Jambharun Village : पाटपाखाडीचे गाव जांभरुण | रत्नागिरी पर्यटन | Ratnagiri Tourist Places | Harifi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 мар 2024
  • #Jambharun #kokan #ratnagiri
    कोकण आणि समुद्र हे समीकरण पहिल्यापासून रुळलेले आहे. पण त्यापलीकडे सह्याद्रीच्या डोंगरामध्ये वसलेल्या कोकणाची एक वेगळी संस्कृती आहे.
    .याच कोकणातले काही पट्टे असे आहेत ज्या पट्ट्यात आजही दाट जंगल आहे.
    जांभरुणला जाणारा रस्ता असाच आहे.
    दाभोळची खाडी ओलांडली की गुहागरवरुन शृंगारतळी अबलोली जाकादेवी मार्गे एक रस्ता जातो कोतावडेला याचा रस्तावर कोतावडेच्या अलीकडे ४ किलोमीटर एक छोटा फाटा आपल्याला घेऊन जातो जांभरुणच्या अद्भूत दुनियेत.
    पण याआधी रस्त्यात लागतो तो भातगावचा पूल...
    भातगावचा पूल हा बाव आणि जयगड नदीच्या संगमावर बांधलेला आहे. समुद्रापलिकडच्या कोकणाचे आगळेवेगळे दर्शन या पुलावरुन घडले. हिरवेगार डोंगर, मध्ये नदीचे निळेशार पाणी आणि त्यामुळे असलेला हा पूल डोळयाचे पारणे फेडतो.
    भातगावचा पूल ओलांडून आम्ही जांभरुणच्या वाटेला लागलो. जांभरुण हे आडेवाटेवरचे गाव असल्यामुळे अर्थातच तिथे अजून फारसे चांगले रस्ते नाहीत. तिन्ही बाजूंनी डोंगराने वेढलेले असल्यामुळे जांभरुणला जाणारा छोटासा रस्ता गर्द आमराईतून जातो.
    अगदीच तुऱळक अशी वस्ती आणि घनदाट झाडी यामुळे तुमचं जांभरुण गावाविषययीचे कुतुहल वाढलेले असतं.
    रस्ता विचारत... चुकत मूकत का होईना... आम्ही एकदाचे... जांभरुण कॉटेजेसला पोचलो...
    जांभरुणमध्ये पोचल्यावर तुम्हाला लगेचच दिसते ती पाखाडी.
    अडीचशे वर्षापुर्वीची ती वाट तुम्हाला थेट सड्यावर घेऊन जाते
    जिथे हजारो वर्षापासूनचा एक चमत्कार तुमची वाट बघत असतो.
    जांभरुणातून सड्यावर आलात की सुमारे साडेतीन चार किलोमीटर तुम्हाला चालावे लागते. रमतगमत गेलात तरी ४० मिनिटात तुम्ही पोचता जांभरुण गावाचे प्राचीन पुराण सांगणाऱ्या एका प्रागैतिहासिक वारश्याजवळ...
    कातळशिल्पांचा अनुभव अत्यंत भारावून टाकणारा होता. कातळावर कोरलेली ही काही चित्र तुम्हाला काही हजार वर्ष मागे घेऊन जातात.
    मावळत्या सुर्यासमोरच आम्ही परतीची वाट धरली. सोबत आलेल्या दिपेशसोबत गावातल्या बिबट्याच्या गोष्टी ऐकत आम्ही मुक्कामी परतलो.
    जांभरुण हे गाव जसं ऑफबीट आहे तसंच आनंद केळकर यांनी उभारलेली जांभरुण कॉटेजेस ही जागासुध्दा ऑफबीटच.
    १९९७ साली आंब्याच्या व्यवसायानिमित्त केळकर इथे आले आणि इथलेच झाले. मुळात निसर्गाची आवड आणि समज उत्तम असल्याने केळकरांनी निसर्गाच्या मुळ गाभ्याला धक्का न लावता जांभरुण कॉटेजेसची जागा अजूनच फुलवली. जांभरुण कॉटेजची जागा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. जांभरुणमधल्या कोणत्याही रानवाटेवर जायचं असेल तर इथूनच जावं लागतं.
    कातळशिल्पांच्या साक्षीने सूर्य़ मावळल्यानंतर आम्ही जांभरुणच्या वाटांवर रात्री फिरायला पडलो. जांभरुणच्या जैवविविधतेचे जे कौतुक ऐकलं होतं त्याची प्रचिती लगेचच आली. भर रस्तात एक डुरक्या घोणस जातीचा दुर्मिळ साप दिसला. डुरक्या घोणस हा बिनविषारी असतो. त्यात तो मातीतून डांबरी रस्त्य़ावर आल्यामुळे बिचारा सुस्तावला होता.
