Bhay ithale sampat nahi - Rahul Deshpande

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 1,1 тыс.

  • @abhijittoro8085
    @abhijittoro8085 3 года назад +92

    भय इथले संपत नाही [चंद्रमाधवीचे प्रदेश]
    "भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
    मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...
    ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया
    झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया
    तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
    सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला
    स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
    हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे"
    -ग्रेस
    प्रस्तुति- श्रीनिवास हवालदार
    ग्रेस यांच्या अधिकांश कवितात संध्याकाळची पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांना काही समालोचकांनी "संध्यासुत्राचा यात्रिक’ म्हणून ही संबोधिले आहे.त्याबद्दल ग्रेसने फार सुरेख विवेचन केले आहे.ते म्हणतात " देवा कडून किवा निसर्गाकडून प्रत्येक व्यक्तीला काहीतरी दान मिळाले असते आणि त्याला घेऊन तो आपला जीवन प्रवाह पुढे नेत असतो.मला निसर्गापासून जे दान मिळाले आहे ते संध्याकाळ नाही "संधिकाल" आहे पण हा संधिकाल म्हणजे प्रकाशाचा अभाव नाही कारण An evening is also a twilight."हा संधिप्रकाश ग्रेस च्या या कवितेच्या अंतिम ओळीत 'स्मरणाच्या चांदण्यात' प्रकाशला आहे. ग्रेस म्हणतात " मी एक प्राचीन काव्य-पुरुष आहे ."I am an ancient man belonging to your modern time."त्यामुळे एकाच वेळेला प्राचीन सभ्यता आणि प्राचीन अविष्कार शैली यांचा मिलाफ आधुनिक काव्यशैलीशी झाला आहे 'भय इथले संपत नाही' .या कवितेत आईचा उल्लेख कोठेच नाही परंतु पूर्ण कविता व त्यातील संदर्भ समजल्यावर हे स्पष्ट होते की कवितेचा संबंध प्रेयसीशी नसून आईशी आहे.या कवितेत कवीचा कल अध्यात्माकडे वळलेला वाटतो.या कवितेत आदिकवी वाल्मिकी रामरक्षा 'स्तोत्र' गात डोकावलेले आहेत.
    भय हा कवीचा ,किबहुना जगाचाच स्थायी भाव आहे. जगातील दैनंदिन घटनांमुळे उत्पन्न होणारे निरंतर भय संपत नाही परंतु संध्याकाळच्या शांत वातावरणात आईने त्यास बालपणात शिकवलेली गीते गायल्यानंतर त्याला मनःशांती लाभते.बालपणी आई बरोबर वनात घालवलेली एक दुपार व नंतरची संध्याकाळ कवीस आठवते. दिवसाच्या उन्हात वनात झर्‍याच्या जवळ विसावणे शक्य नव्हते .ते झरे रात्रीसाठी प्रेमी युगलांकरता चंद्राने राखून ठेवले आहेत. त्याची शीतलता कदाचित चंद्र उगवल्या नंतरच जाणवते . दुपारी आई व मुलाला झोपण्यासाठी मिळालेले स्थळ म्हणजे ईश्वराच्या मायेने उत्पन्न झालेलेली भूमाता व त्यावर उगवलेले वृक्ष. त्या दिवशीची आठवण आता जेह्वा येते तेन्ह्वा असे वाटते की झाडाखाली झोपणे व उठणे या विधीनिर्मित जीवन आणि मृत्यू या निरंतर चक्राचाच एक भाग असावा. हे चक्र असेच चालणार आहे .त्या दिवशी संध्याकाळी वृक्ष्याच्या खाली बसून आईने हळुवारपणे म्हटलेले रामरक्षा स्तोत्र अजून ही त्याच्या स्मरणात आहे. त्या वेळचे आईचे मंद व हळुवार बोल कवीच्या संपूर्ण आयुष्या साठी इतके प्रभावी झाले जसे वनवासाच्या वेळी सीतेस रामाचे स्मरण झाले असेल.रामरक्षा स्रोत्रात शिरापासून पायापर्यंतच्या सर्व इंद्रियांचे रक्षण करण्याची प्रार्थना आहे पण सर्व मानव जाती कुठल्या न कुठल्या दुक्खाने पीडित आहे. ती प्रार्थना कोणासाठी होती ?त्या दिवशीची आईची स्मृती अजूनही चांदण्याच्या मंद व शीतल प्रकाशाप्रमाणे कवीच्या मनात बिम्बलेली आहे

  • @gopalphadke633
    @gopalphadke633 3 года назад +55

    ग्रेस यांच्या अफाट गूढ शब्दावलीला हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेले स्वप्नवत संगीत आणि लतादीदींच्या स्वर्गीय आवाजाने अमर झालेले हे गीत! हे शिवधनुष्य पेलायचा तुमचा प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहे. खूप छान. असेच आनंदाचे दीप आमच्यासाठी तेवत ठेव. खूप खूप शुभेच्छा!

