1 x 3 | Prashant Damle | Vinay Yedekar | 12500th Show Special

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 окт 2022
  • प्रशांत दामले आणि विनय येडेकर यांची गेला माधव कुणीकडे पासूनची ओळख, धमाल किस्से आणि त्यांच्या रंगतदार आठवणींसाठी हा एपिसोड बघायलाच हवा!
    विक्रमी १२५०० व्या प्रयोगासाठीचा 'वन बाय थ्री’चा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंटमध्ये नक्की कळवा!
    in.bookmyshow.com/plays/eka-l...
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 227

  • @omkarbordavekar4098
    @omkarbordavekar4098 4 месяца назад +5

    ही सिरीज कधी संपूच नये असं वाटतं. दिग्गज कलाकारांच्या निखळ आणि मनोरंजक गप्पा ऐकताना भान हरपून जातं. सुंदर उपक्रम. नाटका एवढीच धमाल मजा ह्या मुलाखती बघताना येतेय.

  • @snehamarathe1695
    @snehamarathe1695 Год назад +45

    एपिसोड उत्तम झाला. 1×3 ही सिरीज छान जमली आहे. संकर्षण यांच्या पाहुण्यांना बोलतं करण्याच्या शैलीमुळे मुलाखत अधिक रंगतदार होते.

  • @PranavTambvekar
    @PranavTambvekar Год назад +33

    अप्रतिम कार्यक्रम आहे...
    कधी च संपवू नका ही सिरीज..!
    स्मृतिगंध, अशा च मुलाखती अशोक सराफांच्या सुद्धा घ्या!

  • @prajktag7308
    @prajktag7308 Год назад +34

    मस्त होता आजचा episode👌 फुल्ल धमाल
    हसून हसून पोट दुखायला लागलं.😂😂
    या दोघांचीही chemistry भन्नाट आहे.
    Too good..

  • @mandarjoshi9252
    @mandarjoshi9252 Год назад +25

    Prashant Damle is the Sachin Tendulkar of Natak industry! Amazing person!! Best of luck!!

    • @manunerkar3426
      @manunerkar3426 Год назад +3

      विनय येडेकर हे खरचं उत्तम क्रिकेट खेळतात... ते अगदीच सचिन सारखे सुप्रसिद्ध झाले असते

  • @rsgandhi333
    @rsgandhi333 Год назад +11

    तेंडुलकरच्या कारकीर्दीचा आढावा आणि सेहवाग आला नाही तर चालणार नाही.. जबरदस्त जोडी sir 🙌

  • @kamleshvichare6628
    @kamleshvichare6628 Год назад +3

    आजचा पाहुणा माझ्यासाठी खूप खास आहे. या दोघांनी जे नाटक गाजवलं ते माझ्यासाठी खास आहे. २००५मध्ये आम्ही आमच्या विद्यापीठात स्नेहसंमेलनासाठी गेला माधव केलं होतं. खूप धमाल आली होती. माझ्या मते विनयजींची ही एकमेव मुलाखत असावी. अतिशय साधा माणुस.
    ही मुलाखतींची संपूर्ण मालिकाच खरं तर खूप सुंदर आणि माहितीपुर्ण आहे. खास करून विनोदी नाटक करू पाहणाऱ्यासाठी. विनोदी नट कसा असावा याचा प्रशांतजी एक आदर्श परिपाठ आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिस्त आणि व्यवसायिकता अंगी असणं किती महत्वाचं आहे, नाटक ही एकल नसुन समुह कला असल्याने आदान प्रदान आणि टीम वर्क किती महत्वाचं आहे, गर्व, अहंकार आणि मी फक्त शहाणा ही भावना बाजुला ठेऊन नाटकाच्या टीमने एक कुटुंब बनुन राहणं किती महत्वाचं आहे हे प्रशांतजीना ऐकून कळतं.
    पुन्हा एकदा या सुंदर अनुभूतीसाठी खूप खूप आभार. माधव पुन्हा एकदा होऊन जाऊद्या. अरे हाय काय आणि नाय काय..

