Dhavalgad Fort | ढवळगड - इतिहासात फारशी नोंद नसलेला पुरंदर तालुक्यातील अंबाळे गावाजवळ असलेला किल्ला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • #dhavalgad #dhavalgadfort #ढवळगड
    ढवळगड - पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील डोंगरी किल्ला. हा किल्ला आंबळे गावाजवळ भुलेश्वरच्या डोंगर रांगेवर, समुद्रसपाटीपासून ८६४ मी. (पायथ्यापासून १०० मी.) उंचीवर वसलेला आहे. मराठी साम्राज्यातील रणधुरंधर सरदार खंडेराव दरेकरांमुळे आंबळे या गावाची इतिहासात नोंद आहे. गावातच दरेकारांचा मोठा वाडा आहे. गावाच्या पाठीमागे म्हणजेच उत्तरेला ५ किमी. अंतरावर ढवळगड आहे. किल्ल्यावर ढवळेश्वराचे मंदिर असून ते आंबळे गावापासून १३० मी. उंच डोंगरावर आहे. जिल्ह्याचे ठिकाण पुणे येथून ढवळगडाला जाण्यासाठी पुणे-सासवड-वनपुरी-सिंगापूर-पारगाव चौफुला-वाघापूर-आंबळे असा रस्ता आहे. सासवडपासून हे अंतर साधारणपणे १८ ते २० किमी.
    इतिहासात फारशी नोंद नसलेला ढवळगड पुरंदर तालुक्यातील अंबाळे गावाजवळ असलेला किल्ला. भेटलेल्या माहितीनुसार समजत की, या किल्ल्याबद्दल इतिहासकार कृष्णाजी पुरंदरे यांच्या 1940 साली प्रकाशित झालेल्या " किल्ले पुरंदर " थोडीफार संदर्भ येतो. पुस्तकात भुलेश्वर डोंगर रांगेचे वर्णन करताना मल्हारगड, भुलेश्वर उर्फ दौलतमंगळ व ढवळगड या किल्ल्यांचा उल्लेख केलेला असून त्यात हे तिन्ही किल्ले पुरंदर परिसरात असल्याचे नमूद आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या ग्रंथातही ढवळगडाचा उल्लेख आढळतो.
    किल्ल्यावरील अवशेषांचे पुरातत्त्वीय सर्वेक्षण करून त्याची विस्तृत माहिती आणि किल्ला असल्याचे भक्कम पुरावे भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकामध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
    ढवळगड किल्ल्याचा कालखंड कोणता असेल याबाबत निश्चितपणे सांगता येत नाही. ढवळगड आणि शेजारीच असलेला मल्हारगड या दोन किल्ल्यांच्या बांधकामामध्ये खूप साम्य आढळून येते. ढवळगड किल्ल्याचा बुरूज आणि मल्हारगड किल्ल्यावरील बुरूज यांत बरेच साम्य आहे. त्यामुळे हा किल्ला उत्तर पेशवाई कालखंडात बांधला असण्याची शक्यता जास्त आहे.
    संदर्भ :
    एक्के, शिवाजीराव, पुरंदरचे धुरंदर, पुणे, २०१६.
    पुरंदरे, कृ. वा. किल्ले पुरंदर आणि परिसर, पुणे, १९४०.
    साने, का. ना. सभासद बखर, आवृत्ती तिसरी, पुणे, १९२३.
    जोशी, सचिन विद्याधर; ओक, ओंकार, ‘ढवळगड : एक पुरातत्त्वीय अभ्यासʼ, त्रैमासिक, भारत इतिहास संशोधक मंडळ, वर्ष ९४, अंक १ ते ४, पुणे, २०१८.
    गडावर पाहण्याची ठिकाणे -
    किल्ल्यावर जाताना पायथ्याशी एक चुन्याचा घाना लागतो. थोडं अंतर वर चालून आलं की हनुमानाची वैशिष्ट्य पूर्ण मूर्ती पाहायला मिळते जी दगडाच्या दोन्ही बाजूला कोरलेली आहे.
    पायऱ्या चढून वर आलं की एक छोटंसं गणपती मंदिर आहे . गणपती मंदिर पासून काही पायऱ्या चढलं की आपण पोहचतो गडाच्या दरवाज्या जवळ . दरवाजाची थोडी पडझड झाली आहे , शेजारीच एक बुरुज ही दिसतो .दरवाज्यातून पुढे आले की दोन पाण्याची टाके आहेत. गडावर ढवळेश्वराचं मंदिर , बहुदा याच मंदिरावरून गडाला ढवळगड अस नाव पडल असावे.
    गडाच्या बांधणी वरून समजत की हा एकदा पेशवेकालीन किल्ला असावा, जो निगरणीचा किल्ला म्हणून बांधला असावा जसकी जवळचेच मल्हारगड आणि भुलेश्वर .
    Dhavalgad fort
    dhavalgad fort near saswad
    Dhavalgad fort history
    Dhavalgad fort height
    Dhavalgad fort wikipedia
    Dhavalgad fort story
    Dhavalgad fort information in marathi wikipedia
    Dhavalgad fort information in marathi pdf
    dhavalgad latest video
    dhavalgad fort latest video
    dhavalgad drone videos
    dhavalgad fort drone videos
    ढवळेश्वराचं मंदिर
    आंबळे