  • @pranjalilale3435
    @pranjalilale3435 3 года назад +23

    आमच्या पिढीतील हिरा...सच्चा आवाज....अप्रतिम👌

  • @suhasakolkar
    @suhasakolkar 4 года назад +84

    झाडांशी निजलो आपण....
    झाडात पुन्हा उगवाया...
    किती सुंदर लिहीलंय....

  • @rhushikeshkharkar9301
    @rhushikeshkharkar9301 4 года назад +26

    या गाण्याचा खरा अर्थ घरापासून हजारो किलोमीटर दूर इथे परदेशात राहताना जास्तच जाणवतो पण हेच जे काय आपलं असतं जे टिकवून ठेवतं नातं मायदेशी !

    • @ashishnarkale8532
      @ashishnarkale8532 Год назад

      Come back to India then

    • @freakishlyfeline4917
      @freakishlyfeline4917 Год назад

      Drama

    • @PriyaFly
      @PriyaFly Год назад

      Very true.. I don’t know why hate comments but I understand

    • @rohanutep81
      @rohanutep81 Год назад

      @@ashishnarkale8532😂😂😂😂 dollars American dream

    • @anujagawande21
      @anujagawande21 Год назад

      I can understand man
      But still you're listening pure gem 💎 & for that you should appreciate yourself

  • @sushamakulkarni216
    @sushamakulkarni216 3 года назад +1

    महाश्वेता सिरीयलमधली तरुण ऐश्वर्या नारकर आठवली....एखादे मालिकेतले गीत त्या काळात अत्यंत प्रसिद्ध होणं हे नविनच होते.कवी ग्रेसांची गूढरम्य आणि खोल अर्थ दडलेली ही रचना खूपच अद्भुत आहे....लताजींने तर याचे सोने केले आहे.माझे अत्यंत मनाच्या जवळचे गाणे male voiceमध्ये ऐकताना त्याच भावना आहेत.खूपच शांतरसाचे हे गीत राहुलजी आपणही अप्रतिम गायले आहे,♥️

    • @devidasborkar7402
      @devidasborkar7402 Месяц назад

      Yes, no one, no one can even come close to our Lataji🙏🏻

  • @gawanderohan
    @gawanderohan 4 года назад +21

    आतुरतेने वाट पाहिली या गाण्याची.... हे नुसतं गाणं नसून एक अध्याय आहे.... खूप धन्यवाद या सुंदर अनुभूती साठी... असेच गात रहा... 🙏

  • @makarandketkar
    @makarandketkar 3 года назад +2

    देवाने कान (शारीरिक आणि गाणं समजण्याचे) दिल्याचे सार्थक वाटण्याचे क्षण देतोस तू राहुल.

  • @diptiambekar9564
    @diptiambekar9564 3 года назад +6

    वा ...क्या बात है ...झाडाशी निजलो आपण ..
    झाडात पून्हा उगवाया ..काय गुढ अर्थ ...तसही सगळ्या च ओळीत शब्दांच्या पलीकडल लपलेल आहे ..... सोबत यमन ......न ग्रेस ...बेस्ट काँबो ,खूप छान उलगडून समोर ठेवलत गीत ...मस्तच 🙏🙏🙏🙏🙏

  • @ovlife6121
    @ovlife6121 2 года назад +1

    कोंकणात खळ्या मध्ये बसून संध्याकाळच्या वेळेस हे गाणं ऐकत आहे मी.. ❤️

  • @krishna_o15
    @krishna_o15 4 года назад +34

    I always liked marathi songs for their classical music touch and awesome lyrics. However Rahul dada on a keyboard takes it to next level. My love for Maharashtra and pride being born here raises day by day.

  • @varsharebello
    @varsharebello 4 года назад +141

    Simply beautiful....you keep raising our expectation with every masterpiece you render. Your unplugged songs are addictive. God bless.

    • @RahulDeshpandeoriginal
      @RahulDeshpandeoriginal  4 года назад +7

      Thank you 🙏🏼

    • @vishaltakte5628
      @vishaltakte5628 4 года назад +5

      Sir , Pls Sagara pran talmala hey song keyboard try kara tumcha aavajat avadel

    • @piyushksheersagar839
      @piyushksheersagar839 4 года назад +1

      राहुल, किती सुंदर समजावून सांगतोस। असच ऐकत रहावसं वाटतं।
      Beautiful rendition .. Just like a flow of river.
      Please keep up the good work.

