Is This The End Of Love & Relationships ? | Marathi Motivational Speech | Ft. Dr. Saleel Kulkarni

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 455

  • @shilpakurhade4377
    @shilpakurhade4377 2 года назад +177

    गरज असताना साथ मिळत नाही, मनापासून प्रेम केलेले असतानाही जेव्हा समोरची व्यक्ती फक्त स्वतः चा विचार करते तेव्हा नाते संपवणे योग्य असते!

    • @pritamyewale1028
      @pritamyewale1028 2 года назад +3

      Shilpa Tai salil sir kautumbik natyabaddle boltayt😜

    • @shilpakurhade4377
      @shilpakurhade4377 2 года назад +10

      @@pritamyewale1028 कौटुंबिक नात्यात हे अनुभवले आहे, नातेवाईकांसाठी कितीही करा ते फक्त करतातच की स्वतः चा विचार! ह्यात एक डोळा बंद करून जीभ बाहेर अशी smiley पाठवण्यासारखे काय? जरा विषद कराल!

    • @pritamyewale1028
      @pritamyewale1028 2 года назад

      😊 hi smily pathvaychi hoti chukun ti 😜 click zali Ugich ka apan ithe argument karat basloy tyapeksha salil sirancha video ajun ekda bghun enjoy karuyat

    • @shilpakurhade4377
      @shilpakurhade4377 2 года назад +3

      @@pritamyewale1028 argument नाही करत. आपण आपापले मत मांडले, मी in general statement दिले होते, त्यावर तुम्ही जे मला बोललात त्यास reply दिला. मी स्वतः समुपदेशक आहे, till date 1k+ लोकांना समुपदेशन करून झाले आहे. व्यावसायिक आणि व्यक्तिगत अनुभवाचे बोल आहेत ते. सलील जी किंवा इतर कोणाच्या बोलण्याचे खंडन नाही करत. काळजी घ्या.

    • @pritamyewale1028
      @pritamyewale1028 2 года назад

      @@shilpakurhade4377 नक्कीच काळजी ही घेतलीच पाहिजे स्वतःची आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्यांची पण नात तोडणे हा काही मला पर्याय वाटत नाही

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 2 года назад +41

    ऐकताना रडू आले. आयुष्यात घरातली नाती चांगली असली तर सगळं जग जिंकता येतं मात्र तेच नसतील चांगली तर मन पोकळं बनते.

  • @sudhirkulkarni54
    @sudhirkulkarni54 2 года назад +18

    जसं वय वाढतं, कर्ता मी आहे ही भावना उतरणीला लागते, आणि 'संध्याछाया भिवविती हृदया ' तेव्हा नाती पुन्हा महत्वाची होतात.

  • @madhavitambat8540
    @madhavitambat8540 Год назад +3

    खूप छान विचार मांडलेत सलील सर,खऱ्या अर्थाने नाती समजून सांगितली आहेत.

  • @Gvtmahesh
    @Gvtmahesh 2 года назад +38

    वैचारिक किडा हे खुपचं छान आहे. आणि त्यात नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात.

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat 2 года назад +16

    आजच्या दिवसाची प्रत्येक घरात हा व्हिडिओ गेला पाहिजे असे विचार मांडले सर ने

  • @ashwinkulkarni5669
    @ashwinkulkarni5669 Год назад +11

    हार्दिक अभिनंदन सलील कुलकर्णी सरांचे फॉर नॅशनल अवॉर्ड फिल्म एकदा काय झालं ❤

  • @nitinmestry7240
    @nitinmestry7240 2 года назад +33

    डॉक्टर सलील कुलकर्णी यांचे नातेसंबंध या विषयावरील त्यांचे स्वतःचे विचार हे फारच छान वाटले पाहून आणि ऐकून.