  • @rohangondhalekar
    @rohangondhalekar Год назад +1

    मस्त चालू आहे अजून एक करू शकता एकत्र एका नाटकाची टीम बोलवली विशेषतः गेला माधव कुणीकडे आणि एक लग्नची गोष्ट आणि त्यातल्या किस्से ऐकायला आवडतील. एकूण कार्यक्रम बघताना असे वाटत आहे की श्री प्रशांतजी नी कोकण दौरे फारसे केलेले नसावेत कारण तिथले किस्से कधी समोर आलेच नाहीत. पण कार्यक्रम छान आहे.

  • @SantoshGaikwad-gc1oh
    @SantoshGaikwad-gc1oh Год назад +4

    मराठी संस्कृती चे शिलेदार आहेत , अशा उच्च दर्जाच्या कलाकारां , साहित्यिक यांमुळेच मराठी भाषा श्रीमंती डौलाने वृद्धिंगत होते आहे 👌🙏👌....

  • @snehalgore6570
    @snehalgore6570 Год назад +2

    अप्रतिम मुलाखत होती, हे मी सुध्दा 5ते 6 वेळा बघितले आहे, सुंदर नाटक, परत आल तर परत नक्की बघेन

  • @ajinkyavasht9512
    @ajinkyavasht9512 Год назад +12

    हा कार्यक्रम असाच चालू ठेवा
    अश्या प्रकारच्या कार्यक्रमांची गरज आहे 👌🏻🙏🏻

  • @varshag.8398
    @varshag.8398 Год назад +11

    तीन मित्र कट्ट्यावर बसून मस्त गप्पा मारत, हसत खिदळत आहेत असच वाटतं 1/3 बघताना. पण त्याच बरोबर हे मोठे कलाकार माणूस म्हणून कसे आहेत हे ही लक्षात येतं..

  • @vijayashetty5328
    @vijayashetty5328 Год назад +22

    Go Sankarshan go .........we demand episodes with all his co stars and if possible some backstage team also.

  • @manjiri4541
    @manjiri4541 Год назад +2

    खरंच "गेला माधव कुणीकडे"पुन्हा पहायला आवडेल

  • @umasalvi7643
    @umasalvi7643 Год назад +2

    'गेला माधव.... कराचं आम्हांला ही बघायला मिळेल

  • @kirandatey4187
    @kirandatey4187 Год назад +6

    Prashant Damle’s personality is extremely lovable and his exuberance is contagious. One can never get tired of watching him on stage. I had the good fortune of saying ‘hello’ to PD personally earlier this year at the BMM Convention. I don’t expect him to remember that, of course! 😬😉

  • @Geometrical-patterns
    @Geometrical-patterns Год назад +3

    मस्त होत आहेत एपिसोड 👌
    गेला माधव कुणीकडे बघायला पुन्हा आवडेल.

  • @ajitjoshi4415
    @ajitjoshi4415 Год назад +5

    प्रशांतजी, कविता लाड, विनयजींचे या नाटकाचे प्रयोग ठाण्याला 'राम गणेश गडकरीला' बघितले होते. Full freshening comedy for 3 hours with spontaneous tuning among all the actors.. काय सुंदर प्रयोग व्हायचेत! व्वा. बहोतही बढीया. 🙏😊

  • @Rockstar_03
    @Rockstar_03 Год назад +2

    1×3 छान सिरीज आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह असा उललेख केला तर छान होईल. एकेरी उल्लेख ऐकून दुःख होत. 🙏

  • @surekhakhandekar8694
    @surekhakhandekar8694 Год назад +1

    खू...................पच छान वाटतय ऐकताना
    ऑल दि बेस्ट, अजून खूप सारं ऐकायला आवडेल

  • @swatipimparkar6769
    @swatipimparkar6769 Год назад +1

    बढिया...गेला माधव कोणीकडे परत या जोडी सोबत पाहायला नक्की आवडेल.

  • @pramodkulkarni4030
    @pramodkulkarni4030 Год назад +1

    खुपच सुंदर उपक्रम आहे हा. नाटकाच्या पलीकडचा विषय सर्वसामान्य जनतेला माहीतच नसतात. हे सगळे अगदी ओघवत्या भाषेत विचारून तितक्याच सहजपणे काही ऐकायला मिळणे ही खरी मेजवानी आहे.
    एक विनंती की ह्या कार्यक्रमाचे कमीत कमी दोनशे प्रयोग व्हावे.

