ओमकार Episode अगदी उत्तम होता, पण माझ्या मते एक खूप महत्त्वाचा मुद्दा येथे राहून गेला अन् तो म्हणजे, Extra maritaial affairs मूळे होणारे divorce आणि त्याचे दुष्परिणाम..!
खूप छान एपिसोड होता .. परंतु भारताबाहेर जेव्हा भारतीयांचा घटस्फोट होतो तेव्हा गोष्टी खूप वेगळ्या असतात आणि दुर्दैवाने त्याबद्दल अजूनही फारसं समुपदेशन होत नाही .. तशा समुपदेशनाचीही खरच खूप गरज आहे
खुप सुंदर podcasts असतात खुसपुस मधे. जमल्यास postpartum depression, त्याचे नविन पालकांवर होणारे परिणाम आणि कुटुंब आणि समाजाचा मुलांच्या संगोपनात होणारा overall हस्तक्षेप ह्यावर जर चर्चा करता आली तर नक्की प्रयत्न करा 🙏🏻
उत्तम एपिसोड. शाहीन मॅडम आणि सागर सर दोघांनी उत्तम विश्लेषण केले आहे. ग्रामीण भागात घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत न जाण्यात स्त्रियांचे आर्थिक अवलंबित्व हा एक मोठा घटक आहे. अगदी शहरात देखील स्त्रिया आर्थिक दृष्टीने अवलंबून असतील तर त्या घटस्फोटाचा निर्णय कमी घेतात. ज्यांना माहेरचा सपोर्ट आहे, त्या तसा निर्णय काही अंशी घेतात. ह्या एपिसोड चा शेवट move on वर झाला आहे. तर remarriages ह्या विषयावर खुसफुस व्हायला हवी आहे. त्यात divorcee चे आणि विधुर, विधवा यांचे पुनर्विवाह असा विषय असावा.
आज कालच्या तरुण पिढीला लग्न करायची घाई असते किंवा अर्धवट असलेलं ज्ञान यामुळे येणाऱ्या अडचणी यासाठी योग्य मार्गदर्शनासाठी तुम्ही उत्तम काम कृतायेत.❤ खुप खुप Thank You❤
खुस पुस अमुक तमुक वरचे सगळे सेशन्स खूप छान असतात मला या टीमला एक सजेस्ट करायचा आहे समाजामध्ये जे अपंग मुले आहेत अशी मुलं वाढवताना पालकांसमोर ची आव्हान त्यांच्या समस्या समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यावरचे वेगवेगळे मार्ग आणि त्यामध्येही जे 100% कर्णबधिर मुले असतात यांची ही मुलं वाढवताना येणाऱ्या समस्या समाजाचा दृष्टिकोन आणि त्यावरचे मार्ग याबाबत डिटेल मार्गदर्शन मिळावे समाजाचा एक खूप मोठा वर्ग मुख्य प्रवाहापासून वेगळा राहतो त्यांचे प्रश्न खूप गंभीर आहेत🙏🙏🙏
Thank you 😊 अमुक तमुक टीम शिंदे मॅडमच्या मागच्या episode मद्ये मी पण ही request केली होती की शिंदे मॅडम कडून या विषयाची कायदेशीर बाजू काय असेल... Thank you 😊 परत एकदा ...आणि तुमच्या कडून अपेक्षा खूप वाढत आहेत... best of luck 🤞
अमूक तमुक च्या निमित्ताने अतिशय सुंदर सुंदर आणि विचार करायला लावणारे विषय तुम्ही चर्चेला घेता...अतिशय छान platform आहे...मी वाटच बघत असते...सध्या मी अमेरिकेत आहे...तुमच्या वयाची मुले ह्या अश्या विषयाला वाचा फोडता ह्याचे कौतुक करावे तितके थोडेच...मी विमानप्रवासात तुमचे अनेक episodes download करून लांबच्या प्रवासात त्याचा आनंद घेतला...मी तुमच्या एवढ्या मुलाची आई आहे...नविन पिढी खुप विचारी आहे हे जाणवते...तुमच्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन....पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा....आणि नव्या episode च्या प्रतिक्षेत 😊👍👍
Adv Shahin Ma'am, Podcast was excellent & you have give.n great guidance for couple who are in terrible phase of their marriage. Kindly keep doing such nobel work. Keep guiding couple on marriage because in today's society divorce has become very big issue for kids.
Since unable to post comments on "Extra Marital Affairs and Marriage" podcast ruclips.net/video/Oc4NfGEiT3Y/видео.html&ab_channel=AmukTamuk so posting here. Dr. Shirisha and Adv. Shahin both are great and very knowledge driven. Dr. Shirisha Mam, is superbly talented, highly rich experienced and much more than that...can't express in words. She articulate great futuristic thoughts in few simple words, that ultimate beauty. Also Adv. Shahin Shinde realised us latest real practical issues that was outstanding. Omkar Sir also able to keep the podcast flow very well. However guest supposed to given equal chance for final summary guidelines. Amuk Tamuk Team should bring 2nd part of that and let viewers contribute thru comments sections.
अभिनंदन ओंकार ! आजची मुलाखत अभ्यासपूर्ण झाली. शिंदे मॅडमना त्यांचे अनुभव या मुलाखतीत अधिक छान तऱ्हेने मांडता आले. डॉ. साहेबांनी त्यांच्या अनुभवांनी आजची मुलाखत परिपूर्ण केली. सर्व टीमचे अभिनंदन... All the best
धन्यवाद मनापासून तुम्हा लोकांचे! मी आता माझ्या आता १० वर्षा च्या मुलाच्या ताब्यासाठी मुलगा ७ वर्षाचा असल्यापासून कोर्ट चे चक्कर मारतोय. कोर्ट मध्ये मुलाचा ताबा आई लाच मिळतो हे जे काही मिथ आहे त्याबद्दल थोडी चर्चा करावी जेणे करून जे पुरुष पालक मुलांच्या ताब्यासाठी प्रयत्न करताहेत त्यांना हातभार होईल.
प्रथम अमुक तमुक टीमचे खूप अभिनंदन कारण आजचा विषय खूप महत्वाचा होता . आणि हा विषय मांडण्यासाठी खूप तज्ञ लोकांचे मार्गदर्शन तुम्ही आम्हाला दिलेले आहे . ॲड. शाहीन mam आणि Dr. पाठक सर अतिशय छान पद्धतीने दोघांनी विषयातील प्रत्येक मुद्दा मांडला .. नक्कीच mam, Sir तुमच्या मार्गदर्शनाचा फायदा हा ज्यांच्यावर ही वेळ येईल त्यांना होईल आणि नक्कीच यातून ते चांगले शिकतील . लग्न का करावं , लग्न कसे टिकवावे खूप छान सांगितले पाठक sir तुम्ही !! साध्या साध्या कारणांनी घटस्फोट होतात एकूण मेकाच्या अपेक्षा वाढत आहेत आणि वाढणे योग्य पण आहे पूर्वीच्या काळी स्त्रिया जास्त बाहेर दिसायच्या नाहीत त्यामुळे प्रमाण पण कमी होते पण आता पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया बाहेर कामाला जात आहेत मग दोघांनी मिळून घर सांभाळणे काम करणे ही अपेक्षा काही गैर वाटत नाही मला .जरी मुलांनी कधी कोणती काम केले नसतील तरी शिकले पाहिजे जर पुढचा अनर्थ टाळायचा असेल तर ! घटस्फोट झाल्यानंतर सुद्धा कसे वागायचे हे पण दोघांनी खूप छान सांगितले. एकूण आजचे सेशन हे खूप छान झाले .