  • @aadit9200
    @aadit9200 2 года назад +3

    सलिल जी अप्रतिम खुप छान।एकच पटले नहीं की “तुम्हाला हौस होती आई बाबा होनयची मुलानी नहीं संगीतले की आम्हाला जन्म दया” एक मूल सम्भाल करता ना ही किती कष्ट घ्यावे लगतात. स्वतः च्या हौस मौज इच्छा सर्व बाजुला ठेवतात. आसा विचार केला तर कोनी आई बाबा होनरच नहीं।

  • @dipalipatil2789
    @dipalipatil2789 Год назад +4

    सर तुम्ही खूप सरळ, सोप्या आणि स्वच्छ भाषेत नात्याच महत्त्व सांगितलत खरच खूप बर वाटल ऐकून🥰. हल्ली काहीजण फक्त स्वार्थापोटी नाती जपतायत तिथे आपला फायदा तिथे रेलेशन कॅरी करायच आणि फायदा संपला की नात्यामध्ये दुरावा निर्माण करायचा हेच चाललय. पण Thank you sir विचारांना नवीन उजाळा दिल्याबद्दल 🙏🙏

  • @pushpalohar6935
    @pushpalohar6935 2 года назад +80

    खूप छान. ऐकताना अगदी डोळे भरून आले... आणि खरंच नाती दुरावत आहेत. याच दुःख हीं होत आहे.

  • @mrunalgore5846
    @mrunalgore5846 11 месяцев назад

    वा वा किती मनापासून मनातलं बोलताय
    अगदी ऐकताना हृदयाला भिडतो हा विषय..फार पटतय ..

  • @manjushaloley2466
    @manjushaloley2466 2 года назад +7

    ही संवेदनशीलताच संपली आहे सलीलजी. हे विचार प्रत्येकाच्या मनातले असतात पण कुणी बोलतच नाही. तुम्ही मात्र बोलत रहा.. आम्हाला नक्कीच आवडेल कायम ऐकायला.

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 2 года назад +24

    अप्रतिम विचार व समज..सलीलजी तुमचे विचार ऐकून आश्वस्त झाले.किती ओघवते विचार आहेत तुमचे.खूप शांत वाटलं..खूप खूप धन्यवाद..👌👌👍👍💐🙏

  • @rajeshvekhande6162
    @rajeshvekhande6162 2 года назад +6

    नाती तुटण्या मागे हे एक कारण आहे, गृहीत धरणे, सलील कुलकर्णी सर नात्यांबद्दल छान विश्लेषण

  • @sarojinidhanure3367
    @sarojinidhanure3367 2 года назад +3

    खूप सुंदर सलीलजी.
    खरंच माणसांविषयी बोलावं, नात्यांविषयी बोलावं, आई वडिलांविषयी बोलावं.. खूप खूप आवडले विचार. मी स्वतः आमचं पूर्ण कुटुंब नात्यांना महत्व देत, एकमेकांना सावरत, पुढे आलोय. त्यामुळे कदाचित आपलं बोलणं खूप भावलं. आजचा दिवस
    सत्कारणी लागला. कुटुंब, नाती, आई वडील, मेहुणे, बहिणी , मैत्रिणी, मामा मामी या साऱ्यांवर लिहिलेले लेख आठवले.
    माझ्या वडिलांचे विचार आणि आपल्या विचारात खूप खूप साम्य आहे.
    खूप छान. वैचारिक किडा हा कार्यक्रम
    🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐खूप धन्यवाद 🙏🏼

  • @neetapatokar4717
    @neetapatokar4717 Год назад +1

    👌👌👌👌खूप सुंदर साजूक अप्रतिम कल्पना, नात्यांबद्दल बोलण्याची काळाची गरज आहे जी तुम्ही शब्दातून उत्तम सुंदररित्या मांडली, कधीकधी वाटतं की खरच नाती दुरावत चालली ,अस.वाटायला लागलं,किंवा थोडफार अनुभवलय ,त्यामुळे वाटते किमान कुणाच्या
    सांगण्यातून,बोलण्यातून जर आपुलकी ची जाणिव झाली नात्यानं वेळ देता आला तर खूप किती छान वाटेल...नक्कीच ..

  • @tejitgaykar6288
    @tejitgaykar6288 2 года назад +3

    सुरज भावा हे चॅनेल काढून एक चांगल प्रबोधन लोकांपर्यंत पोहोचेल...खूप खूप अभिनंदन मला हि एक संधी दे

  • @nitinkoli6295
    @nitinkoli6295 2 года назад +13

    अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा विषय ...आणि तो खूप चांगल्या पद्धतीने समजवलात या बद्दल आभारी आहे ...

  • @jyo3136
    @jyo3136 2 года назад +2

    आम्ही खुप बिझी आहोत हे दाखवण्याची जणू स्पर्धा लागते आजकाल जवळच्याच नात्यांमध्ये. एकमेकांना भेटावं, बोलाव असं पण वाटत का नाही कुणाला. खरच नाती दुरावत चालली आहेत

  • @vasundharadasari
    @vasundharadasari 2 года назад +53

    अतिशय सुंदर,ऐकताना खूप रडायला येत होते.नात्यात अहंकार आला की नाती तुटतात,खूप छान वाटलं...

