..डोळ्यात पाणी आले ...😢

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +5

      हे आपलं दैवत आहे, त्यांची नित्य पूजा केली तरी उपकार आयुष्यभर फिटणार नाही, त्यांची जपणूक करणे आपले परम कर्तव्य आहे.
      ताई अगदी मनापासून धन्यवाद 🙏

    • @akki3117
      @akki3117 2 месяца назад +4

      छान आजी कोटी कोटी नमन❤

    • @ushadeshmukh6781
      @ushadeshmukh6781 2 месяца назад

      @@Mivatsaru हो दादा👋

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +1

      @@akki3117 मनःपुर्वक धन्यवाद

    • @anjalibhat4946
      @anjalibhat4946 2 месяца назад

      19:31

  • @kalidaskhatal34
    @kalidaskhatal34 2 месяца назад +19

    आजी देव तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      अगदी मनापासून धन्यवाद,👍

  • @namdevladke3797
    @namdevladke3797 2 месяца назад +40

    खूप छान मुलाखत आजी बरोबर... खूप सुंदर विचार आहे आजीचे... खूप काही शिकण्यासारखे आहे. आजच्या पिढीला आजीच्या मुलाखतीतून आजीला दिर्घ आयुष्य लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना...

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +9

      हि जूनी अनुभवी माणसं म्हणजे खजिना आहे, जोपर्यंत आहेत तोपर्यंत जपला पाहिजे, ट्यूब लाईट इतका प्रकाश देत नाहीत परंतु त्यांचं देवघरातील निरंजणासारखं तेवत रहाणं महत्त्वाचं असतं.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

    • @mahendrakale2806
      @mahendrakale2806 2 месяца назад +2

      देवता

    • @ananddeshmukh8080
      @ananddeshmukh8080 2 месяца назад +1

      Aaji cha address Dena yar Mazi pan aaji asich aahe❤❤​@@Mivatsaru

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +1

      विंझर गाव ता राजगड पुणे

  • @aparnabhoir3118
    @aparnabhoir3118 2 месяца назад +13

    आजीचे विचार खूपच चांगले आहेत आजिना साष्टांग नमस्कार

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ🎓 आहे.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @vivekkulkarni1408
    @vivekkulkarni1408 Месяц назад +6

    हीच खरी भारतीय संस्कृती , जिजाबाई होत्या म्हणून आपण आहोत , नाही तर अल्ला अल्ला करत बसलो असतो , काय धारदार वाक्य आहे अंगावर काटा आला, आजी तुम्हाला शत शत प्रणाम ❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад

      खरा इतिहास सर्वसामान्य माणसापासून लपवला जातो, पाठ्यपुस्तकांमध्ये छापला जात नाही आणि इतिहासकार सुद्धा सांगायला घाबरतात असा इतिहास एका वाक्यात सांगितला आजीने.
      जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🙏🙏

  • @arpitapadwal1560
    @arpitapadwal1560 2 месяца назад +12

    या माऊलीला सलाम जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      खरे इतिहासकार जो सांगत नाहीत आणि पाठ्यपुस्तकांमध्ये छापला जात नाही असा इतिहास आजीने केवळ एका वाक्यात सांगितला.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @aditiparab1625
    @aditiparab1625 2 месяца назад +7

    खरंच धन्य या आजी .किती छान विचार आहेत त्यांचे .उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचा भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ जणू.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @HiraSomu2306
    @HiraSomu2306 2 месяца назад +11

    ए आजी, किती निर्भय आहेस गं.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +2

      गेली 40 वर्षापेक्षा जास्त कालावधीत ही रानात एकटी राहत असल्यामुळे आजीच्या मनात पण कुठल्याही प्रकारची भीती, भय किंवा काळजी दिसत नाही.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @devramshirole9308
    @devramshirole9308 Месяц назад +2

    या माउली ला मानाचा मुजरा
    आता ही शेवटची पिढी अशी सवजळ मनाची प्रेमळ मानसं होने नाही साधी भोळी भाबडी समजूतदार चोळी आणि लुगडं नेसणारी धन्य ती माऊली

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад

      ही आनंदी समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे, याचं खूप वाईट वाटतंय. बहुदा पायजामा आणि नऊवारीत दिसणारी ही शेवटची पिढी असणार.नंतर ही लोकं औषधालाही शोधून सापडणार नाहीत. 🙏

  • @user-kc1dl2nn8p
    @user-kc1dl2nn8p 2 дня назад +1

    आयुष्य हे कसे जगायचे ते या आई कडून शिकावे
    आई तुला शतशः प्रणाम
    मी निशब्द आहे
    काय बोलू आणि किती बोलू
    🙏🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  День назад

      आजीचा एक एक शब्द बहुमूल्य आणि अर्थपूर्ण आहे. यात जीवनाचे तत्त्वज्ञान दडलेले आहे, त्याचा आपल्याला प्रत्यय येतो. बरंच काही शिकण्यासारखं आहे तिच्याकडून. 🙏🙏

  • @LaxmanGayakwad-nt4gg
    @LaxmanGayakwad-nt4gg 2 месяца назад +11

    ❤❤ या आजीचा व्हिडिओ. पाहून आम्ही आंब्याची पाच झाडे लावली आहेत.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +1

      दादा फारच अप्रतिम, म्हणजे या व्हिडिओचा सार्थक झाल्यासारखं वाटलं जगामध्ये आपल्यामुळे कोणीतरी पाच झाडे लावली ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. आणि धन्य ती माऊली आणि धन्य ते जिजामाता जिने हे वैभव साकारले.