    • @aparnamejari5553
      @aparnamejari5553 4 года назад

      ⁰p⁰⁰⁰0pp⁰⁰⁰⁰⁰0ppp⁰ppp⁰0ppppp⁰ppppppppppppppppppp⁰pppppppppppppppppp

    • @ketankotalwar6471
      @ketankotalwar6471 4 года назад

      Simply beautiful 😍

  • @sangeetathakur4999
    @sangeetathakur4999 4 года назад +6

    भय इथले संपत नाही.......हे गीत मनाला भावणारं आहेच शिवाय आत स्पर्शून जाणारं आहे.
    तुम्ही सुरांत हरवता हरवता पुन्हा व्यवहारी जगात येता याचा थोडासा त्रास होतो.
    मी तुमच्या स्वरांसमवेत एका अनोख्या जगात जात असते आणि मधेच थबकते.
    असो.
    या डोळ्यांची दोन पाखरे
    सख्या रे घायाळ मी हरिणी
    अखेरचा हा तुला दंडवत
    जिवलगा राहिले रे दूर
    ही गाणी फक्त सुरावटीवर म्हणाल?
    😊😊😊

  • @nikhilrane7424
    @nikhilrane7424 4 года назад +1

    Ky bolu aata aangavr kata aala aaiktach shani evda apratim gana ahe tyat tumhi gaylat tr man trupta jhale kash didi tumcha bajula asta tr swargach prapta jhale aste doganchi mefil madun😍😍😍😍😍😍

  • @lakshmangore5967
    @lakshmangore5967 4 года назад +17

    मस्त भाऊ , प्रत्येक पिढीला बालगंधर्व, कुमार गधर्व, भीमसेन , वसंतराव आणि अजून खूप पाहिजे असतात जे आता नाहीत . तो भार खूप सुंदर पणे तुम्ही लोक वाहता आहात आमच्यासाठी . खरच फार धनयवाद

  • @chandravilasdeshpande1360
    @chandravilasdeshpande1360 Год назад

    फारच छान व गूढ अशा या कवितेचे खूप कष्ट घेऊन केलेले रसग्रहण पटले आणि पोहोचले. मनःपूर्वक विशेष धन्यवाद.

  • @shamfulzele4286
    @shamfulzele4286 4 года назад +4

    सूर कसा लावावा... कुठे वजन द्यावे तर कुठे पॉज घ्यावा... राहुलजी तुमची ही सुरांची ट्रीट खरच अनमोल आहे... कानात तुमचा स्वर निनादत असतो एखाद्या खळखळत्या प्रवाह सारखा... खूप आभार.

  • @rupalishinde1140
    @rupalishinde1140 2 года назад +4

    ज्ञानेश्वर माऊलींचा शांतरस म्हणजे आपला आवाज!!वंदनीय

  • @radhah726
    @radhah726 4 года назад +72

    "हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणांचे" - अप्रतिम, शांत सुरेल आर्त

    • @ashwinijoshi639
      @ashwinijoshi639 Год назад

      खरच किती हृदयस्पर्शी शब्द आहेत, डोळ्यात पाणी येतं. .हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणांचे 😢

  • @paragsb
    @paragsb 4 года назад +9

    गाणं आणि त्याचं समजावणं दोन्ही ही सुंदर.
    श्रोता म्हणून ‌ऐक यला सुलभ असलेलं गाणं, रचनाकार म्हणून रचणे किती कौशल्य पूर्ण काम आहे, हे व्हिडिओ च्या दुसऱ्या भागातून जाणवते. अशीच उत्तम गाणी व त्याचं तेवढंच उत्तम निरूपण पुन्हा पुन्हा ऐकायला मिळू देत.