    • @HanumantAykar-bg1pc
      @HanumantAykar-bg1pc Год назад

      P परतिबंधात्मक ⁰00 परतिबंधात्मकlp

  • @kaavivyas2374
    @kaavivyas2374 2 года назад +11

    अप्रतिम ....सलील ....तुमच्यासारखे लोकं फार दुर्मिळ असतात .....खुपचं सुंदर ... मनापासुन शुभेच्छा !!!

  • @nehapatil8186
    @nehapatil8186 11 месяцев назад

    Kevdhe deep aani tarihi simple vichar.....mirror dakhvala tumhi.....thank you

  • @ravipatil5784
    @ravipatil5784 Год назад +2

    सहज आणि सोप्या भाषेत नात्यांचं महत्त्व आणि संवाद याबदल खूप चांगल्या पद्धतीने विचार मांडलेत 🙏

  • @Jasmine_14357
    @Jasmine_14357 2 года назад +33

    बाबांची गाणी ऐकताना खरंच डोळे भरून येतात.कोविडमुळे माणसंही खुप जवळ आलीत.नाती घट्ट झालीत.

  • @shubhangijuvekar7844
    @shubhangijuvekar7844 2 года назад +3

    आई बाबा होण्यापूर्वी हे सगळं समजून घेणं खूप गरजेचं आहे. हे माझ्यासाठी खूप गरजेचं होत. आता सापडलं. 🙏🙏🙏

  • @ramchandrapatil9975
    @ramchandrapatil9975 2 года назад +16

    अतिशय सरळ सुंदर भावना व्यक्त... मी एकटा नाही सोबत एक नवीन नातं आहे आणि ते मी फील केलं..... अश्रू ओघळत होते.. एकदाचा बांध फुटला..
    अप्रतिम Salil जी
    🙏🙏🌹🌺👍 God bless you sir ji

  • @bhartigardi1808
    @bhartigardi1808 2 года назад +2

    Khoop khoop chan vatl aiktana. nati asavi jivan aapn jagto aahe yatoonch kalav manasala. Bs inkach vat t manala.

  • @vikaskasar5398
    @vikaskasar5398 2 года назад +4

    अप्रतिम सर
    प्रत्येक शब्द न शब्द काळजाला भिडणारा होता ऐकताना जीवनाचा सारीपाट भरभर नजरेसमोरून गेला आजच्या आधुनिक काळात नाती निभावणे कठीण झाले आहे भले मग ते कोणतेही नाते असो सर्व विसरत चालले आहेत आज आपण नाते निभवयला वेळ देऊ शकत नाही याची खंत वाटते

  • @jasmitakanade1702
    @jasmitakanade1702 2 года назад +1

    Mazaya manatee rather sagayanchya manatale khup sunder

  • @kuldeep1381991
    @kuldeep1381991 2 года назад +4

    बाप रे.... प्रत्येक मराठी माणसाने पहावा असा व्हिडिओ ❤️

  • @tusharmore3967
    @tusharmore3967 2 года назад +1

    Chan vichar mandlet aj garaj ahe saglyanna ashya vicharanchi

  • @janhavikothmire2013
    @janhavikothmire2013 2 года назад +2

    Saleel dada kitiii sunder bolta tumhi . Kiti gadha abhyas .. kiti god shbd... kiti apratimm warnan...
    Really great ... mhnje literally moti vechawe tse tumche shbd bhrabhr wechawe as watl ekdm ... thank you for your valuable words!!!!

  • @anjubarve8551
    @anjubarve8551 2 года назад +1

    सलील किती गोड समजून सांगतोस तू, आमच्या घरातलाच आहेस तू. असाच बोलत रहा आणि भेटत रहा

  • @smitagodbole4152
    @smitagodbole4152 Год назад

    आम्हाला हा चित्रपट बघायचा आहे... कुठे बघायला मिळेल

  • @latakulkarni709
    @latakulkarni709 2 года назад +2

    सर u r very great
    तुम्हाला मनसे वाचायला येतात

  • @allaboutartandcraft6709
    @allaboutartandcraft6709 2 года назад +2

    खर आहे COVID मुळे खूप काही शिकवले आपल्याला चांगलं वाईट.खूप सारे expriance आणि बरच काही

