A Candid Conversation with Actor Amruta Subhash | Mitramhane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 454

  • @ravipatil5957
    @ravipatil5957 10 месяцев назад +40

    खूप छान मुलाखत घेता तुम्ही ....समोरच्या व्यक्तीला बरोबर बोलत करता तुम्ही ....ते देखील त्या व्यक्तीला न दुखावता .....अमृता तर ग्रेटच आहे ....👍👍

  • @PtSachin
    @PtSachin 9 месяцев назад +4

    Amruta, u speak honestly with mindfulness. U decoded many points flawlessly in minimum time.

  • @harshadapitale2908
    @harshadapitale2908 10 месяцев назад +6

    नमस्कार सौमित्र जी,
    तुम्ही नेहमीच खूप वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माणसांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. तुमचे प्रश्न आणि समोरच्याने दिलेल्या उत्तरावरची तुमची प्रतिक्रिया खूप छान , आपल्यातली वाटते. अमृता सुभाष यांची मुलाखत हि खूप सुंदर झालेली आहे. परंतु, तुमची एक प्रेक्षक म्हणून मला असे सुचवावेसे वाटते कि तुम्ही समोर आलेल्या माणसाचे बोलणे मध्येच तोडता. त्यामुळे कुठेतरी मुलाखत अपूर्ण राहिल्यासारखी वाटते आणि प्रेक्षकांचा हिरमोड होतो. तुम्ही जेव्हा स्वतः हा एपिसोड बघाल तेव्हा तुमच्यापण लक्षात येईल. अर्थात अमृता सुभाष यांच्यासारखी दुर्मिळ कलाकार समोर असताना किती विचारू आणि किती नको असा पेच तुम्हाला पडत असावा आणि त्यातून हा थोडासा गोंधळ होत असावा असे वाटते. हि एवढी तक्रार सोडल्यास तुमची एकूण मुलाखत घेण्याची पद्धत छान आहे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!

  • @rajendrashahapurkar8805
    @rajendrashahapurkar8805 10 месяцев назад +16

    खूप सुंदर , छान झाली मुलाखत. मानसिक स्वास्थ्यासाठी तज्ञाची मदत घेण्यात कमीपणा नाही , हे खूप छान पद्धतीने सांगितले अमृताने ... ही अत्यंत सकारात्मक बाजू या मुलाखतीची आहे . अमृताने वेळोवेळी अन्य कलावंताचे नाव घेऊन व्यक्त केलेली भावना, कृतज्ञता अमृताला अधिक मोठं करून गेली असे माझे मत आहे. खूप मोठ्ठी हो पण अशीच रहा ... जमिनीवर !!👍👍

  • @chinmaykhedkar1985
    @chinmaykhedkar1985 10 месяцев назад +25

    सौमित्र - मी तुमच्या बर्‍याच episodes बघितलेत. सगळीकडे एक गोष्ट जाणवते, गेस्ट ला तुमच्या प्रश्नाचे उत्तर.. पूर्ण करूद्या, उत्तराच्या madhatach दुसरा प्रश्ण विचारला की तेच तेच वारंवार बोलल्या जात. Eg- अमृता सुभाष che येणारे प्रोजेक्ट कोणते? याच उत्तर नाही आल. पण तुम्ही प्रश्ण विचारला होता.
    फॉरमॅट छान आहे. Interview मस्त होतयत, मज्जा येतेय. Keep it up! ❤❤

    • @swapnildharam
      @swapnildharam 10 месяцев назад +2

      Agree, मलाही ते जाणून घ्यायचे होते, पण प्रश्नांचे उत्तर पुर्ण होऊ दिले नाही

    • @shrutim9645
      @shrutim9645 9 месяцев назад +1

      Ho mala pan he janvle

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 10 месяцев назад +20

    सौमित्र सर, एक request होती कृपया जे लोक येतात ,त्यांना पूर्ण बोलू द्यावे,, तुम्ही मधेच बोलता मग त्यांची आणि आमची पण लिंक तुटते ,, so pl एव्हढे जपा

