Sharad Pawar यांनी तिसऱ्या आघाडीची खिल्ली उडवली, यामुळं Parivartan Mahashakti डॅमेज होणार का ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • #BolBhidu #SharadPawar #ParivartanMahashaktiAlliance
    महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असली तरी दोन्ही बाजूचे तिन्ही पक्ष एकत्रच निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं विधानसभेला महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी वन ऑन वन फाईट होणार आहे. पण अलीकडेच स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, प्रहार संघटनेचे बच्चू कडू आणि स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी महाराष्ट्राला तिसरा पर्याय दिला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी परिवर्तन महाशक्ती या तिस-या आघाडीची घोषणा केलीय. या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्याच २८८ मतदारसंघांत आपले उमेदवार उभे करण्याची घोषणाही त्यांच्याकडून करण्यात आलीय.
    आता या तिसऱ्या आघाडीला किती यश मिळणार? परिवर्तन महाशक्तीचा फॅक्टर कुणाला डॅमेज करणार? याबाबतचे विविध राजकीय अंदाज बांधले जातायंत. पण आता शरद पवारांनी मात्र या तिसऱ्या आघाडीची पूर्ण हवाच काढून घेतल्याची चर्चा आहे. शुक्रवारी शरद पवारांनी सांगलीत पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी तिसऱ्या आघाडीबाबत भाष्य करताना उपरोधिक टोलेबाजी केली. पवारांच्या या विधानानंतर तिसरी आघाडी राजकीयदृष्ट्या बॅकफुटला जाऊ शकते, अशा चर्चा सुरू झाल्यात. शरद पवार नक्की काय म्हणाले? त्यांनी आपल्या एका विधानातून तिसऱ्या आघाडीची हवा काढून घेतल्याच्या चर्चा का होतायंत, यामुळं तिसरी आघाडी कशी डॅमेज होऊ शकते, पाहुयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 134