  • @ashwinikesarkar4515
    @ashwinikesarkar4515 2 года назад +9

    सध्या माझ्या मनात नात्यांविषयी हेच प्रश्न पडले होते. त्याची मला उत्तर हवी होती आणि तुमचा व्हिडिओ पाहिला.. खूपच छान स्पष्टीकरण दिलं आहे नात्यांबद्दल. खूप धन्यवाद 🙏🙏

  • @namratapatil4248
    @namratapatil4248 2 года назад +2

    कित्ती सुरेख शब्दात नात्यांची गुंफण केली 👌👌👍

  • @mayurdutkar9586
    @mayurdutkar9586 2 года назад +3

    आज प्रेम होतं- व्यवहारासाठी, प्रेम कराव लागतं- व्यवहारासाठी, प्रेम नाही करत पण किंमत मोजावी लागते प्रेमाची .

  • @manasiparkhi1951
    @manasiparkhi1951 2 года назад +2

    खूप छान अगदी खरं आतलं बोललात. हे असलं बोलायला असा परखड भाष्य केलंत . खूप छान.

  • @prakashkamlakar3730
    @prakashkamlakar3730 2 года назад +3

    अप्रतिम सुंदर नाती उलगडत जाते,
    सुंदर उपक्रम

  • @ARUNTHAKUR-ho9fi
    @ARUNTHAKUR-ho9fi 2 года назад +2

    खुपच छान विवेचन!
    आपला व खरेंचा कार्यक्रम पणजीत ऐकला होता.
    हया व्हिडिओ मध्ये, आपला आवाज खुप लहान होता, त्यामुळे, खूपसे शब्द निट ऐकू येत नव्हते.

  • @sagarsalokhe0111
    @sagarsalokhe0111 7 месяцев назад

    खुप छान विचार मांडलेत सर.🙌🏻👌🏻

  • @nikhilsawant9172
    @nikhilsawant9172 2 года назад +12

    अनाथ मुलांचे काय हो दादा...ज्याना कोणतेच नाते नसते.....

    • @shindedc
      @shindedc 2 года назад

      आपल्या पूर्वजांचे उपकार त्यांनी या सर्व पिढ्या घडववलेल्या आहेत,विविध सामाजिक संस्कार या सर्व गोष्टी घडतात.

    • @Rp-iz6fn
      @Rp-iz6fn Год назад

      Anath mulache chi family tyanchyapasun ch suru hote. They are self made like sun ,moon, earth pn swayambhu aahet. Samajatil changali manas tyanchya sadaiv pathishi aahet.
      God bless every child 🤲🙏🙏🤲

  • @sonaljadhav8980
    @sonaljadhav8980 2 года назад +12

    अंतर्मुख करणारा भाग
    धन्यवाद सर

  • @ganpatipatil7551
    @ganpatipatil7551 2 года назад +43

    आम्ही आमच्या घरात रोज रात्री सगळे जण एकमेकांना आपल्या भेटतो, मिठ्ठी मारतो आणि मगच झोपतो 😊

  • @rameshbutte815
    @rameshbutte815 2 года назад +11

    खुप छान व वास्तविक आहे.
    अनेकदा परत परत ऐकावं ऐकतच रहावं असं वाटतं.

  • @smitaharmalkar9793
    @smitaharmalkar9793 2 года назад +4

    नातेसंबंधाबाबत फारच सुंदर पद्धतीने सांगितले आहे. असे व्हिडिओ व्हायरल करायला हवेत. खूपच छान!!

  • @urmilabane2566
    @urmilabane2566 Год назад

    Khoop chaan sagitale.natynmadye fakt satach vichar kartat.

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 Год назад

    मराठी भाषा,मराठी चित्रपट आदी गोष्टींवर महाराष्ट्रातच अन्याय होतो आणि तो सुद्धा मराठी माणसांकडूनच! ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे कारण मराठी माणसाला स्वतःकडच्या संपन्न आणि समृद्ध गोष्टींची अजिबात किंमत नाही,त्यामुळे मराठीत असंख्य सुमधुर भावगीते,भक्तिगीते असतांनाही जी ऐकल्यावर अजूनही तेव्हढाच आनंद देतात. अगदी अमराठी लोकं ही अप्रतिम गाणी ऐकतात तेव्हा भाषा कळत नसली तरी त्या संगीताने ते आकृष्ट होतात कारण उत्कृष्ट संगीताला भाषेचं बंधन नसतं म्हणतात,ते खरं आहे!
    असं असूनही कुठल्या समारंभात गेल्यावर कुणी चांगलं गाणाऱ्याला गायला सांगितलं तर जवळ जवळ १००% मराठी माणसे हिंदी गाणेच कां निवडतात?हा परधार्जिणेपणा कां? आपल्याकडच्या अत्युकृष्ट गोष्टींबाबतचा हा पराकोटीचा न्यूनगंड मराठी माणसाला उगीचच आहे.😢