  • @pajoshi70
    @pajoshi70 Год назад +2

    Khupach chhaan! Prashant sir ani Vinay sir, "Gela madhav..." punha ekada baghayala avadel

  • @sanjayrohinkar1574
    @sanjayrohinkar1574 Год назад +2

    मस्त च आहे. पुढच कविता ताई बघून खूप आनंद झाला

  • @yogik555
    @yogik555 Год назад +1

    वाट बघतोय गेला माधव कुणीकडे, विनय , संकर्षण आणि प्रशांत साहेब सर्वाना खूपच धन्यवाद.. मजा येतेय

  • @anaghawatwe6744
    @anaghawatwe6744 Год назад +1

    Mukta बर्वे ना पहायची içcha आहे... कार्यक्रम खूप सुंदर!!

  • @user-cm4wq1qw4i
    @user-cm4wq1qw4i Год назад +1

    कृपया ही मालिका बंद करू नका. प्रशांतजींचे सगळे भाग झाल्यानंतर दुसऱ्या कलाकारावरती अशीच एक मालिका करा. संकर्षण कऱ्हाडे यांचे सूत्रसंचालन खूप छान आहे. आणि मुलाखती अगदी मोजक्या शब्दांत परंतु मनोरंजनात्मक पद्धतीने व समोरच्या कलाकाराला बोलतं करणाऱ्या किंबहुना समोरच्यालाच जास्त बोलायला देणाऱ्या आहेत. आणि हेच महत्वाचे आहे जे आताच्या मुलाखतींमध्ये पहायला मिळत नाही. खुपते तिथे गुप्ते, आणि विक्रम गोखले होस्ट करत असलेली दूरदर्शन वरील दुसरी बाजू या कार्यक्रमानंतर इतका छान मुलाखतीचा कार्यक्रम 1x 3 च्या निमित्ताने बघायला मिळाला. Specially thanks to स्मृतीगंध.

  • @sugandhajathan3746
    @sugandhajathan3746 Год назад +1

    Apratim mulakat...ha karyakram chaluch theva... khup khup subhecha 🙏

  • @aalaapnaigaonkar7537
    @aalaapnaigaonkar7537 Год назад +4

    सगळे भाग फार छान आहेत... अशोक सराफ यांना बघायला खूप आवडेल

  • @anjaligadgil9524
    @anjaligadgil9524 Год назад +1

    खूपच सुंदर मुलाखत झाली. विनय दादा ने इतके प्रयोग केलेत त्यांचे अनुभव अजून ऐकायला आवडले असते.
    पण "गेला माधव" परत पाहिला मात्र नक्की आवडेल.

  • @vinodrane75
    @vinodrane75 Год назад +2

    गेला माधव कुणीकडे पुन्हा येवू दे

  • @neelakshiketkar2562
    @neelakshiketkar2562 Год назад +1

    Khupach chan chalue malika. Yat sangitlyapramane, Gela Madhav lavkar suru karava.. vat baghtoy !
    Dhanyavad

  • @spp4708
    @spp4708 Год назад +1

    प्रशांतजींच्या इतर सर्व सहकलाकाराच्यासोबत पण अशाच गप्पा बघायला आवडतील ... आत्तापर्यंतच्या सर्व बघितल्या आहेत

  • @iam992003
    @iam992003 5 месяцев назад

    संकर्षण काय भारी मुलाखत घेतोस रे !! १ मिनिट पण मिस करता येत नाही एवढं एन्गेजिंग संभाषण. आणि प्रशांत दामले ,विनय येडेकर म्हणजे तर कमालच आहेत , लै भारी.. मजा आली

  • @ojajog9338
    @ojajog9338 Год назад +1

    Khup majja aali ..mghari conversation asawa tasa natural

  • @jaywant7777
    @jaywant7777 Год назад +1

    खुप छान वाटते सर्व मराठी अप्रतिम हीरे दिलखुलास बोलताना. प्रशांत सर, खरच तब्येत सांभाळा, तुम्ही माझे सर्वात आवडते कलाकार आहत, सर्व हॉलीवूड, बॉलीवूड पेक्षा ही.

  • @aparnaphatak506
    @aparnaphatak506 Год назад +3

    अरुण नलावडे यांचीसुद्धा मुलाखत ऐकायला आवडेल.

