शेती सध्या काय करते? भाग १२ - वसुबारसेची गोधनपुजा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • ‪@farmofhappinessagrotourism‬ 'शेती करणं म्हणजे फक्त अन्न किंवा पीक उगवणं इतकंच नसून मुळात अन्न आणि आपलं अन्न उगवायला कारणीभूत असणाऱ्या सगळ्या घटकांना समजून घेणंही आहे आणि त्या सगळ्या घटकांना पूरक अशी जीवनशैली जगणं आहे' असं आम्हाला वाटतं. ऍग्री 'कल्चर' म्हणजे शेती 'संस्कृती!' आणि संस्कृतीचा अर्थ फक्त पाककृती, सण, पूजा, कार्यक्रम रांगोळ्या, वेष इतकाच नसून खूप खोल आणि विस्तृत आहे. या सगळ्या गोष्टी तर हिमनगाच्या वरच्या टोकासारख्या फक्त सहज दिसणाऱ्या आहेत. पण त्यांचा पाया खूप खोल आणि विस्तारित अशा विज्ञानावर आधारित आहे. अशा विज्ञानावर, जे निसर्ग निष्ठ किंवा मुळातच निसर्गनिर्मित आहे. या विज्ञानाचा, निसर्गाला हरवण्याचा किंवा त्याच्यावर कुरघोडी करण्याचा अट्टाहास नाही. आनंदाचं शेत म्हणजे "फार्म हाऊस नाही" तर तो शेतीवर आधारित जीवनपद्धती (लाईफस्टाईल!) जगण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथल्या आमच्या घरात शेणाने सारवलेली जमीन, संध्याकाळची गोवऱ्यांची धुरी हे वरवर पाहता केवळ "नाॅस्टॅल्जिक एलिमेंट्स" वाटत असले तरी हे जगणं अत्यंत वास्तववादी, प्रॅक्टिकलही आहे...अगदी आजसुद्धा! या नुसत्या संस्कृती जतनाच्या भावना नाहीत. इथला गोकुळासारखा गोठा म्हणजे बारा महिने तेरा काळ दूध पुरवठा करणारा डेअरी व्यवसाय नाही. इथे दुध, दही, लोणी, श्रीखंडाइतकंच... किंबहुना त्याहीपेक्षा जास्त महत्व आहे शेणा-मुताला! त्यातून मातीचं जैविक पोषण होण्याला. गाई-गुरांसह, मधमाश्यां-फुलपाखरांसह जगण्याचं हे सहजीवन असं दहा - बारा मिनीटांत व्हडिओमधून मांडणं केवळ अशक्य आहे... ती प्रत्यक्ष अनुभवायची बाब आहे. आणि त्या अनुभवांत अनेकांना सामील करून घेण्यासाठी कृषीपर्यटन राबवतोय. 'आनंदाचं शेत कृषी पर्यटन' म्हणजेच 'फार्म ऑफ हॅपिनेस 'ऍग्रो टुरिझमच्या व्हिडिओ उपक्रमातल्या"शे'ती' सध्या काय करते?" च्या या बाराव्या भागात आम्ही तुम्हाला सामिल करून घेत आहोत आमच्या शेतातल्या गोधनाची पुजा करायला, तेही आज दिवाळीतल्या वसूबारसेच्या दिवशी. आज या व्हिडिओच्या माध्यमातून हा अनूभव घ्याल तसाच, प्रत्यक्षातही "हा अनुभव घ्यायलाच हवा!" असाच आहे. येताय ना तुम्ही?

Комментарии • 139

  • @ramakantpatil9865
    @ramakantpatil9865 10 месяцев назад +15

    कोकणात आपला हा हॅप्पी फार्म उपक्रम घरोघरी राबवला गेला तर कोकणाचे नंदनवन होईल.

