शाळेचा पहिला दिवस व विद्यार्थ्यांचे स्वागत 2024-25 प्रवेशोत्सव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • 🌷🌷 श्री सिद्धेश्वर बाल मंदिर प्राथमिक शाळा सोलापूर 🌷🌷
    श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळा, भवानी पेठ, सोलापूर येथे आज ,शनिवार दिनांक १५/६ /२०२४ ' प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वितरण ' नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात झाली.
    सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून व गुलाब पुष्पवर्षाने विद्यार्थ्यांचे प्रफुल्लीत वातावरणात शाळेत स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे श्री.अविनाश पाटील,श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समिती सदस्य मा.श्री. गुरुराज माळगे सर व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गीता चिकमनी मॅडम यांच्या शुभहस्ते पाठ्यपुस्तकांचेही वितरण करण्यात आले.
    हा प्रवेशोत्सव श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे सन्माननीय सदस्य गुरुराज माळगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री सिध्देश्वर वुमन्स इंजीनियरिंग कॉलेजचे विभाग प्रमुख मा. श्री अविनाश पाटील सर यांची उपस्थिती लाभली. तसेच या कार्यक्रमास शाळेच्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. श्रद्धानंद व्हटकर व शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ. पूजा सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
    शाळेच्या वतीने प्रभात फेरीचेही आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी हिरीरीने आपला सहभाग नोंदवून, शालेय परिसरामध्ये शैक्षणिक घोषणा देऊन वातावरण निर्मिती केली.
    याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवीन शैक्षणिक वर्षाची आतुरता व उत्साह ओसंडून वाहत होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्वेता शिंदे यांनी केले . प्रवेशोत्सव संपन्न करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्री
    मती. गीता चिकमनी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
    💐 घेतला वसा शिक्षणाचा, ध्यास आम्हा गुणवत्ता वाढीचा 💐

Комментарии • 3