  • @ashokkashikar1989
    @ashokkashikar1989 10 месяцев назад +22

    The Best Conversation with Amruta Subhash .The Great Artist .🎉

  • @anjaligadve1307
    @anjaligadve1307 10 месяцев назад +11

    फारच सुंदर!!! किती भरभरून अन् मनापासून शेअर केले अमृताने!! Just superb ❤️ चांगली भीती वाटते...काय मस्त वाक्य आहे ना!! पुनश्च हनीमून बघितल्यानंतर दोघांना भेटले होते ते सगळे डोळ्यासमोर आले. प्रथमच भेटले होते दोघांना पण खूपच छान बोलले दोघेही!! अमृता अन् संदेश सर...दोघांना पण खूप साऱ्या शुभेच्छा!! छान छान नाटक आणि वेगवेगळे प्रोजेक्ट्स येऊ दे!! अशीच साधी रहा!! बाप्पाला प्रार्थना करते की मला तुम्हा दोघांच्या बरोबर काम करायची संधी मिळू दे!!! ❤❤

  • @maryamareebanatarajan4800
    @maryamareebanatarajan4800 10 месяцев назад +16

    Nowadays many Marathi actresses respond in English during an interview. I like the way Amrutaji has spoken her mother tongue with so much pride. It is such a sweet language. Keep up your good work!

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 10 месяцев назад +5

    किती सुंदर मुलाखत.... खूप छान समोरच्या व्यक्तीला छान बोलता करता 👌🏻👌🏻 अमृता सुभाष अतीशय गुणी आणि सर्व गुण संपन्न कलाकार आणि माणूस म्हणून जगताना तिचे संस्कार दिसून येतात

  • @girishdharap4623
    @girishdharap4623 10 месяцев назад +25

    As usual excellent episode Soumitra Dada !!
    Amruta Tai, Sandesh Dada : The most underrated Actors , they are very humble and very fine actors.

  • @vijayabhise8513
    @vijayabhise8513 10 месяцев назад +50

    खूप सुंदर मुलाखत ❤ अमृता माझी आवडती कलाकार आहे ,कारण ती अस्सल आहे .मित्र म्हणेशी असेच उत्तमोत्तम कलाकार जुळू दे आणि तुमच्याच शब्दात सांगायचे म्हणजे भले ते घडो ! ( हे वाक्य मला खूप आवडलं) 🙏💐👍

  • @pranavranade5403
    @pranavranade5403 10 месяцев назад +1

    Thanks

    • @mitramhane
      @mitramhane  10 месяцев назад

      Means a lot. 🙏🏼💛

  • @sharmilaapte9322
    @sharmilaapte9322 10 месяцев назад +24

    खूप छान मुलाखत👌👌❤
    ज्योती ताई अगदी खालच्याच फ्लॅट मध्ये रहात असल्यामुळे ज्योती ताई , अमृता, संदेश जी येता जाता बरेचदा दिसतात. खूप down to earth आहेत सगळे.
    अमृताचे साधेपण खूप आवडते.

    • @mitramhane
      @mitramhane  10 месяцев назад +2

      🙏🏼💛

    • @jyotitalegaonkar7709
      @jyotitalegaonkar7709 10 месяцев назад +4

      अमृता मॅडम मी punacha Honeymoon नाटक पाहिले आहे, नाटक संपल्यावर तुम्ही प्रत्येकाला वैयक्तीक भेटलात. तुम्ही ईतक्या मोठ्या कलाकार असून प्रत्येकाला selfe दिला. तुम्ही आणी संदेश सर Great आहात. मला तुम्ही खूप आवडतं ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Sulekha-bc2pe
    @Sulekha-bc2pe Месяц назад

    सुरेख मुलाखत.किती डाऊन
    टू अर्थ आहे ही अमृता.खूप छान
    संदेश मिळाले.फाईव्ह सेन्सस
    लक्षात ठेवावे असे.

  • @sumedhanaik2
    @sumedhanaik2 10 месяцев назад +20

    @मित्र म्हणे, एकदा ज्योती सुभाष यांना देखील बोलवा, त्यांच्या सारखे अनुभवाचे संचित खचित कोणाकडे असेल.

  • @prajaktaparab7148
    @prajaktaparab7148 8 месяцев назад

    मी ही मुलाखत दुसऱ्यांदा पाहिली आणि तरीही ती तेवढीच inspiring वाटली. मला पक्की खात्री आहे कि मला जेव्हा जेव्हा डाउन वाटेल तेव्हा सुद्धा ही मुलाखत तितकीच प्रेरणादायी आणि आशादायी वाटेल. thank you saumitra sir आणि अमृता तुला ऐकताना मंत्रमुग्ध व्हायला होतं खूप खूप धन्यवाद !

