महाड (सव) येथील गरम पाण्याचे झरे Sav Hot Water Springs, Mahad-Raigad Sav Garam Pani. | kokan vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2020
  • सव ः मुंबई-गोवा महामार्ग महाडजवळ जिथे सावित्री नदीला खेटून जातो तिथे नदीपल्याड जो हिरवागार देवराईसारखा परिसर दिसतो तिथे सवची गरम पाण्याची कुंडे आहेत. इथे होडीने नदी ओलांडून पलीकडे जावे लागते. झाडीतून गेलेली पायवाट आपल्याला कुंडापाशी आणून सोडते. कुंडांना लागूनच शाह शैलानी यांचा दर्गा आहे. दर्ग्यातील स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे. इथे जानेवारी-फेब्रुवारीत उरूस भरतो. कुंडाचा तळ नारळाच्या खोडांपासून बनवला असून, त्यामुळे कुंडाची खोली कमी झाली आहे. परिणामी, डुंबणे सुरक्षित झाले आहे. आसपास बरीच घरे असून, बहुतेक वस्ती मुसलमान बांधवांचीच आहे. इथे यायला आणखी एक वाट आहे, पण ती लांबची आहे. महाड-आंबेत रस्त्यावरून शेतातून/ बांधावरून गेलेल्या वाटेने सुमारे 15 मिनिटे पायपीट केली की आपण या कुंडाशी येतो.
    या गंधकयुक्त पाण्यात चर्मरोग बरे करण्याचा गुणधर्म असून तेथे भाविकांसाठी व पर्यटकांसाठी स्नानाचीही व्यवस्था आहे. या गरम पाण्याच्या कुंडालगतचा परिसर खूप रम्य आहे. समोरचा निसर्ग, तसेच किल्ले सोनगड, जवळची सावित्री नदी, हिरवीगच्च झाडी अशा निसर्गरम्य परिसरात वसलेली सव येथील गरम पाण्याची कुंडं जरूर भेट द्यावीत अशीच आहेत.

    location link :- maps.app.goo.gl/YqW3hhuB5Qu5n...
    #Mahad #Raigad #Kokan #Garampanyachezare
    #Hotwatersprings
    #Savgarampani
    #kokansafar #mahadkar #marathivlogs

Комментарии • 86