वेध प्रतिष्ठानने घेतला कन्हान नदी उगम आणि नदीचा शोध

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • नागपूर येथील वेध प्रतिष्ठानने घेतला कन्हान नदी उगम आणि नदीचा शोध घेऊन नदीच्या विषाक्त प्रवाहामागची कारणे शोधून काढली.याशिवाय नदी काठावरील सभोवतालच्या परिसराचा आढावा घेत तेथील संस्कृती, भाषा,इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला. या शोध यात्रेत बऱ्याच गोष्टी ,वास्तू आणि इतिहासाची साक्ष देणाऱ्या गोष्टी वेध टीमच्या निदर्शनास आल्यात.
    या शोध यात्रेत वेध चमूने ५ दिवसात महाराष्ट्र तसेच मध्यप्रदेशातील एकुण २५ गावांना भेटी दिल्यात.
    कन्हान नदीचा उगम शोधण्यासाठी स्थानिकांची सुद्धा मदत मिळाली.
    नागपूर जिल्हयातील कधी काळी दुथळी भरून वाहणारी कन्हान नदी आता प्रदूषित झाली आहे. ही नदी म्हणजे नागपूर शहराची जीवनदायीनीचं आहे.पण याच नदीला नागपुरातील नाग नदीचे घाण पाणी जाऊन मिळत असल्याने ही कन्हान नदी आता प्रदूषित तर झाली आहेच,शिवाय येथील जैवविविधता सुद्धा धोक्यात आली आहे. ही नदी डांगरवाड्या करीता प्रसिद्ध होती .मात्र आता त्याही नामशेष होत चालल्या आहेत.
    अशा या कन्हान नदीचा उगम स्थान सुद्धा आज तागायात कोणाला माहित नव्हता.
    त्यामुळे नागपूर येथील वेध प्रतिष्ठानच्या चमूने ही शोधयात्रा राबवण्याचे ठरवले.
    वेध प्रतिष्ठान मध्ये काम करणारे सगळे सदस्य हे जिल्हा परिषद शिक्षक असल्याने ते उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये असे उपक्रम राबवत असतात. यापूर्वी त्यांनी वेणा नदीची शोधयात्रा राबवली होती.या ५ दिवसीय शोध यात्रेचा समारोप आंभोरा या देवस्थानात करण्यात आला.
    इतर सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा😊🙏👇
    आणि आवडल्यास like,share आणि subscribe करा.🔔💐
    #नागपूर
    #शोध
    #रिसर्च
    #शोध_यात्रा
    #इतिहास
    #आंभोरा_देवस्थान
    #गडकोट
    #गडकिल्ले
    #leny
    #teacher
    #glassbridge
    #शिवलिंग
    #कोलेश्वर
    #गडकरी
    #पुलिया
    #bridge
    #संशोधन
    #शिक्षक
    #summertime
    #summer
    #summervibes
    #नाग_नदी

Комментарии • 2

  • @onkarpatil9267
    @onkarpatil9267 Месяц назад +1

    फारच सुंदर व नाविण्यपूर्ण उपक्रमातून उन्हाळी सुट्यांचा सदुपयोग करून संशोधनात्मक विचार समोर ठेऊन वेध प्रतिष्ठान नागपूर द्वारे आयोजित कन्हान नदी शोधयात्रा उपक्रमाचे अभिनंदन....

  • @khushalkapse152
    @khushalkapse152 Месяц назад +2

    सातत्याने नाविन्याचा शोध घेऊन समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा वसा कायम ठेवून वेध प्रतिष्ठान नागपूर द्वारा आयोजित कन्हान नदी शोधयात्रा हा अत्यंत प्रेरणादायी उपक्रम.