  • @kashinathjadhav4234
    @kashinathjadhav4234 2 месяца назад +27

    आपले मनापासून धन्यवाद आपल्या चायनल च्या माध्यमातून निसर्ग रम्य अशा सानिध्यात असणारे जीवाला जीव देणारे माणसे दाखवली आम्हला आमच्या आईची आठवण करून दिली❤️ माणसाची मनस्थिती चांगली असली की जग सुंदर दिसते पुढे बोललायला शब्द नाहीत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +1

      ही माऊली कधी शाळेत गेली नाही आणि कुठलं पुस्तकही वाचले नाही तरी तिला इतिहासाची उत्तम भूत माहिती असते. माणसं कशी ओळखावी ती कशी जपावी हे आजीकडून शिकावं. निसर्गाप्रती प्रेम कसं असावं पर्यावरण कसं जगावं हे अनेक गोष्टी आजी कडन आजकालच्या पिढीला शिकण्यासारखे आहेत.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @subhashgajare-jt3rm
    @subhashgajare-jt3rm 2 месяца назад +7

    शाळा नाय शिकले पण तुला गुंडाळते...कसला तो आजीचा अभ्यास आणि आत्मविश्वास...खरंच जुन्या माणसांबरोबर या तरुण पिढीने बसुन अनुभव तरी घ्यायलाच हवा......नाहीतर आजची पिढी हा विचार करती कि ही पिढी आडानी आहे...तसं काही नाही...स्वताच्या शरीराचा स्वताच डाक्टर आसणं ही काय साधी गोष्ट नाही........आजी तुझे विचार अनमोल आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +1

      ही जुनी माणसं म्हणजे चालती बोलती विद्यापीठ आहे ते कुठे शिकले नाहीत पण त्यांना परिस्थितीने आणि वेळाने खूप काही शिकवले स्वतःची काळजी घ्यायला शिकवले आहार कसा असावा राहणीमान कसा असावा निसर्गाची काळजी कशी घ्यावी इतरांना कशी मदत करावी हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.
      मनःपुर्वक धन्यवाद
      मनःपुर्वक धन्यवाद

  • @vaishalikhandagale2472
    @vaishalikhandagale2472 11 дней назад +1

    दादा आजीचं बोलणं खरंच किती छान आहे❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 дней назад

      बहुदा गेली चाळीस पन्नास वर्षे निसर्गाच्या सोबत राहिल्याने आजीला एक प्रकारचे अद्भुत शक्ती मिळाली असणार आणि त्याचमुळे तिला निरोगी दीर्घ आयुष्य पण लाभलेला असणार.

  • @SanjayPatil-rm6vn
    @SanjayPatil-rm6vn 2 месяца назад +21

    पूर्वीची माणसे लाख मोलाची होती माझ्या गावाला जेव्हा मी जायचो त्यावेळी अशीच बरीच ज्येष्ठ माणसे आमच्या घरी येत असत माझ्या आजोबांचे मित्र त्यांच्यावर प्रेम करणारी माणसे आज माझ्या वडिलांच्या वयाची माणसे सुध्दा गावात राहिली नाही या आजीला पाहिले आणि माझे बाल पण मला आठवले ही आजी किती स्वावलंबी आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे हिला सुदृढ आयुष्य लाभो हीच श्रीराम चरणी प्रार्थना

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +1

      ह्या आजीचं आयुष्य म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. कसं जगावं, कसं राहावं, आहार कसा असावा, निसर्गाप्रती प्रेम कसं असावं आणि आपल्या धर्माचा आदर कसा असावा इतिहासाची जाण कशी असावी या उत्तम सखोल माहिती आहे.
      धन्य ही माऊली धन्य ते शिवराय धन्य जिजाऊ माँसाहेब आणि धन्य संभाजी महाराज.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @prabhakarwaydande
    @prabhakarwaydande 2 месяца назад +23

    ✨️🙏🏽✨️प्रिय आजीला साष्टांग नमस्कार आजीनं सांभाळून ठेवलेली 🏕 वास्तू
    बगून माझं बालपण जागं केलं , धन्यवाद दादा ❤🎉

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +1

      निसर्गाच्या सानिध्यात राहुन त्याच्या वर प्रेम कसं करावं, पर्यावरण संरक्षण कसं करावं हे शिकण्यासारखे आहे.
      धन्य ती जिजाऊ
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @ranipawer6406
    @ranipawer6406 2 месяца назад +26

    नऊवारीतील हि शेवटची पिढी. निर्व्याज, निर्मळ निर्मळ प्रेम करणारी भोळी भाबडी पिढी जगण्याचा अर्थ सांगणारी समजावणारी. चालते बोलते ज्ञानपीठ

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      नऊवारी साडी मध्ये जी माया जे प्रेम आहे ते आजकालच्या ड्रेसमध्ये किंवा जीन्स पॅन्ट मध्ये नाही. तुम्ही जर पाहत असाल तर आजकालच्या मुलांना गालावर किस करण्याऐवजी Flangkiss देतात का तर त्यांची लिपस्टिक खराब होते म्हणून.
      अशी ही पिढी बदलत असते परंतु ही जुनी पिढी म्हणजे 24 कॅरेट शुद्ध सोनं आहे.
      ताई मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 Месяц назад +2

    डोळ्यातून पाणी आले...
    खरंच महाराजांबद्दल असलेल निस्वार्थी प्रेम बघून खुप खुप मन भरून आले...
    जय जिजाऊ, जय शिवराय आजी 🙏🌹

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад +1

      जो खरा इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये छापला जात नाही आणि इतिहासकार सुद्धा सांगायला घाबरतात, तो इतिहास केवळ एका शब्दात आजीने सांगितला. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩

  • @user-fd1lf4lq6i
    @user-fd1lf4lq6i 2 месяца назад +13

    आमच्या सासुबाई ची आठवण झाली धन्य त्या माऊली

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      ही आजी म्हणजे साक्षात जिजामाता आहे धन्य ते शिवाजी महाराज धन्य ते संभाजी महाराज आणि धन्य जिजाऊ माँसाहेब.
      मनःपुर्वक धन्यवाद

  • @JiyuKitchen
    @JiyuKitchen 2 месяца назад +12

    धन्य आहे आजी तुम्हाला बघून माझी आजी आठवली खरेच ती माणसे वेगळीच होती

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार आहेत, २४ कॅरेट सोनं जणू.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