Комментарии • 23

  • @weekendtravelsin
    @weekendtravelsin  29 дней назад +1

    Correction: गावाचे नाव आंबळे | Correct village name: Ambale

  • @rayhanmondalblogs
    @rayhanmondalblogs 26 дней назад +1

    Nice information and beautiful video
    You have covered everything that is needed.. Thanks 🙏👍

  • @Ratna_Mala
    @Ratna_Mala Месяц назад +1

    Very nyc video

  • @jayadventures7258
    @jayadventures7258 Месяц назад +1

    पुस्तकात भुलेश्वर डोंगर रांगेचे वर्णन करताना मल्हारगड, भुलेश्वर उर्फ दौलतमंगळ व ढवळगड या किल्ल्यांचा उल्लेख केलेला असून त्यात हे तिन्ही किल्ले पुरंदर परिसरात असल्याचे नमूद आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या ग्रंथातही ढवळगडाचा उल्लेख आढळतो.
    किल्ल्यावरील अवशेषांचे पुरातत्त्वीय सर्वेक्षण करून त्याची विस्तृत माहिती आणि किल्ला असल्याचे भक्कम पुरावे भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकामध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

  • @jagdishjoshi8733
    @jagdishjoshi8733 Месяц назад +1

    Good information.. Thanks. 🙏

    • @weekendtravelsin
      @weekendtravelsin  Месяц назад

      Thank you 🙏 for your valuable support 😊
      I am glad you like the video and information 🙏👍

  • @jayadventures7258
    @jayadventures7258 Месяц назад +1

    इतिहासात फारशी नोंद नसलेला ढवळगड पुरंदर तालुक्यातील अंबाळे गावाजवळ असलेला किल्ला. भेटलेल्या माहितीनुसार समजत की, या किल्ल्याबद्दल इतिहासकार कृष्णाजी पुरंदरे यांच्या 1940 साली प्रकाशित झालेल्या " किल्ले पुरंदर " थोडीफार संदर्भ येतो.

  • @jayadventures7258
    @jayadventures7258 Месяц назад +1

    एक्के, शिवाजीराव, पुरंदरचे धुरंदर, पुणे, २०१६.
    पुरंदरे, कृ. वा. किल्ले पुरंदर आणि परिसर, पुणे, १९४०.
    साने, का. ना. सभासद बखर, आवृत्ती तिसरी, पुणे, १९२३.
    जोशी, सचिन विद्याधर; ओक, ओंकार, ‘ढवळगड : एक पुरातत्त्वीय अभ्यासʼ, त्रैमासिक, भारत इतिहास संशोधक मंडळ, वर्ष ९४, अंक १ ते ४, पुणे, २०१८.

  • @jayadventures7258
    @jayadventures7258 Месяц назад +1

    गावाच्या पाठीमागे म्हणजेच उत्तरेला ५ किमी. अंतरावर ढवळगड आहे. किल्ल्यावर ढवळेश्वराचे मंदिर असून ते आंबळे गावापासून १३० मी. उंच डोंगरावर आहे. जिल्ह्याचे ठिकाण पुणे येथून ढवळगडाला जाण्यासाठी पुणे-सासवड-वनपुरी-सिंगापूर-पारगाव चौफुला-वाघापूर-आंबळे असा रस्ता आहे. सासवडपासून हे अंतर साधारणपणे १८ ते २० किमी.

  • @jayadventures7258
    @jayadventures7258 Месяц назад +1

    गडावर पाहण्याची ठिकाणे -
    किल्ल्यावर जाताना पायथ्याशी एक चुन्याचा घाना लागतो. थोडं अंतर वर चालून आलं की हनुमानाची वैशिष्ट्य पूर्ण मूर्ती पाहायला मिळते जी दगडाच्या दोन्ही बाजूला कोरलेली आहे.

  • @jayadventures7258
    @jayadventures7258 Месяц назад +1

    पायऱ्या चढून वर आलं की एक छोटंसं गणपती मंदिर आहे . गणपती मंदिर पासून काही पायऱ्या चढलं की आपण पोहचतो गडाच्या दरवाज्या जवळ . दरवाजाची थोडी पडझड झाली आहे , शेजारीच एक बुरुज ही दिसतो .दरवाज्यातून पुढे आले की दोन पाण्याची टाके आहेत. गडावर ढवळेश्वराचं मंदिर , बहुदा याच मंदिरावरून गडाला ढवळगड अस नाव पडल असावे.
    गडाच्या बांधणी वरून समजत की हा एकदा पेशवेकालीन किल्ला असावा, जो निगरणीचा किल्ला म्हणून बांधला असावा जसकी जवळचेच मल्हारगड