कोकणचा"मुळशी पॅटर्न"होतोय|व्हायरल पोस्टर मागील कटू सत्य|Save Konkan From Dalals

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • होय आम्ही कोकण विकायला काढलाय... स्वर्गीय कोकणाची किंमत पैश्यात केलीय आपण..
    पश्चिम घाटा जवळील जमिनी रबर अननस लागवडीसाठी तर किनाऱ्या च्या जमिनी पर्यटनातून पैसा उभा करण्यासाठी पर प्रांतीय investors celebraties landlord राजकारणी पुढाऱ्यांनी विकत घेतल्यात..
    जी गावे जो निसर्ग आपल्या पूर्वजांनी जपला ..गाव राहटी आणि देव राहाटी चे नियम घालून निसर्ग जपला..जमिनी न विकण्यासाठी सामजिक निर्बंध घातले ..देवाचे डोंगर देवाच्या नद्या देव जंगल असे करत परिसंस्था वाचवल्या त्याच गावातील लोक आज काही रुपयांसाठी कोकणच्या सोन्या सारख्या जमिनीची किंमत पैश्यात करत आहेत..
    निसर्गाने जे दिलंय ते शाश्वत तेने घेण्याची वृत्ती आणि दृष्टी संपत चाललीय का??
    गोव्या पासून मालवण पर्यंत जवळपास सर्वच किनारे कवडीमोल किमतीला विकले गेलेत...
    आज शहरात ज्या पैश्यात एक फ्लॅट विकत घेता येणार नाही त्या किमतीत कोकणातील एकरच्या एकर निसर्ग संपन्न जमिनी विकल्या गेल्या..
    आज ह्याच किनाऱ्यांवर आम्ही Unauthorised झालो आहोत..
    मागच्या काही दिवसांत कोकणातल्या निसर्गाच्या कोंदणातील hidden villages मध्ये prime locations वरच्या जागेत स्थानिकांनी Ecotourism centres उभी करावीत म्हणून meetings घ्यायला फिरत असताना लक्ष्यात आले की beach view , Sea view ,Lagoon view, Valley view , mountain top ,River view, Backwaters touch , private beach अश्या स्वर्गीय सुंदर जागा स्थानिकांना त्याचे महत्त्व माहीत नसल्याने अगदी कवडीमोल किमतीत विकल्या आहेत..
    आता कमेंट मध्ये ह्यांना शिव्या घालून पर प्रांतीय लोकांना नावे ठेवून काही फायदा नाही...आपण ground ला येऊन..गावात राहून लोकांसमोर काही सक्षम पर्याय आणि role models उभे करतो आहोत का?? आपण असेलेल्या जमिनी आणि नैसर्गिक सौंदर्याचा फायदा घेऊन काही अर्थव्यवस्था उभी करतो आहोत का? आपल्या शिक्षणाचा उपयोग कोकण च्या आणि अंततः आपल्याच शाश्वत भविष्यासाठी करतो आहोत का? ह्याचा विचार प्रत्येकाने करायला हवा..
    इतकी प्रचंड समृद्धता असलेल्या भागातील सुशिक्षित लोक जेव्हा शहरांकडे स्थलांतर करतात तेव्हा तिचं समृद्धता उपभोगायला बाहेरून लोक येणारच ना...
    आपल्याच मुलांना गावात काय ठेय ला तू मुंबैक्क जा बाबल्या म्हणून सांगणाऱ्या पिढीने गावात राहून जमिनी शी नाते जोडणारे शेतकरी नष्ट केले .. भूमिपुत्र संपवले ..म्हणूनच भकासी विकासाच्या संकल्पना येतायत आणि दलालांचा सुळसुळाट वाढला आहे...एक दिवस आपलाही "मुळशी" होऊ नये आणि आम्हीच आमच्या तालुक्यात Unauthorised होऊ नये अस वाटत असेल तर जमिनी कसायला शिका..विकायला नाही

Комментарии • 802