  • @yogesh_j_pawar
    @yogesh_j_pawar 2 года назад +1

    सुरज्या भावा तुझे किडे खरच भारी आहेत भावा डोळ्यात पाणी आणलस ....मराठी किडा नंतर हा असा content तू देतोयस खरच भाव भारी आहे....तुझे दोन्ही किडे भारीच आहेत😊

  • @maheshsawant4229
    @maheshsawant4229 2 года назад +2

    आठवणीतला मनी.... खूप छान ‼️ कळत नकळत डोळे पाणावले.

  • @sunilsutar5461
    @sunilsutar5461 2 года назад +5

    आपले आई वडील आणि आपली मुल , एवढीच नाती उरली आहेत का, आणि इतर नात्यांचं काय, फक्त आपल्या घरातीलच माणसानं पुरतीच ती राहिली आहेत का, इतर नाती कायमची नामशेष होणार, की झाली आहेत ?
    कोवीड काळात फक्त आपल्या घरातली नाती खूप घट्ट झाली, इतर नाती आपल्या पुढच्या आयुष्यात कायमची नहीशीच झाली अस वाटत.
    मला अस वाटत महिन्यातून दहा दिवस आपल्या घरातल्या नात्यांशी दुरून संवाद झाला तरी एकवेळ चालेल, पण जी दूर ची आपली नाती आहेत त्यांच्याशी "प्रत्यक्ष भावनिक संवाद" झालाच पाहिजे, तरच नाती या शब्दांना अर्थ आहे.

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 Год назад +1

    Salil best manus

  • @aasawarishivnikar9704
    @aasawarishivnikar9704 2 года назад +2

    खूपच छान डोळे पाणावले अगदी.

  • @supriyachavan4037
    @supriyachavan4037 Год назад +1

    U r great सलील 👍👍🤞🤞

  • @फक्कडबेत
    @फक्कडबेत 2 года назад +4

    आजची पिढी खूप समंजस आहे,.. माझा मुलगा आता बारावी झाला.. त्याच्या जन्मापासून आतापर्यंत मी त्याच्यासोबत वाढले शिकले.. आता तर एखाद्या चांगल्या मित्राप्रमाणे तू मला चुकल्यावर ती सल्लाही देतो आणि कोणत्याही गोष्टीवर ती आमची चर्चा होते.. तू मुलगा असूनही माझा पाठीराखा बनतो,.. खूप प्रगल्भ विचार आहेत बॉण्डिंग छान आहे आणि हे सगळं झालं आहे संवादातून चूक झाल्यावर ती मुलांनाही आपण माफी मागून पुढे गेले पाहिजे आपल्या अनुकरणातून ती फार शिकतात.... डॉक्टर सलील कुलकर्णी यांना यांना खूप खूप धन्यवाद

    • @sureshdange9406
      @sureshdange9406 2 года назад

      खूपच छान

    • @sanjupalshikar5283
      @sanjupalshikar5283 Год назад

      Nati ha shabdach itaka sunder ahe mag te fakt raktach hav ase nahi te konihi aso eaka n disanarya dhagyani jodalele asate tyat jar koni apalya ichchepramane apalyashi nat asalyach manat nasal tar vedanadai aste savedanshil manala.

  • @snehalpurkar6734
    @snehalpurkar6734 2 года назад +1

    खरंच खूपच हुंदयस्पर्शी पटकन पटलेलं मस्तं

  • @ujawalagosavi4899
    @ujawalagosavi4899 11 месяцев назад

    आतिशय सुंदर आहे

  • @ashwinkulkarni5669
    @ashwinkulkarni5669 Год назад +2

    खूप छान विचार मांडले आहेत सलील सरांनी ❤

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 Год назад +1

    मनापासून धन्यवाद!❤

  • @jayashribharshankar8612
    @jayashribharshankar8612 Год назад

    As chan kahe yekla ke khup chan feel hot... Kharach as sundar jagayla paheje pan dokha denare lokanch jast ahet tyala अपवाद aai vadil suddha nahit mahnun khup man dukavta... Jivan sundar ahe nehame संवेदनशील ani khup sundar आनंदी जीवन jagayla paheje ❤

  • @UlkaRuiwale
    @UlkaRuiwale 2 месяца назад

    नात्यांची घट्ट वीण जगण्याला अर्थपूर्ण करते.