    • @vandanamahamuni8769
      @vandanamahamuni8769 2 месяца назад +1

      आजींना पाहुन मला माझ्या वडिलांची आठवण आली ते 97वर्षीचे होते ते बॅकेत सराफाच काम करत होते त्यांनी कधिच चश्मा लावला नाही
      जेवणात ते भुकेपुरतच खायचे
      ताक नियमीत प्यायचे
      कडुलिंबांचा रस नियमीत प्यायचे भरपूर चालणं
      हेच त्यांचे उत्तम निरोगी आयुष्याचे गमक होते 🙏
      आजींचा आशिर्वाद आपल्या सगळ्यावर राहो
      आपण आज्जीचा जीवनपद्धती आमच्या समोर आणलीत धन्यवाद 🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      खरं पाहिलं तर ही जुनी माणसं म्हणजे आपले गुरु आहेत, अंधारात रस्ता सापडण्यासाठी एक दिवा आहे.आजकालच्या पिढीला ज्ञान देणारं हे विद्यापीठ आहे, त्यांना जपणं हे आपलं काम आहे. ही समाधानी आणि आनंदी पिढी आपल्याला सोडून जात आहे याचं खूप वाईट वाटतंय, अशी पिढी पुन्हा होणे नाही.
      🙏

  • @user-yj3tu5cf8k
    @user-yj3tu5cf8k 2 месяца назад +20

    वाघाच्या डरकाळीलाही न घाबरणारी खरी वाघीण ...निसर्गाच्या सान्निध्यात राहते ही माऊली ती एकटी कशी बरं ? जिजाऊ आणि शिवाजी महाराजांची खरी शिष्या आहे आजी...धन्य आजींची मुले , नातू ,परतुंडं ज्यांना आजींचा सहवास भेटला

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +1

      निसर्गामध्ये असलेल्या दैवी शक्तीमुळे बहुधा आजीला ही ताकत मिळाली असेल... धन्य ती जिजामाता. 🚩
      अगदी मनापासून धन्यवाद 🙏

    • @Anonymous-pj1xk
      @Anonymous-pj1xk 2 месяца назад +1

      @@Mivatsaru Vaagh konala saangun yet naahi , kadhi pan yevu shakto. janglaat kontyahi thikani asu shakto. Yetana door varun aaju-baajula samor nirikshan karat karat, halu halu pudhe, lapat cchapat yeto.Vaaghachi drushti tikshna asate, Vaagh gavtat, jhaadit kinva jhaadachya aad laplela asu shakto , Biblya vaagh asel tar to jhaadavar pan lapun baslela asu shakto, tyamoole, Aajini , gharachya baaher asatana savdhaani balagalii paahije, Vaaghachya haatach maran bhayanak vedanashil asate..Jaast aatma-vishwash bara naahi.

    • @Anonymous-pj1xk
      @Anonymous-pj1xk 2 месяца назад

      Vaagh konala saangun yet naahi , kadhi pan yevu shakto. janglaat kontyahi thikani asu shakto. Yetana door varun aaju-baajula samor nirikshan karat karat, halu halu pudhe, lapat cchapat yeto.Vaaghachi drushti tikshna asate, Vaagh gavtat, jhaadit kinva jhaadachya aad laplela asu shakto , Biblya vaagh asel tar to jhaadavar pan lapun baslela asu shakto, tyamoole, Aajini , gharachya baaher asatana savdhaani balagalii paahije, Vaaghachya haatach maran bhayanak vedanashil asate..Jaast aatma-vishwash bara naahi.

    • @sanjayshendge1434
      @sanjayshendge1434 2 месяца назад +2

      अरे बाबा गांवच नाव तरी सांग

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      @@sanjayshendge1434
      भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @MALTIJADHAV1979
    @MALTIJADHAV1979 2 месяца назад +13

    🎉किती भरभरुन बोलतात गावाकडील माणसे. 😊😊😊😊🎉खूप छान 😊😊

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      या जुन्या लोकांना भौतिक सुखाची अपेक्षा नसते, दोन शब्द प्रेमाने बोललं की त्याचं मन भरून जातं.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @vishwanathrane5531
    @vishwanathrane5531 2 месяца назад +4

    अशी माणसे परत पहायला सुद्धा मिळणार नाहीत.आमच्या आजीला दिर्घायुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.आणि तिचे आशिर्वाद सतत आम्हाला मिळो.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      ही माणसं नुसती सोबत असली तरी आपल्याला भरपूर आधार असतो, घराचा तो आधार हरपला की मग त्यांची किंमत कळते.
      धन्यवाद 🙏

  • @prakashkolekar1642
    @prakashkolekar1642 2 месяца назад +9

    आजच्या पिढीला यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे जुनी लोक लय मयाळु असतात
    माझं गाव ही निसर्गाच्या कुशीत आहे
    कामा साठी मुंबईला आहे
    दादा विडीओ पाहून डोळ्यात पाणी आले
    गावची आठवण झाली
    आजीची छान मुलाखात❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      या जुन्या लोकांना भौतिक सुखाची अजिबात अपेक्षा नसते फक्त चार शब्द मायेचे बोलले की ते खूप खुश होतात.
      अगदी मनापासून धन्यवाद 🙏

  • @rupalipatil9595
    @rupalipatil9595 2 месяца назад +21

    खूप छान मुलाखत , आजीचे बोल खूपच शिकण्यासारखे आहेत.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +1

      हे चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे ज्ञानाचं भांडार आहे.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @sayalijadhav511
    @sayalijadhav511 Месяц назад +2

    आज आजीला बघून मला माझ्या आजीची आठवण झाली माझी आजी अशीच एकटी राहिली आजच माझ्या आजीला तीन वर्ष झाले.
    आजी तू मला खूप चांगला आरोग्य आणि आयुष्य लाभो तुमची हिम्मत शेवटपर्यंत अशीच राहो तुमचे विचार खरच खूप चांगले ❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад

      ही जुनी माणसं घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसतील तरी त्यांचे देवघरातील समई सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं, ती एकदा निघून गेली इतकी मग त्यांचं महत्त्व कळतं. 🙏🙏