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 23 дня назад

    🕉️🎵खूप आनंद झाला वासरांना आपल्या आई गायीचे दूध पिताना पाहून!!! 🎼 कारण इतर सर्व दुग्ध व्यवसायांमधील गाई-म्हशी-वासरांचे हाल, त्यांच्याशी वागण्यातील मानवाचा दुष्टपणा पाहून-ऐकून आहोत व ते सर्व वाचून-ऐकून-पाहून सुन्न व्हायला होतं व आपण काही करू शकत नाही याबद्दल अपार दुःख होतं.... तुम्हां दोघांना व तुमच्या गायी-म्हशी-वासरांना पाहून ; त्यांची व्यवस्था पाहून खूपच आनंद झाला, समाधान वाटलं!!! ह्या व्हिडिओतून आपण फार मोठं प्रबोधन करत आहात!!! अनेकानेक शुभेच्छा!!!❤🎉 ईश्वर सदैव तुम्हांला सुखी ठेवो!!! ❤🎉,🎶🕉️

  • @varshag.8398
    @varshag.8398 10 месяцев назад +1

    तुमचं आयुष्य किती निरागस आणि संपन्न आहे हो...परमेश्वर तुमच्यावर नक्कीच प्रसन्न आहे..खूप उशीरानेच हा व्हिडीओ पाहिला आणि मी खरच धन्य झाले. मी फारसं कुणाचं कौतुक करत नाही. पण जे ह्रदयाला भिडतं त्याला भरभरून दाद दिल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे माझे हे शब्द केवळ शब्द नसून माझ्या प्रामाणिक भावना आहेत 🎉.

  • @vijaykumarpatil3651
    @vijaykumarpatil3651 10 месяцев назад

    Khup chhan purvi Bharat assach sunder aani samadhani hota

  • @AjinkyaRane
    @AjinkyaRane 10 месяцев назад +6

    दिवाळीच्या खूप शुभेच्छा
    डिजिटल माध्यमातून आम्हालाही हे खर खुर वसुबारस अनुभवता आले.
    खूप खूप आभार. आणि शुभेच्छा 🎉

  • @daulatkadam6129
    @daulatkadam6129 10 месяцев назад +1

    व्वा आपण छान उपक्रम राबवला आहे. सुंदर 💐💐👌👌👍👍

  • @nehaghaligi8521
    @nehaghaligi8521 10 месяцев назад

    Khup sundar vdo ani chan mahiti....lavkarach yayla awadel swatah anubhav ghyayla ❤

  • @anuradhagodbole7986
    @anuradhagodbole7986 10 месяцев назад +1

    नंदिनी ला पाहून तिचा जन्मदिवस आठवला . तुम्ही दोघांनी मायेने तिच्या आईचं केलेलं बाळंतपण ..... आणि तिथला सगळा परिसर पुन्हा एकदा अनुभवला . वसुबारस पारंपरिक पद्धतीने केलेली खूप आवडली . 👌👌👍🏻🙏🏻😊

  • @jostnasahasrabudhe6196
    @jostnasahasrabudhe6196 9 месяцев назад

    🙏🏻🙏🏻

  • @laabhn
    @laabhn 10 месяцев назад +7

    खूपच मस्त वाटल video पाहून. आधी वासरला दूध मग उरलेला वाटा तुम्ही घेता, हे फारच उत्तम करता.
    BTW, गोबर गॅस बनवताना त्यामध्ये गोकृपा अमृत किंवा OWDC Culture नक्की वापरून पहा. Process expedite होते आणि गॅस चा output जास्त येतो. किती प्रमाण वापरायचं हे थोड Trial n Errror ने तुम्हाला कळेल.

    • @farmofhappinessagrotourism
      @farmofhappinessagrotourism  10 месяцев назад

      धन्यवाद! याबद्दल 7620775521 वर संपर्ज करून थोडी अधिक माहिती द्याल का? किंवा तूमचा नंबर या नंबरवर पाठवा. फोन करून नीट समजून घ्यायला आवडेल.