  • @yogeshpedamkar2068
    @yogeshpedamkar2068 4 года назад +9

    पुढील गाण्याची विनंती.."सरणार कधी रण"

  • @vabh786
    @vabh786 2 года назад +3

    काय म्हणायचं ह्या शब्दांना, ह्या सुरांना, अनं ह्या स्वराला! हेच स्वर्ग. दादा तुला प्रणाम!! 🙏

  • @sgian_praju993
    @sgian_praju993 4 года назад +5

    जेव्हा हि मी हे गीत ऐकते तेव्हा ही मी पूर्णपणे प्रसन्न होऊन जाते.
    वय 19 वर्षे. Hollywood Bollywood Kollywood tollywood सर्व गाणी ऐकते पण आपल्या मराठी गाण्यांमध्ये जे समाधान आहे ना ते दूसरी कडे कूठेही नाही.
    भय इथले संपत नाही. 😅😍❣️

  • @meenakshi554
    @meenakshi554 4 года назад +53

    प्रत्येक गाणं कमीतकमी दहादा ऐकावं
    तरीही मन काही भरत नाही
    कितीवेळा वाटतं कमेंट करावं
    तुमच्या आवाजापुढे माझे शब्द उमटत नाही

  • @manjushrinanajkar2527
    @manjushrinanajkar2527 4 года назад +6

    Superb!!!! क्या बात है!!!
    आर्त स्वर काळजाला भिडले. पंडितजी यांची चाल आणि ग्रेस यांचे शब्द मनाला भावतात.राघव शेला मनात रुतत जातो.धन्यवाद.खूपच सुंदर.👌👌

  • @jeevanlagadpatil
    @jeevanlagadpatil Год назад +2

    राहुल राव🚩🚩🔥🔥🔥 आत्मिक आनंद आणि एकतानता , आत्मिकता एकाग्रता ..... आपल्या आवजाने ,आपल्या गान्याने साधुन दिली ,
    खुप दिवसांनी अशी एकाग्रता साधता आली, धन्यवाद .आपला सर्वकाल चाहता, आमच्या शुभेच्छा अपल्यासोबत सर्वकाल आहेतच
    महाराष्ट्राचा आवाज म्हणून , जग आपल्याला ओळखेल या सदिच्छेसह🔥🔥🚩🚩

  • @sharadsuryavanshi9031
    @sharadsuryavanshi9031 4 года назад +42

    Keep singing our appetite is like Lord Ganesha's stomach. Insatiable

  • @akshats6303
    @akshats6303 3 года назад +1

    अप्रतिम, मी हे सारखे सारखे ऐकत असतो

  • @reddotsings801
    @reddotsings801 4 года назад +4

    dada, moklya aakasha saathi kasavis zhalelya fadfadnyara pakshi cha bhaas swatachya aat zhala. you are truly so blessed and gifted dada.

  • @pdb21871
    @pdb21871 2 года назад +1

    Khup chaan... Pan aapan maraathi aahot. Maraathi bhaasha gauravaachi bhaashaa ahe.. Boltanaa hi maraathi ch chaangli waatate

  • @nikhiljagtap5395
    @nikhiljagtap5395 4 года назад +3

    कितीदा ऐकू तेच कळत नाही, अप्रतिम🙏

  • @unmesh_mahajan
    @unmesh_mahajan 4 года назад +8

    बाहेर पावसाची रिपरिप,शांत संध्याकाळ आणि हे गाणं on loop
    तृप्त झालो😍🙏

  • @prachijoshi9794
    @prachijoshi9794 4 года назад +12

    नेहमीप्रमाणेच सुंदर!
    माझं खूप खूप आवडत गाणं आहे हे.
    धन्यवाद ! यासाठी.
    प्रत्येक गाणं तुम्ही तुमच्या पद्धतीने गाता ते खूपच
    आवडतं.👌👌👌🙏

  • @wagleaniket
    @wagleaniket 4 года назад +2

    अप्रतिम राहुल दादा. तुमची गायकी ऐकताना ग्रेसांच्या या कवितेचा गूढ अर्थ कुठतरी नव्यान उमजतोय. एखाद्या संध्याकाळी ऐकाव हे काव्य गायन.. पुन्हापुन्हा...
    एक गाण आहे किशोरी ताईंनी गायलेल.. जाईन विचारित रानफुला... किंवा हे शामसुंदर राजसा...तुमच्या स्वरांत खुप छान वाटेल

  • @rekhasathaye
    @rekhasathaye 4 года назад +5

    ग्रेसचे अफलातून काव्य,पछाडणारे संगीत आणि तुमच्या स्वराची रोमारोमात भिनणारी आर्तता ,अर्थवाही.

  • @transcloudsmegh8932
    @transcloudsmegh8932 4 года назад +8

    प्रत्येक 'नाही' कसा भिन्न प्रकारे येतो..थोर ते ग्रेस,थोर ते बाळासाहेब....आर्त हुरहूर शब्द आणि सूर दोन्हींमध्ये उमटते.
    राहुल दा नेहमीप्रमाणे तरल..❣️

  • @ameys2009
    @ameys2009 4 года назад +9

    सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला...
    काय सुंदर गायले आहे राहुल जी...

