कोकणातले माझे घर आणि परिसर - माझा मातीचा राजवाडा | Kokankar Avinash's Village Mud House - Konkan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • प्रत्येकाला वाटे गावाला घर असावे. माझं पण घर आहे कोकणात. रत्नागिरी जिल्यामध्ये संगमेश्वर तालुक्यात माझं गाव निवळी. निवळी गावात २५० ३०० घरे आहेत त्यातले माझे एक घर. अजूनही माझं घर मातीचे आहे. घराच्या आजूबाजूला भरपूर झाडे आहेत. छोटेसे अंगण पण आहे.
    #VillageHouse #MudHouse #MyHouse
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    S O C I A L S :-
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    RUclips : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
    Work hard! Stay Positive !!

Комментарии • 953

  • @SHUBHAMZANJ
    @SHUBHAMZANJ 10 месяцев назад +1

    दादा खरी संपत्ती तर तुझ्याकडे आहे........❤😊😊 आणि दादा तुझी जी बोलण्याची स्टाईल आहे ना खरच वेगळीच आहे .... आईकत रहावस वाटत.....मला अस वाटत की दादा तू येणाऱ्या काळात नंबर एकच युटुबर होशील .....हे मात्र नक्की 🙏🙏🙏🙏👍

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  10 месяцев назад

      धन्यवाद. आपल्या सर्वांचे प्रेम, जिव्हाळा, आशिर्वाद आणि Support नेहमी असाच राहू दे ❣️

  • @ruchii8613
    @ruchii8613 3 года назад +52

    अविनाश तुझा राजवाडा खूप छान आहे आणि त्या राजवाड्याचा तू राजा आहेस कालांतराने तिथे तुझा नविन राजवाडा उभा राहणार 🙌🙌

  • @hiteshangane2909
    @hiteshangane2909 3 года назад +52

    मित्रा खरंच राजवाडा आहे अशा घरात राहण्या साठी लोक आता पैसे मोजतात खूप नशीब लागत कोकणात घर असायला

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 3 года назад +112

    अरे कोकणात घर म्हणजे स्वर्गसुख. मग ते मातीचं का असेना.❣

    • @ujwaladalvi5591
      @ujwaladalvi5591 Год назад

      खूप छान घर आहे तुझे

  • @1234sudesh
    @1234sudesh 3 года назад +101

    या घरामध्ये जी शांत झोप लागेल ना ती फ्लॅट किंवा राजवाड्यात सुद्धा लागणार नाही..

  • @dhirajborawake1792
    @dhirajborawake1792 3 года назад +17

    खूप सुंदर आहे. मनाला शांती देणारे घर. आणखी काय हवय माणसाला आयुष्यात 👍👍

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 3 года назад +11

    तुझ्या गावच्या व्हिडियोज मुळे शहरात स्थिरावलेली अनेक पाउले गावाकडे नक्कीच परत वळतील...👌👍

  • @nitinohol8150
    @nitinohol8150 3 года назад +1

    खरच खूप छान वाटल हा व्हिडीओ बघून कारण की तु एक साधा,सरळ आणि प्रामाणिक माणूस आहेस,जे आहे ते तू मनापासून सांगितल आणि दाखवल,नाहितर आज कालची खरी परिस्थिति आशी आहे की,आहे म्हणण्यापेक्षा मी स्वताः डोळ्यानी पाहलेली उदाहरणे काही माणस जवळ काही नसत उलट आई वडील यांना दुस-याच्यात कामाला जाऊन जगवतात,पण ही
    माणस आनोळखी माणसाजवळ बळचच काय सांगणार माझ्याकडे बंगाला आहे,गाडी आहे,शेती आहे अजून बरच काही,पण तू ख-या मनाने तुझ घर दाखवल आणि ते खूप छान आहे ,So beautiful मी तुझे खूप व्हिडीओ पाहिले आणि मला ते खूप आवडले कारण जे आहे ते आहे हे स्विकारून तुझे व्हिडीओ असतात....मी एक पंढरपूरकर जि.सोलापूर

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 года назад

      धन्यवाद ❣️ आपल्या कडे जे आहे त्यात समाधानी असल्यावर आयुष्य खूप सुंदर होते

  • @rekhajadhav4153
    @rekhajadhav4153 3 года назад +1

    अरे खरोखर हे तुझे घर आहेना राजवाडा च आहे यामध्ये जे सुख आहे ते सिमेंट च्या जंगलामध्ये नाही मला खूप मनापासून आवडतात अशी मातीची घरं

  • @pratapbhalekar6070
    @pratapbhalekar6070 3 года назад +10

    अविनाश ,तुमचा मातीचा राजवाडा सुवर्ण महाला पेक्षा कमी नाही .अशा निसर्गाच्या सानिध्यात रहाण्यास नशीब लागतं.

