Ketakicha bani tithe | unplugged | केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर | Rahul Deshpande |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • Original singer : Suman Kalyanpur
    Music : Ashok Patki
    Lyrics : Ashokji Paranjape
    |#rahuldeshpande| #sumankalyanpur| #ashokpatki|

Комментарии • 782

  • @milindpusalkar2045
    @milindpusalkar2045 3 года назад +30

    हे गाणं कधी पुरुष आवाजात ऐकायला मिळेल अस वाटल नव्हत। पण तुम्ही ही उणीव भरून काढली। खूपच सुंदर।

  • @Avi13031
    @Avi13031 2 года назад +4

    केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर
    गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर
    पापणीत साचले, अंतरात रंगले
    प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले
    ओठांवरी भिजला ग आसावला सूर
    गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर
    भावफूल रात्रीच्या अंतरंगी डोलले
    धुक्यातूनी कुणी आज भावगीत बोलले
    डोळीयात पाहीले, कौमुदीत नाचले
    स्वप्नरंग स्वप्नीच्या सुरासुरात थांबले
    झाडावरी दिसला ग भारला चकोर
    गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर

  • @commonman.736
    @commonman.736 Год назад +7

    राहूलजी, अण्णा जोशींच्या मखमली हातांचा तबला हे या गीताची जान आहे हे विसरून चालणार नाही.

  • @vaishalijoshi1559
    @vaishalijoshi1559 11 месяцев назад +6

    गाण्यातील भावना किती हळुवार आवाजात उलगडता हो सर!🙏😊👌मन आणि मान आपोआप डोलायला लागतात...😊

  • @aratigondhale4329
    @aratigondhale4329 3 месяца назад +2

    शब्द च नाही.इतकं हळुवार गायना तून उत्कृष्ट भाव प्रकटीकरण. कोटी कोटी वंदन .

  • @Maitreyi.Shital14
    @Maitreyi.Shital14 3 года назад +76

    Your mode,your manner, your way... जणू त्या शब्दांतला अर्थ नव्याने सांगत आहेत असं वाटलं. किती घ्यायचं...दुबळी माझी झोळी...पण आस्वाद पुरेसा आहे🙏

  • @adityashirapure
    @adityashirapure 3 года назад +10

    मी संध्यकाळी शाळेतून आल्यावर बऱ्याच वेळेस हे गाणं रेडिओ वर लागलेलं असायचं आणि आई सोबत गायची स्वयंपाक करताना.. खूप गोड गतोस यार तू.. खूपच मज्जा आली.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад +1

    🌹👌🌹पापणीत साचले अंतःरंगी रंगले-!!!खूप सुंदर⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🌿🌟🌿🌟🌿🌟🌿🌟🌿🌟🌿🌿🌿🌟

  • @rcmemctwest11
    @rcmemctwest11 2 года назад

    का कुणास ठाऊक , मागच्या जन्मी कुणीतरी माझ्यासाठी हे गाण गायलय म्हणून या जन्मी मि हरवतो , एकल्यावर 😊

  • @asmitathaokar5914
    @asmitathaokar5914 2 года назад +1

    पहिल्यांदाच ऐकलं की राहुल देशपांडे ला. ते ही चुकून. म्हणजे माझं पण हे गाणं खूप खूप आवडतं आहे. मग असच सुमनताई ना ऐकून स्क्रोल करताना हे सापडले. खूपच मस्त आवाज, हळूवार, पक्का सुर अर्थात, लहरी खूपच गोड, मखमली आवाज. चक्क तीनदा ऐकून झालं. 👌

  • @bolkya_kavita
    @bolkya_kavita 3 года назад

    जिवलगा राहिले रे दूर घर माझे.... सादर करावे ही विनंती

  • @ravindrapatil2406
    @ravindrapatil2406 3 года назад +3

    लहानपणी सकाळ ची झोप याच गाण्यानी जात असे. सुमन ताई चे आज खूप दिवसाने गाण ऐकले

  • @girishchavan133
    @girishchavan133 Год назад +1

    Rahul dada awesome 🙏🙏

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 3 месяца назад +2

    So nice n divine song 👍☑️♥️ Greatest Mr Ashok Patki n singers

  • @anotherdayofbusylife.....2775
    @anotherdayofbusylife.....2775 3 года назад +24

    राहुलजी नकळत डोळ्यात पाणी आलं हे गाणं तुमच्या आवाजात ऐकून, भावना शब्दात पूर्ण व्यक्त करणे निव्वळ अशक्यच. खूपच सुंदर

    • @sharmilarao6610
      @sharmilarao6610 3 года назад +1

      Excellent rendition.. I could fall asleep peacefully myself at 54!