खूसपूस अमुक तमुक टीमचे मनापासून आभार.. उत्तमोत्तम तज्ञ आणि दर्जेदार विषय यावर चौरंगी चर्चा.. भविष्यात हाती घेणा-या सर्व विषय आणि प्रकल्प यांकरिता शुभेच्छा.
Divorce या विषयावर चर्चा खूपच छान झाली. पण divorce होण्याचे आणखीन एक खूप महत्त्वाचे कारण म्हणजे. Extra Marital affair या विषया वर या पॉडकास्ट मध्ये साधा एक शब्द सुद्धा बोलणे नाही झाले. याचे खूप आश्चर्य वाटतंय.... बाकी चर्चा खूपच छान सुंदर होती... खूप खूप शुभेच्छा..👍👍👍🥰🥰💐💐
Thank you for this segment of khuspus. My family sits together to watch Khuspus podcast is the biggest change in my house. Amuk tamuk team thank you so much for khuspus segment and always waiting for more such new, realistic and vital content😊👍🏻💐
चर्चा खूपच छान झाली,लग्न होऊ घातलेल्या प्रत्येक मुला मुलींनी व त्यांच्या पालकांनी बघणे अत्यंत गरजेचे व महत्वाचे आहे. दोन्ही वक्ते फ़ार म्हणजे फार छान बोलले,both of them seems to be extremely matured and balanced! So these are perfect people to call for this topic. परीपूर्ण चर्चा वाटली . Very informative and interesting talk. Thank you अमुक तमूक, keep going👍
माहिती नाही का पण अमुक तमुक आणि माझ्यात काहीतरी स्ट्राँग कनेक्ट आहे... मी ज्या विषयाबद्दल विचार करतो आणि मला हेल्प हवी असते... अमुक तमुक वर व्हिडिओ अवेलेबल असतो... इट्स लाईक वन स्टॉप सोल्युशन फॉर मी.... मी स्वतः घटस्फोटीत आहे आणि खूप आनंदी आहे...
एकमेव चॅनल आहे जे फक्त ॲाडीयन्स/ viewers ना उपयुक्त गरजेची माहीती देतं , बाकी नवनवीन पॅाडकास्ट चं पीक येतं आहे जे केवळ एखाद्या प्रॅाडक्ट च्या जाहिराती साठी काहीतरी एपिसोड बनवतात किंवा फिल्म मधले आधीच प्रसिद्ध असलेले कलाकार बोलावून त्यांच्या खाजगी आयुष्यावर बोलून स्वत:चे सबस्क्राइबर वाढवतात. Good work keep it up 👍🏻👍🏻
Thank you omkar and your team, सगळेच विषय अगदी खुसपुस करण्याचे असून 😊 सुद्धा,त्यावर उत्तम वैचारिक आणि माहिती पूर्ण चर्चा कशी व्हावी ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे अमुकतमुक,all the very best. असेच अजून खुस पुसणारे विषय😅 घेऊन तुम्ही आमच्यासमोर याल 👍
वैयक्तिक त्याबरोबर सामाजिक प्रश्नाचा केलेला उलगडा अतिशय अप्रतिम आहे.अशाच खूप साऱ्या विषयावरील मार्गदर्शनाची आवश्यकता प्रत्येकाला आहे. Thank you so much Amuk Tamuk and Omkar sir 🙏👍🙏
Most needed topic to be talked about. Topic is handled very skillfully. It will work as a guiding star for many couples. Omkar keep up good work. Thank you
Hellollolo.. ओंकार, शार्दुल..... तुमचे सर्व एपिसोड,subject Very Relevant to present situation, surrounding.... भारी..... तुम्हाला खूप खूप खूप शुभेच्छा...!!👍👍👍🌟🌟🌟
ऐक उदाहरण सांगतो, माझा Best friend शाळेतला त्याचे Divorce झाले 3 वर्षा पूर्वी, आम्ही सोबत प्याला बसतो त्या मुळे त्याने मला सर्व सांगितले काय झाले ते, कारण हे होते की त्याच्या बायको चां लग्ना आधी BF होता आणि जवळ जवळ 8 वर्ष त्यांचे लैंगिक संबंध होते, हे सर्व तिने त्याला लग्ना आधी सांगितले होते पण चलाखी ने तिने लग्नाला 2 महिने बाकी असताना सांगितले त्या आधी 1 वर्षा पूर्वी लग्न जमले होते आणि 6 महिन्या पूर्वी साखरपुडा झाला होता, तिने आधी याचा स्वभावाचा नीट अभ्यास केला आणि गोड गोड बोलून याला प्रेमात पाडले होते,म्हणजे लग्न तुटण्याची शक्यता कमी केली, तो लग्नात थोडा नाराज होता पण लग्ना नंतर तिने खूप भांडण केले कारण त्याला हे पण कळले की लग्नाच्या 1 महिना आधी ते दोघे फिरायला गेले होते आणि जेव्हा हा तिला घरी सोडायला गेला आणि तिला सोडून तेथून गेला तेव्हा तो मुलगा त्यांच्या घरी आला आणि तिला व तिच्या आई ला भेटला, पण आई ने त्याला घरातील देवी वर हात ठेवून वाचन घेतले की तो तिला विसरेल आणि लग्नात काही व्यत्यय आणणार नाही, लग्ना नंतर 1 वर्ष माझा मित्र खूप डीप्रेस झाला होता, एक तर जुळत नव्हते त्यात तिचा past कळल्याने त्याला तिच्यात काहीच Intrest राहीला नाही, नोकरी पण सोडली त्याने आणि खूप भांडण होत होते, शेवटी 2 वर्षा नंतर त्याने तिला परत घरी पाठवले आणि Divorve फाईल केले आणि काही वर्षा पूर्वी झाले त्याचे, मी त्याला 1 प्रश्न विचारला की तुझे पण लग्ना आदी affairs होते मग बायको चे काही पचले का नाही तुला, त्याने उत्तर दिले की मी लग्न जमल्या नंतर लगेच तिला भेटून सर्व सांगितले होते पण तिने लग्न जुळून साखरपुडा झाला आणि 2 महिने आधी पर्यंत सर्व लपून ठेवले होते जेणे करून लग्न तुटू नये म्हणून, ती 8 वर्ष Sex करत होती त्याच्या बरोबर, कोण नवरा असा past सहन करेल, आणि लग्न जवळ आले तरी तो मुलगा तिच्या संपर्कात होता आणि त्यांचे रिलेशनशिप संपलेले नव्हते, आणि हा तर लग्न जमण्या आधी सर्व clear करून बसला होता, खूप किचकट प्रसंग आहे पण नवऱ्याचे किती ही लग्ना आधी Affairs असतील तरी तो बायको चे लग्ना आधी चे संबंध सहन करू शकत नाही.