  • @dayanandrasal3619
    @dayanandrasal3619 3 года назад +6

    "राज वाडा" 👍👌✌🙏 खूप छान जननी जन्म भूमी स्वगाऀहूनी महान ती

  • @yadneshwarmhatre6015
    @yadneshwarmhatre6015 3 года назад

    अविनाश भावा तुझे घर अप्रतिम आहे.
    आणि मुळातच ते मातीचे आणि शेणाने सारवलेले आहे.त्यामुळे ते जास्त आवडल. अशा घरात राहण्याच सुःख काही वेगळच आहे.शुद्ध हवा आणि मातीचा सुगंध पण छान वाटत. ते घर कायम असेच ठेव.कारण येणाऱ्या नवीन पिढीला पाहयला मिळेल कि नाही याची कल्पना नाही पण जप त्या ला. एकदम सुरेख.

  • @saiprasadsawant9037
    @saiprasadsawant9037 3 года назад +1

    दादा खुप मोठे घर नाही असे म्हणु नकोस हो..... तु म्हणतो ना की राजवाडा तर खरेच अगदी मनापासून सांगतो राजवाडाच आहे तो.. तु आणि तुझी आई दोघांचा मिळुन मायेचा स्पर्श आहे, मायेचा ओलावा आहे या घरामध्ये.... आई ने तर अगदी जीव शिंपला असेल हो घरामध्ये.. आणि अंगण तसेच परसदार ही खुप सुंदर आणि ऐसपैस, प्रशस्त.. झाडे देखील छान लावली आहे.. सारे काही उत्तम, छान
    🙏👌🙏☺️

  • @anantnemane6714
    @anantnemane6714 3 года назад +3

    मित्रा मातीचे घर म्हणजे निसर्गाचे घर. मस्त.👍👍👍. मी कातूरडीचा संतोष. मंगेश. सखाराम. संदेश. कुवलेअर हे माझे मावशीचे मुलगे. मामाचे गाव सुद्धा निवलीच. घडशी. मावशी असताना मी 15.15. दिवस राहायचो निवलीत. नंतर यायचा योग आला नाही. केव्हा तरी नक्की येणार तेव्हा तुला भेटणार.🙏🙏🙏🙏🙏

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 года назад

      धन्यवाद. हो नक्किच या ❤️

  • @mahesh_jadhav
    @mahesh_jadhav 3 года назад +10

    घर तुझे तुझ्या स्वभावा सारखे गोड आहे❤️❤️❤️😘😘

  • @vikaskelshikar3219
    @vikaskelshikar3219 3 года назад

    अविनाश, कोकणातला गावचे फार छान,सुंदर कोकणी प्रेमाचे ,मायेचे उबदार टुमदार तुझे कौलारू मातीच्या भिंतीचे घर, तुझा घरात उन्हाळ्यात थंडावा असणार,Normal Temperature.असणारच. गरमीचा , उकाड्याचा त्रास अजिबात जाणवणार नाही.आणखी काय स्वर्गीय-सुख हवे, कोकणी माणसाला.

  • @musica.000
    @musica.000 3 года назад +1

    अविनाश भाऊ तुमचा राजवाडा मस्त👌 . मातीच घर फार दुर्मिळ झालेत. तू नशीबवान आहेस.

  • @prathameshsalunkhe7430
    @prathameshsalunkhe7430 3 года назад +15

    भावा है घर नाही है स्वर्ग आहे ❤

  • @sugandhakamble9180
    @sugandhakamble9180 3 года назад +14

    तुझ घर खूप सुंदर आहे ..मी पण निवळी चीआहे रत्नागिरी ची.खूप खूप छान आहे तुझ घर तुझ्या व्हिडियो मधून समजले की दोन निवळी आहे.