    • @lekhakathale8548
      @lekhakathale8548 3 года назад

      Apratim shabdavali nahit

  • @poojanewalkar2145
    @poojanewalkar2145 Год назад +1

    वाह वाह.अप्रतिम...नुसत ऐकत रहावं अस.माझं अत्यंत आवडत गाणं.

  • @neelapurohit1631
    @neelapurohit1631 2 года назад +2

    राहुलजी फारच सुंदर आपण घातलेय धन्यवाद

  • @shashikantoak
    @shashikantoak 3 года назад +4

    गहिवरला ऽऽ मेघ नभी... सोडला 'ग' धीऽऽर...
    केतकीच्या बनी 'तिथे' नाचला 'ग' मोर..
    ऐकणार्‍याच्या भावविश्वात नेणारे शब्द भावले...

  • @ratanborkar1776
    @ratanborkar1776 2 года назад +1

    कमाल आहे, राहुल अप्रतिम कधी कधी मुळ गाण्या पेक्षा सरस गायले आहे अस वाटत.
    खुप छान.

  • @ganeshvairal1267
    @ganeshvairal1267 5 месяцев назад +1

    सर तुमच्या आवाजात गाण खुप छान वाटत

  • @jyotikokil2786
    @jyotikokil2786 3 года назад +6

    असं वाटतच नाहिय एका शास्रिय अाणि नाट्यसंगीत गायकाने इतकं सुंदर भावगीत सहजतेने गायलय.राहुलजी,सगळ्यांच्या मनामनात रूजलेलं सुमनताईंचं हे गाणं ईतकं कोमल भावनेनं गायलत,Really Incredible!Waiting to attend your live performance.

  • @anitashewade8730
    @anitashewade8730 3 года назад +4

    फारंच सुंदर.... सुरेख ....खरं तर अवर्णनीय आनंद.......ही जी काही निवडक अप्रतिम गाणी आहेत ज्यांनी आधीच मनावर गारुड करुन ठेवलं आहे.....परंतू
    हीच गाणी पुन्हा नव्याने तुमच्या आवाजात ऐकताना जाणवलं की मराठी अभिजात संगीताचा तुमची पिढी तितकाच आनंद देणारं आहात......देत आहात ......या गाण्यांना हात घालणं सोपं नाहीये......keep it up 👍

  • @nandinipatil9499
    @nandinipatil9499 3 года назад

    अप्रतिम गायन
    सुमन कल्याणपूर यांच्या पेक्षा ही
    सुंदर भावना युक्त गायन

  • @सोनालीगुजर
    @सोनालीगुजर 2 года назад +1

    अप्रतिम! मूळ गाणं जितकं गोड तितकंच गोड तुमचं सादरीकरण. आणि शिवाय प्रत्येक गाणं खूप छान पद्धतीने 'शिकवता' तुम्ही. तुमचे हे व्हिडिओज म्हणजे आमच्यासारख्या कानसेनांसाठी पर्वणीच! धन्यवाद 🙏

  • @snehalhon
    @snehalhon 3 года назад +5

    तुमचं प्रत्येक गाणं कानासाठी अमृतानुभव.. आणि मनासाठी अत्तर क्षण असत... महाराष्ट्राला लाभलेला सोन्यासारखा कलाकार...

  • @sunitawani129
    @sunitawani129 3 года назад +3

    किती छान नं! मला प्रचंड प्रचंड आवडतं हे गाणं. माझ्या कॉलेज ग्रुपमध्ये मी असंख्य वेळा गायलंय, आजही गुणगुणत असते. गहिवरला मेघ नभी... ही कल्पनाच किती भावते नै! तुम्ही तर कमाल आहात राहुलजी. वाद्याशिवाय गाणं ऐकताना कसलं भारी वाटतं तुमच्या आवाजात! मस्त!!!
    माझी एक विनवणी आहे तुम्हाला. आईना मुझसे मेरी पहेली सी... ही गजल ऐकवाना एकदा प्लिज, प्लि.....ज 🙏

  • @baharrunzun2598
    @baharrunzun2598 3 года назад +5

    हे गाणं असंच मनमोकळं गायलेलं एकायचं होतं.अाता किशोरीताईंचं हे श्यामसुंदर ऐकायचंअाहे.

  • @arpitamahajan1709
    @arpitamahajan1709 3 года назад +4

    'मोर' म्हणणे तसे थोडे अवघड आहे... may be मी शिकलेले नाही त्यामुळे असेल...आणि 'गहिवरला' पण..!! मी आणि माझे बाबा competition करायचो...
    सुमन कल्याणपूर यांचा आवाज खूपच गोड.... पण तुमच्या आवाजात ऐकायला आवडले👌👌

  • @VijayParekhMumbai-India
    @VijayParekhMumbai-India 3 года назад +14

    अशोक पत्की च स्वरांकन 👍
    सुमन कल्याणपुर यांच गाणं 🌹
    तुमचा संगीत प्रेम 🙏
    Combination of the best ingredients,
    means Good Morning 💐

  • @mahadevjadhav6529
    @mahadevjadhav6529 3 года назад +1

    Sumanji nantar khoop sundar swacha spasth aart nad........... Nice sir.

  • @prashantgargate5723
    @prashantgargate5723 3 года назад +1

    MAST CH SHYAM SUNDAR MADAN MOHAN AAPLYA AVAJAT KHUP CHAN VATEL

  • @deepaksaraf2346
    @deepaksaraf2346 2 года назад +1

    वाहवा, क्या बात है राहुलजी आपनेसमा बांध दिया, रामरायाचीआपल्यावर असीम कृपा
    आहे

  • @sulabhasawargaonkar314
    @sulabhasawargaonkar314 3 года назад +1

    Good morning sir. Khupch chan vatale.prsanna vatale. Sundar.🌺🌹👌👌👍👍

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 6 месяцев назад

    अप्रतिम सुंदर पेशकश वाह वाह वाह। कितीही वेळा ऐकल तरी समाधान होत नाही वारंवार ऐकावी रचना व श्री राहुल च्या गोड आवाजात अजून ही दुधात साखर 🇮🇳🇮🇳🚩🚩🔱🔱🌹🙏🙏

  • @sanjaytayshete1913
    @sanjaytayshete1913 2 года назад

    राहूलदा आपण अतिशय गोड गायलं.हृदयाला संपूर्णपणे भिडलं.

  • @arvindsangvekar9097
    @arvindsangvekar9097 3 года назад

    सकारात्मक वाटले ह्या सभोवतीच्या परिस्थितीत........शांत झालो.....धन्यवाद .

  • @jyotikokil2786
    @jyotikokil2786 3 года назад +1

    अाणी गाण्याबरोबरच "बागेश्री"ही सुंदरतेने ऊलगडवला,वा!क्या बात है!

  • @sandeepd8374
    @sandeepd8374 3 года назад +1

    सुमन ताईंनी गोड गायलंय, तुम्ही ही तितकंच गोड गाता

  • @sanjaydeshpand8227
    @sanjaydeshpand8227 3 года назад

    खुप छान सुंदर सुमन ताईंनीखुप सुंदरगायलच् आहे पण तुमच्या आवाजात पण खुप मजा आली

  • @vrishalideshpande5999
    @vrishalideshpande5999 3 года назад

    स्वामी मालिकेतील माझे मन तुझे झाले ऐकायला आवडेल आणि श्यामची आई मधलं भरजरी ग पितांबर

  • @shripadkulkarni377
    @shripadkulkarni377 3 года назад +1

    राहुल सर आपण सून री सखी मेरी प्यारी सखी हे गाणे गावे ही विनंती.

  • @shashikalakulkarni2825
    @shashikalakulkarni2825 Год назад

    राहुलजी🙏👍👌
    मूळ चालीची मोडतोड न करता ,गायलंत ..धन्यवाद!!!!

  • @pundlikm2583
    @pundlikm2583 3 года назад +24

    राहुल जी खूप छान. गीतकार आणि संगीतकार या दोघांच्याही मनातील सर्व संकल्पना आपण अतिशय सुरेख उलगडून दाखवल्या आहेत. आपले मनःपूर्वक अभिनंदन.