चर्चा खूपच चांगली झाली. दोन्ही पाव्हण्यांनी विषय खूप चांगला मांडला. ओंकार तू खूप अभ्यासपूर्वक मुद्देसूद प्रश्न विचारले. तुम्हा तिघांचे खूप अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार.
सध्याचा पालकांचा मेंदू कुरतडनारा विषय.... दोघेही तज्ञ अनुभवी.... वास्तववादी मार्गदर्शन....I share this episode with one of my friend... who right now go through this situation...living under one roof....but totally lives seperation life..& lot's Of heatrates between them...but after watching...she realises the things & want to wark on that.... May be they seperate or not....but they realise where to focus.......rather than waisting energy on only Blaming each other.....Really...Usefule, Guided conversation..... Thank U so much All Of U...Good Wishes..!! 👍👍👍💖💖💖
खूप छान चर्चा झाली 👌👌... ओंकार मी एक सुचवेन, महाराष्ट्र अंनिस या संघटनेचा एक खूप चांगला उपक्रम आहे 'जोडीदाराची विवेकी निवड' म्हणून, यामध्ये लग्न, सहजीवन, जोडीदार या विषयांशी संबंधित अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर संवाद घडवून आणला जातो व मार्गदर्शनही केले जाते. हा उपक्रम व्हाट्सएप वर 50 दिवसांची batch चालवून घेतला जातो, यात रोज एक प्रश्न विचारला जातो व त्याचे उत्तर ग्रुपमधील सर्वांनी दिवसभरात द्यायचे असते... सांगावं तेवढं कमी आहे याबद्दल.. ही जशी ऑनलाईन batch असते तशाच संवादशाळाही घेतल्या जातात, ज्यामध्ये कोणीही सहभागी होऊ शकतं.. या उपक्रमात महाराष्ट्रातील अनेक तरुण-तरुणी सहभागी होऊन त्यांनी याचा फायदा घेतला आहे, आणि हा उपक्रम प्रत्येक माणसा पर्यंत पोहोचण्यासारखा आहे... या उपक्रमासाठी सचिन, आरती, निशा, महेंद्र, दिक्षा, यांनी खूपच मेहनत घेतली आहे ... जेव्हा शक्य असेल तेव्हा यांना सुद्धा नक्की invite कर.. गरज भासल्यास मी त्यांचे संपर्क क्रमांकही शेअर करेन नक्की😊
दोघे जण खूप छान बोलले आणि छान माहिती सांगितली.... पण आजकाल नाममात्र घटस्फोट एक आणि दोन महिन्यात होतो त्याबद्दल पण माहिती सांगितली तर बरे होईल... आणि घटस्फोट झाल्यानंतर जर कोणाला दुसरे लग्न करायचे असेल तर बरेच वेळा लोकं बोलतात की पहिल्या शी जुळवून घेतलं नाही तर दुसऱ्या व्यक्ती बरोबर काय जुळवून घेणार.. किंवा दुसरे लग्न करताना त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे हे सांगा
आपण नक्कीच बरोबर बोलत आहे. प्रेम आपण एकमेकांना जवळपास येतात आणि भांडण झालं वर एकमेकांना रिलेशनशिप ब्रेक अप झालं नंतर चांगल्या आठवणी लक्षात ठेवून एकमेकांना चांगले आशिर्वाद द्या आणि नवीन जीवांच्या सुरूवात करा ईश्वर शक्ती तुम्हाला एवढाच वेळा प्रयत्न एकमेकांना बरोबर ठेवला असेल आणि दूर केल्या आहे हे लक्षात आलं तर तुम्ही एकमेकांना समजून वेगवेगळ्या होतील आणि त्रास होणार नाही
thank you team amuk tamuk for bringing this episode. I am 20 yrs old girl now ! in upcoming 5 to 8 yrs mala decisions ghyaychet about my life , these conversation are really helpful for us je ki koni gharche lok pan bolat nahiyet ! te tummhi gheun yetayt ! it's really help for decision making of upcoming yrs !
Khupch mahtvacha subject ghetlat. Khup chan mahiti milali. Sadhyachya lagnalu mula- mulina tasech divorce zalelyana pan mahatvapurn mahiti milali asel. Dr. saheb ani Vakil mamche abhar. Omkar all the best for new subject🎉
खूप खूप सुंदर पॉडकास्ट 👌👌 अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा घडवून आणली. दोन्ही मान्यवरांनी अत्यंत सुंदर रित्या गोष्टी उलगडून सांगितल्या त्याबद्दल धन्यवाद.👍
crucial topic handled really well... it is very difficult for divorce couples. After divorce, changing a name on legal documents it's very critical process esp for girls . Bcz on each and every point that girl has to say divorce word and society gives weird look ... How to stay strong and calm ..And accept and move on ..this is discussed in life after divorce topic in a beautiful way..Thank you to AmukTamuk team for bringing this topic on social media..
Thank you amuk tamuk for this topic but please have one more episode for people who went through divorce and suffered emotionally a lot to get some light in their life emotionally
माझे वय ७२ वर्षाचे आहे. आणि नवरा ६६ वर्षाचा आहे. आमचे दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. दोघांचीही पहिली लग्ने आणि दुसरे लग्नही love marriages आहेत. दुसरे लग्न हे आंतर्धर्मीय आहे. मी जाणीवपूर्वक अधिकृतपणे त्याच्या धर्माचा स्वीकार केला आहे. दुस-या लग्नाला ३६ वर्षे झाली आहेत. आणि दुस-या लग्नात आम्ही खूपच मजेत आणि आनंदात आहोत. परस्पर संमतिने मुले होऊ दिली नाहीत. आमच्या मित्रमंडळींना आम्ही Made for each other वाटतो. आमचे नाते हे मानसिक भावनिक बौद्धिक आर्थिक सामाजिक असे सुदृढ आहे. आमच्या आवडी निवडी व विचार खूप मिळते जुळते आहेत.
In my opinion, this is only a legal perspective and that’s why cases are discussed like stories of immature behaviour. One of the major reasons is decreasing Co-dependency and complex social fabric. Many kids come from broken families but their parents could not divorce because they feared social stigma. There are many hidden issues which need to be discussed. Most relations are economical and we have to accept that marriage is also one of them. That’s y we have property issues among blood family members as well. Amicable cohabitation or amicable separation are better options right now. And yes, hygiene is a very important factor which should be discussed before cohabitation.
मी कालच या topic चा विचार करत होते, आणि अमुक तमुक कडून या विषयावर चर्चा व्हावी असे मनापासून वाटत होते आणि आज सकाळी मोबाईल पाहते तर काय....याच topic चा video आलाय 🙏👌
Fantastic episode. Would really like to hear a podcast about awareness of STI & STD's. Also would like to hear insights about upbringing of special child. ( Mentally Challenged Children & there upbringing & challanges faced by their parents through society & some solution oriented approach to it )
Madam : 9/10, Sir : 6/10, But overall very important topic discussed. Still I feel discussion are very one sided considering only Indian thought process. its time of globalization, and we should also consider international thoughts about each topic. That would contribute to come up with more solid solutions. But Kudos to your entire team!