  • @mitalande802
    @mitalande802 Год назад +1

    अविनाश लोक पुन्हा मातीच्या घराकडे वळतील.ग्लोबल वार्मींग मुळे लोक मातीच्या घरात रहाणे पसंत करतील.मातीची घर काळाची गरज आहे.तुझ्याकडे ते आहे ते तु जतन कर.माझे पण मातीचेच घर आहे.आसपास पण खुप झाडी आहे.तुझे घर छान आहे शेणामातीच्या घरात शांतता समाधान मिळते . 👍👍

  • @dineshthakare5840
    @dineshthakare5840 Год назад +1

    भावा तु कोकण वासिय आहेस म्हणजे तु खुप नशीब वान आहेस, भावा तुझा राजवाडा खुप खुप छान आहे very nice your Home My Bro Avinash

  • @maanojsurve1371
    @maanojsurve1371 3 года назад +39

    मस्त घर आणि परिसर. अंगण एकदम बेस्ट👍राजवाडा झक मरतो

    • @ravikawade8450
      @ravikawade8450 3 года назад

      खुप छान घर आहे भाऊ

    • @akshatabane6259
      @akshatabane6259 3 года назад

      खूप घर छान आहे असच छान वाटत👌👍

    • @harshadajoshi8569
      @harshadajoshi8569 3 года назад

      @@akshatabane6259 खुपच छान दादा 👌👌👌

  • @pralhadbachhav1742
    @pralhadbachhav1742 3 года назад +3

    जगण्यासाठी खुप पैसा नसावा पण असे घर आणि वातावरण जर असेल तर स्वर्ग देखील इथे फिका

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 3 года назад +2

    मातीच्या घरात जो गारवा आणि नैसर्गिक वातावरण निर्माण होते ते सिमेंटच्या घरात नाही. तुझे घर कोकणात आहे हिच मोठी समाधानाची बाब आहे.. खूप छान.

  • @khagendrabawankar2399
    @khagendrabawankar2399 2 года назад +1

    ultimate....हा तुझा राजवाडा आणि तु निवडी चा राजा...खुप सुदंर भावा♥️

  • @snehaparadkar8972
    @snehaparadkar8972 3 года назад +3

    अविनाश खुप नशीबवान आहेस. कोकणातील खरे खुरे टिपिकल घर. लोक पैसे देऊन हा आनंद मिळवायला रिसॉर्ट ला जातात.तु तर मालक आहेस ह्या सर्व वैभवाचा.

  • @nusta6059
    @nusta6059 3 года назад +14

    अतिशय सुंदर घर आहे मित्रा
    आणि घराला घरपण देणारी माणसं सुद्धा छान आहेत

  • @alkamukadam7792
    @alkamukadam7792 3 года назад

    कोकणातील माणसात असलेली आपलेपण व साधेपणा पाहून खूपच आनंद वाटला . माझ्या वडिलांची खूप जमीन आंबेड बुद्रुख ला आहे पण घर व सर्व जमिनीवर भावाने लोभापोटी कब्जा केल्याने इतरांची घरे पाहून मला समाधान मानावे लागते . तुझे पण चिरेबंदी घर लवकरच होईल हा आशीर्वाद.

  • @poojagaikwad6486
    @poojagaikwad6486 Год назад

    आजकाल अशी जुनी घर गावी राहिली नाही. पण तुम्ही ते जपून ठेवल. खरी मजा तर अशाच घरा मध्ये असते. मला तुमचं हें घर खुप खुप आवडल. 👍

  • @rupaliborawake4105
    @rupaliborawake4105 3 года назад +7

    खूप सुंदर आहे घर, अवतीभवती सर्व प्रकारची झाडे आहेत सावली पण छान आहे 👍

  • @Dhepsemadhavi1986
    @Dhepsemadhavi1986 3 года назад +6

    दादा तुझा राजवाडा खूप सुंदर आहे
    तसेच आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर आहे
    हा व्हिडिओ पाहून खूप बरं वाटलं

  • @basicsofindianclassicalmus2337
    @basicsofindianclassicalmus2337 3 года назад

    तुला बरेचदा विनंती केली होती घराच्या video साठी....धन्यवाद.... सुंदर आहे रे घर....खुपचचचचचचच छान...मातीची घर दुर्मिळ होत चाललीयत....तुमच आहे....अतिशय सुंदर घर...