  • @sunitakamble6659
    @sunitakamble6659 Месяц назад +3

    आजी एकच नंबर आणि मुलाखत घेणारेपण एकच नंबर.... दिलखुलास मुलाखत... आजी खूपच परखड विचारांची, निसर्ग प्रेमी, स्वाभिमानी, स्वच्छ नीटनेटकी, कष्टाळू आहे.
    माझी आजीपण आयुष्य मुंबईत गेले पण शेवटी जावयाच्या दारात नको म्हणून एकटी अनेक वर्षे अशीच राहिली. आई अधूनमधून तिला हव नको बघायला जायची तर तिच आईला अंडी, हरभऱ्याची वाळवलेली भाजी, हुरडा वगैरे बांधून द्यायची. अतिशय स्वच्छ व मोजकाच आहार घेणारी होती.
    या आजीला पाहून मला तिची खूप आठवण झाली.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад

      अगदी मनापासून धन्यवाद अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काहीतरी करायला उत्साह येतो.
      ही स्वाभिमानी पिढी गावाकडेच आपल्या झोपडीमध्ये आनंदी आनंदी जगतात, त्यांना शहरातील लाइफस्टाइल किंवा जे जीवन हे अजिबात आवडत नाही, त्यांचे मन रमत ते खेड्यामध्ये आणि त्यांचा आनंद असतो ते आपल्या मुलाबाळांच्या कल्याणा मध्ये.
      ही आनंदी समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे याचा खूप दुःख आहे.

  • @netrarajeshirke3399
    @netrarajeshirke3399 2 месяца назад +3

    निस्वार्थी, स्वाभिमानी शेतकरी आजी.
    हे आपले आदर्श आहेत.
    जय जिजाऊ जय शिवराय.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      आज वयाची शंभरी गाठण्याच्या मार्गावर असलेली ही आजी परंतु त्या पूर्णपणे स्वावलंबी आहेत, तसेच भाजीपाला स्वतः पिकवतात. या समाधानी आणि आनंदी पिढीकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आपल्याला.

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 2 месяца назад +8

    किती निर्मळ हास्य चा झरा आहे ही आजी छान.खरी स्वस्कुरुती हीच आहे व्हिडिओ धन्यवाद सर

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +1

      ही आजी गेली 50 वर्ष या रानात एकटी राहते परंतु तिला कुठलाही आजार नाही. बीपी आणि शुगर तर खूप लांबच्या गोष्टी पण ही माऊली एकदाही दवाखान्यात गेलेली नाही.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @vg-kf8kg
    @vg-kf8kg 2 месяца назад +9

    धन्यवाद भाऊ, फार छान व्हिडिओ....सुंदर चित्रण, निवेदन.
    माझ्या आजीची (ती खरं माझी काकू पण आम्ही तिला आजी म्हणायचो) आठवण झाली. अगदी अशीच....प्रेमळ पण स्पष्ट. शिवाजी राजे आणि जिजाऊ होती म्हणून आपण टिकलो, नाहीतर गेलो असतो अल्ला अल्ला करीत. आजींनी अगदी माणसांच्या मनातला खरा इतिहास सांगितला...( हल्लीच्या ओढून ताणून शिवरायांना सर्वधर्मसमभाव चिकटवणाऱ्या तथाकथित इतिहासकारांनी यातून बोध घ्यावा.)❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +1

      निसर्गाच्या सानिध्यात राहून या आजींना काहीतरी दैवी शक्ती किंवा एखादी ऊर्जा प्राप्त झालेली असणार आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे या आजींनी दोन शब्द धर्माविषयी चा अभिमान आणि धर्माविषयी चे महत्व सांगितले आहे. सलाम आजीला. छत्रपती शिवाजी महाराजांना, मासाहेब जिजाऊंना आणि शभुराजेंना🚩🚩
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏🙏

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 2 месяца назад +7

    आजी सासष्टिगं नमस्कार🙏 खूप खूप छान सुदंर अशी ही जुनी माणस मस्त नियम आणि निरागस मन 👍👍🙏🙏पहीली कंमेट

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भांडार. चालते बोलते विद्यापीठ, यांच्याकडून बरेच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आजकालच्या पिढीला.
      मनःपुर्वक धन्यवाद

  • @dineshmandlik9122
    @dineshmandlik9122 2 месяца назад +5

    भरुन पावलो आजीच्या मुखी छत्रपती शिवाजीराजे आणि जिजाऊ आईसाहेब यांचे नाव निघाले धन्यवाद ❤❤❤❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      इतिहास तज्ञ खरा इतिहास सांगायला घाबरतात परंतु या माऊलीने एका शब्दात पूर्ण इतिहास सांगितला आणि धर्माचा अभिमान या गोष्टीतून आपल्याला दिसून येतो.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @justrelax2415
    @justrelax2415 Месяц назад +5

    जपा अशा माणसांना. माझी आजी गेली तेव्हा तिची खरी किंमत कळली. आता आठवणीत रडण्यावाचून काहीच राहिले नाही

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад +1

      ही जुनी अनुभवी माणसं ज्ञानाचे भांडार आहेत, ती वडाच्या झाडा इतकी भव्य सावली देऊ शकत नाहीत किंवा घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी त्यांचे देवघरातील निरंजना सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

    • @vaishalidhemare9759
      @vaishalidhemare9759 Месяц назад +2

      Ho maji suddha aaji gelyaver mala khari kimmat kalali ..ata rahilya fakt athvani tichya ..

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад

      ही माणसं घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी त्यांचे देवघरातील निरंजना सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असत, ती एकदा निघून गेली की मग त्यांचं महत्त्व कळतं.

  • @sunildude
    @sunildude 24 дня назад +1

    अत्यंत छान मनाला खूप बरे वाटले कारण अशी माणसे कितीही पैसे दिले तरी मिळणार नाहीत आजी जा समाधानाने जगल्या तेच खरे जीवन आहे तुम्ही चांगला व्हिडिओ केलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  23 дня назад

      ही आनंदी समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे याचं खूप वाईट वाटतंय.
      मनापासून धन्यवाद 🙏

  • @sachchidanandbhokare2610
    @sachchidanandbhokare2610 2 месяца назад +3

    खूप सुंदर आणि बोधप्रद व्हिडिओ.
    आता अशी साधी भोळी, स्वाभिमानी आणि स्वधर्माचे आचरण करणारी पिढी पहायला मिळते अशक्य.
    जुनं ते सोनं.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      ही नऊवारीतील पिढी बहुदा शेवटची पिढी असणार, पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवला जाणारा इतिहास आणि इतिहासकारांमार्फत सांगितलं जाणारा इतिहास यामध्ये खूप फरक आहे, स्वधर्म विषयी असणारा अभिमान कसा असावा हे आजीकडून शिकण्यासारखा आहे.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @vanitazkitchen....6319
    @vanitazkitchen....6319 Месяц назад +9

    खूप गोड सच्ची आणि कणखर आजी. आम्हाला यांच्यासारखे जगता आले तर किती छान होईल. पण आजीच्या पर्सनल गोष्टी तुम्ही विचारायला नको हव्या होत्या. जसं की पेटी........