  • @rahuldugal100
    @rahuldugal100 10 месяцев назад +1

    5 sense
    1. Touch
    2. See
    3. Listen
    4. Smell
    5.taste
    Mitramhane yatun nehmich industry peksha career peksha manus mhanun kasa ghadat java he nehmich kalat jata . Tya badal khup khup abhar …

  • @ravishanbhag
    @ravishanbhag 4 месяца назад

    interview was excellent ,appreciate the truthfulness & sincerity of her character. somehow wondered why did she set her HAIR more than questions she faced.

  • @yashavantijoglekar7203
    @yashavantijoglekar7203 7 месяцев назад

    छान मुलीची वेगळ्या दिशेने जाणीवपूर्वक मनापासून वाट चालणाऱ्या कलाकार मुलीची उलगडत गेलेली वाटचाल समजली. सौमित्र तुम्ही घेतलेली ही एक अप्रतिम मुलाखत.

  • @anjalijoshi1228
    @anjalijoshi1228 10 месяцев назад +5

    अगदी मनमोकळे पणे बोलली अमृता व तुम्ही ही छान खुलवली तितक्याच निर्व्याज तेने..तिच्या अभिनयात ती सहजता आहे..
    तिच्या व तुमच्या वाटचाली ला अनेक शुभेच्छा....

  • @rameshnikam4646
    @rameshnikam4646 10 месяцев назад +3

    Very impressive interview. Credit goes to both Amruta and interviewer. Very proud to say that marathi actors and actresses are so beautiful, intelligent and down to earth.

  • @shilpaketkar8444
    @shilpaketkar8444 10 месяцев назад +4

    अतिशय छान मुलखात, अमृता सुभाष आणि माझी शाळा एकच.. त्यामूळे तीला मी शाळेपासून ओळखते.. आज खूप खूप तिचा अभिमान वाटतो.. सगळ्याच बाबतीत... मित्र म्हणे हा platformch खूप छान आहे.. अमृताला खुप खुप शुभेच्छा

  • @lakk789
    @lakk789 10 месяцев назад +20

    Extremely talented n down to earth person she is...very good episode

  • @vijaymuley5433
    @vijaymuley5433 10 месяцев назад +3

    अशीच एक प्रतिभावान अभिनेत्री आहे मुक्ता बर्वे तिची पण एक सुंदर मुलाखत पाहण्याची इच्छा आहे ❤❤❤

    • @mitramhane
      @mitramhane  10 месяцев назад +1

      नक्की

  • @AaravXEditx
    @AaravXEditx 10 месяцев назад +1

    मित्रा,एक अत्यंत बहारदार मुलाखत बघण्यास मिळाली याचे श्रेय आहेच तुला (मित्राला अरे-तुरे चालते म्हणून संबोधते आहे बरे का) पण अम्रृता ताईला ऐकण्यात एक वेगळाच आनंद आहे..प्रतिभावान अभिनेत्री ती आहेच पण एक माणूस म्हणूनही किती गुणी आहे ही!💞

  • @arunaedu8862
    @arunaedu8862 10 месяцев назад +3

    खरी खुरी अमृता दिसली, माणूस म्हणून अमृता आणि सौमित्र कळले असे वाटते. रोजच्या जीवनात अमृता चां अनुभव उपयोगी येईल .❤

  • @vijaymuley5433
    @vijaymuley5433 10 месяцев назад +7

    एका सर्वांग सुंदर गुणी अभिनेत्री ची तितकीच बहारदार मुलाखत ❤❤❤

  • @nikitapawaskar9889
    @nikitapawaskar9889 10 месяцев назад +4

    अप्रतिम मुलाखत..खूप छान अमृता सुभाष..तुझे वेगवेगळे अनुभव ऐकायला मिळाले ..

  • @preetihate6677
    @preetihate6677 10 месяцев назад +10

    Fabulous Interview, I am hard-core fan of Amruta Tai , All the best and love you Tai❤❤

  • @pralhadakolkar4996
    @pralhadakolkar4996 5 дней назад +1

    ❤ खूप छान मुलाखत

  • @SandipPatil-fq1mh
    @SandipPatil-fq1mh 9 месяцев назад

    अमृता ताई, काय कमालीची एनर्जी आहे तुझ्याकडे... एक प्रकारची अभिनयाची अभ्यासिका आहेस तू.... किती शिकायला मिळालं आज तुझी ही मुलाखत पाहून..thanks.. नव्याने परत सूरू करावं आपल्याला जे हवय ते मिळवावच....इतकी ताकत दिलीस...❤ त्याबद्दल...