  • @KiranPatil-im5oc
    @KiranPatil-im5oc 3 года назад +1

    ग्रेट यार खरंच तू नेहमी तुझी रियल स्टोरी दाखवायचा प्रयत्न करतोस त्याबद्दल तुझे अभिनंदन बाकीचे युट्युब वर अशी स्टोरी नाही दाखवू शकत खरंच खूप मस्त वाटलं व्हिडिओ पाहून खरंच कोकण सुंदर आहे

  • @rohinisakpal2322
    @rohinisakpal2322 3 года назад +3

    खूप छान आहे विडिओ आणि हा तुझा राजवाडा आहे तो दुर्मिळ आहे जपून ठेव भोवतालचा परिसर अतिशय रमणीय सुंदर आहे

  • @user-vp1kf9gp6t
    @user-vp1kf9gp6t 3 года назад +5

    अविनाशभाऊ खूप आवडला राजवाडा, एकदा कोकणात यायचेच आहे. व्हिडिओ आवडला

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 3 года назад

    @अविनाश"राजवाडा"छोटा असला तरी मनानी खूप खूप खूप 😀 मोठा आहे. आई तू मयुरी. छान कुटुंब आहे. काळू बाळू खबऱ्या😀😀 आजूबाजूला आहेत. मस्तच.रे👍 घराची रचना मस्त आहे.आणि आजूबाजूला. भरपूर जागा "शेती"आहे."घर असावे घरा सारखी नकोत नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नात्ती😀😀👍❤️छान आहे! मस्त व्हिडिओ

  • @mukesh-lt3ci
    @mukesh-lt3ci 3 года назад +5

    माझी खूप इच्छा होती तुझं घर बघायची .खूप छान घर आहे दादा तुझं.

  • @chhayakurle437
    @chhayakurle437 3 года назад +5

    Khup chan ghar ahe re tuza.. साधा n simple...mast...tuza ghar अतून बघायची बरेच दिवस इच्छा होती ...thank u👍

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 года назад

    अविनाश, निवळी ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी. संगमेश्वर तालुका क्षेत्रफळात खुप मोठा आहे. सर्व सरकारी कार्यालये देवरूखात आहेत. कधीतरी संगमेश्वरी भाषेत बोल मजा येईल. अविनाश, घर हे घर असतं ते आपलं स्वतःचं असतं. आतापर्यंत आमचं वडिलोपार्जीत घर असचं लहान व मातीचं होतं आता चिर् याचं आहे. पण त्या जुन्या घरात बरं वाटायचं. सुंदर घर, सुंदर विडिओ. 👌👌👌

  • @yogeshpadwal985
    @yogeshpadwal985 Год назад +1

    तुझे घर मस्त आहे. मातीच्या घरात जो भावनिक ओलावा आहे तो सिमेंटच्या घरात नाही.

  • @vrishalisi5147
    @vrishalisi5147 3 года назад +5

    अरे अविनाश खरंच तू राजवाड्यात राहतो आहेस. नशीबवान आहेस.

  • @dynamicboi4607
    @dynamicboi4607 3 года назад +3

    घराची छान माहिती दिलीस अविनाश इतिहासाशी सांगड घालून.खूपच छान आहे तुझी घर.keep it up

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 3 года назад

    कोकणातले घर खूप आवडले, उन्हाळ्यात अशा घरात गरम होत नाही तर थंड वाटते. मला खूप आवडले

  • @ujwalamandrekar2399
    @ujwalamandrekar2399 3 года назад +5

    Thank u @kokankar Avinash for accepting my request and uploading this video...... Your house is very nice....