Very informative.. Dr Shinde म्हणाल्या की शुल्लक कारणावरून divorce reject होतात...तर हे शुल्लाक आहे की नाही हा personal विषय असू शकतो ना....कारण एकाला एक कारण शुल्लक वाटते पण तेच कारण कोणा दुसऱ्याला खूप important असेल ना...त्या मुळे हे कोर्टाची divorce reject करायची method नाही पटली...also Dr.Pathak जे म्हणले की toilet seat वर करणे or अव्यवस्थित पणा हे शुल्लक कारण असू शकतं नाही..ज्याला स्वच्छता किंव्हा टापटीपीची आवड आहे, अश्या व्यक्तीला हा मानसिक त्रास असू शकतो..
True. Being an organized person is good and expecting it from the other family members is also OK, but it should not become an OCD (Obsessive Compulsive Disorder) OR one should not get paranoid due to such small issues. People face a lot more severe problems in life, but they keep trying to live happily. In such a situation, are these issues, so serious that for these, you want to get separated from your life partner ?
@@ShahinShinde of course I agree…but these small things build up and form a reason for divorce….when u start disliking someone even smallest of a silliest gesture becomes non tolerable …divorce is always I feel coz of small issues building up and blowing out of proportion
@@sharmilapuranik229 काय करायचे. अवघड असते सगळे. सासरचे जेव्हा सगळे एक होऊन मला बाहेर काढले म्हणजे स्पष्ट नको म्हटले नांदवायला ,तर काय करणार. पर्याय च न्हवता
excellent podcast.....very knowledgeable content for married , unmarried, in a relationship wale couples who are aspiring to become life partners....all must watch this video so that many consequences can resolve in their current & future life...great work Omkar Bro👌👍
I like all these amuk tamuk episodes.ek request aahe ,jar 20-25 years chya mula- mulinkarta tyani life partners kase choose karayla havet kiwa kay criteria asla pahije hyavishayawar ekhada episode karta aala tar I will be thankful to all
Thank you for conducting these kind of channel.
It helps a lot for having clarity of thoughts and carrying healthy life styles
Awesome Mumma!!♥
I am proud to be your daughter!!😌
❤️🥰
ओमकार Episode अगदी उत्तम होता, पण माझ्या मते एक खूप महत्त्वाचा मुद्दा येथे राहून गेला अन् तो म्हणजे, Extra maritaial affairs मूळे होणारे divorce आणि त्याचे दुष्परिणाम..!
आजकाल लग्न कमी आणि घटस्फोट जास्त होत आहेत याला घरातील संस्कार जबाबदार आहेत....या चॅनेलवर खरच उपयुक्त अशी चर्चा घडवून आणली जाते...धन्यवाद
This doctor and the lawyer are simply amazing!
एक बरोबर सांगितले की पहिले तीन ते पाच वर्षे मुल होऊ देऊ नये, कारण आईवडिलांच्या भांडणामधे मुलांचे मानसिक आणि शारीरिक खुप हाल होतात.
Not true. After 7 yrs baby jhale ki bhandn nahi honar ka??
Good that I can hear out Shaheen mam's views. In the last video, the other guest didn't let her speak and that was very wrong.
खूप छान एपिसोड होता .. परंतु भारताबाहेर जेव्हा भारतीयांचा घटस्फोट होतो तेव्हा गोष्टी खूप वेगळ्या असतात आणि दुर्दैवाने त्याबद्दल अजूनही फारसं समुपदेशन होत नाही .. तशा समुपदेशनाचीही खरच खूप गरज आहे
खुप सुंदर podcasts असतात खुसपुस मधे. जमल्यास postpartum depression, त्याचे नविन पालकांवर होणारे परिणाम आणि कुटुंब आणि समाजाचा मुलांच्या संगोपनात होणारा overall हस्तक्षेप ह्यावर जर चर्चा करता आली तर नक्की प्रयत्न करा 🙏🏻
आयुष्याचा जोडीदार निवडताना पालकांचा कितपत सहभाग असावा यावर जर एक podcast घेतलात तर खूप helpful होईल असं वाटतं..
Mullinna lagnachya dusryach diwashi ka jabbadari taktat
उत्तम एपिसोड. शाहीन मॅडम आणि सागर सर दोघांनी उत्तम विश्लेषण केले आहे.
ग्रामीण भागात घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत न जाण्यात स्त्रियांचे आर्थिक अवलंबित्व हा एक मोठा घटक आहे.
अगदी शहरात देखील स्त्रिया आर्थिक दृष्टीने अवलंबून असतील तर त्या घटस्फोटाचा निर्णय कमी घेतात.
ज्यांना माहेरचा सपोर्ट आहे, त्या तसा निर्णय काही अंशी घेतात.
ह्या एपिसोड चा शेवट move on वर झाला आहे. तर remarriages ह्या विषयावर खुसफुस व्हायला हवी आहे.
त्यात divorcee चे आणि विधुर, विधवा यांचे पुनर्विवाह असा विषय असावा.
सर आणि मॅडम यांनी उत्तम माहिती सांगितली ,मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
आज कालच्या तरुण पिढीला लग्न करायची घाई असते किंवा अर्धवट असलेलं ज्ञान यामुळे येणाऱ्या अडचणी यासाठी योग्य मार्गदर्शनासाठी तुम्ही उत्तम काम कृतायेत.❤
खुप खुप Thank You❤
खुस पुस अमुक तमुक वरचे सगळे सेशन्स खूप छान असतात मला या टीमला एक सजेस्ट करायचा आहे समाजामध्ये जे अपंग मुले आहेत अशी मुलं वाढवताना पालकांसमोर ची आव्हान त्यांच्या समस्या समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यावरचे वेगवेगळे मार्ग आणि त्यामध्येही जे 100% कर्णबधिर मुले असतात यांची ही मुलं वाढवताना येणाऱ्या समस्या समाजाचा दृष्टिकोन आणि त्यावरचे मार्ग याबाबत डिटेल मार्गदर्शन मिळावे समाजाचा एक खूप मोठा वर्ग मुख्य प्रवाहापासून वेगळा राहतो त्यांचे प्रश्न खूप गंभीर आहेत🙏🙏🙏
Thank you 😊 अमुक तमुक टीम शिंदे मॅडमच्या मागच्या episode मद्ये मी पण ही request केली होती की शिंदे मॅडम कडून या विषयाची कायदेशीर बाजू काय असेल... Thank you 😊 परत एकदा ...आणि तुमच्या कडून अपेक्षा खूप वाढत आहेत... best of luck 🤞
धन्यवाद 🙏🏻🙌🏻
Thank you 😊🙏
@@OmkarJadhav09 very nice
❤ खूप छान छान विषय आहेत. मला जाम आवडला अमुक तमुक channel. आणि ओमकार मला तुझं हसणं खूप आवडलं. एकदम real हसतोस तू. Recording पुरते नाटकी नाही हसत.❤
Pre marriage counseling is a dire need of the present time.