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад

      प्रामाणिकपणा, काबाड कष्ट करणे, दुसऱ्याला जीव लावणे, माया लावणे, आपल्या मुलाबाळांची काळजी घेणे या साऱ्या गोष्टी अगदी आनंदाने करत असत हे जुनी लोकं.

    • @dhanajikate-sx9wm
      @dhanajikate-sx9wm Месяц назад

      कणखर बाणा, सुसंस्कृतणा आणि विचारांच वैभव क्वचीत एखाद्याला लाभतं त्या पैकी ही एक आजी जीनं याही वयात स्मरणशक्तीसह संस्कार नुसते जपले नाही तर आचरणात सुद्धा आणले आहेत.
      आजी सलाम आणि त्रिवार वंदन🙏🙏🙏 आतापर्यंतच्या नाबाद वाटचालीस👍🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад

      आपल्या शुभेच्छा आजीपर्यंत नक्की पोचवतो.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @likelymee8
    @likelymee8 Месяц назад +2

    खूप छान आणि तेवढाच अनेक भावनांनी भरलेला व्हिडिओ ❤ व्हिडिओ पाहताना डोळ्यातून कधी अश्रूधारा वाहू लागल्या ते समजलं देखील नाही.. आजींना आमच्याकडून खूप सारं प्रेम 😊🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад +1

      ही जुनी माणसं अत्यंत प्रेमळ आणि मायाळू, दुसऱ्याला जीव कसा लावावा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे, परंतु ही आनंदी समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे याचं खूप वाईट वाटतंय.

  • @meghanamodak9631
    @meghanamodak9631 24 дня назад +1

    खूपच छान आजीबाईना नमस्कार ❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  23 дня назад

      मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @ashajadhav6250
    @ashajadhav6250 2 месяца назад +10

    माझे माहेर रु ळे आहे माझी आजी पण अशीच होती आजी हिरकणी आहेत

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      ही जुनी माणसं चंदनाप्रमाणे आयुष्यभर झिजतात आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतात परंतु त्यांची किंमत गेल्यानंतरच आपल्याला समजते.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @nitindixit1813
    @nitindixit1813 2 месяца назад +2

    आजींच्या कडून धाडस,कष्ट ,जिद्द हे खूप शिकण्यासारखे आहे . आजीना साष्टांग नमस्कार

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      तुमचा नमस्कार आजपर्यंत नक्की पोहोचवतो.
      ही जुनी झालेली माणसं म्हणजे चालते बोलते विद्यापीठ आहेत, बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आजकालच्या पिढीला यांच्याकडून.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @omhariom2085
    @omhariom2085 2 месяца назад +1

    वाह🙏ही आजी ऐक सीव्ही न आहे देवाची सुद्धा काय हिम्मत तीच्या केसाला धक्का दैची, न शिक्षण घेऊन सुध्दा Masters digree in self realization मध्ये मिळाली आहे. कोटी कोटी प्रणाम हया माउली ला🙏🙏🙏खूप शिकायला मिळाला मिळाले 🙌

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      ही जुनी माणसं कधी शाळेत गेली नाहीत ना कधी पुस्तक वाचलं, मग त्यांना एवढं ज्ञान कसं आलं? बहुदा निसर्गासोबत राहून राहून तिला एक प्रकारची दैवी शक्ती मिळालेली असावी.

  • @vikasdabir
    @vikasdabir 2 месяца назад +1

    फारच सुरेख.भावस्पर्शी, जीवनाचा शोध घेणारी संकल्पना.धन्यवाद.आणी आपल्या मातेला शतशः वंदन.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह येतो, मनःपूर्वक धन्यवाद🙏
      ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ आणि अंधाऱ्या मार्गात प्रकाश देणाऱा दिवा.

  • @sultanashikalgar1179
    @sultanashikalgar1179 2 месяца назад +7

    आजी तुमचं बघून मला जीवन जगण्यासाठी मला ताकत मिळाली

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      गेली 50 पेक्षाही अधिक वर्षाचा कालखंड या माऊलीने या रानात घालवलेला आहे त्यामुळे बहुदा निसर्गाकडून तिला एक प्रकारची अद्भुत अशी शक्ती मिळाली असावी असं मला वाटतं. त्यामुळे तीचे विचार आणि त्याचं मन, शरीर हे अजूनही ठणठणीत आहे.

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 2 месяца назад +8

    आजी खूप छान आहे ग तू पण बोलणं ऐकून डोळ्यात पाणी आल

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +1

      हि जुनी माणसं मायेची खाण आहेत, त्यांना भौतिक सुख नको असतं, परंतु परंतु मायेचा एक शब्द महत्त्वाचा असतो.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @rohinimulik1524
    @rohinimulik1524 Месяц назад +1

    काही तरी शिकायला भेटल खूप मस्त डोळे भरले आजीच्या बोलन खुप भारी

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад

      ही जुनी माणसं ना शाळेत गेली ना बुकं शिकली, परंतु त्यांना परिस्थितीमुळे एवढे ज्ञान आलं होतं की त्यांच्याकडून बरेच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.🙏

  • @kalyanirandhir2863
    @kalyanirandhir2863 2 месяца назад +2

    आजीला साष्टांग दंडवत ❤
    किती गोड आजी आहे......
    संस्कार, इतिहास, अन् संस्कारांचे दर्शन घडवणारी माऊली
    ❤❤❤आजीला भेटावस वाटतं

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282 2 месяца назад +3

    खूपच छान आजीचे विचार ईथुनच आजीला मनापासून सांष्टग नमस्कार आम्हाला आजी नव्हती आजीला पाहून खूप छान वाटले धन्यवाद

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भांडार असतात.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

    • @shamaldhekale5282
      @shamaldhekale5282 2 месяца назад

      @@Mivatsaru बरोबर आहे

  • @meeraamin4310
    @meeraamin4310 2 месяца назад +4

    Agadi khalkhal vahnari nadich vatli hee aaji...Ajunhi mast sense of humour....Khotepana nahi.... nisarg aani jijamai,Shivaji ,Tanaji ya thor mansanchi thoravo ganari hee mai kitikiti madhur...Naman ya maulila manapasun...

