राहुल सोलापूरकर यांच्या वादग्रस्त विधानावर तीव्र संताप! | APH Times | Chhatrapati Shivaji Maharaj
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- राहुल सोलापूरकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते आहेत. नूतन मराठी विद्यालय आणि स. प. महाविद्यालय येथे त्यांनी शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात त्यांनी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सहभाग घेतला आणि अनेक बक्षिसे मिळविली. त्यांनी २२ हौशी नाटकांमध्ये आणि २५ व्यावसायिक नाटकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. २०१७ साली त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने नेत्रदीपक 'चित्रकर्मी' पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्या मुळे जनतेच्या मनात त्यांच्या बद्दल एक चांगला अभिनेता अशी इमेज तयार झाली होती.
मात्र अलीकडेच, राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यांनी म्हटले की, महाराजांनी मिठाईच्या पेटाऱ्यांमध्ये लपून नव्हे, तर लाच देऊन सुटका करून घेतली होती, आणि याचे पुरावेही उपलब्ध आहेत. त्यांच्या या विधानामुळे समाजात प्रचंड वादळ उठले असून जनमानसात त्यांची प्रतिमा डागाळली गेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे दैवत नसून संपूर्ण भारतातच त्यांच्या बद्दल आदर आहे. शिवाजी महाराजांची राजनीती, कुटनीती आणि युद्धनीती याचा आजही जगात अनेक ठिकाणी अभ्यास केला जातो. अशा महान व्यक्ती बद्दल बोलताना जिभेवर ताबा ठेवायला हवा. केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी बेधडक वक्तव्य करण्याचे दुष्परिणाम राहुल सोलापूरकर यांना भविष्यात भोगावेच लागणार.
या विधानानंतर समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून अनेक अभिनेत्यांनी सोलापूरकर यांच्या या विधानाचा निषेध केला आहे. अशा वक्तव्यांमुळे मराठी चित्रपटसृष्टीची प्रतिमा खराब होत असल्याचे सांगितले.
राहुल सोलापूरकर यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर टीका होत असून, अनेकांनी त्यांना माफी मागण्याचा आणि भविष्यात पुन्हा अशी चूक न करण्याचा सल्ला दिला आहे.
Visit: www.aphtimes.in
For all the latest news from Maharashtra keep watching APH Times on RUclips: @AphTimes
Follow us on
Facebook: www.facebook.c....
Instagram:@aphtimes