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 10 месяцев назад +8

    संपूर्ण कुलकर्णी कुटुंबाला वसू बारस आणि दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा..सोज्वळ आणि सात्विकतेचं प्रतिक म्हणजेच फार्म ऑफ हॅपीनेस ♥️👍

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 10 месяцев назад +3

    दीपावलीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा

  • @devyanitekale4689
    @devyanitekale4689 10 месяцев назад +7

    तुम्हाला दोघांना पण दिवाळीच्या शुभेच्छा ताई...नावाप्रमाणेच आनंदाचे शेत आहे..यामागे तुम्हा सर्वांचीच खूप मेहनत आहे..आमचा experience खूप छान होता...मला परत एकदा येण्याची ईच्छा आहे..मी परत नक्की येईन..Happy Diwali!

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 10 месяцев назад +4

    दीपावलीच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा। 💐🎉🎊🎆

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 10 месяцев назад

    .आनंद आनंद अभिमान

  • @shubhashripathak2348
    @shubhashripathak2348 10 месяцев назад

    मला सगळ्यांत जास्त तुमची तुमच्या गायी म्हशी विषयीची, तुमच्या सोबत काम करणार्‍या सगळ्या गावकर्‍यांबद्यल वाटणारी कृतज्ञता खूप भावली. दुध काढण्याआधी वासरांना दुध प्यायला सोडल्यावर ती कृतज्ञता जाणवलीही. छान वाटले हे बघुन. कृतज्ञता तुम्हाला आणखी आणखी यश, भाग्य मिळवून देते. परमेश्वर तुम्हाला कायमच सुखीसमाधानी ठेवो.

    • @smitaudhalikar4098
      @smitaudhalikar4098 10 месяцев назад

      खूपच छान राहूलदादा ...पून्हा यावस वाटतय...निसर्गात रममाण होणारे तुम्ही मला ऊर्जा देता...

  • @kanchandharmadhikari9182
    @kanchandharmadhikari9182 10 месяцев назад

    तुम्हाला बघून गावाकडे जाऊन शेती करण्याची प्रेरणा मिळते.

  • @makrandnaik8136
    @makrandnaik8136 10 месяцев назад

    Khup dhanyawaad hya sundar video saathi.. lavkar yaychi iccha aahe.. Dev tumcha saglyancha bhala karo

  • @shrisvlogs2806
    @shrisvlogs2806 10 месяцев назад +5

    खूप सुंदर, आपणास दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. लहानपण आठवले माझे नेरळ मधले.
    आपण जे अनुभवता तेच खरे जगणे आहे.

  • @NileshOak
    @NileshOak 10 месяцев назад +4

    Diwalichya Shubhecchya

  • @anjalijoshi423
    @anjalijoshi423 10 месяцев назад

    Must visit

  • @sukhadadeo5110
    @sukhadadeo5110 10 месяцев назад

    दिवाळीच्या शुभेच्छा 🎉 व्हिडिओ बघून खूप छान वाटले. काही जुन्या अश्याच आठवणी जाग्या झाल्या. Dhanyawad

  • @ravinakambli9474
    @ravinakambli9474 10 месяцев назад +1

    Tumhala aani tumchya sampurn parisarala diwalichya khup khupppp shubhcha🎉 khup diwas videochi wat baghat hoto khup chan watal tumhala pahun❤

  • @nisargmitrafarm
    @nisargmitrafarm 10 месяцев назад +5

    फारच छान.परंपरा जपताय व लोकांना प्रेरणा देताय

  • @nishigandhawagh4230
    @nishigandhawagh4230 10 месяцев назад

    खुप जास्त छान विडिओ असतात तुमचे... पण आम्हाला अजून जास्त विडिओ आलेले आवडतील पाहायला

  • @jayantpathak7420
    @jayantpathak7420 10 месяцев назад

    Namaskar sir, nice to see this, video. I m from kokan. Where it is located. I wish to visit.

  • @shrayserudkar278
    @shrayserudkar278 10 месяцев назад

    1 no life ❤

  • @suvarnakadam3905
    @suvarnakadam3905 10 месяцев назад +4

    खुपच सुंदर. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.