    आता जांभरुणचा मुक्काम खऱ्या सार्थकी लागला होता.
    दुसरा दिवस उजाडला तो धनेशच्या आवाजाने. मलबार पाईड हॉर्नबील आंब्याच्या झाडावर बसून सगळ्या गावाला आवाजात साद घालत होता. धनेशाचे हे आस्त्विव जांभरुणची जैवविविधता दाखवत होती.
    कातळशिल्पानंतर आता आम्ही बघणार होतो ती जांभरुणमधली जुनी मंदिरं. ही मंदिर साक्ष देतात की शेकडो वर्षापासून इथली माणसं नुसती नांदत नव्हती तर या मंदिरांच्या माध्यमातून स्थापत्यकला, श्रध्दा, धर्म, कुळाचार अगदी निगुतीने जपत होती. खऱ्या अर्थाने समृध्द होती.
    जांभरुणात एकूण 5 मंदिरं आहेत. त्यातली 4 ही खासगी मालकीची आहे. गावातल्या शितूत कुटुंबियांच्या मालकीची ही मंदिरं आहेत. त्यांच्याकडूनच या मंदिरांची देखरेख केली जाते.
    विष्णुचे पहिले मंदिर बघितल्यानंतर आम्ही निघालो दुसऱ्या मंदिराकडे. दुसर मंदिर होतं ते श्रीकृष्णाचं. वाटेत एका ठिकाणी दिसला तो जांभरुणचा पॅनोरमा... डोंगरावर उतरलेल्या कोवळ्या उन्हात वनराईचा आमराईचा हिरवा पट्टा झळाळत होता.
    डोंगरातून फिरवलेली पाखाडीची वाट उतरत गेलं लागतं जांभरुणातलं तिसरं मंदिर रत्नेश्वराचे मंदिर.
    या मंदिरात महादेवाची पिंड आहे. महाशिवरात्रीला इथे मोठा उत्सव भरतो. सगळे शितूत कुटुंबिय इथे उपस्थित असतात. या मंदिराला रंगरंगोटी करुन छान निगा राखली होती. कोकणातल्या जाणवलेल्या मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे इथली शांतता आणि इथे येणारी अनुभुती.... निसर्गाशी, तुमच् विश्वास असेल तर देवाशी, अशा ठिकाणी लवकर कनेक्ट होता येतं...अर्थात हा ज्याच्या त्याच्या श्रध्देचा भाग...
    जांभरुणची पाचही मंदिर बघून झाल्यानंतर आता जांभरुणच्या सगळ्यांत वैशिष्ट्यपुर्ण गोष्टीकडे आपण वळणार होतो.
    जांभरुण म्हणजे पाटपाखाड़ीचे गाव. त्यातली पाखाडी तर आपण पाहिली आता राहिला तो पाट... हा पाट म्हणजे जांभरुणची लाईफ लाईन आहे.
    शेकडो वर्षापुर्वी आपल्या पुर्वजांनी डोंगऱ्यातल्या झऱ्यांना खेळवत गावात आणले. जमिनिच्या आणि पाण्याच्या लेव्हल ओळखत केलेला हा सगळा खेळ. या पाटातून बारा महिने पाणी वाहत असतं. याच पाण्यावर जांभरुणमधली वनसंपदा, पशुसंपदा ही आजही टिकून आहे.
    जांभरुणची ओळख म्हणजे या गावातून बारा महिने वाहणारे झरे...
    सह्याद्रीच्या सड्यांवर ४ महिने कोसळणारा महामूर पाऊस येथे कातळ पिऊन घेतात आणि झऱ्यांच्या रुपाने हे पाणी जांभरुणला देतात.
    केळकर काकांनी दिलेल्या माहितीनुसार जांभरुणात जे झरे आहेत त्यातून वेगवेगळ्या लेव्हल २१ पाट काढलेले आहेत आणि गावातल्या सगळ्या घरांमध्ये हे पाणी पाटाने फिरवले आहे.
    बरं हे पाट काही आत्ताचे नाहीत तर सुमारे अडीचशे वर्षापासून ते आहेत म्हणजे अडीचशे वर्षापुर्वी ज्या आपल्या पुर्वजांना ही कल्पना हे इंजिनिअरिंग सुचले असेल त्यांना नक्कीच दाद द्यायला हवी.
    या पाटाच्या बाजूने वाहणाऱ्या नदीत एक सुंदर डोह आहे. दुपारची वेळ, घनदाट झाडी आणि त्यात पुरुषभर उंचीच थंडगार डोह..
    हा डोहात मनसोक्त डुंबलो आणि निघालो परतीच्या वाटेवर.

