Sarasgad Fort Pali Raigad Dist ( Sarasgad Killa ) | सरसगड किल्ला पाली ( किल्ले सरसगड ) जिल्हा रायगड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • #sarasgad #sarasgadfort #nearpune #fortsofindia #fortsinmaharashtra #fort #sahyadrimountains #sahyadri #raigad
    सरसगड जिल्हा रायगड | किल्ल्याचा प्रकार गिरीदुर्ग
    पाली हे अष्टविनायकांपैकी एक ठिकाण. येथील गणपती‘बल्लाळेश्वर’ म्हणून ओळखला जातो. याच पाली गावाच्या सीमेला लागून उभा असणारा गड म्हणजे सरसगड. पाली गावात जाताच या गडाचे दर्शन होते. या गडाचा उपयोग मुख्यता टेहळणीसाठी करत असत. या गडावरून पाली व जवळच्या संपूर्ण परिसरावर टेहळणी करता येते. शिवाजी महाराजांनी या गडास आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतले आणि किल्ल्याच्या डागडुजीसाठी २००० होन मंजूर केले. स्वातंत्र्यप्राप्ती पर्यंत या गडाची व्यवस्था ‘भोर संस्थानाकडे होती.
    सरसगड माची व बालेकिल्ला या दोन भागात विभागलेला आहे. पाली गावातून डोंगरधारेवरून गडाच्या माचीवर जातांना दोन कातळ कड्यांमध्ये (नाळेत) कातळात खोदलेल्या १०० पायर्या चढाव्या लागतात. पायर्यांच्या वाटेवर कातळात कोरून काढलेले प्रवेशव्दार पाहायला मिळते. प्रवेशव्दारावर कलश कोरलेला आहे. प्रवेशव्दारच्या आतील बाजूस खांब असलेली खोली (देवडी) आहे. पायर्या संपल्यावर आपला दिंडी दरवाजातून माचीवर प्रवेश होतो.
    दिंडी दरवाजाला लागूनच तिहेरी तटबंदीची रचना आपणास बघावयास मिळते. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे वळावे आणि १५ पायर्या वर चढाव्यात, म्हणजे तटबंदी दिसते. दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे गेल्यावर एक मोठा पाण्याचा हौद (‘मोती हौद’) आहे. पुढे तसेच उत्तरेकडे चालत गेल्यावर पाण्याच एक टाक व वास्तुंचे काही चौथरे पाहायला मिळतात. उत्तर टोकाला एक दगडांनी बांधलेला दरवाजा आहे. त्याला उत्तर दरवाजा म्हणतात. दरवाजा जवळ एक भुयारी मार्ग आहे. सध्या हा मार्ग मात्र बुजलेला आहे. पुढे गडावर येणारा दुसरा मार्ग आहे. दरवाजातून खाली उतरून गेल्यावर उजवीकडे कातळात खोदलेल्या गुहा आहेत. परत दरवाजाजवळ येऊन डावीकडे गेलो की १५ पायर्या चढाव्या लागतात आणि मग बालेकिल्ल्याचा पायथा लागतो.
    बालेकिल्ल्याचा पायथा : समोरच एक मोठा पाण्याचा हौद आहे. येथे बारामाही पाणी असते. हौदाच्या डाव्या बाजूस एक शहापीराचे थडगे आहे. त्याच्या जवळच पुन्हा पाण्याची तळी आहेत.जवळच कपारीत शंकराची एक पिंड आहे. या कपारीत आपणास रहाता येते. हौदाच्या उजव्या बाजूला काही धान्यकोठारे , शस्त्रागारे आहेत. तसेच निवासस्थाने, आखाडा व कैदखाना देखील आहे. येथे दहाबारा जणांची रहाण्याची सोय होते. पुढे बालेकिल्ल्यावर जाण्याचा मार्ग लागतो.
    बालेकिल्ला माथा : बालेकिल्ल्याच्या माथ्यावर केदारेश्वराचे मंदिर आहे येथे एक तलाव आहे. टेहळणीसाठी दोन बुरूज आहेत. या बालेकिल्ल्यावरून समोरच असणारा तीन कावडीचा डोंगर दिसतो. समोरच उभा असणारा सुधागड, तैलबैला, घनगड आणि कोरीगड दिसतो तसेच पालीगाव, अंबानदी, उन्हेरीची गरम पाण्याची कुंडे, कोकण,जांभुळपाडा असा सर्व परिसर दिसतो. वैशाख पौर्णिमेला गडावरील शहापीराचा उरूस भरतो. महाशिवरात्रीला केदारेश्वराला भाविकांची गर्दी असते.
    सरसगड पाहायला दोन ते तीन तासात लागतात.
    गडावर जाण्यासाठी मात्र ‘दिंडी’ दरवाजाची वाट वापरात आहे. पाली गावात उतरून या दरवाज्याने गडावर जाता येते. मंदिराच्या मागील बाजूस असणार्या डांबरी रस्त्यावरून डावीकडे वळावे आणि मळलेली वाट पकडावी. ही वाट सरळसोट असून आपणास थेट गडाच्या बुरुजापर्यंत आणून सोडते. बुरुजाच्या पायथ्याशी एक खोली आहे. या खोलीचा उपयोग पहारेकर्यांना राहण्यासाठी होत असे. पुढे दरवाज्यापर्यंत जाण्यासाठी ९६ पायर्या चढाव्या लागतात. या पायर्या जरा जपूनच चढाव्यात कारण पाय घसरला तर दरीत पडण्याचा धोका उद्भवतो. पायर्यांची वाट फार दमछाक करणारी आहे. या पायर्या आपल्याला सरळ दरवाजापर्यंत आणून सोडतात.
    गडावर जाण्यासाठी अजून एक वाट असून ती फारशी वापरात नाही. पालीहून तेलारी गावात जावे. तेलारी गावातून घळीमार्गे उत्तर दरवाजा गाठावा.
    Sarasgad fort is situated near village Pali in the Raigad district of Maharashtra. Pali lies about 10 kilometres East of Nagothane along the Nagothane-Khopoli road. This fort height from sea level is 490 meters. It was one of the forts which was captured by Malik Ahmad Nizam Shah I of Ahmednagar in his konkan campaigns in 1485. Shivaji Maharaj gave 2000 hones (golden coin used as currency during Shivaji Maharaj's time) for repairing the fortifications of this fort. After the victory over Vasai, Chimaji Appa donated a Portuguese bell to the Ballleshwar temple which he had brought from Vasai in 1739. Till independence, this fort was in Bhor princely state.On the top is the Shiva temple providing an excellent panoramic view of all the mountain ranges surrounding this area. Sudhagad, Sankshi fort, Sagargad and TailBaila can be easily viewed from the top of Sarasgad. There are many caves that were used for soldiers and other purposes because the fort has the very little area available on its top. There are around ten tanks carved in rocks. They provide cool water supply throughout the year, which is very important for any fort.
    सरसगड किल्ला पाली किल्ले सरसगड जिल्हा रायगड
    #sarasgad
    #sarasgadfort
    sarasgad trek difficulty
    sarasgad photos
    sarasgad trek
    sarasgad information in marathi
    sarasgad pali
    how to reach sarasgad
    sarasgad map
    sarasgad Fort Trek blog speed climbing
    sarasgad fort distance
    sarasgad information in marathi
    Sarasgad fort history
    Sarasgad fort difficulty level
    Sarasgad fort trek
    Sarasgad fort wikipedia
    sarasgad trek
    Sarasgad fort height
    fort near pali ganpati
    sarasgad information in marathi wikipedia
    sarasgad information in marathi in english
    marathi travel vlog