  • @Hitman_lover-u4p
    @Hitman_lover-u4p 2 года назад +13

    खूप पारदर्शक गोष्टी ऐकायला मिळाल्या ✌️

  • @dikshapeshave3398
    @dikshapeshave3398 2 года назад +1

    Salilji khup chan mandalet tumhi badalanarya kalatil nati ani tyanchi khari olakh

  • @renukadhabadgaonkar5174
    @renukadhabadgaonkar5174 2 года назад +3

    नातेसंबंधांचे अतिशय सुंदर विवेचन केले आहे🙏

  • @rithnyamaitreya8517
    @rithnyamaitreya8517 Год назад

    Salil tumhi khup chaan bollat parvach tumcha ek interview baghitla to hi chaan hota ani ha sudha sunder vyakt hota tumhi madhle sher ani kavita sudha apratim... all the best

  • @yogeshguravyg433
    @yogeshguravyg433 2 года назад +3

    खूप चांगल्यापेक्षा खूप गरजेचा हा वैचारिक किडा चा एपिसोड आहे हा👌

  • @seapharmacy2413
    @seapharmacy2413 2 года назад +1

    खुपच सुंदर विचार ,आणि आताच्या काळासाठी उपयुक्त आहेत.सलिल तुम्ही बोलायला लागलात की ऐकतच रहावंस वाटतं.नातं हे जोडलेलं नसतंच कधी ,ती एक गुंफण असते एकमेकांमध्ये अडकलेली.
    धन्यवाद सर !🙏
    असेच अप्रतिम विषय घेऊन येत जा, जेणेकरून नात्यांमध्ये पुन्हा जिवंतपणा येईल.🙏🙏

  • @umakshirsagar2843
    @umakshirsagar2843 2 года назад +2

    वाह!!खूपच छान!! प्रत्यक्ष नात्यांचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले..नात्यांचा ओलावा अधिक हवाहवासा वाटतो..

  • @amodpatwardhan2492
    @amodpatwardhan2492 2 года назад +1

    सलील सर... खूप छान मांडलत तुम्ही... ऐकताना रिलेट करता आले... धन्यवाद.. 👌🙏..

  • @pallaviparandekar6001
    @pallaviparandekar6001 2 года назад +3

    चर्चा खरच खूपच छान.कुटुंब एकमेकांसोबत,एकमेकांसाठी कसे नातं असावे हे छान सांगितले आहे. त्यांच्या सांगण्याप्रमाणे खरच कोविडने ही किमया केली. एकमेकांना खूप जवळ आणले तसेच वाईट पद्धतीने दूर ही केले. एकत्र कुटुंब असावे, असायला हवे ते किती गरजेचे आहे ते सांगितले. नाती हवीत, ती जपायला हवीत त्यातला गोडवा, संस्कार, रूसवे फुगवे सगळेच नात्यात अनुभवता येते.
    जे संकट कोविडने भोगायला लावले ते पुन्हा कुणाच्याच आयुष्यात येऊ नये.
    खूपच सुंदर मुलाखत होती.

    • @amarishsamel2442
      @amarishsamel2442 Год назад

      नाती जपता येते हे खरंच खूप महत्वाचे आहे पण
      त्यासाठी आपला अहंकार बर्याच वेळा आड येतो,जर आपण आपल्यातल्या मी ला विसरून पूढे जाऊ शकलो तरी ही बराच फरक पडेल! बिपिन 🙏

  • @sharadhadke416
    @sharadhadke416 2 года назад +5

    सर्वेसर्वा फक्त कुटुंब ... नात्यात गोडपणा हा फक्त जाणिवेने अन् संभाषण होऊनच राहतो....