अमूक तमुक च्या निमित्ताने अतिशय सुंदर सुंदर आणि विचार करायला लावणारे विषय तुम्ही चर्चेला घेता...अतिशय छान platform आहे...मी वाटच बघत असते...सध्या मी अमेरिकेत आहे...तुमच्या वयाची मुले ह्या अश्या विषयाला वाचा फोडता ह्याचे कौतुक करावे तितके थोडेच...मी विमानप्रवासात तुमचे अनेक episodes download करून लांबच्या प्रवासात त्याचा आनंद घेतला...मी तुमच्या एवढ्या मुलाची आई आहे...नविन पिढी खुप विचारी आहे हे जाणवते...तुमच्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन....पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा....आणि नव्या episode च्या प्रतिक्षेत 😊👍👍
अमुक तमुक च्या माध्यमातून समाज प्रबोधन करून अनेक गुपित विषय हाताळून समोर ठेवणं तसेच ओमकार जाधव सरांच्या कार्याला सलाम करतो
Thank you Omkar for this wonderful opportunity ! And thanks to the viewers, for all the appreciations. 😊🙏
Adv Shahin Ma'am, Podcast was excellent & you have give.n great guidance for couple who are in terrible phase of their marriage.
Kindly keep doing such nobel work. Keep guiding couple on marriage because in today's society divorce has become very big issue for kids.
@@KetanKatkar Thank you so much ! God Bless All !!
Adv shinde mam please how to contact you
Since unable to post comments on "Extra Marital Affairs and Marriage" podcast
ruclips.net/video/Oc4NfGEiT3Y/видео.html&ab_channel=AmukTamuk
so posting here.
Dr. Shirisha and Adv. Shahin both are great and very knowledge driven.
Dr. Shirisha Mam, is superbly talented, highly rich experienced and much more than that...can't express in words.
She articulate great futuristic thoughts in few simple words, that ultimate beauty. Also Adv. Shahin Shinde realised us latest real practical issues that was outstanding.
Omkar Sir also able to keep the podcast flow very well. However guest supposed to given equal chance for final summary guidelines.
Amuk Tamuk Team should bring 2nd part of that and let viewers contribute thru comments sections.
@@anandpunalkar8765 Grateful to you ! Thank you 🙏
नवरा आणि बायको या दोघांकडून दोन्ही बाजू अगदी बरोबर मांडले सरांनी, मॅडम नी खुप छान ❤❤❤
अभिनंदन ओंकार ! आजची मुलाखत अभ्यासपूर्ण झाली. शिंदे मॅडमना त्यांचे अनुभव या मुलाखतीत अधिक छान तऱ्हेने मांडता आले. डॉ. साहेबांनी त्यांच्या अनुभवांनी आजची मुलाखत परिपूर्ण केली. सर्व टीमचे अभिनंदन... All the best
धन्यवाद 😊🙏
खूप छान विषय. अतिशय matured prashna विचारले. अँकर मध्ये बरीच सुधारणा जाणवली. तज्ञ अगदी योग्य निवडले. छान episode
खूप छान चर्चा झालीय...अमुक तमुक टीम चे हार्दिक अभिनंदन...दोन्ही तज्ञांनी खुप छान चर्चा केलीय...खुप खुप धन्यवाद
धन्यवाद मनापासून तुम्हा लोकांचे!
मी आता माझ्या आता १० वर्षा च्या मुलाच्या ताब्यासाठी मुलगा ७ वर्षाचा असल्यापासून कोर्ट चे चक्कर मारतोय.
कोर्ट मध्ये मुलाचा ताबा आई लाच मिळतो हे जे काही मिथ आहे त्याबद्दल थोडी चर्चा करावी जेणे करून जे पुरुष पालक मुलांच्या ताब्यासाठी प्रयत्न करताहेत त्यांना हातभार होईल.
Khup Chan discussion… divorce zalyavar parat kas move on karayach tya baddal ek session houde.. karan divorce nantar je kharach mentally disturb hotat tyanchy sathi
खूप संवेदनाशील विषय आहे शिवाय समाजात याची माहिती होणं गरजेचे आहे ती तुम्ही करता या बद्दल तुमचे अभिनंदन.
प्रथम अमुक तमुक टीमचे खूप अभिनंदन कारण आजचा विषय खूप महत्वाचा होता . आणि हा विषय मांडण्यासाठी खूप तज्ञ लोकांचे मार्गदर्शन तुम्ही आम्हाला दिलेले आहे . ॲड. शाहीन mam आणि Dr. पाठक सर अतिशय छान पद्धतीने दोघांनी विषयातील प्रत्येक मुद्दा मांडला .. नक्कीच mam, Sir तुमच्या मार्गदर्शनाचा फायदा हा ज्यांच्यावर ही वेळ येईल त्यांना होईल आणि नक्कीच यातून ते चांगले शिकतील . लग्न का करावं , लग्न कसे टिकवावे खूप छान सांगितले पाठक sir तुम्ही !! साध्या साध्या कारणांनी घटस्फोट होतात एकूण मेकाच्या अपेक्षा वाढत आहेत आणि वाढणे योग्य पण आहे पूर्वीच्या काळी स्त्रिया जास्त बाहेर दिसायच्या नाहीत त्यामुळे प्रमाण पण कमी होते पण आता पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया बाहेर कामाला जात आहेत मग दोघांनी मिळून घर सांभाळणे काम करणे ही अपेक्षा काही गैर वाटत नाही मला .जरी मुलांनी कधी कोणती काम केले नसतील तरी शिकले पाहिजे जर पुढचा अनर्थ टाळायचा असेल तर ! घटस्फोट झाल्यानंतर सुद्धा कसे वागायचे हे पण दोघांनी खूप छान सांगितले. एकूण आजचे सेशन हे खूप छान झाले .
खूप खूप धन्यवाद आणि आभार 😊🙏
Adv. Shaheen khoop chhan bollya. esp at the end while talking about kids, and about how to get back to life after divorce.
Thank you 🙏
तुम्ही जे तज्ञ आणता ना ते एकदम जगातभरी असतात. अमुक तमुक चे मनापासून आभार. माझ्या मते सर्वच मुद्दे तुम्ही बोलला आहात.
धन्यवाद 😊🙏
खूसपूस अमुक तमुक टीमचे मनापासून आभार.. उत्तमोत्तम तज्ञ आणि दर्जेदार विषय यावर चौरंगी चर्चा.. भविष्यात हाती घेणा-या सर्व विषय आणि प्रकल्प यांकरिता शुभेच्छा.
बेस्ट एपिसोड! ओंकार ने पाय दाखवत प्रश्न विचारणं बरोबर दिसत नाही. या आधी ही बऱ्याच वेळा अनेकांनी हे पॉइंट आऊट केले आहे.
त्यांन समोर छोट टेबल ठेवाव त्यावर टिपण असलेला कागद ठेवावा मांडीवर ठेवण्या पेक्षा
Divorce या विषयावर चर्चा खूपच छान झाली. पण divorce होण्याचे आणखीन एक खूप महत्त्वाचे कारण म्हणजे. Extra Marital affair या विषया वर या पॉडकास्ट मध्ये साधा एक शब्द सुद्धा बोलणे नाही झाले. याचे खूप आश्चर्य वाटतंय....
