शिक्षक प्रशिक्षण व्याख्याते मा.श्री. श्रीरंग क्षीरसागर प्राचार्य दयानंद शिक्षण शास्त्र महाविद्यालय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित...
    श्री सिद्धेश्वर बाल मंदिर प्राथमिक शाळा सोलापूर
    ________________________________________________
    📚📚📚🌏📚📚📚
    ' श्री सिद्धेश्वर देवस्थान गुणवत्ता वाढ अभियान या उपक्रमांतर्गत ' श्री सिद्धेश्वर बाल मंदिर प्राथमिक शाळेत श्री सिद्धेश्वर बाल मंदिर प्राथमिक शाळेतील शिक्षक व श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन सोमवार ,दिनांक ३०/९/२०२४ रोजी करण्यात आले होते. या व्याख्यानास दोन्ही शाळेतील एकूण ४० शिक्षक उपस्थित होते. * बुद्धिमंथन या विषयावर दयानंद शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे मा.प्राचार्य डॉ.श्रीरंग क्षीरसागर यांनी पहिले पुष्प गुंफले.
    शिक्षक हा निरंतर विद्यार्थी असून,शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आपल्या व्यवसायिक क्षमतांच्या वाढीचे विकसन करण्यासाठी प्रशिक्षण घेण्याची प्राथमिकता व आवश्यकता ओळखून श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे सदस्य व गुणवत्तावाढ समितीचे अध्यक्ष मा. डॉ. श्री.राजशेखर येळीकर सर यांनी शिक्षकांच्या प्रशिक्षणास प्राधान्यक्रम दिला आहे.या उपक्रमास प्रत्यक्षात उतरवण्याचे कार्य श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे सन्माननीय सदस्य तथा श्री सिद्धेश्वर बाल मंदिरचे पालक सदस्य मा . गुरुराज माळगे सर यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती गीता चिकमनी मॅडम यांच्या कुशल मार्गदर्शनाने आजचे व्याख्यान संपन्न झाले.
    दैनंदिन अध्यापन करताना शिक्षकांसमोर येणाऱ्या शैक्षणिक समस्या, अडचणी, अडथळे व त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, उपाय योजना शोधण्यासाठी विचारमंथन पद्धतीची उपयोगिता प्रात्यक्षिकातून स्पष्ट केली. प्रत्येक शिक्षकाचा कृतीयुक्त सहभाग घेऊन बुद्धिमंथनाची उपयोगिता अतिशय सहज व सोप्या भाषेत व खुमासदार शैलीने मा. प्रा.डॉ.श्री.श्रीरंग क्षीरसागर सर यांनी स्पष्ट केली .
    आजच्या व्याख्यानमालेचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती गीता चिकमनी मॅडम यांनी केले. आजच्या व्याख्यात्यांचा परिचय सौ. अर्चना मरगूर मॅडम यांनी करुन दिला. आभार प्रदर्शन सौ. शिल्पा भैरप्पा मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. ज्योती लंगोटे मॅडम यांनी केले. व्याख्यानमाला संपन्न होण्यासाठी सौ. वसुधा जंबगी मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.
    कार्यक्रम पारपाडण्यासाठी सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
    __________________________________________ *घेतला वसा शिक्षणाचा, ध्यास आम्हा गुणवत्ता वाढीचा*📚📚📚📚📚📚📚

Комментарии •