  • @Prat24-x4v
    @Prat24-x4v 10 месяцев назад +3

    मुलाखत उत्तम झाली आहे. मला ते नासीर जी नी सांगितलेला every organ चा importance cha सांगितलेलं खूप आवडलं. To be applied to everyone witj different professions in different ways. Also the funda of deep breath, being patient and giving time to self to think is awesome. Am going to use both the fundas. Thank you so much Soumitra. ❤❤

    • @Prat24-x4v
      @Prat24-x4v 10 месяцев назад

      Amruta you have taught a lot...love you and all the very best for your future endeavours 🎉🎉

  • @alokitabhalerao8415
    @alokitabhalerao8415 10 месяцев назад +4

    Thank u Mitramhane team.
    Amruta Maam is one of my favorite actress. Appreciate Mr. Sandeep Sir for being such a support.
    I love Amruta maam's mom too. Amazing actress.
    Thank u for this podcast.

  • @hemangidhulgude3436
    @hemangidhulgude3436 10 месяцев назад +1

    मोकळ्या गप्पा! प्रामाणिक विचार देवाण घेवाण. व्यक्ती प्रगल्भ विचाराने आणि अनुभवाने... अत्यंत सूचक, साधे आणि उच्च विचार स्पष्टपणे मांडणे. I am a fan of her work. खूप कमी कलाकार सहज, सोप्पं होऊन बोलू शकतात. अमृता सुभाष keep challenging yourself! ❤

  • @SandipPatil-fq1mh
    @SandipPatil-fq1mh 9 месяцев назад

    क्या लेकर आया हुं.. क्या लेकर जाउंगा.. सपनो का महल आखिर में सच मे बनाउंगा.... अमृता सुभाष आप हो वो चमकता सितारा.. जिसकी रोशनी से देखो भारत चमक उठा है सारा..❤

  • @swapnamogre4179
    @swapnamogre4179 10 месяцев назад +1

    Khoop chhan interview!!
    Tum chi interview ghyayachi paddhat khoop chhan aahe
    Amruta is a great actress

  • @charushilathorat3728
    @charushilathorat3728 10 месяцев назад +2

    खुप सुंदर मुलाखत ऐकल्याचा पाहिल्याचा अनुभव खूपच सुंदर ❤. अमृताला ऐकणं की कधीच चुकवत नाही. आज तर एक वेगळीच treat/ मेजवानी 😍

  • @npb5258
    @npb5258 10 месяцев назад +6

    ज्योती सुभाष आणि अमृता सुभाष दोघीही आवडत्या अभिनेत्री आहेतच. पण त्यांचा साताऱ्यात कनेक्शन ऐकून खूप छान वाटला❤

  • @shaileshkulkarni6525
    @shaileshkulkarni6525 10 месяцев назад

    पाय जमिनीवर रोवून सजगतेने चालणारी तरीही चौफेर पाहत, आनंद घेत, देत वाटचाल करणारी, आपल्याच घरातली वाटणारी ही छान अभिनेत्री. अमृता. इमानदार आणि सशक्त मुलगी. सौमित्र - एक ठहराव असलेला, शांत आणि पोक्तपणे मुलाखत घेण्याची किमया साधलेला विरळा कलाकार. खूप छान आणि श्रीमंत करणारी मुलाखत. वा!

  • @meenadhuldhule8781
    @meenadhuldhule8781 10 месяцев назад +2

    Kiti sunder mulakhat. Aaj mala samajle ki kharya kalakarachya mage kiti mehnat aahe...Amruta really hats off to you...🙏

  • @savitapatankar2714
    @savitapatankar2714 10 месяцев назад +6

    खूपच सुंदर! वास्तवाशी पुन्हा नव्याने ओळख करून देणारा अनुभव. पंचेंद्रिय सजगता ,एकाग्रता,वर्तमानात राहण्याची सवय, व्यायामाचे महत्व, शरीर संपदा, श्वास नियमन असे कितीतरी तिचे अनुभव , आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थक्क करणारे आहेत. खरोखर अमृता सुभाष एक सर्वस्वी भन्नाट व्यक्तिमत्व!
    सौमित्रजी तुमचा प्रत्येक पॉडकास्ट भरभरून आनंद व वेगळा अनुभव देऊन जातो पण प्लीज ध्वनिप्रक्षेपण अजून चांगले पाहिजे असे वाटते.