Комментарии • 43

  • @Beautiful_Kokan1
    @Beautiful_Kokan1 4 месяца назад

    खूप सुंदर.

  • @shitalshinde5779
    @shitalshinde5779 5 месяцев назад +1

    तुमच्या दोघांमुळे कोकण सहलीचा आनंद मिळत आहे घरी बसल्या बसल्य

  • @vijayjoshi1805
    @vijayjoshi1805 5 месяцев назад +1

    फारच सुरेख.हा व्हिडिओ बघणे म्हणजे एक मनःशांती चा व्यायाम प्रकार आहे. मस्त

  • @shardachavan6011
    @shardachavan6011 4 месяца назад +1

    सगळ्या भारी तुमचा भारदस्त आवाज🤗🤗👍👍👍

    • @Harifi_
      @Harifi_  4 месяца назад

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल खूप आभारी आहे.
      कृपया आमचा Harifi हे चॅनल सबस्क्राइब करा.

  • @manjirikarambelkar6572
    @manjirikarambelkar6572 5 месяцев назад +2

    कोकण म्हणजे स्वर्गच❤

  • @pushpavatipatil5471
    @pushpavatipatil5471 5 месяцев назад +1

    आपल निवेदन एकदम भारदस्त!
    फापटपसारा नाही .आटोपशीर ,शुद्ध स्पष्ट उच्चार !!
    मंदिरातल्या आतला गाभारा ,मुर्ती ,कलशमंडप शिवाय जांभरुणच पाटाच पाणी पाहणेची उस्तुकता होती .
    एकंदरीत कोकणात राहूनही जाता आल नाही पण आता एक मुक्काम आसुदला नि एक जांभळ्या !
    धन्यवाद!!
    🎉🎉🎉

    • @pushpavatipatil5471
      @pushpavatipatil5471 5 месяцев назад

      क्षमस्व. मंदिरातील कलशमंडप , मुर्त्या , पाटाच पाणी पहायला मिळाल .

    • @Harifi_
      @Harifi_  5 месяцев назад

      आपल्या commmet बद्दल खूप आभारी आहे.
      आमचा प्रयत्न तुम्हाला आवडला हीच आमच्यासाठी महत्त्वाची पावती आहे.

    • @Harifi_
      @Harifi_  5 месяцев назад

      तुम्ही channel subscribe केलं नसेल तर आवर्जुन जाता तुमच्या परिचयाच्या लोकांना हि चॅनल subscribe करायला सांगा

  • @nilamdharmadhikari7073
    @nilamdharmadhikari7073 5 месяцев назад +1

    सुंदर 👌🏻 खूप छान ठिकाण अगदी जाऊन आल्या सारखं वाटले.🎉

  • @ArvindTelkar
    @ArvindTelkar 5 месяцев назад +2

    अतिशय सुंदर व्हीडिओ आणि माहिती. प्रत्यक्ष जांभरूणला जाऊन आल्यासारखं वाटलं. धन्यवाद.

    • @Harifi_
      @Harifi_  4 месяца назад

      धन्यवाद सर
      आपल्या प्रतिक्रिया बद्दल खूप आभारी आहे.
      कृपया आमचा चॅनल सबस्क्राइब करा.

  • @macdeep8523
    @macdeep8523 3 месяца назад

    Excellent work , I was in Jambhrun last Sunday ... It was great experience

    • @Harifi_
      @Harifi_  Месяц назад

      So how was your experience ?
      Its beautiful village

    • @Harifi_
      @Harifi_  Месяц назад

      So how was your experience ?
      Its beautiful village

  • @gaurijoshi8317
    @gaurijoshi8317 5 месяцев назад +2

    खुप सुंदर ठिकाण आहे.. हिरवाईने नटलेल.. प्राचीन मंदिर खुप छान आणि पुरातन काळाची साक्ष देणारी.. पावसाच्या पाण्याच पाटा च्या माध्यमातून केलेले सुंदर नियोजन.. माहितीपूर्ण असा उत्तम vlog

    • @Harifi_
      @Harifi_  5 месяцев назад

      Thank you very much

  • @travel_with_yunus
    @travel_with_yunus 5 месяцев назад +1

    अतिशय सुंदर वीडियो, दादा, keep it up,

    • @Harifi_
      @Harifi_  5 месяцев назад

      Thanks मित्रा !!!!

