Samna - Sakhya Re Ghayal Mi Harini

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • Good song from the movie Samna

Комментарии • 406

  • @shashimohite1054
    @shashimohite1054 3 года назад +142

    हा महाल कसला, रानझाडी ही दाट
    अंधार रातीचा कुठं दिसना वाट
    कुण्या द्वाडानं घातला घाव,
    केली कशी करणी
    सख्या रे घायाळ मी हरिणी
    काजळकाळी गर्द रात अन् कंपकंप अंगात सळसळणाऱ्या पानांना ही
    रातकिडयांची साथ
    कुठं लपू मी, कशी लपू मी,
    गेले भांबावुनी
    गुपित उमटले चेहऱ्यावरती
    भाव आगळे डोळ्यांत
    पाश गुंतले नियतीचे रे
    तुझ्या नि माझ्या भेटीत
    कुठं पळू मी कशी पळू मी,
    गेले मी हरवुनी

    • @friendsforever-ri7sk
      @friendsforever-ri7sk 2 года назад +3

      Bhari

    • @jeevanshinde1619
      @jeevanshinde1619 2 года назад +5

      लता दीदी शी कोणीच बरोबरी करू शकत....... ति तर गाणकोकीळा.... सलाम सलाम.... तुझ्या आवाजाला🙏🌹

    • @ganamite004
      @ganamite004 2 года назад +2

      @@jeevanshinde1619 प्रश्नच नाही excellent song

    • @vijaymorudkar4528
      @vijaymorudkar4528 2 года назад +2

      Chhan Lyrics Lihile

    • @jaipalsonule2619
      @jaipalsonule2619 Год назад +1

      Thank

  • @kalaakarkatta
    @kalaakarkatta 4 года назад +237

    सख्या रे, ची 'आर्तता' ... हेच या गाण्याला 'अमरता' प्रदान करून गेलय..... आणि हो गाण सरस्वती लता दीदींशिवाय हे कोणाकडून शक्य झाले असते.... नाहीच ! ...... लता दीदींना शतशा प्रणाम !!

  • @rajendradeobhankar4069
    @rajendradeobhankar4069 3 года назад +48

    जगदीश खेबुडकर यांच्या गीतलेखनाचे करावं तितकं कौतुक कमीच आहे.ह्या महान गीतलेखकाने एक एक मराठी गीत मौल्यवान दागिना घडवून रसिकांच्या आवडीच्या तिजोरीत ठेव जपून ठेवावी असा जडाऊ आहे.या गीताची पटकथाच जणू त्यांनी सुरुवातील पासून शेवटपर्यंत एक एक मार्मिक शब्दावलीं मधे केली आहे.पूर्ण गीतांचे सादरीकरण इमानदारीने लिहणार्या या थोर वल्लीला मानाचा मुजरा.

  • @atuldpatil
    @atuldpatil 3 года назад +39

    हा चित्रपट थियेटर ला पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. कसल्याश्या एका महोत्सवाच्या निमित्ताने दहा एक वर्षांपूर्वी मला हा थियेटर मध्ये पाहायला मिळाला. तो अनुभव केवळ विलक्षण. दर्जेदार चित्रपटाला प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी रंग, तंत्रज्ञान, स्पेशल इफेक्ट्स, बिग बजेट याची खरे गरज नसते हे तेंव्हा जाणवते.

  • @jeevanshinde1619
    @jeevanshinde1619 2 года назад +9

    जब्बर पटेल रामदास फुटाणे लता मंगेशकर आपण खूप ग्रेट आहे

  • @dadaraokhatat946
    @dadaraokhatat946 Год назад +36

    कोन कोन हे गाणे 2023 मद्धे ऐकत आहे

  • @beamer7702
    @beamer7702 2 года назад +11

    अंगावर काटा आणणार गाणं. चाळीस वर्षा पूर्वी आणि आता देखील तोच परिणाम

  • @Mr.Roshan18555
    @Mr.Roshan18555 2 года назад +31

    हे देवा रिमिक वाल्यांचा नजरेतून या गाण्याला वाचवशील बापा...

    • @mahendradusane6615
      @mahendradusane6615 4 месяца назад

      खरं आहे .
      कारण जुन्या गाण्यांचा पुर्ण सत्यानाश करतात रिमिक्स वाले .

