गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी व गुरुपौर्णिमेचे औचित्य साधन विठूचा गजर ही गीत गायनाची स्पर्धा उत्साहात संपन्न...
    श्री सिद्धेश्वर बालमंदिर शाळेमध्ये शनिवार; दिनांक 20 /7/ 2024 रोजी ' गुरुपौर्णिमा ' उत्साहात साजरी करण्यात आली . कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धेश्वर प्रशालेच्या माजी संगीत शिक्षिका सौ. अलका अरगडे मॅडम, अध्यक्ष म्हणून श्रीमती. गीता चिकमनी मॅडम हे उपस्थित होते. याप्रसंगी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगणारे गीत व भाषणे घेण्यात आली. गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून आषाढ मासानिमित्त ' विठूचा गजर' ही गीत गायन स्पर्धा राबवण्यात आली.
    या स्पर्धेसाठी इ.1ली ते 7वी च्या विद्यार्थ्यांनी कराओके वर विठूचा महिमा सांगणारी अनेक गीते सादर केली.
    कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या व परीक्षक म्हणून लाभलेल्या सौ. अलका अरगडे मॅडम यांनी सुंदर गीत सादर करत मुलांचे कौतुक केले आणि मुलांना कलेचे महत्त्व समजावून सांगितले . शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती गीता चिकमनी मॅडम यांनीही मुलांचे कौतुक केले.
    प्रमुख पाहुणे व माननीय मुख्याध्यापिकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षिसे दिली. गुरुपौर्णिमेनिमित्त स्वागत गीत व गुरुवर आधारित गीत सादर केले. या गाण्यांना तबल्याची साथ चि. चिन्मय बिराजदार , पखवाजाची साथ चि. श्रेयस शिंदे यांनी दिली. विठूच्या गजर स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांना तसेच गीत सादर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सौ. अनुजा देशपांडे यांनी केले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे विद्यार्थी चि.अंशुक कांबळे व राजनंदिनी साठे यांनी तर प्रास्ताविक अनुजा देशपांडे यांनी केले, प्रमुख पाहुण्यांचे परिचय सौ. अर्चना मरगूर तर आभार सौ शिल्पा भैरप्पा यांनी मानले . याप्रसंगी 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे !' ही सामाजिक बांधिलकी जपत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना रोपे देऊन गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
    कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.श्वेता शिंदे, सौ.शिल्पा भैरप्पा व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
    *घेतला वसा शिक्षणाचा ,ध्यास आम्हा गुणवत्ता वाढीचा*💐💐

Комментарии • 1