  • @bhartiratale2353
    @bhartiratale2353 4 года назад +1

    Khup sunder atishya pavitra aawaj aahe tumcha 👌 ekda toch Chandrma nabhat eika please Rahulji.

  • @vivekdeshpande4423
    @vivekdeshpande4423 4 года назад +3

    फारच सुंदर जेव्हा केव्हा शांत वेळ असेल तेव्हा हे गाण ऐकायला आवडत ....फार जुन्या आठवणी जुळल्या आहे या गाण्यात... अणि राहुल जी आपल्या आवाजात तर फारच सुंदर वाटते 🌹🌹

  • @prachikulkarni8302
    @prachikulkarni8302 4 года назад +1

    स्तोत्रा त इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे धन्य ते कवी ग्रेस , बाळासाहेब, लताबाई आणि बऱ्याच वर्षांनी ह्या गाण्याला पुनरुज्जीवन देणारा तू राहुल , धन्यवाद 🙏🙏 क्या बात सुंदर 👌💐 फरीदा खानुम जींची गझल👍 😊 प्लिज राम का गुणगान करिये होऊन जाऊदेत

  • @ss0771
    @ss0771 4 года назад +268

    Amchya generation ne Bharat Ratna Pt.Bhimsen Joshi aikle nahiyet, pn next generation la nakki sangu ki amhi "Shri Rahul Deshpande" yanche gaane aikle ahet!🙏🙏

  • @devidasborkar7402
    @devidasborkar7402 Месяц назад

    God bless these youngsters. The altimate Latamataji will remain immortal. My sincere Pranam to Lataji for making my life enjoyable.🙏🏻

  • @hemangibonde2591
    @hemangibonde2591 4 года назад +3

    कवी ग्रेस यांच्या कविता तश्या समजण्यास कठीण पण तुम्ही शब्दसुरांच्या जादुगार आपल्या मखमली स्वराने किती सहज उलगडवून सांगता.मस्त.👌गात रहा.

  • @SaashaTraveler
    @SaashaTraveler 4 года назад +1

    Sundar Ruhul sir 👌 👌👌👌👌👌👌👌 mast survat aajcha divaschi...👍🙏

  • @omkarnighul6223
    @omkarnighul6223 4 года назад +6

    राहुलदादा खूप छान...तुझ्यामुळे आमच्यासारख्या तरुण पिढीला संगिताची गोडी निर्माण झाली आहे...खूप खूप thank you😍❤❤

  • @siddharthavhad6316
    @siddharthavhad6316 4 года назад +3

    गाण्याचे नाव पाहताक्षणी like केले, ठाऊकच आहे की गाणं मस्त आहे आणि गायकही तितकाच! खूप छान .....

  • @prajaktatalvelkar5448
    @prajaktatalvelkar5448 4 года назад +4

    Apratim Rahul. Mata Saraswati chi krupa aplyavar nehmi ashich raho hich prarthana
    I can’t begin or end my day without listening to you.

  • @varadaapte9357
    @varadaapte9357 3 года назад +1

    Kharach sampu ch nai as vatat hot ..shabd apure padtayt lihtana... Suchat nais hot... 🙏🙏Dhanyvad itkya sunder kalakrutisathi..🙏

  • @adityajoshi8042
    @adityajoshi8042 4 года назад +5

    अप्रतिम... गाणं आणि ते समजावणं..... राहुल sir एका गाण्याची विनंती.."सरणार कधी रण प्रभो"

  • @kaustubhkulkarni2282
    @kaustubhkulkarni2282 4 года назад +7

    निःशब्द...शब्दातीत..अप्रतिम...सुरेख. मी पुन्हा पुन्हा ऐकतोय तरीही परत ऐकावेसे वाटत आहे...
    सहेला रे ऐकायची इच्छा आहे सर

  • @VijayParekhMumbai-India
    @VijayParekhMumbai-India 4 года назад +5

    राहुल तुम्ही काव्य, गायन आणि संगीत चा समन्वय म्हणजे काय ते प्रत्यक्ष अनुभव करून दाखवला. अनेक आभार कवि ग्रेस, हृदयनाथ जी आणि सुं श्री लताजीं ला पण 🙏

  • @nikhilpghag
    @nikhilpghag 4 года назад +1

    Rahul awaaj khupach goad lagala. Atishay sundar. Apt. Bless you.