    • @sangeetaborkar1097
      @sangeetaborkar1097 27 дней назад

      Agdi kharay

  • @vaishalizagade6015
    @vaishalizagade6015 3 года назад +60

    लताजी दैवी शक्ती आहे तुमच्यात ती कोणातच नाही काय आवाज आहे तूमचे गाणे ऐकले की माणूस सर्व दुख विसरतो एनर्जी मिळते खूप खूप धन्यवाद दीदी सलाम तुम्हाला 🙏🙏

  • @kalaakarkatta
    @kalaakarkatta 3 года назад +27

    सख्या रे ची आर्तता ऐकताना काळजाला उभा छेद जातो, कोणत्या शब्दात या अप्रतिम कलाकृतीचे कौतुक करावे तेच कळत नाही . आजतागायत एकाही गायकाला एवढी आर्तता, वेदना शब्दांद्वारे प्रकट नाही करता आली........ हे तर फक्त माय सरस्वतीलाच जमले हो,..... एक एक शब्दाला न्याय दिला आहे.

  • @vijaybagwe66
    @vijaybagwe66 2 года назад +24

    लतादिदींच्या आवाजातल हे गाणं कधीही ऐकलं की, माझ्या काळजात एकदम चर्रर्रर्र होऊन जातं. आणि काळजाचं पाणी पाणी होऊन जातं. दिदी, तुम्ही महान आहात.....

    • @sunitasonawane5853
      @sunitasonawane5853 2 года назад +2

      अगदी बरोबर..!! सख्या रे... ही आर्त साद काळीज चिरून टाकते.

    • @prashantkulkarni2006
      @prashantkulkarni2006 2 года назад +1

      खरं आहे

  • @mohanpujar7403
    @mohanpujar7403 10 месяцев назад +19

    लतादीदींनी गूढता, आर्तता आणि विरह या सर्व भावना आपल्या मधुर स्वरांमध्ये अशा मांडल्या आहेत, की एकदा ऐकल्यानंतर हे गाणे कायमचेच मनात घर करुन राहाते. लतादीदी अश्रूपूर्ण डोळ्यांनी तुम्हाला शत शत नमन!!!

  • @sunitajawale8369
    @sunitajawale8369 2 года назад +5

    आवडते गाणे. उषा ताई नाईक खूपच आवडत्या अभिनेत्री. नीळू भाऊ व डाँ.मोहन आगाशे सर. ही दिग्गज लोकं.
    आणि लता दिदीचा आवाज. सोने पे सुहागा.
    👍👌👌👌❤

  • @vinayjadhav3437
    @vinayjadhav3437 5 лет назад +40

    मी हे गाणे चुकून पप्पांच्या मोबाईल मधे ऐकले होते. तेव्हा पासून आवडते हे गाणे.

  • @akashchaudhari6736
    @akashchaudhari6736 3 года назад +90

    अप्रतिम शब्दरचना आणि मंत्रमुग्ध करणारा आवाज..❤ जुन ते सोन..☺

  • @dattatraymadrasi4183
    @dattatraymadrasi4183 5 лет назад +10

    ही कधीही तहान न भागवणारी गाणी आहेत केव्हा ही ऐका मन भरतच नाही.पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते

  • @user-ju4zo4wc5x
    @user-ju4zo4wc5x 9 лет назад +155

    वर्णन करायला शब्द नाहीत. उच्च दर्जा संगीताचा, काव्याचा, आवाजाचा आणि भावनांचा. क्या बात है .

  • @subhash.shejwalgmail.comsh4432
    @subhash.shejwalgmail.comsh4432 2 года назад +5

    खूप सुंदर अप्रतिम गाणं लतादीदीने गायलेले आहे अवीट आणि अविस्मरणीय संगीत आणि तितकाच ताकतीचा अभिनय निळू फुले यांचा तितकेच सुंदर लावणी नृत्य उषा नाईक यांचा गाण्याच्या बोल नुसार त्यांचे हावभाव अदाकारी सर्वच अप्रतिम सर्व कलाकारांना मानाचा मुजरा असे कलाकार पुन्हा होणे नाही स्वर्गीय लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @maheshchoure9286
    @maheshchoure9286 Год назад +4

    सत्तेच्या सारीपटात असे किती तरी मारुती कांबळे हरवले आहेत.