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Год назад +2

    खरं आहे.माझा नवरा पण नाटक बघताना रडतो.मी पण श्रावण बाळाची गोष्ट,शिवाजी महाराजांची तहां च्या गोष्टी,बाजी प्रभू,तानाजी मालुसरे आशा गोष्टी बघताना अक्षरशः ढसाढसा रडू येत म्हणून मी बघतच नाही.

  • @samirawati1975
    @samirawati1975 Год назад +4

    वंदना गुप्ते यांना पण बोलवा प्लीज

  • @blackblack1553
    @blackblack1553 3 месяца назад

    अरे राम ना तु? यांच्या सारख्या कलाकारांनी आमचे मनोरंजन करुन जीवन समृद्ध केले आभार.

  • @yogitasawant3399
    @yogitasawant3399 Год назад

    Great ek apratim jodi amhala mahit naslele prashant damale ya programme madhun aankhin ulgata jatat mast

  • @vaishalishewale601
    @vaishalishewale601 Год назад +3

    Kharach.... Gela Madhav kunikade.... we want for Naveen Pidhi 😀😀

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 Год назад +2

    Kavita lad yanna kadhi bolavatay?
    Kharach yache khup episodes hou dya. Aamhi fans vat pahat aahot.

  • @sarangag
    @sarangag Год назад +3

    Ek episode sagle back stage team barobar please kara... They are unsung heroes... Khupach chaan.✌

  • @ManishBorde
    @ManishBorde Год назад +1

    gela madhav che tharavik 25 kinva 50 prayog kara hi namra vinanti.
    aapla "madhav" fan

  • @tejajoshi8409
    @tejajoshi8409 Год назад +4

    Beautiful chemistry between all of you
    Got to know the hard work behind the scenes

  • @arunajadeja9324
    @arunajadeja9324 Год назад +1

    हा एपिसोड पाहायला सकाळ सकाळची कामं पण एका बाजुला ठेवावे लागतात. नमस्कार. अफलातून. धन्यवाद.

  • @dilsefunLiveLaughbehappy
    @dilsefunLiveLaughbehappy Год назад +1

    संकर्षण, तू बोलत करतोस, प्रत्येक पाहुण्यांना, त्यांच्या पद्धतीने, खूप छान... विनय आणि प्रशांत सर मस्त, तुम्ही सगळे विथ संदीप पाठक यांना आणि शुभांगी गोखले मिळून नाटक पाहायला आवडेल, कोल्हापूर मध्ये भरपूर प्रयोग करा, 😄👍✨️🙏

  • @JayPatil877
    @JayPatil877 Год назад +3

    सर्व episodes छान आहेत पण तरी एक उणीव जाणवते आहे. प्रदीप पटवर्धन यांच्यासोबत episode हवा होता. अशक्य कोटीतील गोष्ट आहे पण त्यांच्या तोंडून प्रशांत दामले यांचे किस्से ऐकताना मजा आली असती...

  • @madhusudantaori9821
    @madhusudantaori9821 8 дней назад

    My fevrete गेला Madhav कुणीकडे

  • @sudarshanpise2
    @sudarshanpise2 Год назад +4

    Ekch number ❤.. I am so happy to see Kavita Madam at the end 😁😁 too excited to see next episode..

  • @maheshbborhade
    @maheshbborhade Год назад +1

    I love you guys. Amazing. Wish can see you guys again

  • @prasannaranade9689
    @prasannaranade9689 Год назад +1

    masta zalay ha episode... 'gela madhav kuni kade' parat bahayla avdel...sankarshan tuze aabhaar... ya series madhe pudhe kavita laad yana baghayla avdel..thank you

  • @puncturelife
    @puncturelife Год назад

    संकर्षण 1*3 चे सर्वच भाग खूप उत्तम वाटले आणि सर्व किस्से ऐकून फार भारी वाटलं, इतकं की माझी नाटकं किंवा त्याची तालीम घ्यावी अशी इच्छा झाली. तसचं प्रशांत सर याचे जुने प्रयोग जसे की गेला माधव कुणीकडे वगैरे हे पुन्हा रंगमंचावर येणं शक्य असेल तर पाहायला नक्की आवडेल. खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙌👏

  • @anusohoni8895
    @anusohoni8895 Год назад

    सगळेच भाग फार मस्त झाले आहेत...प्रशांत दामले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खूप सारे पैलू समजलेच पण सह कलाकारांनी सांगितलेले किस्से ऐकून धमाल हसलो सगळे...प्रशांत ना उदंड शुभेच्छा...