  • @ameettashirode298
    @ameettashirode298 10 месяцев назад

    Happy Diwali. Masst chan video. Thank you

  • @VipinGaikwadpatil
    @VipinGaikwadpatil 10 месяцев назад

    🙏🙏🙏🙏जय गौमाता🙏🙏🙏🙏

  • @balkrishnagavas6325
    @balkrishnagavas6325 10 месяцев назад

    SHUBHA DIPAWALI ALL THE BEST

  • @purnanandjambhavdekar2540
    @purnanandjambhavdekar2540 10 месяцев назад

    Khupch chan sir & mam ek vinati aahe ki mhaishi thodya high quality cha pn theva. Jene krun tumhala artik fayda pn hoil. Gavti mhaishi pn changlya pn dudh cha prman kmi ast baki khupch chan vatl video bgun.

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 10 месяцев назад +3

    खूप च मस्त.... आपल्या संस्कृतीचे जतन तुमच्या दोघांकडून होताना खूपच अभिमान वाटला 🙏🌹

  • @shitaldeshmukh585
    @shitaldeshmukh585 10 месяцев назад +1

    Sir apan Amul dudh geto hey Dudh Gujrat made company ahe Pan gujrat made fakt Amul viktat aplya Mahratratun dudh geun tech Mahrastrat viktat aple Mahrashtra Made ek Marathi
    Mansacha cha Dudhacha brand asava ani tech asav promote Local products jastit jast only Mahrashtra Aplya Mahrashtra Samruddh ahe Jay Maharastra Jay Matrubhumi Jay Bhumiputra Ani Marathi Manasache Dudhacha brand asava aplya Mahrastra made kapus banto pan kapda utpadan. Nahi Maharashtra made khup potential ahe Marathi manus khup samruddh ahe fakt Margadarshan Milat nahi Mahrashtratlya udyog mantri je lath lath pagar getat ani asey udyog margadarshan karun Bhumiputrana Rojgar dila pahije Maharastratla pratek Manus Samruddh hovo Mahrashtratla pratek Bhumiputrana udyog milava Mansaman milava sarva skhetrat yash Milo .pratek Marathi Manus yashasavi hovo hech Sadeccha

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 10 месяцев назад

    ऊतम शेती ऊतम गाई म्हशी ऊतम दुध असाच घरोघरी मातीच्या चुली पेटल्या पाहिजे

  • @SunilSantra-uy4xe
    @SunilSantra-uy4xe 10 месяцев назад

    Hai.pnam.🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌🌟🌟🌟🌟

  • @nitinpawar2505
    @nitinpawar2505 10 месяцев назад +2

    राहुल दादा आणि संपदा ताई तुम्हा दोघांनाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...तुम्ही फार छान पद्धतीने वसुबारस या सणा बद्दल समजावले मी आणि माझ्या मुलाने फार आनंद घेतला या व्हिडिओच्या माध्यमातून.

  • @vasudhadamle4293
    @vasudhadamle4293 10 месяцев назад

    तुम्हा सर्वांना दिवाळी शुभेच्छा

  • @sureshsurve2337
    @sureshsurve2337 10 месяцев назад +1

    तुम्हा दोघांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. हे आनंदाचे शेत कोणत्या ठिकाणी आहे?

  • @smitadhamale6755
    @smitadhamale6755 10 месяцев назад

    Happy Diwali 🎉

  • @shubhashreejakhalekar8997
    @shubhashreejakhalekar8997 10 месяцев назад +2

    ❤किती शंभर वर्ष आयुष्य आहे मँडम कालच मला तुमची खूप आठवण येत होती तुमच्या संपूर्ण परिवाराला खूप खूप शुभेच्छा

  • @nehamirajkar350
    @nehamirajkar350 10 месяцев назад +1

    Khup chhan celebration gayavasaranci krutadnyata pujan thanks for video shubha dipawali apanala

  • @ShaileshMahadik-f2m
    @ShaileshMahadik-f2m 10 месяцев назад +1

    ताई आणि दादा हे तुम्ही जे करताय ते आजच्या पिढीला हे करण्याची गरज आहे मला हे असच कराच होत पण मला माझ्या घरच्यांनी कुणी समजून घेतले नाही हे सर्व पाहुन मला खूप छान वाटले गणपती बाप्पाच्या तुम्हा दोघांना ऊद॑ड आयुष्य लाभो हिच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना 🙏

    • @vinodinichawan2513
      @vinodinichawan2513 3 месяца назад

      ha video tyana dakhva mhanje kadajit mindset madhe thoda pharak padel.