बाकी चर्चा खूपच छान सुंदर होती...
खूप खूप शुभेच्छा..👍👍👍🥰🥰💐💐
Thank you for this segment of khuspus. My family sits together to watch Khuspus podcast is the biggest change in my house. Amuk tamuk team thank you so much for khuspus segment and always waiting for more such new, realistic and vital content😊👍🏻💐
Thank you so much!! 🙌🏻
चर्चा खूपच छान झाली,लग्न होऊ घातलेल्या प्रत्येक मुला मुलींनी व त्यांच्या पालकांनी बघणे अत्यंत गरजेचे व महत्वाचे आहे. दोन्ही वक्ते फ़ार म्हणजे फार छान बोलले,both of them seems to be extremely matured and balanced! So these are perfect people to call for this topic. परीपूर्ण चर्चा वाटली . Very informative and interesting talk. Thank you अमुक तमूक, keep going👍
खूप छान विषय घेऊन आलात अमुक तमुक टीम अश्या विषयावर चर्चा करणे समाजाला खूप अत्यंत गरज होती
खूप छान podcast सुरू केली ओमकार जाधव...आणि अत्यंत निष्णात गेस्ट बोलावून क्लिष्ट विषय सर्व बाजूंनी समजावुन सांगतात!
अतिशय उत्तम कार्यक्रम. ग्राउंड रिॲलिटी वर झालेली चर्चा. आपल्या वैवाहिक जीवनाकडे पहाण्याची एक दृष्टी देते
माहिती नाही का पण अमुक तमुक आणि माझ्यात काहीतरी स्ट्राँग कनेक्ट आहे... मी ज्या विषयाबद्दल विचार करतो आणि मला हेल्प हवी असते... अमुक तमुक वर व्हिडिओ अवेलेबल असतो... इट्स लाईक वन स्टॉप सोल्युशन फॉर मी....
मी स्वतः घटस्फोटीत आहे आणि खूप आनंदी आहे...
धन्यवाद धन्यवाद Omkar Sir👏👏💐💐
अप्रतिम.. दोन्ही, शाहीन मॅडम, पाठक सर.. Anchor also. Very good, ...
धन्यवाद!
एकमेव चॅनल आहे जे फक्त ॲाडीयन्स/ viewers ना उपयुक्त गरजेची माहीती देतं , बाकी नवनवीन पॅाडकास्ट चं पीक येतं आहे जे केवळ एखाद्या प्रॅाडक्ट च्या जाहिराती साठी काहीतरी एपिसोड बनवतात किंवा फिल्म मधले आधीच प्रसिद्ध असलेले कलाकार बोलावून त्यांच्या खाजगी आयुष्यावर बोलून स्वत:चे सबस्क्राइबर वाढवतात. Good work keep it up 👍🏻👍🏻
खूप खूप धन्यवाद! लोभ असावा!
खुप सुंदर आपण बोलतात selute❤❤ 💐💐 Sir🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अगदी परफेक्ट चर्चा! सगळ्यांपर्यत पोचली पिहिजे.
Atishay sundar vishay ani purna charcha khup mast.
Thank you omkar and your team, सगळेच विषय अगदी खुसपुस करण्याचे असून 😊 सुद्धा,त्यावर उत्तम वैचारिक आणि माहिती पूर्ण चर्चा कशी व्हावी ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे अमुकतमुक,all the very best. असेच अजून खुस पुसणारे विषय😅 घेऊन तुम्ही आमच्यासमोर याल 👍
वैयक्तिक त्याबरोबर सामाजिक प्रश्नाचा केलेला उलगडा अतिशय अप्रतिम आहे.अशाच खूप साऱ्या विषयावरील मार्गदर्शनाची आवश्यकता प्रत्येकाला आहे. Thank you so much Amuk Tamuk and Omkar sir 🙏👍🙏
Thank u amuk tamuk team.... Shinde Madam na punha bolwalya baddal ... 🙏❤
खुप छान! अत्यंत छान शब्दात दोघांनी ही खुप छान सांगितले आहे.👌🏻👌🏻🙏🙏
Most needed topic to be talked about. Topic is handled very skillfully. It will work as a guiding star for many couples. Omkar keep up good work. Thank you
Hellollolo.. ओंकार, शार्दुल..... तुमचे सर्व एपिसोड,subject Very Relevant to present situation, surrounding.... भारी..... तुम्हाला खूप खूप खूप शुभेच्छा...!!👍👍👍🌟🌟🌟
ऐक उदाहरण सांगतो,
माझा Best friend शाळेतला त्याचे Divorce झाले 3 वर्षा पूर्वी, आम्ही सोबत प्याला बसतो त्या मुळे त्याने मला सर्व सांगितले काय झाले ते,
कारण हे होते की त्याच्या बायको चां लग्ना आधी BF होता आणि जवळ जवळ 8 वर्ष त्यांचे लैंगिक संबंध होते,
हे सर्व तिने त्याला लग्ना आधी सांगितले होते पण चलाखी ने तिने लग्नाला 2 महिने बाकी असताना सांगितले त्या आधी 1 वर्षा पूर्वी लग्न जमले होते आणि 6 महिन्या पूर्वी साखरपुडा झाला होता, तिने आधी याचा स्वभावाचा नीट अभ्यास केला आणि गोड गोड बोलून याला प्रेमात पाडले होते,म्हणजे लग्न तुटण्याची शक्यता कमी केली, तो लग्नात थोडा नाराज होता पण लग्ना नंतर तिने खूप भांडण केले कारण त्याला हे पण कळले की लग्नाच्या 1 महिना आधी ते दोघे फिरायला गेले होते आणि जेव्हा हा तिला घरी सोडायला गेला आणि तिला सोडून तेथून गेला तेव्हा तो मुलगा त्यांच्या घरी आला आणि तिला व तिच्या आई ला भेटला, पण आई ने त्याला घरातील देवी वर हात ठेवून वाचन घेतले की तो तिला विसरेल आणि लग्नात काही व्यत्यय आणणार नाही,
लग्ना नंतर 1 वर्ष माझा मित्र खूप डीप्रेस झाला होता, एक तर जुळत नव्हते त्यात तिचा past कळल्याने त्याला तिच्यात काहीच Intrest राहीला नाही, नोकरी पण सोडली त्याने आणि खूप भांडण होत होते,
शेवटी 2 वर्षा नंतर त्याने तिला परत घरी पाठवले आणि Divorve फाईल केले आणि काही वर्षा पूर्वी झाले त्याचे,
मी त्याला 1 प्रश्न विचारला की तुझे पण लग्ना आदी affairs होते मग बायको चे काही पचले का नाही तुला,
त्याने उत्तर दिले की मी लग्न जमल्या नंतर लगेच तिला भेटून सर्व सांगितले होते पण तिने लग्न जुळून साखरपुडा झाला आणि 2 महिने आधी पर्यंत सर्व लपून ठेवले होते जेणे करून लग्न तुटू नये म्हणून,
ती 8 वर्ष Sex करत होती त्याच्या बरोबर, कोण नवरा असा past सहन करेल,
आणि लग्न जवळ आले तरी तो मुलगा तिच्या संपर्कात होता आणि त्यांचे रिलेशनशिप संपलेले नव्हते, आणि हा तर लग्न जमण्या आधी सर्व clear करून बसला होता,
खूप किचकट प्रसंग आहे पण नवऱ्याचे किती ही लग्ना आधी Affairs असतील तरी तो बायको चे लग्ना आधी चे संबंध सहन करू शकत नाही.