  • @reshmakadam9172
    @reshmakadam9172 3 года назад +6

    खूप छान 😊 शांत आणि निवांत,असं वाटलं घर पाहून 😇 निर्मळ आनंद

  • @sambhajikalunge9528
    @sambhajikalunge9528 3 года назад

    भाऊ,घर कितीही साधं असू दे,माणसात माणुसपन जपणारी तुम्ही कोकणकर मंडळी!
    आणि छत्रपतींच्या पावन स्पर्शाने झालेली तुमची भूमि
    मला न ,खूप आवडल तुझं घर👌👌👌
    आणि तुझं पण चिऱ्याच घर असेल ना एक दिवस,नक्की....👍👍👍

  • @dipakwadar4141
    @dipakwadar4141 3 года назад

    मस्तच घर आहे तुझ,आणि तुझी बोलण्याची कला सुद्धा.......👍👌

  • @nilampawar1896
    @nilampawar1896 3 года назад +6

    Ghar jari matiche asl tari ajubajula khup chan zade ahet
    Hech khar swargsukh ahe
    Lucky ahes dada
    Chan video
    Ajubajucha parisar khup avdla

  • @raghunathdange7362
    @raghunathdange7362 3 года назад +6

    काही फार्महाऊस वर मातीची घर बांधलेली असतात ,तेथे पैसे भरून मातीच्या घरात रहाण्याचा अनुभव काहिलोक घेतात, तुला
    हे सुख नेहमीच मिळते ,नशीब लागते याला

  • @surekhaadhav6602
    @surekhaadhav6602 3 года назад +1

    मातीच्या घरामध्ये जे सुख आहे ते कशातच नाही खुप छान आहे घर भारी वाटलं घर पाहून 👍🙏

  • @shailabhatwadekar4337
    @shailabhatwadekar4337 2 года назад

    खरंच आहे मातीचं असलं तरी कौलारू असलं तरी आपलं गावचं घर आपला राजवाडाच असतो

  • @nehanevrekar5047
    @nehanevrekar5047 3 года назад +4

    🌳🌴🏠 कोकणातील निसर्गात वसलेले सुंदर घर स्वर्गाहून सुंदर 👌👌

  • @ranjeetjadhav6262
    @ranjeetjadhav6262 3 года назад +3

    बरोबर आहे भाऊ तूमच घर हा राजवाडाच आहे. 👌🙏🙏

  • @bhausahebbomble3786
    @bhausahebbomble3786 3 года назад +1

    अविनाश दादा घर मातीचा आहे पण मन निर्मळ आहे, परमेश्वर आपली इच्छा पूर्ण करोत

  • @shwetasawant6277
    @shwetasawant6277 3 года назад

    दादा तुमच घर अतिशय सुंदर आहे मला खूप आवडल तुमच घर आतुन खूप मोठ आहे.घर खूप टापटीप आणि स्वच्छ ठेवलेत तुम्ही. दादा अंगणात जास्वंदीच झाड लाव आपल्या कोकणात जास्वंदी चे नानाविध प्रकार आहेत.

  • @umeshmane3527
    @umeshmane3527 3 года назад +3

    खूप छान दादा, निसर्गरम्य परिसर.

  • @dreambollywood6262
    @dreambollywood6262 3 года назад +11

    आजचा निम्म्यापेक्षा जास्त दिवस तुमचे व्हिडिओ बघितले खूप छान वाटले
    घर खूप छान आहे 💗💗
    धन्यवाद 🙏🙏

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 года назад +1

      धन्यवाद. नेहमी असेच सोबत रहा 😊

    • @ashwinidalvi1860
      @ashwinidalvi1860 3 года назад

      Avinash kasla bhaka nahi sho nahi sadh Sun...er jag ahe tuz natur hach dev asto parme...er Kantar kam ghar sunderch ahe mara...thi sudh bol matru bha..sha vait vatun gheu nako

  • @sujatarane9784
    @sujatarane9784 3 года назад

    अविनाश माझ्या आई कडचे घर,राजवाडा मातीचे पण खूप थंड वाटते,त्या नाळे कौल व वासे यांचा फटीतून हवा थंड येते,छान आहे घर, गाव,आईला तुझ्या झाडे लावायची आवड..खूप छान 👍🏼👍🏼🙏

  • @vinayakgurav2708
    @vinayakgurav2708 3 года назад +1

    खुपच छान घर आहे... खरतर कोकणातील अशा मातीच्या घराची सर श्रीमंतांच्या बंगल्याला सुद्धा येणार नाही.....

