वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ 2022-23

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • श्री सिद्धेश्वर बाल मंदिर प्राथमिक शाळा, भवानी पेठ,सोलापूर.
    🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
    वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा सन 2022- 23
    🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
    श्री सिद्धेश्वर बाल मंदिर प्राथमिक शाळेचे आज वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ हुतात्मा स्मृती मंदिर येथे पार पडले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे माजी विद्यार्थी *मा. डॉ. श्री. प्रसन्न कासेगावकर सर व त्यांच्या पत्नी सौ.सीना कासेगावकर मॅडम उपस्थित होते. श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे सदस्य तसेच श्री सिद्धेश्वर बाल मंदिर प्राथमिक शाळेचे पालक सदस्य मा. श्री .गुरुराज माळगे सर, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे सदस्य मा. ॲड. श्री रे.सी. पाटील सर*, सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे समन्वयक मा. श्री संतोष पाटील सर. शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीम. प्रमिला नंदगावकर मॅडम, श्रीम .शांता मरगूर मॅडम, श्रीम.भौरम्मा बिराजदार, सौ. महादेवी कुंभार मॅडम, श्री सिद्धेश्वर बाल मंदिर प्राथमिक शाळेच्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्रद्धानंद व्हटकर सर, श्री सिद्धेश्वर संकुलातील सर्व मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका ,प्राचार्य, माजी शिक्षक वृंद बहुसंख्य पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमा पूजनाने व शाळेचे संस्थापक कर्मयोगी कैलासवासी आप्पासाहेब काडादी यांच्या प्रतिमापूजनाने व दिपप्रज्वलाने झाली. शाळेच्या विविध परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. शाळेच्या बालचमूंनी देशभक्तीपर गीत, सामाजिक संदेश देणारे गीत, हनुमान चालीसा अशा विविध गाण्यांवर कलाविष्कार सादर केला. पीपीटी च्या माध्यमातून शाळेचा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला.
    कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री. डॉ. प्रसन्न कासेगावकर सर हे आपल्या शाळेत शिकलेले माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी आपले शाळेतील अनुभव, आठवणी पालकांसमोर मांडले, पालकांना मोबाईलच्या वापरापासून मुलांना दूर ठेवण्याचा संदेश दिला, त्यांना या पदावर पोहोचण्यासाठी शिक्षकांचे मोलाचे स्थान आहे. त्यांनी सर्व शिक्षकांविषयी ऋण व्यक्त केले.त्यांच्या बोलण्याने पालक वर्ग, शिक्षक वृंद भारावून गेले होते. अतिशय आनंदाने ,उत्साहाने हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे आजी व माजी मुख्याध्यापकांनी, पालकांनी कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वसुधा जंबगी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.मुख्या. श्रीम. चिकमनी मॅडम यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सौ. श्रुतिका बिराजदार यांनी करून दिला व आभार सौ .रेणुका वाघमोडे मॅडम यांनी मानले. अतिशय खेळीमेळी च्या वातावरणात हा कार्यक्रम हुतात्मा स्मृती मंदिराच्या सभागृहात पार पडला.
    🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶 !!घेतला वसा शिक्षणाचा ध्यास आम्हा गुणवत्ता वाढीचा!!

Комментарии •