  • @tejaswinipendharkar
    @tejaswinipendharkar 5 месяцев назад

    वाह वा, क्या बात. खूपच छान वर्णन आणि निवेदन पण.
    सुंदर उपक्रम....

  • @vishnugadade4409
    @vishnugadade4409 5 месяцев назад

    अतिशय सुंदर.....रोहित सर अप्रतिम आवाज , विलोभनीय दृश्य, सुश्राव्य भाषा...!!!

    • @Harifi_
      @Harifi_  4 месяца назад

      धन्यवाद विष्णू जी !!!
      आपल्या प्रतिक्रिया बद्दल खूप आभारी आहे.
      कृपया आमचा Harifi हे चॅनल सबस्क्राइब करा.

  • @mrinalinirokade7335
    @mrinalinirokade7335 5 месяцев назад +1

    Sundar...❤

    • @Harifi_
      @Harifi_  4 месяца назад

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल खूप आभारी आहे.
      कृपया आमचा चॅनल सबस्क्राइब करा.

  • @rajaniabhijitkatore3699
    @rajaniabhijitkatore3699 5 месяцев назад

    Very nice

  • @yogeshvaishampayan3285
    @yogeshvaishampayan3285 4 месяца назад

    माझे कोकणातले गाव ही असेच आहे पाट वगैरे सारखेच मला माझ्या गावाची आठवण झाली खूप छान व्हिडिओ

    • @Harifi_
      @Harifi_  4 месяца назад

      कोणता गाव तुमचा ??
      आपल्या प्रतिक्रिया बद्दल खूप आभारी आहे.
      कृपया आमचा चॅनल सबस्क्राइब करा.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 4 месяца назад

    Swargiy. Sundar. Konkan 💓

    • @Harifi_
      @Harifi_  4 месяца назад

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल खूप आभारी आहे.
      असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी कृपया आमचा Harifi हे चॅनल सबस्क्राइब करा.

  • @vinayakjadhav2137
    @vinayakjadhav2137 5 месяцев назад

    मी ह्या गावाचे अाधी विडियो पाहिले होते, पण तुम्ही खुप छान पद्धतीने विडियो बनवला आहे.. 😊

    • @Harifi_
      @Harifi_  5 месяцев назад +1

      Dhanywad vinayak ji.
      आपण गावात असाल तर पुढच्या वेळेस येईन तेव्हा नक्की भेटू

    • @vinayakjadhav2137
      @vinayakjadhav2137 5 месяцев назад

      @@Harifi_ हो नक्कीच 😊🤝

  • @user-pw6vb2yi5f
    @user-pw6vb2yi5f 5 месяцев назад +1

    नाखवा.कधी..भेटणार

  • @suhaspatye1989
    @suhaspatye1989 4 месяца назад

    Aamchya nivendi gavala pan bhet dya

    • @Harifi_
      @Harifi_  4 месяца назад

      तुमच्या गावचा पत्ता द्या आम्ही नक्की भेट देऊ

  • @deeptiwalunjkar4900
    @deeptiwalunjkar4900 4 месяца назад +1

    Harifi mhanje?

    • @Harifi_
      @Harifi_  4 месяца назад

      आमच्या आडनावाचा एक मोठा इतिहास आहे.
      त्यातून आलेला आमचा आडनाव '
      एक ब्लॉग करून नक्की आडनावाचा इतिहास सांगेन.

  • @VinayakMule-hc4rs
    @VinayakMule-hc4rs 4 месяца назад

    तुम्ही म्हणता की पाट अडीच शे वर्ष जुना आहॆ परंतु हा पाट सोळाव्या शतका पासून आहे.

    • @Harifi_
      @Harifi_  4 месяца назад

      आम्हाला गावकऱ्यांकडून मिळालेली माहिती आम्ही मांडली.
      आपण म्हणता तसाही असू शकतं

  • @anilm2395
    @anilm2395 5 месяцев назад

    ह्या गावाला भेट द्यायची आहे. कुठल्या महिन्यात वातावरण सुसह्य असेल इकडे??

    • @Harifi_
      @Harifi_  5 месяцев назад

      प्रत्येक ऋतूत हे गाव छानच दिसते.
      पण सहसा सप्टेंबर ते जानेवारी हा सीझन सर्वोत्तम आहे.

    • @anilm2395
      @anilm2395 5 месяцев назад

      @@Harifi_ धन्यवाद