श्री कर्णेश्वर मंदिर, संगमेश्वर | Sangameshwar | Konkan |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 фев 2022
  • 🌿🍂कोकणातील शिल्पवैभव असलेलं शिवमंदिर...🍂🌿
    #हिंदू #संस्कृतीमध्ये #नदी संगमाला अनन्य साधारण महत्व आहे. #अलखनंदा, #शास्त्री आणि #वरुणा या तीन नद्यांच्या संगमावर शिल्पकलेचा पुरेपूर वापर केलेल्या मंदिरांचा एक समूह आहे. यातील दोन #मंदिरे आज आपण पाहणार आहोत. कोकणातील शिल्पकलेचा #खजिना असलेलं हे #मंदिर त्याच्यातील शिल्पकलेने आपल्याला मंत्रमुग्ध करतं. #देवदेवता, #यक्ष, #दिक्पाल, #नर्तकी अशा कितीतरी #सुंदर शिल्पांनी हे मंदिर सजलं आहे. अशा या सुंदर शिवमंदिरावरचा हा खास विडिओ.
    कसे जाल: Karneshwar Temple
    maps.app.goo.gl/eLv1xu3LMWakb...
    "गद्धेगळ" आणि त्याचा अर्थ
    गद्धेगळ हा शब्द गाढवाचा दगड ह्या अर्थी आला. गद्धेगळीला गडदू असे ही म्हणतात. गाव उत्पन्न किंवा जमीन दान एखाद्या किल्ल्यासाठी किंवा मंदिरासाठी दिले तर तशा जमिनीवर गडदू ठेवण्याची पद्धत होती. या शिलेवर चंद्र, सूर्य, गाढव आणि मानवाकृती कोरण्यात आल्या आहेत. चंद्र, सूर्य यांचा अर्थ जे दान देण्यात आले आहे ते आकाशात चंद्र, सूर्य असेपर्यंत चिरकाळ राहो असा होतो. तर गाढव आणि मनुष्याकृती ही संकर आकारात दाखवण्याचा अर्थ जो ह्या दानाला विरोध करेल त्याचा संकर गाढवाशी होईल (त्याला गाढव लागो) अशा अर्थाचा अपशब्द होतो.
    मंदिर परिसरात, किल्यांवर किंवा गावामध्ये वीरगळ, सतीशीळेसोबतच गद्धेगळ ही पाहायला मिळतात.
    श्री कर्णेश्वर मंदिर, संगमेश्वर आणि श्री कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर यामधील साम्य
    या दोन्ही मंदिराच्या स्थापत्य आणि कलाविष्कारात बरेच साम्य आढळते.
    मकरमुख: दोन्ही मंदिरात गर्भगृहाच्या न्हाणीच्या जागी मकरमुखाची रचना आहे.
    देवकोष्टे: गर्भगृहाच्या बाहेरच्या बाजूला भिंतीमध्ये देवकोष्टे आढळतात.
    दरवाजा समोरील शंख वेलीची नक्षी: मंदिराच्या सर्व दरवाजांच्या उंबऱ्यासमोर शंख वेलीची नक्षी दिसते.
    शिल्पकला: कर्णेश्वर मंदिरातील मुखमंडपात आणि कोपेश्वर मंदिराच्या स्वर्गमंडपामध्ये अष्टदिक्पाल आणि देवता आपल्या वाहनावर आरूढ दाखवण्यात आल्या आहेत. दोन्ही मंदिरातील दगडी झुंबरे एकाच पद्धतीने कोरली गेली आहेत. मंदिरात ब्रम्हा विष्णू महेशाचे दर्शन होते. सभामंडपात, मुखमंडपात गोल शिळा बसवल्या आहेत.
    किर्तीमुखांचे वेगवेगळे आलंकण: सभामंडपातील खांबांवर किर्तीमुखांचे वेगवेगळे आलंकण दोन्ही मंदिरात सारखेच आहे.
    श्री कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर: • Shri Kopeshwar Mandir,...
    #mtdc #maharashtratourism #ratnagiri #travel #traveller #travelvlog #temple #templesofindia #temples #ancient #ancientindia #ancienthistory #art

Комментарии •