  • @sanjanagaikwad2185
    @sanjanagaikwad2185 4 года назад +3

    खूप छान पद्धतीने गायलं आहे... झाडांशी निजलो... किती लीन होऊन जातो आपण गाण्यात ला अर्थ समजून घेऊन तो तुमच्या स्वरातून पोहचतो मनाला भिडणारे आहे

  • @sharmilamane3924
    @sharmilamane3924 4 года назад +2

    कवी ग्रेस यांच्या शब्दांना सुंदर ,योग्य न्याय दिला. गुढ,शांत, आर्त स्वर . अप्रतीम

  • @priyankalondhe
    @priyankalondhe 4 года назад +4

    Weekend ची सकाळ, हातात मस्त आल्याचा चहा आणि तुमचा छान आवाज। अजून काहीच नको

  • @sonalkhedkar5445
    @sonalkhedkar5445 4 года назад +1

    khup khup surekh....shant chal...n beautiful meaning...tumchya avajat far chan aikayla

  • @digambarpatil1229
    @digambarpatil1229 4 года назад +5

    कितीही ताण तणाव असूद्या, सर तुम्हाला ऐकल्यावर मन अगदी प्रसन्न होऊन जातो. बस ऐकत बसवास वाटतं. तुम्हाला live ऐकायची खूप इच्छा आहे and I m sure ती कधीतरी पूर्ण होईलच 🙏

  • @deeptiadsul5095
    @deeptiadsul5095 4 года назад +2

    Wah wah Aprtim khupch Sunder shabt kami padtat koutuk karayla .

  • @kaushikkulkarni4138
    @kaushikkulkarni4138 4 года назад +13

    Simply Mesmerizing !!! Would like to hear ' ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता ' in your voice... Another classic by Grace and Pt. Hridaynath Mangeshkar.

    • @akshaykk99
      @akshaykk99 3 года назад

      ruclips.net/video/Q8qCGtl_zNE/видео.html

  • @ashwininaik6379
    @ashwininaik6379 4 года назад +2

    माझे अत्यंत आवडते गाणे आहे.पण मला नेहमीच वाटायचे की ही कविता गायिकेसाठी नाहीतर गायकाच्या आवाजात असावी.आणि आज माझं मलाच पटलं....अप्रतिम ....दैवी....आतातर मला जास्तच आवडलं....

  • @milindkhedekar6496
    @milindkhedekar6496 4 года назад +3

    खुपच सुंदर. तुमच्या गायकीबद्दल आम्ही काय बोलणार, शब्द अपुरे पडतील. अशीच सुंदर गाणी ऐकवत रहा. God Bless You

  • @abhijeetparalikar1478
    @abhijeetparalikar1478 4 года назад +2

    Aprateem. Jevdhe Lata didinchya aawajaat aavadte tevdhech aatahi aavdle. Dhanyawad sir🙏

  • @prabhakarhatkar794
    @prabhakarhatkar794 4 года назад +9

    गाणं तर अप्रतिमच झालं राहुल दादा. परंतु मध्येच जे विश्लेषण करताय ते मराठी भाषेत ऎकायला मिळालं तर अजून जास्त बहार येईल. इंग्रजी येत नाही असला भाग नाही. पण आपल्या मराठी भाषेची मजाच वेगळी. ♥️♥️

  • @yogeshdeshpande4014
    @yogeshdeshpande4014 3 года назад +1

    Rahul sir , hey Apratim gaana tumhi jya sunder padhatini ulgadun dakhavala ..... a million thnx for it. Balasahebanche saglech gaane eaka peksha eak saras ... ajun ase sunder gaane tumchya aawazat aaikayla milave hich vinanti sir ...

  • @jayeshvispute9258
    @jayeshvispute9258 4 года назад +3

    अप्रतिम! नव्याने प्रेमात पाडलंत ह्या गाण्याच्या. सुंदर! 🥰👍🏼👌🏼

  • @sharangdeshpande1426
    @sharangdeshpande1426 4 года назад +2

    सुंदर ....मन सुद्धा गान्यासोबत जाते.
    ' सखी मंद झाल्या तारका ' तुमच्या कडून ऐकायला आवडेल.