  • @chandrakantkhopade3942
    @chandrakantkhopade3942 10 месяцев назад +1

    आपल्या उभयतास दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा शतायुषी व्हा उदंड आयुष्य लाभो उत्तम आरोग्य लाभो हीच परमेश्वराकडे प्रार्थना

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 10 месяцев назад +2

    तुम्हाला दिवाळी च्या अनेक शुभेच्छा

  • @sachinsonar1839
    @sachinsonar1839 10 месяцев назад

    शेती सध्या काय करते. याबरोबरच शेतीत सध्या काय करायला हवं ! हा ही व्हिडिओ आम्हाला पाहायला नक्कीचं आवडेल.
    आपला अभ्यास या बरोबर आहे त्यामुळे तो व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे. इतर व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवी तेवढी दिशा मिळत नाही की जी आपल्या व्हिडिओ मधून मिळेल.
    दीपावलीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन 🪔🪷🌷🙏🌷🪷🪔
    🪔🪔🪔🌷🙏🌷🪔🪔🪔

  • @SaasBahuFoodVlogs
    @SaasBahuFoodVlogs 3 месяца назад +1

    Kithi chan❤

  • @kodaks1
    @kodaks1 10 месяцев назад +3

    राहुल संपदा खूप छान व्हिडिओ नवीन पिढीला या माध्यमातून पटकन शिकता येईल आणि तुम्ही ते छान समजावून सांगितले आहे
    धन्यवाद.
    तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकार्‍यांना सर्वांना शुभ दीपावली.

  • @smitakadav7338
    @smitakadav7338 10 месяцев назад +2

    खूप छान

  • @urmilaamate9933
    @urmilaamate9933 9 месяцев назад

    किती सुजलाम सुफलाम पशुधन आणि धनधान्य ने भरभरून श्रीमंती जणू जुन्या काळातील दृष्यच पाहतोय. खूप खूप शुभेच्छा.

  • @unknownguy279
    @unknownguy279 9 месяцев назад

    आवडलंय ..... आपण लोकांना educate करत आहात . आवडलंय

  • @manoj7alkar
    @manoj7alkar 10 месяцев назад +1

    सर्वात प्रथम आपले खूप खूप अभिनंदन बरेचसे लोकही आपल्या गोठ्यामध्ये फक्त गाईला स्थान देतात मात्र आपण म्हशीचे देखील सांभाळ केला आहे
    भारतात आणि आफ्रिकेमध्ये फक्त म्हशी पाळल्या जातात. गाई प्रमाणेच म्हशी देखील आपल्या तितक्याच प्रिय पाळीव प्राणी आहेत हे पाहून आनंद वाटला

  • @shabdalay7100
    @shabdalay7100 7 месяцев назад

    विठू आणि नंदिनी खूपच छान. All the best to Farm of happiness..

  • @fatemabaramatiwala7436
    @fatemabaramatiwala7436 10 месяцев назад

    Yu have given rt name from Yr Fram you'll care for every one realy natural home be happy

  • @deepalihebbare8660
    @deepalihebbare8660 10 месяцев назад +1

    तुम्हाला दोघांना शेतात मना पासून उत्कृष्ट आनंदाने काम करताना बघून,आम्हाला ही आमच्या शेतात काम करण्या चा उत्साह येतो❤

  • @mangalshind
    @mangalshind 5 месяцев назад

    मला पण तुमचा आनंदाच्या शेतीत येते आहे कुठे आहे तुमच्या आनंदाची शेती

  • @gurunathbhagwat2275
    @gurunathbhagwat2275 10 месяцев назад

    आनंदाच्या शेताचा पत्ता मिळेल का?

  • @vishnuvardhankulkarni6608
    @vishnuvardhankulkarni6608 10 месяцев назад +1

    Stay happy, loved to watch this video and sincere thanks for caring for those gavus and mhasrus 😊

  • @arunakelkar3672
    @arunakelkar3672 10 месяцев назад +1

    दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा. अतिशय सुंदर video, छान वाटलं पशुधन पाहून.