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      ह्या आजीने आयुष्यातील 50 पेक्षा जास्त वर्ष निसर्गाच्या सान्निध्यात घालवल्यामुळे तिला निसर्गाकडून एक दैवी शक्ती किंवा एक अदभूत शक्ती प्राप्त झालेली असावी त्यामुळे तिचा विचार करण्याची क्षमता आहे ते अजूनही टिकून आहे.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @sarkarji960
    @sarkarji960 Месяц назад +1

    ब्रह्म वाक्य अगदी बरोबर, कोटी नमन ह्या मातेला 🙏❤
    जय शिवराय जय शंभुराजे ❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад

      ह्या जुन्या लोकांकडून बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आजकालच्या पिढीला. ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचा भांडारच आहे, केवळ अनुभवाच्या जीवावर त्यांनी आपलं जीवन व्यतीत केला.
      धन्यवाद 🙏🙏

  • @swarup280
    @swarup280 2 месяца назад +2

    खरच आजी खूप धाडसी आहेत आणि त्यांच आयुष्य त्या त्यांच्या मनानी जगत आहेत समाधानी आहेत

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      ही समाधानी आणि आनंदी पिढी आपल्याला सोडून जात आहे. नऊवारीतील ही पिढी बहुतेक शेवटची पिढी असणार, या आजीचे एक वैशिष्ट्य म्हणजे या आजीचं स्वतःच्या आहारावर अगदी काटेकोर लक्ष असतं. तिने गेली ही 80 वर्षापेक्षा जास्त आयुष्यात केवळ दूध, दही, ताक असा सकस आहार घेतलेला आहे.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @shobhanawaghmare4464
    @shobhanawaghmare4464 2 месяца назад +6

    Shabdach nahit vyakt honyasathi......aata paryantcha mla aavadlela vdo...❤❤❤❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की काम करायला अजून उत्साह येतो.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @suvarnasavagave233
    @suvarnasavagave233 2 месяца назад +4

    खूप छान आजी जिद्दीला सलाम ❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      सलाम या माऊली ला.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @reshmapawar5158
    @reshmapawar5158 29 дней назад +1

    Maza aaichi athwan aali tumcha video bghun🥺...aaji khup khup chan ahe khup jast awdla ha video❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  29 дней назад

      अगदी मनापासून धन्यवाद 🙏
      ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ आहे, त्यांना जपलं पाहिजे🙏

  • @DattuChaudhary-gu3pz
    @DattuChaudhary-gu3pz Месяц назад +1

    आई तुळजा भावानी आपणास ऊदंड निरोगी दीर्घायुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना दादा तुमचे आभार मानतो धन्यवाद .

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад

      अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह येतो, मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 2 месяца назад +5

    एकदम बरोबर बोललात आजी जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +1

      आजीने केवळ एका शब्दात धर्माविषयी असलेला अभिमान व्यक्त केलेला आहे. सलाम आजीला तिच्या ज्ञानाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना तसेच माँसाहेब जिजाऊंना.
      अगदी मनापासून धन्यवाद 🚩🙏🙏

  • @vidyanawle3655
    @vidyanawle3655 2 месяца назад +4

    खुप छान व्हिडिओ आहे बघून खुप छान वाटले आज्जी एकच नंबर 👌👌🙏🙏👍

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भांडार आणि अनुभवाचा खजिना असतो.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @deepakkadam4423
    @deepakkadam4423 Месяц назад +2

    आजीला साष्टांग नमस्कार,मला माझ्या आजीची आठवण आली.आज ती या जगात नाही.अश्या माणसांना जपायला पाहीजे.अशी निर्मळ मनाची माणसं या पुढं मिळणार नाहीत.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад

      थोडा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या दैनंदिन जीवनात आपण किती व्यस्त आहोत आणि प्रत्येक गोष्टीच्या मागे आपण धावत आहोत, अगदी उर फुटेपर्यंत. परंतु विचार करत नाही की जीवन केव्हातरी संपणार आहे, थोडा वेळ थांबून स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं आहे.

  • @vidhyabudhale9390
    @vidhyabudhale9390 Месяц назад +1

    खुप छान विचार आहे, छान ठेवलं
    घर अगदी निसर्गाच्या सानिध्यात राहून , सालम अजजीला

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад +1

      माणसाचं

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад

      माणसाचं खरं जीवन हे निसर्गासोबत आहे ना की निसर्गाच्या विरुद्ध🙏

  • @SangitaShivale-wm3bg
    @SangitaShivale-wm3bg 2 месяца назад +4

    आजी लईच कष्टकरी आहे आणि कणखर आहे आपल्या राजांबद्दल किती स्वाभिमान आहे त्यांना जिजाऊंच्या मातीतील माऊली आहे हि जय जिजाऊ जय शिवराय

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      या माऊलींनी खरा इतिहास सांगितला आहे जो इतिहास सांगायला इतर इतिहास तज्ञ घाबरतात ते या माऊलीने एका शब्दात सांगितले.
      मनःपुर्वक धन्यवाद, 🙏

  • @bibhishandighe8540
    @bibhishandighe8540 Месяц назад +3

    आजीचे संस्कार , सगळ्या बद्दल प्रेम , केलेले कष्ट तरुण पिढीला प्रेरणादायी आहे .दादा गाव कोणते आहे आजीचे ते सांगा

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад

      खरोखरच ही चालती बोलती विद्यापीठ आहेत, संस्कार पीठ म्हणेन मी.
      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

