७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित, 🌹🌹श्री सिद्धेश्वर बाल मंदिर प्राथमिक शाळा,भवानी पेठ, सोलापूर*🌹🌹 --------------------------------------- *श्री सिद्धेश्वर बालमंदिर शाळेमध्ये स्वातंत्र्यदिन समारंभ अगदी उत्साहाने, आनंदाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मा. श्री. दिपक आर्वे साहेब हे लाभले. कब, बुलबुल च्या विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले . स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण मा. श्री दिपक आर्वे साहेब,श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे सदस्य तथा आपल्या श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळेचे पालक सदस्य मा. श्री .गुरुराज माळगे सर व कु. दीक्षा चव्हाण (S.S.C बोर्ड परीक्षा प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी) यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळेच्या मुख्या. मा.श्रीम.गीता चिकमनी मॅडम, श्री सिद्धेश्वर बाल मंदिर पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्या. मा. सौ. शारदा हेब्बाळ मॅडम तसेच श्री सिद्धेश्वर बाल मंदिर माध्यमिक विभागाचे मुख्या. मा .श्री .नागेश रायकोटी सर,श्री सिद्धेश्वर बाल मंदिर इंग्लिश मीडियम च्या मुख्या. सौ. स्मिता कोरवार मॅडम चारही विभागाच्या पालक- शिक्षक संघाचे उपाध्यक्ष, पालक शिक्षक संघाचे सदस्य, पालक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आजी व माजी विद्यार्थी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत गायन सौ. देशपांडे मॅडम यांनी केले. राज्य गीताच्या सामूहिक गायनानंतर प्रतिज्ञा व संविधान सामूहिक रित्या म्हणण्यात आले.विद्यार्थिनींनी ध्वजगीत, समूहगीत सादर केले या गाण्यांना तबल्याची साथ चि. चिन्मय बिराजदार व पखवाजाची साथ चि. श्रेयश शिंदे यांनी दिली. कब बुलबुल च्या विद्यार्थ्यांनी संचलन करत ध्वजाला सलामी दिली. त्यानंतर कवायत व लाठी काठी यांचे सादरीकरण करण्यात आले. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना पालक शिक्षक संघाकडून मोफत गणवेश वितरीत करण्यात आले.S.S.C. बोर्ड परीक्षेत यश प्राप्त तसेच विविध क्षेत्रात यश प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीसे प्रदान करण्यात आली. बक्षीस समारंभा नंतर भाषण, देशभक्तीपर गीतांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये विविध नयनरम्य मानवी मनोरे, नृत्य,देशभक्तीपर समूहगीते सादर करण्यात आली. *"लंडन देखा प्यारीस देखा, घर घर तिरंगा , पगडी संभाल जट्टा पगडी संभाल ,लगान थीम ." आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्व हुतात्मे तसेच अहोरात्र देशाचे संरक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांना विविध नृत्याविष्कार व समूहगीतातून मानवंदना दिली.
    प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी
    घेताना मोबाईल पासून लांब राहून अभ्यास, खेळाची, वाचनाची साथ धरावी असे आवाहन आपल्या मनोगतातून व्यक्त केले. श्री सिद्धेश्वर बाल मंदिर प्राथमिक विभागाच्या मा. मुख्या. श्रीम.गीता चिकमनी मॅडम यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या व भारताच्या सुवर्णमयी स्वातंत्र्यच्या इतिहासाला उजाळा दिला. तसेच
    विद्यार्थ्यांना वाचनाची आवड जोपासत मोबाईल पासून दूर राहण्यास सांगितले. मा.श्री. गुरुराज माळगे सरांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगलमय अध्यक्षीय शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून या कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.
    शिल्पा भैरप्पा यांनी केले. अशाप्रकारे प्रफुल्लित व देश प्रेमाने भारावलेल्या वातावरणात आजचा स्वातंत्र्य दिन समारंभ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, पा-शि संघाच्या उपाध्यक्षांनी, सदस्यांनी, पालकांनी कार्यक्रम व सर्व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले .* ‌ ‌ ‌ ----------------------------------------------
    🌷🌷*!!घेतला वसा शिक्षणाचा ध्यास आम्हा गुणवत्ता वाढीचा!!*🌷🌷

Комментарии •