  • @tejrajtawde9467
    @tejrajtawde9467 4 года назад +3

    राहुलदादा डोळ्यात पाणी आणलस आज 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @gayatripantsachiv3808
    @gayatripantsachiv3808 4 года назад +2

    Aare🙏 धन्यवाद मनापासून..किती सगळी रत्न आहेत ही. गणपती उत्सवा पासून सुरु झालेला हा प्रवाह असाच चालू राहो..असाच सुरेख गात रहा 👏👏👏❤❤❤

  • @smitaborawake0000
    @smitaborawake0000 4 года назад +4

    Ahahaaaa..beyond words....very close to heart song...great legendary people has created what a piece...काय अर्थ आहे...वाह्!🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😇😇😇😇😇

  • @Nik-mh5jp
    @Nik-mh5jp 4 года назад +2

    Manala shantata milate tumache shabd aikun...khupach sundar

  • @anandpandey9361
    @anandpandey9361 2 года назад +3

    AAH! "me sandhyakaaDi gaato... tuu malaa shikavalii geetey..' ufff.. What legends. What a monumental coming together of 'greats' to give us a timeless piece of art! Jai ho _/\_ You have sung it so so responsibly Rahul.. kept it alive, intact... hearty....God bless!

  • @suyashmairal8506
    @suyashmairal8506 4 года назад +2

    सकाळी इतकी सुरेल सुरुवात झाली आणि काय हव एक परफेक्ट सकाळी साठी। 👌👌🙏🙏

  • @jayashreekothavale5390
    @jayashreekothavale5390 3 года назад +3

    Kavitetl bhaw sanjun manapasun gayale aahe.Touching the heart!

  • @meghanavairal599
    @meghanavairal599 4 года назад +2

    अप्रतिम सर तुम्ही गाणी शृंगार करून सादर करता, अजुन सुंदर गाणी ऐकायला मिळतात शांतता व्वा छान खुपच आवडलं धन्यवाद 🙏

  • @tusharniras
    @tusharniras 4 года назад +3

    काय कवी ग्रेस चे बोल ..... ❤️ आणि काय देशपांडे चा आवाज..... ❤️

  • @AmarDesh82
    @AmarDesh82 4 года назад +2

    वाह वा राहुल.. एक तर आवडीचे गाणे त्यात तुम्ही गायले पण सुरेख.. हृदयनाथजी बद्दल बोलताना तुम्हाला जसे शब्दं अपुरे पडत होते तसे मला तुमचे प्रत्येक गाणे ऐकल्यावर होते..
    जुन्या मराठी मालिकांची ही शीर्षक गीते ऐकायला खूप आवडतील..
    १. स्वामी - माझे मन तुझे झाले
    २. संघर्ष - आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा

  • @alekhsawant356
    @alekhsawant356 4 года назад +5

    5:43 after "Sarata...." aha..That was amazing !!!
    Same like "Ti geli Tevha..."
    Absolute perfection.
    Its beyond any words !

  • @ketandeshpande6992
    @ketandeshpande6992 4 года назад +1

    Apratim Rahul ji .....
    Tumcha gana mansala mantramugdha karun sodta ......

  • @Amitzf
    @Amitzf 4 года назад +5

    Proud to be a Marathi. Your voice over my home theater.. resonating in my home. Perfect start for the weekend.
    Thank you very much

  • @Maitreyi.Shital14
    @Maitreyi.Shital14 4 года назад +2

    हे सुराSS
    शब्दफुलांचा सुगंध तू
    तू मंदिरीची देवता
    जादुई पंख तुझे
    तू सांजवेडी शांतता...
    अंतरंगात भरुन का
    या वेदना या संवेदना
    खडतर हा प्रवास साहे
    तू असतोस जेव्हा सोबतीला...
    कणकणात आनंद आहे
    अथांग या सागरात तुझ्या
    स्पर्धा,ईर्षा,लोभ सारे
    साथी तू त्या गर्दीतला...
    🙏

  • @juniorraut
    @juniorraut 4 года назад +4

    This made me remember so many tracks probably on the Khamaj.
    Chandan sa badan chanchal chitwan
    Wo shaam bhi ajeeb hain
    So many songs one can relate.
    Personal fav song. Many memories and feelings to it.

  • @amitkelkar4501
    @amitkelkar4501 4 года назад +1

    Dada Tuzya Aawajat Ekda Sahela Re Aikayla Aavdel .🙏🏻

  • @dhanashridalvi7730
    @dhanashridalvi7730 4 года назад +6

    Usually its difficult to hear this song in someone else’s voice. Because I’ve heard it Lataji sing since childhood. But I loved what you sang. It’s a big deal to pull off her songs so gracefully. You deserve so much more appreciation than you get. World wide appreciation 🙏

  • @vinayl72
    @vinayl72 4 года назад +2

    क्या बात है! भय इथले हे एक अजरामर गीत झाले आहे. तुझ्या आवाजात खूप छान वाटले! काॅड्स पण छान मूड बनवत होत्या 👌🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @manaskulkarni904
    @manaskulkarni904 4 года назад +16