    • @bibhishandighe8540
      @bibhishandighe8540 Месяц назад +1

      @@Mivatsaru 🙏

  • @vikasjadhav1150
    @vikasjadhav1150 2 месяца назад +2

    ❤❤❤❤❤❤ लय भारी आजी आणि शंभर वर्षे जगावे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      हो नक्कीच ..
      ही आजी स्वतःच्या आहाराकडे काळजीपूर्वक लक्ष देते. गेली पन्नास वर्षे त्यांनी दूध, दही, ताक हाच आहार घेतलेला आहे त्यामुळे तिची प्रकृती आजही ठणठणीत आहे.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @manishagilbile2633
    @manishagilbile2633 Месяц назад +1

    या माऊलीला कोटी कोटी प्रणाम ❤😊

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад

      खरं पाहिलं तर आजीला 12 तोफांची सलामी द्यायला पाहिजे.🙏🙏

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 2 месяца назад +3

    आजी स्मरणशक्ती खुप चांगली आहे त्यासाठी मानाचा मुजरा 🔥🚩🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या आजी आयुष्यात एकदा पण दवाखान्यात गेल्या नाहीत आणि त्यांना कुठल्याही प्रकारची व्याधी किंवा आजार झालेला नाही, निसर्गामध्ये राहिल्याने त्यांच्यामध्ये एक अद्भुत प्रकारची शक्ती निर्माण झालेली असावी असं मला वाटतं.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @shirishkharpude2025
    @shirishkharpude2025 2 месяца назад +8

    ऊंदड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ 🚩

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      मनःपुर्वक धन्यवाद, 🙏
      जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @rupalimhaskarvlogs
    @rupalimhaskarvlogs Месяц назад +1

    दादा आज्जीचे बोल ऐकून डोळ्यात पाणी आलं 🙏🏻 शिवरायांबद्दल खूप काही सांगून गेली खरज जिजाऊ माता नसत्या तर आपण पण नसतो🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад +1

      इतिहास जो पाठ्यपुस्तकांमध्ये छापला जात नाही, आणि खरे इतिहासकार सांगायला घाबरतात, तो इतिहास आजीने एका वाक्यात सांगितला.
      ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचा भांडार.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @yashrajchaudhari8852
    @yashrajchaudhari8852 26 дней назад +1

    माझ्या आजी जवळ अशीच लाकडी पेटी होती ❤आज हे पाहून आजीची खूप आठवण येते असंच साधं रहायची ती 🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  26 дней назад

      ही जुनी लोकं घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी त्यांचे देवघरातील निरंजना सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं. 🙏

  • @chikankarikurti9
    @chikankarikurti9 2 месяца назад +8

    आजी ❤. खरं सांगातात जिजाऊ होत्या म्हणून..

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +1

      हे चालतं बोलतं विद्यापीठ एखाद्या वैज्ञानिकांपेक्षा बुध्दिवान आहे.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @user-st7yq7wv8b
    @user-st7yq7wv8b 2 месяца назад +2

    अशी जुनी माणसं भेटली की इतिहास पूर्ण समजतो 🙏🙏🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      तो इतिहास पाठ्यपुस्तकात छापला जात नाही, इतिहासकार सुद्धा सांंगत नाहीत तो खरा इतिहास आजीने एका वाक्यात सांगितला.
      धन्यवाद 🙏

  • @jeevanlondhe5808
    @jeevanlondhe5808 18 дней назад +1

    आजी मला तुझ्या सारख आयुष्य मिळू दे आजी खुप छान खुप आवडल मला

  • @Talash88
    @Talash88 2 месяца назад +2

    जुनं ते सोनं
    खरं आहे आजीबाईच महाराज होते म्हणून भोसले आहोत भोसलेच राहिलो

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      तसं पाहिलं तर ह्या आजीने खरा इतिहास सांगितलेला आहे जो इतिहास कोणीही सांगू शकत नाही.
      आपल्या धर्माविषयी चा अभिमान कसा असावा हे आजीकडून शिकण्यासारखं आहे
      मनःपुर्वक धन्यवाद

  • @meenasurve7253
    @meenasurve7253 2 месяца назад +7

    माझा आजीला मनापासून नमस्कार🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      अगदी मनापासून धन्यवाद 🙏

  • @kirandhokale1174
    @kirandhokale1174 2 месяца назад +6

    खुप सुंदर आजी हे खरं सोन आहे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      हे जुनं फर्निचर म्हणजे 24 कॅरेट सोनं आहे.
      मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @ravindragangurde7810
    @ravindragangurde7810 2 месяца назад +1

    "अनुभव आले अंगा!ते या जगा देत असो"...या तु.म.च्या.प्रमाणानुसार..वयाने वृध्द झालेल्या..पण अनुभवाच्या सखोल ज्ञानाने प्रभुत्व प्राप्त झालेले, शब्द ज्ञान.. म्हणजेच हि माणस.. ❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +1

      ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचा भांडार असतात घरामध्ये ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नाहीत परंतु त्यांचं देवघरातील निरंजना सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

    • @ravindragangurde7810
      @ravindragangurde7810 2 месяца назад

      @@Mivatsaru welcome sir

  • @truptirane9080
    @truptirane9080 Месяц назад +1

    खुप छान वीडियो बनावला आहे 😊

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад

      अगदी मनापासून धन्यवाद 🙏
      ही जुनी म्हातारी माणसं वडाच्या झाडा इतकी भव्य सावली देऊ शकत नसली किंवा घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी त्यांचं देवघरातील निरंजना सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं, ती एकदा निघून गेलीत की मग त्यांचं महत्त्व कळतं. 🙏

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 2 месяца назад +3

    हिंमतवान आजीला साष्टांग दंडवत.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      केली पन्नास वर्षे रानात एकटी राहते आणि अजूनही निरोगी आहेत, कधीही दवाखान्यात गेलेली नाही.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @user-gb2kf2ev7z
    @user-gb2kf2ev7z 2 месяца назад +4

    झक्कास आज्जी.धन्यवाद वाटसरु

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +1

      ही जुनी माणसं म्हणजे चालते बोलते विद्यापीठ. तुम्ही त्यांच्याकडून एक एक डिग्री घेऊ शकता असं त्यांचं अफाट ज्ञान आहे.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

    • @user-gb2kf2ev7z
      @user-gb2kf2ev7z 2 месяца назад +1

      @@Mivatsaru हो, पण तुमच्या अथक कामगिरीने या विद्यापिठाला आमच्यापर्यंत पोहचवलेय. आभार.
      असे वाटते की त्या गावात माझेही घर असावे आणी त्यांच्यासाठी काहीतरी करावे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +1

      @@user-gb2kf2ev7z धन्यवाद
      एक वेळ नक्की या.

