हरभरा मर रोग व्यवस्थापन | harbhara mar rog niyantran
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- ✅घरबसल्या कृषि निगडीत सर्व उत्पादने भारी डिसकाऊंटसह खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा 👉krushidukan.bh...
============================================================
👨🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
🌱भारतअॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.
✅आजचा विषय - 🌱हरभरा पिकातील मर रोगावरील रामबाण उपाय👍
मर रोग फ्युजाहियम ऑक्सिस्पोरम बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रसार जमीन मधुन आणी बियाव्दारे होतो. हा झाडाची अन्नद्रव्य वाहून घेऊन जाणाऱ्या पेशीला मारते. मर रोगाची बुरशी 6 वर्षापर्यंत जमीन जिवंत राहू शकते. पण ज्या भागात हवामान जादा थंड राहते तेथे याचा प्रार्दुभाव कमी दिसतो. रोगामुळे बरीचशी झाडे वाळल्या मुळे हरभऱ्याच्या उत्पादनात घट येते. या रोगाचा प्रादुर्भाव हरभरा पिकात काईक वाढ अवस्थेपासून घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये सुद्धा आढळून येतो.
✅ लक्षणे:
👉 झाडाचा जमिनी वरचा भाग, देठ आणी पाने सुकतात व झाड वाळून मरतात.
👉 कोवळी रोप सुकतात.
👉 जमिनी खालचा खोडाच्या भागाचा रंग कमी होतो.
👉 रोगग्रस्त झाडाच्या खोडांना उभा छेद दिल्यास फिकट तांबुस काळसर रंग दिसून येतो.
✅ व्यवस्थापन:
👉 वेळेवर पेरणी करावी.
👉 शेणखत टाकताना ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ लिटर प्रति टन या प्रमाणामध्ये मिसळून द्यावे.
👉 रोग प्रतिकारक्षम जातीचा वापर करावा - पीकेव्ही, हरिता, बीडी एन जी 797, दिग्विजय, जे एस सी 55
👉 बीजप्रक्रिया - 3 ग्राम कार्बेन्डाझिम (बाविस्टीन) किंवा १० मिली ट्रायकोडर्मा व्हिरीडी / किलो बियाण्यास हलक्या हाताने चोळून बीजप्रक्रिया करावी.
👉 हरभरा पिकात मर रोग प्राथमिक अवस्था असताना. 1 लिटर ट्रायकोडर्मा व्हिरीडी 200 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळा. 3 दिवसां नंतर मरप्रादुर्भावित भागात याचा वापर करावा तसेच रोको २५ ग्राम किंवा कॅब्रिओटॉप ४५ ग्राम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
👉 जास्त प्रधुरभाव असल्यास -
1️⃣टाटा मास्टर (मैनकोज़ेब 64% + मेटलैक्सिल 8% डब्लू पी ) - 400 ग्राम
2️⃣रोको(थिओफेनेट मिथाइल 70% डब्लू पी ) - 400 ग्राम
3️⃣टाटा ताकत (कॅप्टन 70% + हेक्झाकोनाझोल 5% डब्लू पी) - 400 ग्राम
या पैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची ड्रेंचिंग किंवा सिंचनाच्या पाण्यासोबत द्यावे.
तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
👉भारतअॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
👉भारतअॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
👉भारतअॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal