मतदार संघाचं खराब झालेले नाव बदलायचय -सुरेंद्र पठारे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • मला मतदार संघाचं खराब झालेलं नाव बदलायच आहे...सुरेंद्र पठारे
    पुणे:- पुणे शहरातील वडगांव शेरी मतदार संघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील टिंगरे असून मागच्याच आठवड्यात शरद पवार यांनी वडगांव शेरी येथे झालेल्या सभेत टिंगरे यांच्यावर जोरदार टीका केली होती.आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार बापू पठारे आणि त्यांचा मुलगा सुरेंद्र पठारे हे इच्छुक असताना मागच्या पाच वर्षात मतदार संघाचं जे नाव खराब झालं आहे ते बदलायच आहे आणि त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मला एक युवक म्हणून संधी देतील असा विश्वास शरद पवार यांच्या पक्षातील इच्छुक उमेदवार सुरेंद्र पठारे यांनी व्यक्त केलं आहे.
    यावेळी सुरेंद्र पठारे म्हणाले की हे सगळं पवार साहेबांच्या सभेनंतर सुरू झालं की कोणाला उमेदवारी मिळणार आहे.मला किंवा वडील बापू पठारे कोणालाही उमेदवारी मिळाली तरी आम्ही एकच आहोत.फक्त फरक एवढंच आहे की जर तरुणाला उमेदवारी द्यायची असेल तर मला देण्यात येईल आणि जर अनुभवावरून द्यायची असेल तर वडिलांना तिकीट देण्यात येईल.आम्ही दोघेही तयारी करत असून आपापल्या पद्धतीने आम्ही प्रचार करत आहोत.पक्ष ज्याला उमेदवारी देईल तो उमेदवार आम्ही जिंकून आणू अस यावेळी पठारे म्हणाले.
    काही दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणी नगर येथे पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांचं नाव देखील पुढं आलं होत.यावर सुरेंद्र पठारे म्हणाले की गेल्या पाच वर्षात वडगांव शेरी मतदार संघात कोणतेही काम झालेली नसून सगळ्यात मोठं वाहतूक कोंडीचा प्रश्न हा निर्माण झाला आहे.तसेच जे नाव आमच्या मतदार संघाचा खराब झाला आहे ते मला बदलायच असल्याचं यावेळी पठारे यांनी सांगितल.

Комментарии •