  • @smitakulkarni5256
    @smitakulkarni5256 2 года назад +1

    Vary vary nice thinking today and tomorrow Smita s ķulkarni

  • @gaurichavan5917
    @gaurichavan5917 2 года назад +1

    खूपच छान, खरंच आहे, नाती खरच बदलत चालली आहेत, आपल्याला जरी माणसं हवी असली तरी समोरच्याला नाती नको असतात, एकतर्फी प्रयत्न फोल ठरतात, हा माझा अनुभव आहे

  • @PiyushShah-nw6sp
    @PiyushShah-nw6sp 7 месяцев назад

    अप्रतिम.....

  • @samidhajadhav9426
    @samidhajadhav9426 2 года назад +1

    Khup chan visahy mandla aaj chi satya paristhi ahe

  • @sandeshfalke2684
    @sandeshfalke2684 2 года назад

    Dr sir ni नात्याचे एक नवीन ओळख करून दिली.जगतो खरे आपण नाती पण जाणवते कमी आपल्याला.

  • @maheshsinghshisode
    @maheshsinghshisode 2 года назад +4

    खूप दिवसांनी डोळे पाणावले... Thanks वैचारिक किडा...

  • @aartikasallu1506
    @aartikasallu1506 2 года назад +2

    खरंच खूप मार्मिक बोललात👍

  • @archanadanke967
    @archanadanke967 Год назад

    ऐकत रहावे असे वाटतंय..सुंदर..खूप धन्यवाद

  • @savitajadhav8482
    @savitajadhav8482 2 года назад +1

    अप्रतिम ,सर तुम्ही जे विचार मांडले निशब्दच व्हायला झालं .

  • @radhikabhide3992
    @radhikabhide3992 Год назад +4

    In relations people wants others to take first step,expect too much from you,that time we think of limiting ourselves.Also people are friendly if you are in power position-money,position and age

  • @thinktalks7895
    @thinktalks7895 2 года назад +1

    Kupch great sir tumhi. Ajun video yekayela awadel.

  • @smitadoule5932
    @smitadoule5932 2 года назад

    200 comment... Khupach chaan dole bharoon aale yektana.

  • @kavitap2426
    @kavitap2426 2 года назад +3

    अप्रतिम!सुंदर!👌👌😊

  • @sheetalbhosale4451
    @sheetalbhosale4451 2 года назад +6

    Khup chan sir...👌👏👏👏

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav8068 Год назад

    म्हंटल तर गंभीर आणि म्हंटल तर अगदी हळूवारपणे काळजाला भिडणारा विषय,पण किती शांत पणे आणि नात्यांची गुंफण आणि नात्यांची गरज समजून सांगितली
    खुप सुंदर

  • @ajoywithsunjoy3436
    @ajoywithsunjoy3436 11 месяцев назад

    खरंच नाती हरवत चाललीत......😢

  • @ruthagrofarm3085
    @ruthagrofarm3085 2 года назад +1

    Vaicharik kida ne khup चांगलं platform aahe

  • @pratibhaadarkar960
    @pratibhaadarkar960 2 года назад

    Khupach antarmukh kele tumhi Salil Sir. Chhan

  • @sonalitelore8126
    @sonalitelore8126 2 года назад +2

    Kharch ❤️garaj ahe yachi 😊😊😊

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 Год назад

    नात्याची व्याख्या बरोबबर केलीत भाऊ

  • @nehak_7
    @nehak_7 2 года назад +2

    Khupch Sundar... Aplya javlchya saglya mansanchi athvn yete aiktana🥺🥺❤️❤️

  • @vikasyadav1107
    @vikasyadav1107 2 года назад

    मस्त बोलला आहेस संदीप, output/ result / gains असं सगळ बघितलं जातय सध्या प्रत्येक नात्या मध्ये...ज्या दोघांमध्ये हे बघितलं जातं नाही ते खर नात असं म्हणता येईल.

  • @swatiparekhji
    @swatiparekhji 2 года назад +11

    Nice. Covid was a pause button for entire humanity and most of us learnt a great deal from it .

  • @mrunaltarale9921
    @mrunaltarale9921 2 года назад

    खर आहे ‌.या बाबतीत बोलले गेले पाहिजे.

  • @chandrakalav4118
    @chandrakalav4118 2 года назад +1

    Ayektana dole bharun aahe , antarmanatil Satya sangitle ,khup chhan vatle.kontyahi vayat hechhanach vatel ase vichhar mandle .👍👍👌👌

  • @kishorpatil6225
    @kishorpatil6225 2 года назад +1

    नात्या बद्दल खुप छान सांगितलात सर 🙏🏻👌