रत्नागिरीतील हे गाव अजूनही सांभाळून आहे गावचं पुरातन वैभव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • रत्नागिरीतील आपलं पुरातन वैभव जपत आलेलं गाव म्हणजे जांभरुण.डोंगरउतारावर गाव वसलंय.मंदिरं, पाटपाखाडी आणि निसर्गसंपन्नता ही या गावाची खास ओळख. गावातल्या आंब्याच्या बागेतून आणि झऱ्यातून फिरण्याचा एक वेगळाच आनंद आहे.असा आनंद आपल्याला जांभरुण कॉटेजेस देतं.खाली त्यांचा संपर्क क्रमांक आणि वेबसाईट लिंक दिलीये.🤗
    🌼जांभरुण कॉटेजेस संपर्क क्रमांक:
    आनंद केळकर:
    9403399240
    🌼जांभरुण कॉटेजेस वेबसाईट
    www.kokanrang.com
    🌿जांभरून मध्ये कसे पोहोचाल याचे डिटेल्स खाली आहेत:
    निवळी फाट्याला डावीकडे वळल्यावर बारा-तेरा किलोमीटर वरती तिवराड गाव येते. तेथे समोर तुम्ही पोलिस चौकीला जाऊन धडाकाल. एक रस्ता डावीकडे जातो एक रस्ता उजवीकडे गणपतीपुळे कडे जातो. डावीकडे कोतवड्याकडे जातो. आपल्याला कोतवड्याकडे डावीकडे वळायचे आहे.
    चार ते पाच किलोमीटर डावीकडे कोकणवाडीचे बोर्ड फॉलो करत जायचं. *पुढे तुम्हाला डाव्या बाजूला एक काळी टाकी असलेला पांढरा बंगला लागेल. याच्यापुढे लगेचच डावीकडे जांभरूण फाटा लागतो. तेथे आपल्याला डावीकडे वळायचे आहे.
    थोडे पुढे आल्यावर एक तीव्र उतार लागेल. डावीकडे शाळा लागेल. असं पुढे आल्यानंतर साधारण अडीचशे ते तीनशे मीटरवर जांभरूण ग्रामपंचायत लागेल. त्यापुढे साधारण एक ते दीड किलोमीटर गेल्यावर परत एक तीव्र उताराची घाटी लागेल. घाटी संपल्यावर डावीकडे एक पूल लागेल.
    त्या पुलावरून पलीकडे आल्यावर आपल्याला डांबरी रस्ता लागतो. एके ठिकाणी तो उजवीकडे चढत वर जातो. त्या ठिकाणी वर न जाता आपल्याला सरळ कच्च्या रस्त्याकडे जायचे आहे. त्या ठिकाणी आमच्या 'जांभरूण कॉटेजेस'चा एक बोर्ड सुद्धा आहे.
    रस्त्याने सरळ पुढे गेल्यावर एक किलोमीटर दूर *तेली वाडीचा रस्ता उजवीकडे वर जातो. त्या रस्त्याला न वळता आपल्याला पुढे सरळ यायचे आहे.जिथे रस्ता संपतो तिथे उजवीकडे वळायचे आहे.
    सुरवातीला थोडा तीव्र चढ लागतो. या रस्त्याने साधारण शंभर मीटर पुढे गेल्यावर आपण चव्हाण वाडी मध्ये पोहोचतो.
    या ठिकाणी तसेच वर न जाता डावीकडे आपल्याला "जांभरूण कॉटेजेस" चा बोर्ड लागेल. इथून डावीकडे खाली उतरल्यावर आपण जांभरून कॉटेजेसला पोचाल.
    Join this channel to get access to perks:
    / @muktanarvekar
    Cinematography And Editing
    Rohit Patil
    Follow me on
    Insta
    / mukta_narvekar
    My fb page
    www.facebook.c...

Комментарии • 684