  • @maheshmahatekar2885
    @maheshmahatekar2885 Год назад +1

    I enjoy all of them. Great.

  • @thEAshayThipse
    @thEAshayThipse Год назад +1

    Manapasun chi iccha aahe sir Gela Madhav kunikade parat yava pratyakshat ekdach baghitla aahe parat pahnyachi khup iccha aahe 🙏🙏☺️☺️

  • @amolmarathe1184
    @amolmarathe1184 2 месяца назад

    Excellent 🎉🎉❤❤Loved this

  • @sainathchavan4034
    @sainathchavan4034 Год назад +1

    please Gela Madhav Punha kara... Prashant sir... Khup pratisad milel aajahi... God bless you... forever.... 😊🥰😇🙏

  • @dhanshreewankhedkar1681
    @dhanshreewankhedkar1681 Год назад

    अप्रतिम कार्यक्रम सादर होत आहे...प्रशांत सरांना खूप मनापासून शुभेच्छा

  • @tejalsamant7686
    @tejalsamant7686 Год назад +1

    सग़ळे एपिसोड अप्रतिम…. प्रशांत दामले याना ख़ुप ख़ुप शुभेच्छा… गेला माधव नाटक प्लीज़ पुन्हा करा..

  • @abhilashchaudhari-yr1ef
    @abhilashchaudhari-yr1ef 5 месяцев назад

    गरिबीतून वर आलेले कलाकार जाणीव ठेवतात, विनय दादा सलाम तुमच्या sincerity ला

  • @renukabhosle7310
    @renukabhosle7310 Год назад +1

    अप्रतिम कार्यक्रम आहे, याचे अनेक भाग बघायला आवडतील ,धन्यवाद

  • @anupparchure6255
    @anupparchure6255 Год назад

    Apratim show. Mastach ekdum

  • @sunitakekre5230
    @sunitakekre5230 Год назад

    संकर्षण सगळेच एपीसोड फारच छान आहेत मजा येतेय बघायला असेच अनेक एपीसोड व्हावे
    हाच आशिर्वाद

  • @poonamgawde4329
    @poonamgawde4329 Год назад +1

    विनय येडेकर, प्रशांत दामले, संकर्षण..... मस्त एपीसोड..... 👌👌

  • @user-vs9qc8rw3y
    @user-vs9qc8rw3y 4 месяца назад

    खूप खूप छान सर्व भाग सर्व नाटकं मंडळी 😊 sankarshan तर *कमाल*

  • @swatikokaje7129
    @swatikokaje7129 Год назад +1

    १x३ ची भट्टी मस्त जमली आहे.
    खरच गेला माधव पुन्हा करा. पुन्हा एकदा enjoy करु दे. गेला माधव मी फक्त ३ दाच बघितले. ३ नही वेळी गंर्धवला.
    मुंबई ची मंडळी lucky १२५०० प्रयोग बघणार.

  • @sakshibendre1971
    @sakshibendre1971 Год назад +1

    गेला माधव कुणीकडे लाईव्ह बघायला नक्की आवडेल RUclips वर बरेचदा बघितला आहे

  • @prashantghaisas3750
    @prashantghaisas3750 Год назад

    Khup sunder suru ahe..Great

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 Год назад +2

    Masta series ahe. Pls invite vandana gupte, arun nalavde

  • @TheParag18
    @TheParag18 Год назад +2

    सुंदर मुलाखत, हसून हसून पोट दुखल....खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @tanishqgosavi9199
    @tanishqgosavi9199 Год назад

    वा आहेच एपिसोड होत राहो ....अप्रतिम आणि खूप मस्त एपिसोड ....👍👍🙏❣️

  • @shwetabhandare7307
    @shwetabhandare7307 Год назад +1

    We are enjoying these videos
    Keep making these videos 👌👌

  • @prodevidas
    @prodevidas Год назад

    अप्रतिमच 👌👍🙏❤️

  • @swarille-healingwithmusic.9579
    @swarille-healingwithmusic.9579 Год назад +1

    1×3 Team
    प्रत्येक भाग ( episode) स्वाध्याय म्हणून उपयोगी आहे.
    धन्यवाद 🙏🏼

  • @tanishkaganu463
    @tanishkaganu463 Год назад +1

    उत्तम एपिसोड्स आहेत, संकर्षण छान मुलाखत घेत आहेस...प्रशांत दामले विनोदाचे बादशहा आहेत, त्यांच्या 12500 ... हा विक्रम मराठी प्रेक्षकांना अभिमान वाटावा असा आहे..

