LoP Shri Devendra Fadnavis interview with Raju Parulekar on The Insider

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • LoP Shri Devendra Fadnavis interview with Raju Parulekar on The Insider on 23rd June 2020
    0:49 - मुख्यमंत्रीपद आणि विरोधीपक्षनेते पद दोन्ही अनपेक्षित गोष्टी
    मुख्यमंत्रीपद मिळणार असे कोणालाही वाटले नव्हेत त्यावेळी मुख्यमंत्रीपद मिळाले आणि ज्यावेळी पुन्हा मुख्यमंत्री होईल असे वाटले त्यावेळीते मिळाले नाही, याचे दु:ख निश्चित. सरकार हातातून निसटले तेव्हा विश्वास बसला नाही. मात्र 10-15 दिवसांत परिस्थिती स्वीकारली. मग जी जबाबदारी मिळाली ती स्वीकारली आणि काम सुरु केले.
    4:11 - शिवसेनेशी मुख्यमंत्री पदावरुन युती तोडली आणि पालघरची जागा देऊन पुन्हा जोडली
    विधानसभा निवडणुकीच्या वेळी सेनाविरोधात जे भाजपातले बंडखोर होते त्यांचे फॉर्म परत घेण्यासाठी 5 तास घालवले. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची प्रचंड बंडखोरी होती. 5 वर्षाच्या कार्यकाळात श्री उध्दवजींनी सांगितले आणि भाजपाने ते ऐकले नाही असे कधीच झाले नाही. त्याचा संताप आला, फोनही घेतला नाही याचे दु:ख प्रचंड. श्री उध्दवजींना मा. अमितभाईं शहांनी मुख्यमंत्री पदाबाबत कधीच आश्वस्त केले नव्हते.
    11:47 - स्व. हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरेंना कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या जीवावर मुख्यमंत्री बनेन असे वचन दिले होते का?
    शिवसेनेच्या वागण्याने व्यक्तीगत संबंधाना तडा गेला असे होत नाही. मात्र ती घडी 100%विस्कटली. शिवसेना आणि भाजपाची चर्चा झाली असती तर 100% मार्ग निघाला असता. मा.उध्दवजी स्व.हिंदुहृद्यसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरोधात जाऊन सरकार चालवत आहेत. 2 वर्षापूर्वी मा. मोदीजींनी राष्ट्रवादीला सोबत यायचे असेल तर शिवसेनेशिवाय येता येणार नाही, असा मा. मोदीजींचा निरोप स्वत: अमितभाईंकडून मा. पवार साहेबांपर्यंत पोहचवला होता. स्व.हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार बनवण्यास सहमती दिली नसती. जेव्हा राजकारणात तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो आहे हे कळते तेव्हा लढावे लागते. तेव्हाच गनिमी कावा केला, जर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विरोधात गेला नसता तर भाजपा-राष्ट्रवादीचे सरकार टिकले असते.
    19:53 - फडणवीस आडनावामुळे अनेकांनी भूमिका बदलल्याचे पाहिले.
    जातीच्या अभिमान असण्यापेक्षा कर्तृत्त्व चागले हवे, त्याचा अभिमान असला पाहिजे. आजही पाठिशी सर्वोत भक्कमपणे उभे हे मा.श्री अमितभाई शहा. छोट्यातली छोटी बाब ही श्री.अमितभाईंना सांगता येते. राजकारणात अनेक वेळा भूमिका बदलत राहतात. पंतप्रधान पदाची क्षमता आहे असे वाटत नाही.
    26:30 - कोरोनासाठी केंद्राने राज्याला 28,000 कोटी रुपये दिले.