  • @kanchandharmadhikari9182
    @kanchandharmadhikari9182 10 месяцев назад

    पण हा सर्व डोलारा उभा करायला खूप मेहनत व पैशाची गरज आहे.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 10 месяцев назад +1

    Sir tumhaalaa manaapasun salaam

  • @sujatakunkerkar8301
    @sujatakunkerkar8301 10 месяцев назад

    संपदाताई थकल्यासारख्या वाटता , थोडा आराम करा

  • @namratazemse5748
    @namratazemse5748 10 месяцев назад

    खुप छान संपदा. Love you, मीरा पेण रायगड वरून

  • @vanitadhaboo5617
    @vanitadhaboo5617 10 месяцев назад

    तुमच कोकणात कुठे फाम हाउस कुठे आहे आणी कस येयच तुमचा पत्ता काय

  • @bhaktijoshi3272
    @bhaktijoshi3272 10 месяцев назад

    ग्रेट खूप खूप छान अभिनंदन

  • @sushamalad7788
    @sushamalad7788 5 месяцев назад

    Sir new blogs kadhi?

  • @shobhasolanki4964
    @shobhasolanki4964 8 месяцев назад

    Madam mala tumchya shetavar dyayche tar thi the rahne khane yacha kiti kharch yenar massage karnar ka

  • @surajpatankar
    @surajpatankar 10 месяцев назад +1

    Wish you a very happy and prosperous Diwali, You both look really very happy...❤

  • @seemapisal5007
    @seemapisal5007 10 месяцев назад

    Kuthe aahe he tumache phrm hause ,tumhala contact kase karayache

  • @vishwasbuwa8291
    @vishwasbuwa8291 9 месяцев назад

    फार छान!! विलोभनीय!❤❤

  • @gaurishomeandtravelvlogs
    @gaurishomeandtravelvlogs 10 месяцев назад

    Excellent video

  • @kavyapatil1705
    @kavyapatil1705 10 месяцев назад

    खूप सुंदर 😊🙏🏻🙏🏻

  • @rajendradalvi6572
    @rajendradalvi6572 10 месяцев назад

    पाहुश आनंद झाला. बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. आपणास पारंपारिक पद्धतीने जीवन जगण्यासाठी जी धडपड सुरू आहे ती अशीच चालू राहू दे व पुढील काळासाठी शुभेच्छा.
    मुख्य गोष्ट व्हिडिओ पाहून जाणवली की आपम जर्सी गायी करून देशी वाण बिघडवले नाही. धन्यवाद.

  • @mangalshind
    @mangalshind 5 месяцев назад

    Malappuram Tum Chandan

  • @ramredij19
    @ramredij19 10 месяцев назад

    915 am....mast

  • @santoshlad1235
    @santoshlad1235 10 месяцев назад

    खूप छान माहिती
    कोकणातील जीवन पद्धत
    कोकण किती समृध्द आहे
    आपण कोकणात खूप काही करू शकतो याच उदाहरण आहे
    एक दुर्दैवी गोष्ट आहे लोक शेत जमीन विकत आहेत

  • @sarojsawant1127
    @sarojsawant1127 10 месяцев назад

    Lovely

  • @Samratplayzofficial
    @Samratplayzofficial 10 месяцев назад

    🙏तुम्हा दाम्पत्यांचा हा प्रवास हा नक्कीच कौतुकास्पद व विलक्षण प्रेरणादायी आहे तुमच्या ह्या फार्म हाऊस ला भेट देण्याची इच्छा आहे 💐

  • @piyu7447
    @piyu7447 10 месяцев назад

    Nice❤❤

  • @namratazemse5748
    @namratazemse5748 10 месяцев назад

    परंपरेचे लेणे लेती जपानचे पाहुणे न्
    गाय वासरू मांजर गाती दिवाळीचे गाणे रे
    समर्पित संपदा, सड्यावरच्या शेतीला..गं
    राजसि राहुल दादा, हिचा शेतकरी राजा रे