  • @truptirane2578
    @truptirane2578 10 месяцев назад +1

    खूपच अप्रतिम भाग आहे हा. अमृता च्या आयुष्यात इतक्या गोष्टी घडून देखील तीने खूप छान दृष्टीकोन ठेवला तिच्या आयुष्या बद्दल

  • @shabdali269
    @shabdali269 10 месяцев назад +2

    अमृता सुभाष अत्यंत आवडती अभिनेत्री...किती सहजपणे बोललीस ...कसलाच आविर्भाव नाही.....खूप आवडली ही मुलाखत....( वर्षा पतके थोटे ( शब्दाली )

  • @PrachiDeshpande27
    @PrachiDeshpande27 10 месяцев назад +1

    माझ्या अत्यंत आवडत्या अभिनेत्रींपैकी एक अमृता सुभाष ❤ अतिशय सुंदर शब्दांत, मनापासून प्रामाणिकपणे व्यक्त झाली.. खूप शिकायला मिळालं.. मनःपूर्वक धन्यवाद अमृता 🙏❤सौमित्र ❤🙏stay blessed always 💐

  • @meghaaherrao8907
    @meghaaherrao8907 9 месяцев назад +3

    57:17 मित्र म्हणे, pls समोरच्याच वाक्य पूर्ण होऊ द्या. तुम्ही खूप वेळा बोलणाऱ्याच वाक्य तोडून टाकता. आणि एकदम वेगळं काही तरी विचारता. आणि हे खूप मुलाखती मध्ये झालेल आहे.

  • @alaknanda7733
    @alaknanda7733 10 месяцев назад

    Amruta Subhash...navapramanech velgala vyakti matwa...khup utsfurta ani knowledgeable actress you are.interview throws light on so many different topy

  • @Chinma..Jadhav
    @Chinma..Jadhav 6 месяцев назад +1

    अमृताची सुभाष मालिका अवघाची संसार आणि चित्रपट श्वास मला खूप आवडतो👍👍

  • @shreeyaapte4440
    @shreeyaapte4440 10 месяцев назад

    खूपच मस्त episode Ani khupach महत्वाच्या गोष्टी ,आणि आयुष्यात शिस्त आणि तब्येत किती महत्त्वाची आहे हे कळलं.
    खूपच इंस्पिरेशनाल मुलाखत

  • @neelimamarathe9160
    @neelimamarathe9160 10 месяцев назад +8

    खूप छान मुलाखत. 👌👌
    अमृता ही एक अत्यंत गुणी अभिनेत्री आहे ती कुठल्याही भूमिकेचे सोनं करते.
    तिच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद.

  • @shreyasshende1748
    @shreyasshende1748 10 месяцев назад +3

    खरच! खुप छान आणि नाविन्यपूर्ण मुलाखत ❤✨मनापासून आवडली. अमृता सुभाष माझी आवडती कलाकार आहे आणि ती खरी आहे.
    बरयाच गोष्टी नवीन होत्या 'शिकण्याजोग्या'
    ✨Specially 5 senses ✨
    Soumitra da amazing👍

  • @tungumungu
    @tungumungu 10 месяцев назад +1

    Waa, उत्तम मुलाखत, उत्तम विचार, उत्तम व्यक्ती..छान अमृता आणि सौमित्र

  • @ushaaher6623
    @ushaaher6623 4 месяца назад +1

    खूप एनर्जेटीक मुलाखत, उत्तम.

  • @Anita_Gaikwad
    @Anita_Gaikwad 10 месяцев назад

    तुमच्या प्रत्येक मुलाखतीमधून एवढ छान आणि वेगळ अस शिकायला मिळत की प्रत्येक मुलाखत अगदी शांत वातावरणात लक्ष देऊन ऐकली जाते.अमृता तर अतिशय आवडतात आणि एक गोष्ट त्या सुरेख गातात आज तेवढ missing वाटल..पण एकूण गप्पांची मैफल छानच 👌👌👍👍धन्यवाद 🙏

  • @sandeepjadhav927
    @sandeepjadhav927 9 месяцев назад

    ही मुलाखत म्हणजे अमृताची आत्मकथा च जपू काही. धन्यवाद. खूप छान मुलाखत.