    • @user-gb2kf2ev7z
      @user-gb2kf2ev7z 2 месяца назад +1

      @@Mivatsaru खरंच, मी अगदी मनापासून लिहितोय, मला खुप आवडतं अशा लोकांच्यात राहुन काहीतरी करावे.
      आपला संपर्क मिळेल का

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      @@user-gb2kf2ev7z
      Please share your number on
      milindrajebhosale@gmail.com

  • @abhijeetpatil3618
    @abhijeetpatil3618 Месяц назад +1

    नमस्कार आजीची कथा छान आहे मी ह मीही या आजीच्या कथेसाठी दैव हे एक आत्मचरित्र लिहिलं आहे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад

      अरे वा फारच अप्रतिम 👌मला ऐकायला नक्की आवडेल.

  • @Saching007-b7i
    @Saching007-b7i 2 месяца назад +1

    माझी बी म्हातार आय अशीच होती रानात राहायची मी सुट्टीत तीच्या बरोबरच राहायचं कशाची कमी नाही अंबे केळी चिक्कू पेरू द्राक्षाची बाग ...समाधानी जीवन गुरे ढोरे यांच्या सोबत आणि रानात राबण्यात आहे... काय मस्त दिवस होते

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      खरं पाहिलं तर आपण फक्त आयुष्य जगतोय ही माणसं खऱ्या अर्थाने जीवन जगले आणि आजकाल ही नऊवारीतील पिढी बहुदा शेवटची पिढी असणार.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @sarikakhade5498
    @sarikakhade5498 2 месяца назад +3

    अशी माणसे परत दिसणार नाही जुनी माणस खरंच छान होती 😊

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +1

      बहुदा नऊवारीतील ही शेवटची पिढी असणार, आनंदी आणि समाधानाची पिढी आपल्याला सोडून जात आहे याचं दुःख आहे.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @renukamakar60
    @renukamakar60 2 месяца назад +5

    एकच नंबर आजी

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      या वयात सुद्धा आजीला कोणत्याही प्रकारचा आजार नाही, आयुष्यात एकदाही दवाखान्यात केली नाही.
      मनापासून धन्यवाद 🙏

  • @user-vk1om1ws3m
    @user-vk1om1ws3m Месяц назад +1

    शब्दच नाहीत👌👌👌👌 सुंदर व्हिडिओ

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад

      अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह येतो.
      मनःपुर्वक🙏धन्यवाद

    • @user-vk1om1ws3m
      @user-vk1om1ws3m Месяц назад +1

      @@Mivatsaru आपले विचार छान आहेत नेहमी चर्चा करायला अशी व्यक्ती असेल तर विचार प्रबळ होण्यास मदत होते

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад

      @@user-vk1om1ws3m अगदी बरोबर 🙏

  • @ashathorat3282
    @ashathorat3282 23 дня назад +1

    आई आई ग तुला बघू माझी आई आठवली आम्ही चार बहिणी आहोत पण आम्हाला भाऊ नाही पण नेहमी म्हणाची माझ्या घरी पण सोयराच्या दारात नाही मरणार खूप छान मरण आले तीच्या घरात 🙏आजी तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🪷🪷🪷🪷🪷👍👍👍👍👍

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 дня назад

      ही जुनी माणसं करारी असतात, निश्चयी असतात आणि कष्टाळू. 🙏

  • @rojjermaddy
    @rojjermaddy 2 месяца назад +11

    गेलो असतो अल्ला अल्ला करत😂😂😂😂❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +2

      आपल्या धर्माचा अभिमान कसा असावा हे केवळ एका शब्दात या माऊलीने सांगितले आपल्याला.
      मनःपुर्वक धन्यवाद

  • @nileshinfotech68
    @nileshinfotech68 2 месяца назад +5

    भारी वाटले....

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @chandshaikh1711
    @chandshaikh1711 Месяц назад +1

    वा क्या बात है. निसर्ग पण जपला आहे स्वाभिमानी आजीने.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Месяц назад

      गेली 50 पेक्षा अधिक वर्ष निसर्गासोबत राहिल्यामुळे तिला एक प्रकारचे अद्भुत शक्ती मिळाली असावी. 🙏

  • @jagdishdeshmukh161
    @jagdishdeshmukh161 26 дней назад +1

    अस वाटत मावली जवळ जाऊन राहाव माउलीला नमस्कार😊

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  26 дней назад

      ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  26 дней назад

      ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ🙏

  • @user-yx6fd3ln4j
    @user-yx6fd3ln4j 2 месяца назад +7

    माझी आई पावसाळा सोडून गावालाच एकटी राहते. तीला पुण्यात किंवा इतर ठिकाणी अजिबात करमत नाही. पावसाळ्यात जरी पुण्यात आणली तरी चार महिन्यांत चार वेळा तीला गावाला न्यावेच लागते. नाही नेले तर आमच्याशी बोलत नाही. ऐवढ्या गावच्या वातावरणात समरस झालेली जुनी पिढी आहे.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      वास्तविक पाहता गावाकडचे वातावरण निसर्गाशी एकरूप झाल्याने त्यांच्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा तयार झालेली असते आणि ती ऊर्जा या लोकांना जगण्यासाठी कारणीभूत असते. शहराकडील कोंदट किंवा फ्लॅट मधलं जीवनशैली त्यांना आवडत नाही मोकळ्या हवेत राहण्याचा त्यांना सवय झालेली असते त्यामुळे त्यांचं आयुष्यमान पण वाढतं.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