    • @farmofhappinessagrotourism
      @farmofhappinessagrotourism  10 месяцев назад +1

      अरे व्वा! छानच, धन्यवाद मनापासून

  • @Sigma-gg7wh
    @Sigma-gg7wh 10 месяцев назад

    Tai; khup chan

  • @kanchandharmadhikari9182
    @kanchandharmadhikari9182 10 месяцев назад

    संपदाताई & राहूलदादा दोघेपण खूपच छान आपली भारतीय जीवन शैली जपता आहात.हया व्हिडिओ मार्फत माझ्यापण मोर्शी च्या बालपणी च्या आठवणीना उजाळा मिळाला.❤😊

  • @gurunathbhagwat2275
    @gurunathbhagwat2275 10 месяцев назад

    खूपच सुंदर.... तुम्हां सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ....🙏

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 10 месяцев назад

    आम्हि सुध्दा असच सार्वत्रिक आमच पण कोकणातच घर आहे सावर्डे च्या पुढे माणकि येथे छान वाटत हे बघुन 👌👌🌷🌷

  • @kiranwadher
    @kiranwadher 10 месяцев назад

    So beautiful..missing nandini s lot .feel like leaving everything and run 🏃‍♂️ back there ❤❤

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 10 месяцев назад

    अतिशय सुंदर.कोकणात गेल्याची जाणीव झाली.आपण हे सर्व करत आहात.खरंच कौतुक आणि धन्यवाद.

  • @monikadeogaonkar6192
    @monikadeogaonkar6192 10 месяцев назад

    खूप छान.. आम्हालाही नक्कीच यायला आवडेल. खरंच हे असे सगळ्यांनाच जमत नाही तुम्ही ग्रेट आहात 🙏🏻

  • @waseemmashalkar212
    @waseemmashalkar212 10 месяцев назад

    Which Village? Would like to visit. From Borivali west, Mumbai. Waseem Mashalkar. Thanks !!!!!

    • @farmofhappinessagrotourism
      @farmofhappinessagrotourism  10 месяцев назад

      नमस्कार, व्हिडिओच्या शेवटी पूर्ण डिटेल्स आहेत दिलेले

  • @sanjaymanwatkar6722
    @sanjaymanwatkar6722 10 месяцев назад

    नमस्कार

  • @smitamokashi1974
    @smitamokashi1974 10 месяцев назад

    खरीखुरी गोठ्यातली वसुबारसेची पूजा पाहून खूप छान वाटले. धन्यवाद.

  • @manishachavan8865
    @manishachavan8865 10 месяцев назад

    🌟🌟🌟🌟🌟👍

  • @prachiscuisine
    @prachiscuisine 10 месяцев назад

    Khup sundar … dolyat paani ch Ala evdha chhan sagla tya go mata na chhan naiwedya khaatana ani tyanchya vasarana Dudu pitana ani a Purushottam dada n cha dedication baghun
    Khup prem ❤

  • @shivajishelakeshelake2312
    @shivajishelakeshelake2312 10 месяцев назад

    Very nice.dipawalichya hardik shubheccha.mst vyawasthapan.

  • @SharayuAnerao
    @SharayuAnerao 10 месяцев назад

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte9043 10 месяцев назад

    खुपच छान हिंदू संकृती राहिली केवळ आपल्या कारणे

  • @amitpardule5155
    @amitpardule5155 10 месяцев назад

    खूप छान तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @prashantzanpure8075
    @prashantzanpure8075 10 месяцев назад

    खुपचं सुंदर.सर्व परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...

  • @SwarupRevolutionaryFarmer
    @SwarupRevolutionaryFarmer 10 месяцев назад +2

    Happy Diwali to you. Nice to see u working on beautiful concept. U really keeping our culture alive❤

  • @snehagogate7039
    @snehagogate7039 10 месяцев назад

    तुम्हाला दोघानाही दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा!

  • @gokulvadlik602
    @gokulvadlik602 10 месяцев назад

    यालाच म्हणतात संस्कृतीची जोपासना करणे.