समुदाय सहभाग दिवस, शिक्षण सप्ताह दिवस सातवा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • 💐💐 श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळेत 'समुदाय सहभाग दिवस' उत्साहात साजरा 💐💐
    राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त रविवार, दिनांक 28/ 7/ 2024 रोजी महाराष्ट्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या शिक्षण सप्ताह अंतर्गत शेवटचा दिवस
    💫 विद्यांजली समितीचे उद्दिष्टे- 💫
    *-* शाळेचे सक्षमीकरण करणे.
    *-* लोकसमुदायाच्या माध्यमातून शाळेचा विकास साधणे.
    *-* शाळा आणि समाज यांच्यामध्ये उत्तम नातेसंबंध प्रस्थापित करणे
    *-* समाजातील घटकांमध्ये शाळेविषयीचे उत्तरदायित्व निर्माण करणे.
    हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी
    " समुदाय सहभाग दिवस"
    श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला.
    👫👫👫👫👫👫👫👫
    शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी स्नेहभोजनाचा आनंद घेत शाळेप्रती आपली प्रेम, आपुलकी, स्नेह व्यक्त केले.
    🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱
    कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे 18 पेक्षाअधिक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित मा. श्री.राहुल बिराजदार सर (M.sc.B.ed-Mathematics) 'Bleed safely' मोहिमेचे प्रवर्तक इ. यांनी आपल्या मनोगतातून 'आता नाही तर कधी ?' ' मी नाही तर आणखीन कोण?' असे प्रश्न विचारत सर्वांमध्ये जागरूकता निर्माण केली. शाळेच्या कोणत्याही कार्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू अशी ग्वाही मा. श्री. शिवानंद सावळगी सर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. तसेच शाळेचे माजी विद्यार्थी मा. श्री. निखिल शहा सर, मा. सौ. कलावती आवटे मॅडम, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष भीमाशंकर कोनाळी सर या सर्वांचीही प्रमुख उपस्थिती होती. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गीता चिकमनी मॅडम यांनी
    आपल्या प्रास्ताविकेतून समुदायातील सर्वांचे स्वागत करत त्यांना ' विद्यांजली ' पोर्टल विषयी माहिती देत विद्यार्थ्यांना स्वयंसेवक होण्यास आवाहन दिले.
    👫👫👫👫👫👫👫👫
    समुदाय सहभाग दिवस अंतर्गत विद्यांजली पोर्टलची माहिती शाळेच्या शिक्षिका सौ. स्वराली वमने यांनी दिली.
    📖📖📖📖📖📖📖📖
    चि.सागर राठोड याने आपल्या कलेतून मिमिक्रीद्वारे शाळेतील आपल्या भावना व्यक्त करत सर्वांचे मनोरंजन केले. चि. सात्विक तोटद, चि. शुभम चव्हाण,निलेश मलजी या माजी विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करत शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच शिक्षकांप्रती आदर व्यक्त केले.
    📚📚📚📚📚📚📚📚
    सौ.अनुजा देशपांडे मॅडम यांनी स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली . सौ. श्वेता शिंदे मॅडम यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय तसेच शाळेप्रती योगदान दिलेल्या सर्व सदस्यांप्रती ऋण व्यक्त केले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. माधुरी थोंटे मॅडम यांनी केलेे. कार्यक्रमाचे आभार सौ. शिल्पा भैरप्पा यांनी मानले.
    📚📚 घेतला वसा शिक्षणाचा, ध्यास आम्हा गुणवत्ता वाढीचा 📚📚

Комментарии • 2