  • @laxmanalhat1118
    @laxmanalhat1118 2 года назад +17

    शब्दांतून आभार व्यक्त करता येणार नाही असे उत्कृष्ट लेखन, गायन, संगीत, अभिनय नृत्य सर्वांना खरोखर मानाचा मुजरा 🙏🙏🙏

    • @shashikantveer
      @shashikantveer Год назад +1

      अप्रतिम गाने आहे

  • @dhanrajmane6133
    @dhanrajmane6133 5 лет назад +34

    सुमधुर गाणं नेहमी नेहमी ऐकावं असं.
    गाण्यातील लताजींचा स्वर तसेच शब्द, संगीत,चित्रीकरण आणि उषा नाईक यांचे तेवढेच सुंदर पडद्यावरील सादरीकरण अप्रतिम ... 👌👍

  • @nitinbibikar8323
    @nitinbibikar8323 2 года назад +4

    कैलासवासी निळू फुले यांच्या चित्रपट कारकिर्दीतील एक अजरामर कलाकृती

  • @kapilfulmamdikar6579
    @kapilfulmamdikar6579 2 года назад +4

    ही गाणी जेवढी आईकायला सोपी वाटतात पण ते गायला इतकं सोपं नसतं, त्या साठी साक्षात गान सरस्वती लता दीदी जी च पाहिजे

  • @shirishkanhere9134
    @shirishkanhere9134 2 года назад +8

    I heard about this song as
    Lataji has no dates for recording this song. She was busy in other recording. This movie director wants to picturized this song. So music director asked ravindra sathe to sing this song, song picturized on male version. Usha naik ji acted on it. Then lataji sang this song by rehearsal on ravindra sathe version

  • @rinkichamkar
    @rinkichamkar 15 лет назад +27

    There never was nor will there ever be a Nilu Phule .....
    His performance in "Gosht Chhoti ..." was stunning and he still commanded the screen. His death was a great blow to Marathi cinema. Truly a legend !!

    • @pushprajrajguru6891
      @pushprajrajguru6891 4 года назад +2

      मराठी मधिल Top 5 मधिल हे Sad Song असेल .

  • @nikhilchavan4633
    @nikhilchavan4633 8 лет назад +74

    How can people dislike this song?? probably they are unaware about feelings and emotions behind this song.

  • @Deepakshrikhandesir
    @Deepakshrikhandesir 2 года назад +6

    * किती सुंदर एक छान गाणे आहे हे...भारतरत्न लतादीदीं चे असे अमोघ अजरामर गाणे_ याहून स्व.लतादीदी किती महान आहेत याचे 101% दर्शन होते..यात दैवी चमत्कार स्व.लता दिदी दिसून येतात..101%*🤷

  • @santoshrane5168
    @santoshrane5168 2 года назад +11

    वर्णन करायला शब्द नाहीत. उच्च दर्जा संगीताचा, काव्याचा, आवाजाचा आणि भावनांचा. क्या बात है .
    122

  • @nikhilwedpathak4095
    @nikhilwedpathak4095 6 лет назад +40

    अप्रतिम . दूरदर्शन वाहीन्या आता हे जुने सुंदर चित्रपट , गाणी दाखवत का नाहीत ?????????????

  • @vishwajitpawar4076
    @vishwajitpawar4076 5 лет назад +29

    बाई वाड्यावर या....बाई तर वाड्यावर कधीच आलीय......
    हे गाणं पहाताना एक गुढ रहस्यमय वातावरण उभे रहाते. गीत व संगीत खुपच छान आहे. लताजींचा आर्त स्वर व्याकुळ करतो. उषा नाईक या गुणी नर्तिका अभिनेत्रीने गाण्यातील कथा व व्यथा तडफेने सादर केली आहे. नृत्य दिग्दर्शन व चित्रीकरण छान आहे. एकुणच अभिजात कलाकृती. धन्यवाद.

  • @bhaskarjawanjal
    @bhaskarjawanjal 2 года назад +5

    शब्द, स्वर ,संगीत आणि उषा नाईक यांचा नृत्याविष्कार अभिनय🥇
    अजरामर कलाकृती 🎼💎🎼

  • @bhartidhakwal8703
    @bhartidhakwal8703 2 года назад +2

    सख्या रे ची आर्त हाक ऐकून अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही...आज सहजच ऐकायचं ठरवले ...अप्रतिम शब्द...