    सुकून !!!
    dada, I cannot thank you enough for all the musical treats you’ve been showering upon us!!
    If emotions had voice, It has to be yours.
    🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @sangeetagupte3487
    @sangeetagupte3487 4 года назад +1

    अतिशय सुरेख मेळ कवी ग्रेस, पंडित हृदयनाथ मंगेशकरजी आणि गानसरस्वती लता मंगेशकर यांच्या स्वरात ऐकणं म्हणजे शब्दांच्या पलीकडे नेमकं तेच गमक तुमच्या आवाजात ऐकताना जाणवले...हळुवार, आर्त आणि हृदयापर्यंत पोहोचलं..अप्रतिम गीत आहे..धन्यवाद तुमच्या शब्दातील सातत्याबद्दल.. अनेक शुभाशिर्वाद

  • @aparnakarnik4960
    @aparnakarnik4960 4 года назад +2

    तो बोल मंद हळवसा.....
    तो स्वर मंद हळवासा आपला......
    मनास भावून गेला......👌👌👌

  • @rahulpawar9530
    @rahulpawar9530 4 года назад +16

    ग्रेस , बाळासाहेब , सरस्वती
    आणि . . . . .
    शब्द पोरके बापुडे

  • @svnrm2004
    @svnrm2004 4 года назад +2

    राहुलजी, धन्यवाद। कवी ग्रेसजी,पंडितजी, लताजी यांची ही अजरामर कलाकृती.. आपण अतिशय समर्थपणे सादर केलीत. तरल, तलम स्वरानुभव 🌹

  • @jitendrahiwarkar729
    @jitendrahiwarkar729 4 года назад +4

    राहुलजी अप्रतिम,,... व्यक्त व्हायला पण शब्द सुचत नाही ..आभार💐

  • @deepakulkarni5950
    @deepakulkarni5950 4 года назад +2

    अप्रतिम. आपले प्रत्येक सादरीकरण मला निःशब्द करते. काही लिहावे किंवा काही बोलावे या पलिकडे मन जाते. मनाला कातर करणारी शब्दातीत अनुभूति. 🙏🙏

  • @athalyeakshay09
    @athalyeakshay09 4 года назад +3

    तुम्ही जेंव्हा म्हणता .....तू मला शिकवली गीते Goosebumps आणि तुमचा आवाज त्यात Unplugged सुंदर, सुरेल, सुरेख आणि तुमचा साधेपणा खूपच छान 🙏👌👋

  • @dr.maheshkulkarni7060
    @dr.maheshkulkarni7060 4 года назад +2

    राहुलजी.... अतिशय सुंदर ....स्वर्गीय अनुभती देणारे आपले गायन .... प्रत्येक शब्द व सुरांवरचा आपला ठेहराव हा केवळ अवर्णनीय ....

  • @dipeshpatil7975
    @dipeshpatil7975 4 года назад +5

    मला अजून आठवतंय रस्त्यानं जात असताना तुम्ही ठाण्यात तलाव पालीला आला होतात तेव्हा हे गाणं गायलं होतं आणि किती तरी वेळ थांबून ते गाणं मी ऐकलं होतं ..... सुंदर

  • @ganeshghadigaonkar8271
    @ganeshghadigaonkar8271 4 года назад +2

    सर तुमच गाण गुणगुणन पण दिव्य असत.....तुम्ही खरच या जनरेशन साठी शास्त्रीय संगीताची ओळख आहात..!!

  • @amoldatar2505
    @amoldatar2505 4 года назад +6

    Your voice is like a medicine for all of us. It helps us to forget our pains,sorrws, and what not. Ha aawaz fakta "daivi" aahe. Truly amazing. Thanks for all the happiness you shared with all of us during this pendamic time.

  • @satishhajare2260
    @satishhajare2260 4 года назад +2

    पहिले like आणि नंतर ऐकले👌 नेहमीप्रमाणे👍 श्रुती धन्य जाहल्या 👌

  • @drnehakk
    @drnehakk 4 года назад +8

    This is one of my favorites... I just love it. U have taken it to another level....

  • @anandkulkarni1453
    @anandkulkarni1453 4 года назад +2

    खूपच छान. तुमच्या आवाजात हे गाणं ऐकताना आम्ही पण गाण्या बरोबरच वाहून गेलो.हृदय स्पर्शी गाणं.

  • @tejaswinia
    @tejaswinia 4 года назад +6

    Before I even heard it .. I clicked liked ... Because the song is one of my fav and you are superb always🙏 God Bless! After hearing you .. your voice always reaches my heart it's so beautiful my eyes go moist.