    कोरोना महामारीमुळे राज्यात कर जमा झाला नाही. पहिल्याच दोन महिन्यात केंद्र सरकारने 4500 कोटी रुपये जास्त दिले. सर्वप्रकारचे रेशन आणि शेतमाल खरेदीसाठी पैसा राज्य सरकारने दिला. पैसा केंद्राने देऊनही खर्च करु शकले नाही हा राज्य सरकारचा नाकर्तेपणा. राज्यात सरकारचे अस्तित्वच दिसत नाही, प्रशासनच कारभार करते आहे असे दिसते आहे. मंत्र्यामंध्ये, मुख्यमंत्री आणि प्रशासनातही समन्वय नसल्याचे दिसत आहे. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी लीडरशीप घेतली पाहिजे होती.
    मुंबईत कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाण अधिक. अनेक मृत्यू लपवले गेले. मुंबईत टेस्टिंग लिमिटेड केले. राज्य सरकारचे कोरोना काळातील व्यवस्थापन चुकले.
    40:30 - भाजपाने मुंबईत कोरोनाकाळात डॉक्टरांच्या टीम्स तयार केल्या.
    राज्य सरकारची शक्ती आणि व्यवस्था या कोरोनाविरुध्द लढण्यासाठी फारशा परिणामकारक ठरल्या नाही, अनेकवेळा लोकांना त्यासाठी झगडावे लागले. खाजगी रुग्णालयातील 80% बेडस् राज्य सरकारने घेतले तरी परिस्थिती बदलली नाही. मुख्यमंत्री सहायत्ता कक्षातून कोविड बेडस् संदर्भातील माहिती देण्यासही यंत्रणा अपयशी ठरली.
    44:10 - कोणतीही तोडफोड करुन राज्य सरकार आणण्याची भाजपाची मानसिकता नाही.
    45:24 - राज्यात रामायण महाभारत घडत असताना फोन उचललले गेले नाही. त्यामुळे मा. मुख्यमंत्र्यांना सल्ला काय देणार? पक्षप्रमुख सोडून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मा. उध्वजींनी जनतेसाठी उपलब्ध राहायला हवे.
    50:30 - मा. श्री.राज ठाकरे हे ज्यावेळेस हिदुत्त्वाकडे येत आहेत, हे समजले त्यावेळी भेट. त्यांना राजकीय परिस्थिती तसेच कुठे पोकळी निर्माण झाली आहे हे ही समजते. हिंदुत्त्व आणि मराठी माणूस यावर विवाद होऊ शकत नाही.
    56:53 - व्यक्तिगत अकाऊंट वरुन भाजपाला ट्रोल केल्यास अडचण नाही पण जवळजवळ 1:5 लाख खोटी अकाऊंट्स्.
    1:01:33 - 2014 नंतर भारताच्या अर्थव्यवस्थेचा प्रचंड विस्तार. जागतिक मंदीच्या काळातही 5-7%दर ठेवू शकलो ते चांगलेच आहे.
    1:05:08 - 2014 नंतर भाजपात अधिक शिस्त. शिस्तबध्द कॅडर आणि राष्ट्रवाद या दोनच गोष्टी भाजपामध्ये महत्त्वाची.
    1:11:05 - श्रीमती मेधाताईंनी पुण्यात चांगले काम केले. त्यांच्या कामाची दखल योग्यवेळी पक्ष घेईलच.
    1:13:35 - माणसाला महत्त्वकांक्षा लागते, जे किलर इनस्टिक जे लागते ते नाही. अल्पसंतुष्ट असण्याचा फायदा म्हणजे फारसा त्रास होत नाही.
    1:16:22 - राजकारणात जी भूमिका मिळेल त्याला आपल्या क्षमतेनुसार न्याय देण्याचा प्रयत्न करणार. राजकीय टाच ठेवून त्रास देण्याचा कधीही प्रयत्न केला नाही.
    #Maharashtra
    #देवेंद्रफडणवीस #DevendraFadnavis Subscribe Now: bit.ly/YT_Dev_F... Stay Updated! 🔔
    Follow us to stay updated:
    ► Like us on Facebook: / devendra.fadnavis
    ► Follow us on Twitter: / dev_fadnavis
    ► Follow us on Instagram: / devendra_fadnavis

Комментарии • 1,5 тыс.