  • @kalimpathan6312
    @kalimpathan6312 7 лет назад +36

    वर्णन करायला शब्द नाहीत. उच्च दर्जा संगीताचा, काव्याचा, आवाजाचा आणि भावनांचा. क्या बात है .

  • @chaitanyajosh
    @chaitanyajosh 15 лет назад +18

    Bhaskar Chandavarkar hyanchi apratim chal ! Ani Latabaincha swargiya awaaj !!!

  • @AmeyJoshi_AMTP
    @AmeyJoshi_AMTP 7 лет назад +49

    The dancer describes herself as well as Maruti Kamble in identical words. That's the greatest achievement of this piece of art.

  • @preetamsawant6270
    @preetamsawant6270 5 лет назад +19

    This is Jabbar first film. He said that I felt myself lucky because coconut breaking ceremony was done by Didi and first shot was taken by Bhalaji. I requested Didi to sing one song in this film and she agreed to it. After some time she got very busy and she even did not find time for rehearsal. So this song was recorded in Ravindra Sathe's voice and send to Didi for listening. She listened it and recorded this beautiful song.

  • @andrapopatlal5425
    @andrapopatlal5425 4 года назад +3

    लहाणपणी मनावर ठसलेले हे गीत । जबरदस्त हिट ।

  • @sagarkamble1060
    @sagarkamble1060 5 лет назад +5

    त्या काळातील सर्व मराठी गाणी ऐकताना मन भरून येतं
    सामना हा मराठी चित्रपट त्या काळात सुपर हिट झाला होता
    यातील सर्व गाणी मला खूपच आवडतात 👌

  • @vnp160666
    @vnp160666 3 года назад +3

    अप्रतिम सन्गीत. आजकाल चे संगीतकार पाणी भरतात ह्रीदाय्नाथ मंगेशकर कडे. ते सुद्धा कमीच आहे ह्यांच्या प्रतिभेपुढं

    • @shirishkanhere9134
      @shirishkanhere9134 3 года назад

      music for this movie is given by bhaskar chandavarkar......no doubt hridaynath ji is best

  • @lavanyanair7147
    @lavanyanair7147 7 лет назад +66

    lovely song.....gives goosebumps every time I hear.....missing the golden era of meaningful lyrics

  • @shreekantsardesai6017
    @shreekantsardesai6017 2 года назад +2

    सरस्वती लता दीदी, खरंच अप्रतिम गाणं. अजरामर अपरंपार

  • @ganamite004
    @ganamite004 2 года назад +3

    अप्रतिम गाणं, त्यात लता म्हणजे excellent 👌👍

  • @ashay1989
    @ashay1989 3 года назад +10

    I am here for Lata Mangeshkar's voice !

  • @vishwaswagh4531
    @vishwaswagh4531 5 лет назад +5

    लता मंगेशकर यांचा अप्रतिम आवाज...उषा नाईक यांची अप्रतिम अदाकारी......

  • @manjirisatam3335
    @manjirisatam3335 9 месяцев назад +2

    कितीही वर्ष झाली तरी गाण्यातील गोडवा कायम मनात राहिला आहे. गाणे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. सलाम लता दिदिंना 🎉🎉

  • @sachinmainkar
    @sachinmainkar 18 дней назад

    लता बाई आणि ऊषा बाई ( नाईक ) . अफलातून गायकी आणि तितकीच सुंदर अदाकारी. ह्या गीताचा परिणाम अजून ही कायम आहे.

  • @rameshmali2922
    @rameshmali2922 2 года назад +4

    अतिशय आशय पूर्ण, सुमधर ,अविट, ऐकल्यानंतर थकवा घालवणार शब्द व चित्रीकरण याचा सुरेख संगम

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 2 года назад +1

    हे गाण जेंव्हा जेंव्हा एकते तेंव्हा अंगावर रोमांच उभे राहतात.किती ती आर्तता आहे आवाजात.कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही.

