आमचे ४२ कोंबड्या ऐका रात्रीत मेल्या.
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- काही दिवसांनपूर्वीच मी एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये माझ्या हातामध्ये गावठी कोंबडा आहे आणि असे इतर कोंबड्या जवळपास फिरत आहेत.त्यांचा आपण मुक्त संचार मध्ये संगोपन करत होतो आपल्या बागेमध्ये.
पण अचानक ८ जानेवारी रोजी,मध्यरात्रीत "कांडेचोर म्हणजेच इंग्रजीत (Asian Palm Civet)" या प्राण्यांनी आमच्या बागेतील कोंबड्यांच्या बंदिस्त जाळ्यामध्ये कुठून तरी जागा करून आत शिरकाव केला आणि एका रात्रीत होत्याचं नव्हतं केलं. सगळे पक्षी एकूण ४२ पक्षी मारून टाकल्या
(आता काही अभ्यासक तासेच काही अनुभवी शेतकरी असे देखील म्हणतात की कांडेचोर नसून हा हल्ला रान मांजर/ भाटई मांजर हिने देखील केला आसावा)
ह्या अगोदर अशा प्राण्यांचा कधी आम्हाला त्रास झाला नव्हता किंवा याबद्दल आम्ही कधी ऐकलं नव्हतं. गेली एक वर्षापासून आम्ही मुक्त संचार मध्ये कुक्कुटपालन करत आहोत आणि हे नवीन संगोपन बॅच-२ आम्ही आमच्या बागेमध्ये गेली तीन महिण्या पासून सांभाळत आहोत. असे काही कधीच निदर्शनात आले नाही.
येत्या २०-२५ दिवसात आमच्या या कोंबड्या अंड्यावर येणार होत्या पण त्याआधीच त्यांच्यावर जीवघेणे हल्ला झाला आणि ते सगळे पक्षी मरून गेले. अंधार असल्याकारणाने कोंबड्यांना त्यांच्यावर कोण अटॅक करत आहे!! हे करण्यापूर्वीच त्यांचा जीव घेण्यात आला. या कांडेचोर किंवा रानमांजर दोघांचे वैशिष्ट्य म्हणजे हे कोंबड्यांना मानेजवळ चावा करून त्यांचे रक्त शोषून घेतात आणि निघून जातो.
असे करत करत त्यांनी आमच्या या मुक्त संचार प्लॉटमधील एकूण ४२ कोंबड्यांचा जीव घेतला.
अत्यंत वाईट वाटतं जेव्हा आपण मन लावून मेहनत करून असे काही शेतीत प्रयोग करतो पण अश्या काही गोष्टी ज्यांचा आपण कधी विचार केला नसतो त्या गोष्टी घडतात आणि एका क्षणात सगळं काही नाहीस होते.
तर शेतकरी मित्रांनो असे प्राणी देखील आहेत ज्यांचा आपण कधी नाव ऐकलं नाही ते आपल्या कोंबड्यांवरती अटॅक करून आपलं बरंच नुकसान करू शकतात. तर आज मला ह्या नुकसानीतून शिकायला हेच मिळाले की बाहेरून मुंगूस कींवा आकाशातून घार ह्यांच्या बरोबर आसे हे रानमांजर, कंडेचोर व असे इतर प्राण्यांपासून आपले पक्षी सुरक्षित ठेवायचे असतील तर काही उपाययोजना करावे लागतील जेणेकरून जास्त जास्ती पॅक बंद घरटे ज्यात रात्री एकूण एक पक्षी सुरक्षित रहातील,ज्यातून असे प्राणी शिरणार नाहीत. ह्या प्रसंगा नंतर आम्ही पूर्णपैकी काम पुन्हा एकदा नव्याने करत आहोत.
तुम्ही देखील ह्या गोष्टीचा एक अंदाज घ्यावा की असे प्राणी तुमचं पूर्ण पोल्ट्री कल्चर नुकसानीत आणू शकत.हेच मला आजच्या ह्या youtube व्हिडिओ तसेच ह्या मेसेज द्वारे सांगायचे होते..