  • @shreekrupamejvani6464
    @shreekrupamejvani6464 3 года назад +18

    Rajvadya peksha Bhari, he sukh sarvanchyach nahibat naste Bhau.Mazya najret tu aaj Karodpati peksha Shreemant vatlas Bhau.Maze gav Mangav Talukyat Aahe. Aani mumbai la Borivali made. Thanks for Beautiful Home tour😊🙏Shilpa

    • @sunildesai9527
      @sunildesai9527 3 года назад

      कृपया देवनागरीत टंकलेखन करावे.
      एक नम्र विनंती.
      संस्कृती टिकवायची असेल तर भाषेचे संवर्धन गरजेचे आहे.
      🙏✍🙏

    • @sunildesai9527
      @sunildesai9527 3 года назад

      कृपया देवनागरीत टंकलेखन करावे.
      एक नम्र विनंती.
      संस्कृती टिकवायची असेल तर भाषेचे संवर्धन गरजेचे आहे.
      🙏✍🙏

  • @seemashinde1883
    @seemashinde1883 3 года назад +3

    छान आहे तुमच गाव आणि छोटस घर 👌

  • @manshreesakpal1079
    @manshreesakpal1079 3 года назад

    👌👌👌 ह्या काजूची नवीन रोपं लावा म्हणजे ते झाड जुने झाले तरी दूसरे नवीन झाड होईल आपल्याकडे भरपूर झाडे असतात म्हणजे आंबा फणस काजू वगैरे अजून काही पण नवीन लावली जात नाही म्हणून त्यांचा बीमोड होतो 🙏

  • @nandkumarmanjrekar4747
    @nandkumarmanjrekar4747 Год назад

    अरे लय भारी भावा, हेच सुरुवातीचे आपले कोकणातील राजवाडे होते

  • @ravikhopkar2603
    @ravikhopkar2603 3 года назад +5

    घराला घरपण देतात ती त्यात राहणारी माणस, तुम्ही कुटुंबीय खूप प्रेमळ आणि गोड आहेत...,....बाकी सगळ्या अंधश्रधा

  • @ruchikudu1381
    @ruchikudu1381 3 года назад +4

    Maj swapan ahe ashya gharat rahnyachi😍

  • @aniljadhav9285
    @aniljadhav9285 3 года назад

    फार म्हणजे फारच छान. आम्ही तुमच्या गावात आणि ते ही तुमच्या सोबत आहोत आणि तुम्ही आपल्या घराची आजुबाजुची माहिती सांगत आहात दाखवत आहात असे वाटत होते.होते सध्याच्या काळात अशाच घरांची गरज आहे .धन्यवाद

  • @chitrapashte2618
    @chitrapashte2618 3 года назад

    खूपच सुंदर घर आहे... अंबानीच घर पण फिके पडेल एवढं आवडलं मला कारण आमच्याकडे पण तूझ्या घरासारखीच घरे आहेत मातीची ...जी मला माझ्या लहान पणात घेऊन गेली ..मला तर वाटतं की असेच राहू दे हे घर ..आता लोकं तरस्तात अशा घरांमध्ये राहायला .. मातीच घर नाही तुझं सोन्याचं घर आहे ते...

  • @sambhajigarud6900
    @sambhajigarud6900 3 года назад +26

    1️⃣ गोष्ट कोकणातील 2️⃣ मालवणी लाईफ 3️⃣कोकणकर अविनाश 4️⃣कोकण संस्कृती 5️⃣ प्रगत लोके 6️⃣ एस फाॅर सतिश 7️⃣ मी कोकणी निखिल8️⃣ जीवन कदम व्लॉग्स हे महाराष्ट्रातील व कोकणातील टाॅप》8《 फेमस युटूबर आहेत,यांचे विडीओ 📷 1080p60 आहेत,यांना नक्कीच सबस्क्राईब करा..यांना👍लाईक, लिंक शेअर करा...

    • @ppatil4265
      @ppatil4265 3 года назад

      जीवन कदम , सातारा चा आहे कोकणातील नाही

    • @sambhajigarud6900
      @sambhajigarud6900 3 года назад +3

      @@ppatil4265 दादा मी महाराष्ट्रातील पण बोलो आहे..

    • @sambhajigarud6900
      @sambhajigarud6900 3 года назад

      @@ppatil4265 सातारा पाठीशी च कोकण आहे..