  • @siddeshsawant4038
    @siddeshsawant4038 10 месяцев назад

    She so authentic and straight from The heart ... she is very pure and honest to her work profession

  • @suvarnakulkarni6775
    @suvarnakulkarni6775 10 месяцев назад

    अमृताचा साधेपणा आणि खरेपण मनाला खूपच भावले. संकेतची मोलाची साथ हे ही तिच्या यशाचे गमक आहे. खरंतर सुरवाती पासूनच त्याला नाटक, त्यातली आव्हाने, अमृताला त्यावरचे उपाय याची जाणीव होती म्हणून आपल्याला आजची अमृता दिसते. संदेशचे विशेष कौतुक.

  • @mac13online
    @mac13online 10 месяцев назад +2

    thanks Soumitra Sir , Amruta Subhash is my total fevorite

  • @RadhaKrishna-v5z
    @RadhaKrishna-v5z 27 дней назад

    Khup sundar gappa ani barchkahi shikayla milal great 👌👌👌💞💐👍

  • @ashwinipendharkar8417
    @ashwinipendharkar8417 10 месяцев назад +3

    श्वास आणि posture....Exact👍

  • @sawantshistory2710
    @sawantshistory2710 10 месяцев назад

    Must watch episode Amruta is so honest n candid which reflects in her work too।she is so passionate about her work and very sharp intelligent actress without any pomp and show ❤god bless her

  • @mayurijoshi925
    @mayurijoshi925 10 месяцев назад +3

    Khup sundar mulakhat. Ajun khup vel ikat rahava vatle. Shevatche Amruta Subhash hyanche vakya khup bhavle manala ki prarthanechi shakti aste divayat. Khupch sundar 🙏👌👌👌

  • @Maithilicoaching
    @Maithilicoaching 10 месяцев назад +2

    खुप सुंदर. खुप छान विचार मिळाले. सौमित्र व अमृता या दोन्ही मनस्वी व्यक्तींचे मनःपूर्वक धन्यवाद !🙏

  • @seemashinde6654
    @seemashinde6654 10 месяцев назад +1

    Khup sundar, jadan ghadan kiti mahatwachi aahe, hyacha pratyaksha udaharan, Amru....be blessed

  • @tejaswineegore5261
    @tejaswineegore5261 6 месяцев назад

    झोका पासून माझी आवडती अभिनेत्री... तिला कुठेही बघायला मला आवडतच. खूप छान झाला हा एपिसोड.. ❤

  • @medhajunnarkar190
    @medhajunnarkar190 10 месяцев назад +6

    "चांगली माणस जोडली जाण फार महत्त्वाचं आहे "

  • @uttarare
    @uttarare 10 месяцев назад

    अप्रतिम मुलाखत. तुम्ही छान विषय काढले बोलायला आणि अमृताने तितक्याच मोकळेपणाने उत्तरे दिली. अमृता माझी फार आवडती कलाकार आहे. अजूनही खूप काही ऐकायचे आहे असे वाटतेय! लवकर संपली मुलाखत असे वाटले. पुढच्या कारेक्रमासाठी शुभेच्छा.

  • @aparnakulkarni1640
    @aparnakulkarni1640 10 месяцев назад

    का संपली एव्हढ्यात मुलाखत? अशी अवस्था होती. अत्यंत आवडती कलाकार अमृता त्याही पलिकडे माणूस म्हणून खूप आवडली. तिचे विचार, तिचा साधेपणा, तिचा खरेपणा, तिचा गोडवा... किती आणि काय काय आवडलं म्हणून सांगायचं. एक सामान्य माणूस म्हणून सुद्धा तिच्याकडून शिकण्यासारखं किती आहे!! तुम्ही अतिशय सुरेख मुलाखत घेतलीत. परत परत मुलाखत बघावी आणि प्रत्येक वेळी काहीतरी वेगळंच जाणवावं, मिळावं अशी ही मुलाखत होती. अमृता परत एकदा याच मंचावर यावी आणि परत एकदा अशीच मैफल जमून यावी अशीच इच्छा आहे!! व्वा!! समृद्ध करणारा अनुभव होता.