खुप sundar विषय mandla mulancha man kalushit karneyacha mudda खुप avadla👌👌👌
चर्चा खूपच चांगली झाली. दोन्ही पाव्हण्यांनी विषय खूप चांगला मांडला.
ओंकार तू खूप अभ्यासपूर्वक मुद्देसूद प्रश्न विचारले. तुम्हा तिघांचे खूप अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार.
Thank you 🙏😊
सध्याचा पालकांचा मेंदू कुरतडनारा विषय.... दोघेही तज्ञ अनुभवी.... वास्तववादी मार्गदर्शन....I share this episode with one of my friend... who right now go through this situation...living under one roof....but totally lives seperation life..& lot's Of heatrates between them...but after watching...she realises the things & want to wark on that.... May be they seperate or not....but they realise where to focus.......rather than waisting energy on only Blaming each other.....Really...Usefule, Guided conversation..... Thank U so much All Of U...Good Wishes..!! 👍👍👍💖💖💖
Thank you 😊🙏
एकदम छान फायदेशीर आणि उपयुक्त माहिती👌
Live in relationship, keep some light, with these guys.
खूप छान चर्चा झाली ही.
व्यवस्थित प्रश्न आणि अनुभवातून आलेली true to the ground उत्तरे.
खूप छान चर्चा झाली 👌👌... ओंकार
मी एक सुचवेन, महाराष्ट्र अंनिस या संघटनेचा एक खूप चांगला उपक्रम आहे 'जोडीदाराची विवेकी निवड' म्हणून, यामध्ये लग्न, सहजीवन, जोडीदार या विषयांशी संबंधित अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर संवाद घडवून आणला जातो व मार्गदर्शनही केले जाते. हा उपक्रम व्हाट्सएप वर 50 दिवसांची batch चालवून घेतला जातो, यात रोज एक प्रश्न विचारला जातो व त्याचे उत्तर ग्रुपमधील सर्वांनी दिवसभरात द्यायचे असते... सांगावं तेवढं कमी आहे याबद्दल.. ही जशी ऑनलाईन batch असते तशाच संवादशाळाही घेतल्या जातात, ज्यामध्ये कोणीही सहभागी होऊ शकतं.. या उपक्रमात महाराष्ट्रातील अनेक तरुण-तरुणी सहभागी होऊन त्यांनी याचा फायदा घेतला आहे, आणि हा उपक्रम प्रत्येक माणसा पर्यंत पोहोचण्यासारखा आहे... या उपक्रमासाठी सचिन, आरती, निशा, महेंद्र, दिक्षा, यांनी खूपच मेहनत घेतली आहे ... जेव्हा शक्य असेल तेव्हा यांना सुद्धा नक्की invite कर.. गरज भासल्यास मी त्यांचे संपर्क क्रमांकही शेअर करेन नक्की😊
दोघे जण खूप छान बोलले आणि छान माहिती सांगितली.... पण आजकाल नाममात्र घटस्फोट एक आणि दोन महिन्यात होतो त्याबद्दल पण माहिती सांगितली तर बरे होईल... आणि घटस्फोट झाल्यानंतर जर कोणाला दुसरे लग्न करायचे असेल तर बरेच वेळा लोकं बोलतात की पहिल्या शी जुळवून घेतलं नाही तर दुसऱ्या व्यक्ती बरोबर काय जुळवून घेणार.. किंवा दुसरे लग्न करताना त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे हे सांगा
सेन्सेटीव्ह विषय असून सर्वांगिण उत्तम चर्चा झाली.
खुप छान शो....शुद्ध मराठीत बोलतात...ते सर्वात चांगल वाटतेय.
Pan ha vishay ithe khup sunder mandlay amuk tamuk ne..kadhi kadhi couples na he sagla umjat konitari te shantpane sangitlya jast impactful hota
खूपच छान प्रकारे चर्चासत्र झाले.
Omkar you ask really good and relevant questions.
घटस्फोट किंवा ब्रेकअप नंतर सूडभावना ठेवून वाईट चिंतू नका, वाईट करू नका हा सल्ला खूप मोलाचा आहे.
आपण नक्कीच बरोबर बोलत आहे. प्रेम आपण एकमेकांना जवळपास येतात आणि भांडण झालं वर एकमेकांना रिलेशनशिप ब्रेक अप झालं नंतर चांगल्या आठवणी लक्षात ठेवून एकमेकांना चांगले आशिर्वाद द्या आणि नवीन जीवांच्या सुरूवात करा ईश्वर शक्ती तुम्हाला एवढाच वेळा प्रयत्न एकमेकांना बरोबर ठेवला असेल आणि दूर केल्या आहे हे लक्षात आलं तर तुम्ही एकमेकांना समजून वेगवेगळ्या होतील आणि त्रास होणार नाही
thank you team amuk tamuk for bringing this episode. I am 20 yrs old girl now ! in upcoming 5 to 8 yrs mala decisions ghyaychet about my life , these conversation are really helpful for us je ki koni gharche lok pan bolat nahiyet ! te tummhi gheun yetayt ! it's really help for decision making of upcoming yrs !
Khupch mahtvacha subject ghetlat. Khup chan mahiti milali. Sadhyachya lagnalu mula- mulina tasech divorce zalelyana pan mahatvapurn mahiti milali asel. Dr. saheb ani Vakil mamche abhar.
Omkar all the best for new subject🎉
Omkar dada, Can we have a talk on ADHD, its a very common concern in school kids.
घटस्फोट होऊ नये यासाठी आपले प्रयत्न खूपच छान, नवरा -बायको मॅचिंग असावी तरच संसार फुलतो.धन्यवाद!🙏🏼
Pre marriage counselling var ek separate episode vhyala pahije.
Khup imp.
Pre marriage photo shoot peksha pre marriage counseling jaste important aahe
I wish I could meet Shahin ma'am in time!!!
लग्नापूर्वीच्या counselingला महत्व द्यायची आता गरज वाढली आहे
खूप खूप सुंदर पॉडकास्ट 👌👌
अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा घडवून आणली. दोन्ही मान्यवरांनी अत्यंत सुंदर रित्या गोष्टी उलगडून सांगितल्या त्याबद्दल धन्यवाद.👍
Beautiful beautiful beautiful
Khup chan episode.. baryach prashnanchi answers milali👍🙏
छान विषय. You can still keep focus constant at your guest.