  • @umeshgore4085
    @umeshgore4085 3 года назад +4

    मस्त आमचं घर ही असेच होत पूर्वी आता पाडीचे आहे

  • @satishrdatar6337
    @satishrdatar6337 3 года назад

    खूपच छान आहे तुमचे घर...👌👌 मला आवडले..कोकणात तुमचे घर म्हणजे तुम्ही खूप भाग्यवान आहात..👍👍💐💐 कोकणातल्या घराची सर पुण्यामुंबईतल्या कुठल्याही फ्लॅटला येणार नाही..💐💐 आपले घर हे आपल्यासाठी राजवाडाच असते...!!💐💐 तुमचे घर बघायची खूप इच्छा झाली आहे.. लोकडाऊन संपल्यावर जमले तर तुमचे घर बघायला येऊ...अशीच घराची काळजी घ्या...!!💐💐

  • @kanchannikam209
    @kanchannikam209 Год назад

    खूप छान घर आहे माहिती सांगितली नशिबवान आहात तुमचे स्वता चे घर आहे कोकणात 👌👌👍

  • @sandeshchavan1612
    @sandeshchavan1612 3 года назад +8

    खूप छान आहे तूझे घर ...
    मस्त व्हिडीओ झाला अविनाश दादा...

    • @lalitgksingh8489
      @lalitgksingh8489 3 года назад

      खुप छान आहे राजवाडा व राजाचा विडीयो व कथन पण धन्यवाद

  • @geetaathaide142
    @geetaathaide142 3 года назад +9

    Lovely house with beautiful nature on all sides

  • @nirmalapatil5727
    @nirmalapatil5727 3 года назад +2

    तुमचे घर छान आहे .गावाला असेच घर असायला पाहिजे.तर मजा येते.पण छानच आहे परिसर.

  • @blowtek4386
    @blowtek4386 3 года назад +2

    खूप छान घर आहे तुझं सुख आणि समाधान मिळते या घरात 🌷खरंच तुझा राजवाडा च आहे

  • @IcShaikh
    @IcShaikh 3 года назад +27

    नमस्कार .. फार छान घर /राजवाडा आहे.. एवढी मोकळी जागा आहे.. आणखी काय हवय.. मुंबईतील धकाधकिच्या जिवनापेक्षा कितीतरी छान आहे.. धन्यवाद ..

  • @ashwinithakur7380
    @ashwinithakur7380 3 года назад +3

    Avi dada ,matichya gharatach khar sukh aahe aani manachi shanti aahe, ethe fakt nakali mukhavte aahet aani aapal kokan mhanje swargsukh aahe

  • @sujataskitchen6776
    @sujataskitchen6776 3 года назад

    दादा फार सुंदर राजवाडा आहे अरे असे घरं असणं ते पण कोकणात स्वर्गा हुन सुंदर आहे आज कोकणात घर असते तर आज आम्ही मुंबई मध्ये राहिलों नसतो करोना चार काळात आजुबाजुला पण छान झाडें लावली आहेत काजू आंबा फणस नारळ आबोली मोगरा अननस अंगण फार सुंदर आहे घरा मधे खोल्या पण मस्त आहेत नेटवर्क तुला भेटते आहे अजून काय पाहिजे कोणाचे प्रेशर नाही मुंबई मध्ये धावपळीच्या जीवनात पोटापाण्यासाठी राहतो थोडा विसावा असावा म्हणून कोकणात घर असावे माझा विचार आहे मिस्टर रिटायर झाल्यावर मी कोकणात

  • @user-kw6zq3im7f
    @user-kw6zq3im7f Год назад

    दादा खूप छान राजवाडा आहे राजा आहेस खर सुख समाधान हेच आहे नवा राजवाडा लवकरच होईल सगळ्यांना खूप आनंद होईल

  • @ankushbabar2157
    @ankushbabar2157 3 года назад +4

    छान आहे व्हिडिओ आवडला
    👌👌👌💐💐छान आहे राजवाडा

  • @thebludragongaming
    @thebludragongaming 3 года назад +7

    खुप छान घर आहे राजवाड्यापेक्षा सुंदर👌आणि सभोवतालचा परिसर छान.

  • @amolkadam157
    @amolkadam157 3 года назад +1

    सुरुवातीची माहिती खूपच छान होती.