  • @vaishalisangaonkar4318
    @vaishalisangaonkar4318 10 месяцев назад

    खरंच एक अप्रतिम विद्यार्थिनी आहे हे प्रत्येक वेळी जाणवते ❤ आणि ती किती जमिनीवर आहे
    प्रत्येकाला ती ऋणी मानते ज्यांच्या बरोबरीने तिने काम केलंय
    सर्वांनी पहावा असा हा 🎉 *मित्र म्हणे*

  • @prajaktasalvi9612
    @prajaktasalvi9612 10 месяцев назад

    अमृता, खरंच ग्रेट आहेस......आगामी प्रोजेक्ट साठी खूप शुभेच्छा. सौमित्र, मुलाखत खूप छान घेतली. धन्यवाद.

  • @sangeethashenoy8682
    @sangeethashenoy8682 10 месяцев назад +3

    Very profound and beautiful interview

  • @manjushakapshikar3518
    @manjushakapshikar3518 10 месяцев назад +1

    Khoop sunder mulakhat. Shri.Pote yanche sarv interview atishay Chan astat

  • @rup-reshabyrupali3588
    @rup-reshabyrupali3588 10 месяцев назад

    खूप छान रंगतदार मुलाखत.. अजून वेळ हवा अस वाटलं.. पार्ट २ पण चालेल Thank you so much Saumitra sir for this great interview.

  • @shilpajadhav4699
    @shilpajadhav4699 10 месяцев назад +2

    I just love this Lady do very much ❤... Lots of love to Amruta Subhash❤

  • @vijayashetty5328
    @vijayashetty5328 10 месяцев назад +3

    Congratulations!!!!!! On your achievement.
    We always look forward for your posts. Loved this interview.

  • @saritapatil4687
    @saritapatil4687 8 месяцев назад

    Khup sundar episode ❤ Astitwache vividh pailu ulagadnara✨️

  • @pravinkadam3717
    @pravinkadam3717 10 месяцев назад

    Khup chan Interview ...Mastch Dada ... And Amruta mla aavdate ... Khup kahi ghenyasarkh aahe hya interview madhun

  • @swapnaligavade-wb7dv
    @swapnaligavade-wb7dv 8 месяцев назад

    MLA Tumhi ghetleli mulakat pahun khup🙏🙏👍👍👏👏khup khup Chhan Vatle, thanku....

  • @manikparanjape2408
    @manikparanjape2408 8 месяцев назад

    Aaj ha episode atishay awadla. Tumchi prashna vicharnyachi padhhat aani Amrutacha sadhepana…. Amrutanubhav🙏🏻

  • @mayurijoshi1914
    @mayurijoshi1914 9 месяцев назад

    Amazing episode....liked Amrutas personality 😊

  • @SaritapawarPawar
    @SaritapawarPawar 10 месяцев назад

    खूप , खूप सुरेख झाली मुलाखत ❤ तुम्ही नेहमीच उत्तमोत्तम माणसे निवडता🎉 अमृता तर अभिनेत्री म्हणून gr8 आहेच😊 तिचे down to earth असणे खूपच भावते ❤

  • @prajaktivagal2270
    @prajaktivagal2270 10 месяцев назад

    Khup chan mulakht, amruta Subhash far avadli, khup depth aahe vicharat amrutachya, changli Mansa ayushyat bhetat pun tyanche uttam vichar kase atmasad karave yach uttam udaharan 👍🏻😊

  • @nehas1467
    @nehas1467 10 месяцев назад +5

    Nice interview! अमृताच्या आजी आशाताई आणि माझी आजी ह्या दोघी रहिमतपूरच्या खास मैत्रिणी 😊

  • @swapnaudgaonkar6132
    @swapnaudgaonkar6132 10 месяцев назад +1

    Fantastic lady. So graceful and real. !

  • @vaishalibhalerao9821
    @vaishalibhalerao9821 10 месяцев назад

    Superb episode. Got to learn many things from Amruta Ma'am.