  • @rajendrabadve5289
    @rajendrabadve5289 Год назад

    अतीशय सुंदर

  • @pradeeppatki2134
    @pradeeppatki2134 Год назад

    Ekdum zakas mulakhat

  • @kvisualtree
    @kvisualtree Год назад +1

    Was fortunate to watch 'Gela Madhav Kunikade' at Shivaji Mandir Natyagruh and also at Bhagini Samaj, Hindu Colony during Ganpati Festival.
    Also seen 'Hasat Khelat' - Ashok Saraf and Vinay Yedekar at Shivaji Mandir.
    Both plays are simply hilarious. It's a everlasting memory which I keep rewinding and can talk about for hours.
    Wish to see Prashant Damle's new play soon.
    👍

  • @prachivaidya4100
    @prachivaidya4100 Год назад +1

    Too good sarvach episode Masta , maja yete baghayala

  • @poojaumrani4520
    @poojaumrani4520 Год назад

    Too good.. Sankarshan..keep it up..and best wishes..🍫🍫

  • @tejalkhanolkar2027
    @tejalkhanolkar2027 Год назад +1

    आजचा भाग एकदम लाजवाब.. अशीच मैत्री कायम राहो

  • @mmagar33
    @mmagar33 Год назад

    सर्वच भाग खूप छान आहेत 👍

  • @jyotsnadeo7031
    @jyotsnadeo7031 Год назад

    खूप बहारदार कार्यक्रम ,मजा आली.

  • @manalibhandare-patwardhan1127
    @manalibhandare-patwardhan1127 Год назад

    सर्व एपिसोड अप्रतिम ❤️❤️❤️

  • @pranitakirkire2272
    @pranitakirkire2272 Год назад

    As usual खूपच छान झाला हा सुद्धा भाग

  • @pragikeskar6140
    @pragikeskar6140 Год назад

    अतिशय उत्तम कार्यक्रम

  • @yogeshkulkarni9174
    @yogeshkulkarni9174 2 месяца назад

    खूप छान पैलू कळाले. खूपच मस्त 👌

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 Год назад

    खूप छान भाग आहेत.

  • @Smita-Shinde
    @Smita-Shinde Год назад +1

    छान वाटले ऐकून 💐

  • @tanmaishintre4978
    @tanmaishintre4978 Год назад

    सगळे भाग ही उत्तम मेजवानी च आहे...मस्त मस्त मस्त मस्त

  • @vrishalivenegurkar3029
    @vrishalivenegurkar3029 Год назад

    प्रत्येक ईपिसोड आणि गमतीजमती ऐकून मस्त वाटते.

  • @a.s.617
    @a.s.617 Год назад

    ग्रेट कलाकार.मनापासून शुभेच्छा 🙏

  • @saritamalik84
    @saritamalik84 Год назад

    एकदम मस्त.

  • @dinesh675
    @dinesh675 Год назад +3

    संकर्षण आणि स्मृती गंध, प्लिज प्लीज प्लीज ही सिरीज सुरू ठेवा. Nostalgia आहे हा. निव्वळ महिफिल.

  • @sinduradixit4072
    @sinduradixit4072 Год назад

    फारच सुंदर. 👍🙏

  • @pandurangshedge7798
    @pandurangshedge7798 5 месяцев назад

    एपिसोड खुप छान आसतात, प्रशांत दामले तर खूपच मस्त संकर्षण प्रश्न संवाद खूपच सुंदर, मी सुध्दा नाटकात बॅक स्टेज ला काम केले आसल्याने मला काही वर्ष मागे गेल्या सारखं वाटल

  • @bewithvarunandaditya.7498
    @bewithvarunandaditya.7498 Год назад

    Khupach chhan episode

  • @blackblack1553
    @blackblack1553 3 месяца назад

    आता मी पण प्रशांत आणि विनय १० नाटकं बघत नाही तो पर्यंत नाटक तिकीट काढून बघणार नाही