  • @sanjaywadekar1838
    @sanjaywadekar1838 2 года назад +4

    Owesome song ... Owesome acting n Owesome Writing ...... Colourful picture in Black n White movie

  • @user-my1lp2gl1b
    @user-my1lp2gl1b 3 месяца назад +1

    खरच किती गोड अंगावर शहारे येतात डोळे भरून येते हे

  • @vnp160666
    @vnp160666 3 года назад +2

    अप्रतिम संगीत. ह्या संगीतकारांनी मूर्ती बनवल्या. आजकाल चे संगीतकार मूर्त्यांवर फक्त कोरीवकाम करतात

  • @sudhirumbre6685
    @sudhirumbre6685 4 года назад +4

    किती छान आवाज लतादीदींचा किती छान संगीत . कितीही वेळेस गाणे ऐकलं तरी समाधान होत नाही शेवटी जुने ते सोने

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 2 года назад +1

    Laajavab Nilu bhU Dr Lagu asi manse hone nahi

  • @ramsonawane3258
    @ramsonawane3258 Год назад +1

    Khup sundar song aahe manala shanti lagte aaiklyavar lata didinna koti koti pranam

  • @oneallwyn
    @oneallwyn 4 года назад +11

    That time, those movies and such core to soul actors.... We all know it's never coming but this is what time travel may be

  • @Vande_Mataram-
    @Vande_Mataram- 5 лет назад +12

    A classic movie.
    Actors,Director,Singers,Music Director...all created a benchmark.
    Despite limited technological support, this song gives the better effect than any recently recorded song

  • @anirudhapatil4308
    @anirudhapatil4308 5 лет назад +6

    भारतरत्न लता मंगेशकर खुप छान आवाज

  • @ashokshende5095
    @ashokshende5095 3 года назад +5

    Excellent marathi geet

  • @nitinp5
    @nitinp5 7 лет назад +8

    संगीतविश्वातील एक दुर्दम्य रत्न म्हणजे लताजी...

  • @vinayakartsproductio
    @vinayakartsproductio 12 лет назад +23

    गीत: जगदीश खेबुडकर

  • @sanjayvangikar5010
    @sanjayvangikar5010 2 года назад +2

    Bhartiy sangeetachi mata lata mangeshkar yanna shat shat pranam.

  • @vinayakpofalkar3997
    @vinayakpofalkar3997 Год назад +1

    ।। खरच जुने ते सोने आहे।। 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @vishalpawar4046
    @vishalpawar4046 5 лет назад +2

    काव्य, संगीत, अवर्णनीय अशी गाणी ऐकायला दुरापास्त झालीत

  • @rajeasylearning
    @rajeasylearning 7 лет назад +8

    अप्रतिम गाणे. आणि आजवरच्या चित्रपटामधील अतिशय ह्रीदयद्रावक प्रसंगापैकी एक प्रसंग - मारुती कांबळे ची हत्या .

  • @sangeetakatti-surbahar
    @sangeetakatti-surbahar Год назад +3

    Are such songs made today??
    Or sung the way it is?? All these legends are praatahsmaraneeya🙏🙏

  • @prashantnandgaonkar9885
    @prashantnandgaonkar9885 2 года назад +1

    सख्या रे, हे गीत जणू, "हे सूर जिवनाचे" 🙏🌹👌😘

  • @pravinchavan9236
    @pravinchavan9236 25 дней назад

    सुंदर शब्द रचना.सुंदर गायन . सुंदर संगीत.सुंदर अभिनय.यातुन निर्माण झालेली रचना.

  • @kiranjangam1590
    @kiranjangam1590 2 года назад +2

    हा सिनेमा बघायचा आहे ,,,

  • @luckygedam3288
    @luckygedam3288 Год назад +1

    Aaj hi ved laun jaat he gaan
    .. 2023

  • @sankukabukar
    @sankukabukar 7 месяцев назад +1

    Heart touch words and melody 🎶
    Goddess singing in this video that’s declared ❤

  • @archanakumbhar2900
    @archanakumbhar2900 2 года назад +1

    Khup sundhar Latadidi na salam🙏🙏

  • @gaanasudhe123
    @gaanasudhe123 4 года назад +14

    One of the evergreen songs of Marathi Film Music! What a composition by Bhaskar Chandavarkar, and out of this world rendition by Lataji! It is truly a "haunting melody!" By the way, what Raag is this song composed upon?

  • @ADITYA72
    @ADITYA72 17 лет назад +15

    Excellent song, treat to ears

  • @avantikapatankar9971
    @avantikapatankar9971 5 лет назад +6

    miracle song by lata didi, ushs naik superb act, lyrics superb!

  • @mohanpujar7403
    @mohanpujar7403 8 лет назад +27

    Immortal, soulful composition by Bhaskar Chandavarkar, filled with elements of suspense. Lataji's rendition is unsurpassable!!!