  • @archanawatulkar7258
    @archanawatulkar7258 10 месяцев назад

    Extremely wonderful episode.. you and Amruta mam have touched upon so many life lessons which were not only limited to her areas of expertise or career but are applicable to all of us ..
    Amruta you have such a wealth of insights and wisdom.. it has been amazing to listen to your journey.. 🙌🏽👌🏾

  • @deepasawant7875
    @deepasawant7875 10 месяцев назад +1

    अप्रतिम मुलाखत. धन्यवाद सौमित्र

  • @SaketMirkar
    @SaketMirkar 10 месяцев назад +2

    Soumitra I loved your way you talk to person and make them comfortable. You are great

  • @shashikantgupte4089
    @shashikantgupte4089 10 месяцев назад

    फार फार छान, मुलाखत
    अमृता मन मोकळी, खुप छान बोलते, मना पासून बोलते
    आयुष्यात ल्या काही प्रश्न ची ऊतरे अमृता कडून मिळाली
    अमृता खुप खूप आभारी आहे

  • @mangald1979
    @mangald1979 10 месяцев назад +1

    खूपच सुंदर आणि ऐकत रहावी अशी मुलाखत झाली. दोघेही तोडीस तोड आहेत त्यामुळे खूपच मजा आली.

  • @omkarkulkarni5700
    @omkarkulkarni5700 10 месяцев назад +1

    सौमित्र तुझी मुलाखतीची शैली मस्तच आहे...
    अमृता एकदम प्रसन्न व्यक्तिमत्त्व...
    राधा मंगेशकर भेटली पाहिजे हिला एकदा...

  • @vaishalipatankar8944
    @vaishalipatankar8944 10 месяцев назад +1

    Khupch sundar mulakat amruta mala khup aawadte khupch natural abhinay karte hi mulagi aani Jyoti tai tar prashnach nahi bless you Amruta ❤

  • @rushikhodke7288
    @rushikhodke7288 10 месяцев назад +6

    Still Same smile as Aasawari from Avghachi ha sansar...❤

    • @pournimasonawane1934
      @pournimasonawane1934 10 месяцев назад

      Ho malahi khup awdaychi ti malika i was just married....n just seperate jalo hoto aainchya independent vyayche hote...n far emotional n sansari malika pahila new TV ani hi malika tya nantr aaj paryant ekahi malika itaki maan laun pahilich nhi ....

  • @madhavibhagwat9858
    @madhavibhagwat9858 9 месяцев назад

    Khup chan mulakhat zali
    Ti aani tichi aai mazya doghihi favourite actresses aahet

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 10 месяцев назад +1

    khup dhanyvad.mazi khup jast aavdti vyakti ki jila satat aikayla aavdel The Amruta. Doghanahi khup shubheccha.

  • @pradnyaparab3413
    @pradnyaparab3413 10 месяцев назад +1

    Apratim episode, lovely to see Amruta

  • @XXyy1409
    @XXyy1409 10 месяцев назад +2

    खुप सुंदर मुलाखत 👌 ह्या क्षेत्रात ज्यांना आपले करिअर करायचे आहे त्यांनी नक्की पहावी ...

  • @damodaracharya4951
    @damodaracharya4951 10 месяцев назад

    Amruta madam हा एपिसोड एक तास अजून हवा होता. फार सुंदर आणि बेस्ट episode

  • @sumedhanaik2
    @sumedhanaik2 10 месяцев назад

    किती सुंदर मुलाखत. अमृता तिच्या पूर्ण करीअर मध्ये किती छान मुरत मुरत गेली आहे, हे साफ जाणवते. अमृता, तुझ्या सगळ्या भूमिका खूप आवडीच्या आहेत. सिक्रेड गेम्स तर खूपच आवडली. तुझा पाया इतका पक्का आहे की तू कोणत्याही माध्यमात काम केले तरी ते खरे आणि चांगलेच असते. कालच तुझा लोकसत्ता मधील लेख वाचला, कापूस कोंड्याची गोष्ट..प्रत्येक गोष्टीतून तू किती सहजपणे शिकत राहतेस, ते मला खूप आवडते. तू खूप मोठी celebrity आहेस, पण आमच्यातील, घरातील वाटतेस, हे तुझ्या स्वभावाचे, वागण्याचे, वावराचे वैशिष्टय आहे. आजूबाजूच्या ज्या ज्या माणसांनी तुला मोलाचे सल्ले दिलेस, त्यांची आठवण तू सतत जागती ठेवतेस, हा कृतज्ञ भाव लोभसवाणा आहे.
    सौमित्र, तुम्ही उत्तम पॉडकास्ट केले आहे. तुमचे प्रश्न टिपिकल वाटत नाहीत.

  • @bhaktiratnaparkhi2169
    @bhaktiratnaparkhi2169 10 месяцев назад +1

    Wa.. uttam conversation... Can you share manasopchar tadnya contact in discription... Yogya Manus milna far avashak