Комментарии • 8

  • @ट्रॅव्हल्लोव्हर

    👍 मस्त विडिओ

  • @jayadventures7258
    @jayadventures7258 4 месяца назад +1

    बालेकिल्ल्याचा पायथा : समोरच एक मोठा पाण्याचा हौद आहे. येथे बारामाही पाणी असते. हौदाच्या डाव्या बाजूस एक शहापीराचे थडगे आहे. त्याच्या जवळच पुन्हा पाण्याची तळी आहेत.जवळच कपारीत शंकराची एक पिंड आहे. या कपारीत आपणास रहाता येते. हौदाच्या उजव्या बाजूला काही धान्यकोठारे , शस्त्रागारे आहेत. तसेच निवासस्थाने, आखाडा व कैदखाना देखील आहे. येथे दहाबारा जणांची रहाण्याची सोय होते. पुढे बालेकिल्ल्यावर जाण्याचा मार्ग लागतो.

  • @sarveshmore4382
    @sarveshmore4382 3 месяца назад +1

    Dada khopoli kadn bus ahet ka pali la jaila ani timing mahit ahe ia tula

    • @weekendtravelsin
      @weekendtravelsin  3 месяца назад

      Mitra.. Khopoli Pali bus seva ahey. Khopoli pasun Pali javal ahey va road suddha khup chan ahey. Me timing check karun sangto..