Vidhan Parishad : बाकी कोणीही पडेल, पण Milind Narvekar जिंकणारच! Harish Kenchi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • #vidhanparishadelection #milindnarvekar #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadanvis #sharadpawar
    विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिली. मिलिंद नार्वेकर हे एकनाथ शिंदेंच्या जवळचे मानले जातात, पुढे कधी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधायचा झाला तर मिलिंद नार्वेकरांच्या रूपात महायुतीकडे पर्याय असल्याचं म्हटलं जात होतं, एकनाथ शिंदे यांच्या जवळचे म्हणून ते कधीही शिंदे गटात उडी मारू शकतात अशी नार्वेकरांबाबत अनेकदा शक्यता वर्तवली जाते, म्हणून लॉयल्टी टेस्ट म्हणून त्यांना उद्धव ठाकरे यांनी त्यांना रिंगणात उतरवलं का? नेमके मिलिंद नार्वेकर आहेत कसे? चहापेक्षा किटली गरम, अशी म्हण नार्वेकरांविषयी बोलताना वापरली जाते, मातोश्रीवर जाण्याअगोदर लागणार स्पीडब्रेकर असच लोकं त्यांच्याकडे बघतात, उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू म्हणून ते ओळखले जातात, नेमके नार्वेकर आहेत कसे? कुठलीही निवडणूक आली की नार्वेकरांचं नाव चर्चेत असतंच.... असं का? मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या जवळचे मानले जात असले, तरी इतिहासात भास्कर जाधव, नारायण राणे, राज ठाकरे यांनी त्यांच्यावर बरेच आरोप केले आहेत, एकंदरीत ही सगळी मंडळी पक्षात असताना मिलिंद नार्वेकर यांच्याकडून अनेकदा मातोश्रीवरील कार्यभागात आडकाठी आणण्यासाठी आरोप झाले, अजूनही नार्वेकरांबद्दल सेनेत कटुता आहे का? याबाबत जाणून घेऊ या ज्येष्ठ पत्रकार हरीश केंची यांच्याकडून!

Комментарии • 15