Khup chan! Very important subject in today's world 👏
Thank you .. Omkar khup chan ani matured questions vicharlet .. very nice anchoring ... Best episode 👌
crucial topic handled really well... it is very difficult for divorce couples. After divorce, changing a name on legal documents it's very critical process esp for girls . Bcz on each and every point that girl has to say divorce word and society gives weird look ... How to stay strong and calm ..And accept and move on ..this is discussed in life after divorce topic in a beautiful way..Thank you to AmukTamuk team for bringing this topic on social media..
Thank you amuk tamuk for this topic but please have one more episode for people who went through divorce and suffered emotionally a lot to get some light in their life emotionally
अप्रतिम एपिसोड🙌🏻🙌🏻🙌🏻🙏🙏🙏❤️❤️
Khup chan episode ahe...shiknyasarkha ahe ....
येणाऱ्या पिढीला आज काल लग्न करायचे नसते.लग्न करणे किती सुंदर आहे. हे ह्या पिढीला कळायला हवं.हा विषय घेऊन एक पॉडकास्ट कृपया करा.
😂😂😂😂
सध्यास्थितीत अतिशय महत्त्वपूर्ण सामाजिक,संवेदनशील व वास्तववादी विषय. धन्यवाद..शिंदे मॅडम,ओंकार जाधव. छान podcast 👍🙏
खूप खूप आभार
Thank you 😊🙏
The Best discussion will end to better output for both individuals or families....
खूप सुंदर episod होता, almost dimensions madam and Sirani cover kelet. Khup chan samajik subject ghetlat. Last minutes was excellent
माझे वय ७२ वर्षाचे आहे. आणि नवरा ६६ वर्षाचा आहे. आमचे दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. दोघांचीही पहिली लग्ने आणि दुसरे लग्नही love marriages आहेत. दुसरे लग्न हे आंतर्धर्मीय आहे. मी जाणीवपूर्वक अधिकृतपणे त्याच्या धर्माचा स्वीकार केला आहे. दुस-या लग्नाला ३६ वर्षे झाली आहेत. आणि दुस-या लग्नात आम्ही खूपच मजेत आणि आनंदात आहोत. परस्पर संमतिने मुले होऊ दिली नाहीत. आमच्या मित्रमंडळींना आम्ही Made for each other वाटतो. आमचे नाते हे मानसिक भावनिक बौद्धिक आर्थिक सामाजिक असे सुदृढ आहे. आमच्या आवडी निवडी व विचार खूप मिळते जुळते आहेत.
In my opinion, this is only a legal perspective and that’s why cases are discussed like stories of immature behaviour. One of the major reasons is decreasing Co-dependency and complex social fabric. Many kids come from broken families but their parents could not divorce because they feared social stigma. There are many hidden issues which need to be discussed. Most relations are economical and we have to accept that marriage is also one of them. That’s y we have property issues among blood family members as well. Amicable cohabitation or amicable separation are better options right now. And yes, hygiene is a very important factor which should be discussed before cohabitation.
Well said
मी कालच या topic चा विचार करत होते, आणि अमुक तमुक कडून या विषयावर चर्चा व्हावी असे मनापासून वाटत होते आणि आज सकाळी मोबाईल पाहते तर काय....याच topic चा video आलाय 🙏👌
Fantastic episode. Would really like to hear a podcast about awareness of STI & STD's. Also would like to hear insights about upbringing of special child. ( Mentally Challenged Children & there upbringing & challanges faced by their parents through society & some solution oriented approach to it )
Really help ful....khup mhatvachya topic var ha episode banvlat....Kharach avdel ajun janun ghenya sathi...ke vibhakta zalya var alelya depression kinva tya bad patch madhun swatala kase savrun baher padave. Asha topic var ekhada podcast banvlat tar nakki avdel. khup khup shubehcha 🙂
Madam : 9/10, Sir : 6/10, But overall very important topic discussed. Still I feel discussion are very one sided considering only Indian thought process. its time of globalization, and we should also consider international thoughts about each topic. That would contribute to come up with more solid solutions. But Kudos to your entire team!
Very informative.. Dr Shinde म्हणाल्या की शुल्लक कारणावरून divorce reject होतात...तर हे शुल्लाक आहे की नाही हा personal विषय असू शकतो ना....कारण एकाला एक कारण शुल्लक वाटते पण तेच कारण कोणा दुसऱ्याला खूप important असेल ना...त्या मुळे हे कोर्टाची divorce reject करायची method नाही पटली...also Dr.Pathak जे म्हणले की toilet seat वर करणे or अव्यवस्थित पणा हे शुल्लक कारण असू शकतं नाही..ज्याला स्वच्छता किंव्हा टापटीपीची आवड आहे, अश्या व्यक्तीला हा मानसिक त्रास असू शकतो..
I agree with u as I am going through the same and it affects ur mental ,emotional health .
True. Being an organized person is good and expecting it from the other family members is also OK, but it should not become an OCD (Obsessive Compulsive Disorder) OR one should not get paranoid due to such small issues. People face a lot more severe problems in life, but they keep trying to live happily. In such a situation, are these issues, so serious that for these, you want to get separated from your life partner ?
@@ShahinShinde of course I agree…but these small things build up and form a reason for divorce….when u start disliking someone even smallest of a silliest gesture becomes non tolerable …divorce is always I feel coz of small issues building up and blowing out of proportion
अजून एक अप्रतिम एपिसोड.... gr888 work अमुकतमुक
महत्वाचा विषय, मी pre व post marriage counselingकरते;विचारही करू शकत नाही अशी घटस्फोटाची कारणे आहेत;हा episode छान
Madam, खूप वेदनादायी डिवोर्स झाला माझा. माझी इच्छा नसताना करण्यात आला कारण नव-याला नको होते, लग्नानंतर दोनच महिन्यात झाला
Thank you 😊🙏
@@panash6 sorry to hear that !
@@panash6 काही ठिकाणी divorce होत नाही पण मनात तो झालेला असतो ,
@@sharmilapuranik229 काय करायचे. अवघड असते सगळे. सासरचे जेव्हा सगळे एक होऊन मला बाहेर काढले म्हणजे स्पष्ट नको म्हटले नांदवायला ,तर काय करणार. पर्याय च न्हवता
खूप खूप छान 👍🏼
आयुष संपत आल तरी दोन जण एकमेकांना ओळखू शकतात असे ही नाही
Please make more shows on different reasons in detail for divorce.
excellent podcast.....very knowledgeable content for married , unmarried, in a relationship wale couples who are aspiring to become life partners....all must watch this video so that many consequences can resolve in their current & future life...great work Omkar Bro👌👍
Thank you!
I like all these amuk tamuk episodes.ek request aahe ,jar 20-25 years chya mula- mulinkarta tyani life partners kase choose karayla havet kiwa kay criteria asla pahije hyavishayawar ekhada episode karta aala tar I will be thankful to all
🎉😮😮😢😮Jar navryane ghar ghetana fakt swatachya navavar ghetl anhi aplya baykola fasavl tar diverce nanter bagkone kay karaych baykola bicharila navryachya premapudhe he lakshyatach yet nahi ki agreementmadhye doghanch nav asnhe must ahe pandhra varsh sansar karun baher multilones karun navra palhun jato tevha baykone kay karaych