  • @sanjana281978
    @sanjana281978 3 года назад +1

    Avinash bhaoocha Rajwada aahe khup chan,
    Konkankaranchi aste hich tar khari shan❤️
    Ghar matiche aso ki chiryache farak kahi nahi padat
    Pariwar sobat asel tarch sarv sukh yetil palat❤️

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 года назад +1

      धन्यवाद. खूप छान रचना

  • @leenavinchurkar7651
    @leenavinchurkar7651 3 года назад +3

    पारंपारिक घर 👌

  • @vilasjadhav1232
    @vilasjadhav1232 3 года назад +5

    तुझं 🏠 छान आहे .👌👌👌👍👍

  • @harshadaparab1842
    @harshadaparab1842 Год назад

    कितीही मोठा माणूस झालास दादा तरी हा राजवाडा असाच राहूदे याची सर कशालाच नाही 🙏

  • @surekhaadhav6602
    @surekhaadhav6602 3 года назад

    घर मातीचे असो किंवा सीमेंटचे आपलं घर ते आपले असते खुप छान आहे तुमचे घर ब्लॉग खुप छान आहे 👍🙏

  • @SanjayGorivale-nd1bw
    @SanjayGorivale-nd1bw 3 года назад +3

    छान परिसर स्वच्छ सुंदर घर 🙏 छान माहिती दिलीत अविनाश भाऊ

  • @palchinbhandari1938
    @palchinbhandari1938 3 года назад +4

    घर मातीच असो किंवा चिर्याचे घर हे घरच असते आपल घर आहे हे महत्वाचं

  • @harshdashigwan2130
    @harshdashigwan2130 3 года назад +1

    खुप छान घर आहे अविनाश घर आहे म्हणून तु हक्काने जाऊन मोकळा श्वास घेतो रे

  • @maithileesamant387
    @maithileesamant387 3 года назад

    खुपच छान घर आहे .मला खुप, खुप आवड़ले.मातीचे घर तसेच ठेव.थंड़ पणा येतो.मी तुला खुप वेळा दाखवायला सांगितले होते..त्याबद्दल thanks..तुझ्या किचन मध्ये जर तुला शक्य झाले तर चुलीजवल एक खिडकी बनव.म्हणजे हवा खेळती राहील.तसेच मधल्या खोलीत भाड़ी आहेत ती किचन मध्ये लाव.बाकी मला तुझे घर खुप,खुप,खुप आवड़ले.तुझी,आई,बायको दिसली नाही.. घर दिखवलयाबददल thanks......

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 года назад

      धन्यवाद ❣️ आई मयुरी बाहेर गेली होती

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 года назад +30

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌺🙏

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 года назад +8

    राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या 🙏🙏🙏🙏🙏

  • @archanachoudhari2860
    @archanachoudhari2860 3 года назад

    तुमचे घर खूप च छान आहे आजुबाजुचा परिसर बघून माझ्या डोळयाचे पारण फिटले

  • @arunnaiksatam1858
    @arunnaiksatam1858 3 года назад +3

    घर छान आहे . आपल्या गरजा सिमित ठेवल्या की माणुस नेहमी सुखी रहातो . आपण अंथरून पाहूनच पाय पसरावे .

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 3 года назад +3

    Avinash so lucky.Beautiful home.

  • @anmolshevte2797
    @anmolshevte2797 3 года назад

    खूप छान घर आहे. फ्लॅट, बंगला या पुढे फिक आहे भाऊ. मला कोकण जाम आवडत अणि साधी राहणी उच्च विचारसरणी..घर इतकं आवडलं तुझ की विचारू नकोस. घराचं सुख म्हंजे तुझ घर उत्तम उदाहरण. आज काल सगळ्या कडे सगळं आहे पण जे तुझ्या जवळ आहे ना ते सोन आहे भाऊ🙏🙏🙏

  • @pravin1122
    @pravin1122 3 года назад +1

    खरंच राजवाडा आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. खूपच छान आहे

  • @kishormayekar2649
    @kishormayekar2649 3 года назад +6

    रत्नागिरी जिल्ह्यात तीन निवळी गावे आहेत .तिसरी चिपळून निवळी.

  • @alicegavit
    @alicegavit 3 года назад +8

    A very nice Bro house, no matter what it is, but it is important to have your own house, brother, like your hard work