    • @jayantkunte2252
      @jayantkunte2252 6 лет назад +1

      Exactly right. Bhaskar Chandavarkay has tuned this tune to the fantastic and Lataji has done the justice as usual.

  • @manishachaudhari495
    @manishachaudhari495 3 года назад +1

    Pratek gan Sundar aahe ,jr te LATADIDI gat astil tr...
    Love you LATADIDI..😘😘😘

  • @vinayakpofalkar3997
    @vinayakpofalkar3997 Год назад +1

    खूप सुंदर व छान अर्थपूर्ण असे गाणे आहे मला मनापासून आवडले आहे।। 🙏🌹🌹🙏

  • @komalmore7994
    @komalmore7994 7 месяцев назад +1

    मनातील भावना व्यक्त क रणे खुप अवघड वाटते सलाम लता दीदी

  • @rajeshtendulkar9734
    @rajeshtendulkar9734 11 лет назад +12

    I guess the saying"ratr vairyachee aste" aptly applies here how tactfully the plot was executed,g8 wordings,music and lata mangheskarancha aawaz speechless

  • @dvaibhav1
    @dvaibhav1 3 года назад +2

    वा
    खूपच छान
    अप्रतिम
    खूप छान आवाज

  • @yeshwantmaske3711
    @yeshwantmaske3711 6 месяцев назад +1

    अत्यंत सुमधुर व विलोभनीय गानं❤

  • @anvikadam9309
    @anvikadam9309 6 лет назад +6

    classic music and superb singing by Lataji

  • @shirishkanhere9134
    @shirishkanhere9134 3 года назад +3

    anybody observed ? usha naik's speaking voice, speaking style and lataj's voice for this song ? listen again carefully .....you will find talent of lataji

  • @shivanandravsaheblamgunde9802
    @shivanandravsaheblamgunde9802 2 года назад +1

    सुमधुर व अर्थपूर्ण गीत...,
    निळूभाऊ एकच नंबर

  • @antaravlogs2572
    @antaravlogs2572 4 года назад +2

    Lockdown 2020

  • @a1music930
    @a1music930 4 года назад +1

    Lata bai ka muqabla koi bhi nahi kar sakta Koyel hai lata didi hindustan ki

  • @ajk8232
    @ajk8232 Год назад +1

    What's the Greatest Voice of Lataji+The Lataji

  • @sanjaydhamdhere3708
    @sanjaydhamdhere3708 5 лет назад +4

    What a great words and great photography all is great

  • @ART_INDIA
    @ART_INDIA 7 лет назад +7

    Apritam......song..my fevriot movie samana.....still....I am shock....what politics can do this.......this real truth.....
    I am follow jabber patel saaheb.......and umbrtha also....jai tr jait........Great director......legend.

  • @chintamaniwadikar1050
    @chintamaniwadikar1050 3 года назад +1

    लता दिदींच्या आवाजातील सुंदर गीत

  • @charlizankar7544
    @charlizankar7544 2 года назад +1

    What a song

  • @dattajiraopatil2902
    @dattajiraopatil2902 Год назад +1

    भास्कर चंदावरकर यांची अप्रतिम रचना

  • @komalmore7994
    @komalmore7994 7 месяцев назад +1

    लता दीदी तुमच्या प्रत्येक गायनाला सलाम

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 2 года назад +2

    All team was prepared to do anything for legendary Dr. Jabbar Patel... Inspired days. Maruti Kambalechan Kay zale? This still haunts Indian politics

  • @Anpanman14
    @Anpanman14 17 лет назад +8

    Great song ! evergreen ! thanks !

  • @hariomkedarswami3126
    @hariomkedarswami3126 9 лет назад +9

    Hariom Lata Mangeshkar
    One an Only One Swarrgeey Sarsvasti Female singer

  • @parulmerchant6498
    @parulmerchant6498 2 года назад +1

    Latadidi...the best of best 🎉

  • @thelegend-latajee3939
    @thelegend-latajee3939 5 лет назад +9

    Latadidi your voice has been heighten the song to the level..where everyone just astonished ...

  • @myvgworld
    @myvgworld 5 лет назад +1

    आज देखील या ओळी आणि संगीत मनाला भुरळ घालतात

  • @aparnabhagat5629
    @aparnabhagat5629 4 месяца назад

    किती ते मंत्रमुग्ध करणार गाणं🥰