  • @rasikadhope1684
    @rasikadhope1684 3 года назад +1

    खुप छान गायत्री सर मन प्रसन्न झाले ऐकून

  • @gzlspoemssongs3846
    @gzlspoemssongs3846 3 года назад +2

    केवळ मधाचंच बोट चाखतोय असं वाटतंय..धन्य धन्य वाटतंय..

  • @shalakagawde1424
    @shalakagawde1424 3 года назад +1

    Atishay sundar dada.❤️🙏. Ashok Patki yancha Sangeet ani Suman tai Kalyanpur yancha Avaj Aselela he khup sundar gana ahe he.. N tu khup sundar gaylas.. ❤️🙏 ani divsachi sundar suruvat zali..❤️🙏

  • @PaperPulse20
    @PaperPulse20 3 года назад +1

    Diwasbhar kaam kelyavar asa kahi aikayla milnar asel tar mi roz paath modeparyant kaam karayla tayar ahe! Atishay sundar Rahul Dada!

  • @gopalphadke633
    @gopalphadke633 3 года назад +6

    माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर, सर्वात गोड गाण्यातील हे एक गाणं. खूप छान रचना, खूप छान संगीत आणि खूप छान सादरीकरण. Great!

  • @surekhaathaley7839
    @surekhaathaley7839 3 года назад +1

    ह्या लाॅक डाउन चे अनेकानेक अनुभव
    आले, शांत शहर पाहिल, मदती ला सरसाउन आलेल्यांना बघितल
    कधी नव्हे ते पक्ष्यां च किलबिलण ऐकल आणि सर्वात अनोखी, अनमोल भेट लाॅक डाउन ची ती म्हणजे तुमच्या सारख्या रसिक, गुणी,मनमोकळ्या गायका ची मुक्त संगीता ची मैफिल ऐकायला मिळाली ( आता मैफिल च
    म्हणावी लागेल .)मला माझी खुशी ह्या
    पेक्षा वेगळ्या शब्दात सांगता येत नाहीये.असेच गात रहा ही विनंती
    तुमच्या समस्त परिवार आणि टीम ला नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌹

  • @vinodlankeshwar1445
    @vinodlankeshwar1445 Год назад +2

    शास्त्रीय आवाजाचा बेस असताना ही तुम्ही या भावगीताच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या जागा सहज घेतल्या...

  • @zaynemalik1233
    @zaynemalik1233 3 года назад +1

    बगळ्यांची माळ फुले या तुमच्या गाण्याचा एकच खूप जुना विडिओ youtube वर आहे. ते गाणे तसेच गाऊन पुन्हा एकदा सादर करावे. त्यातल्या हरकती कमाल आहेत!!!

  • @harerama1030
    @harerama1030 2 года назад

    My favourite song. Very sweet song by Suman Kalyanrpurji. अप्रतिम.

  • @kundadongre1806
    @kundadongre1806 3 года назад +1

    मी संध्याकाळी शाळेतून घरी आले की रेडिओ वर हेच गाणं असायचं त्यामुळे फार जवळचं आहे हे गाणं व ते दारापाशी येणं व हेच बोल कानी पडणे. आता ऐकताना तेच दिवस दिसतात समोर हळवं मन होतं फार इतकं घर केलंय ह्या गाण्याने मनात.

  • @smitaborawake0000
    @smitaborawake0000 3 года назад +1

    अहाहा कॉंपोझिशन आणि त्याहून तुमची पेशकश वाह् वाह् क्या बात है 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊😊😍😍😍🎶🎵🎶🎵🎶🎵🎶🎼🎵🎶🎵🎵🎼

  • @diliphatgaonkar510
    @diliphatgaonkar510 2 месяца назад

    खूप च सुंदर गायण सर

  • @vandanakarve9568
    @vandanakarve9568 3 года назад +1

    खूप सुंदर. छान हळुवारपणे गायलात. मस्तच खूप आवडलं.

  • @neeladeodhar7237
    @neeladeodhar7237 3 года назад

    काय सुदर गाणे..सुंदर गायले तुम्ही..मस्तच अशीच गाजलेली गाणी गा.आनंद मिळतो

  • @shobhanaathalye366
    @shobhanaathalye366 Год назад +2

    अप्रतिम!!.....

  • @मीनानिमकर
    @मीनानिमकर Год назад

    स्वर इतके सुखद वाटतातआणि Continue ऐकत राहवे वाटते!! अप्रतिम

  • @hemchandragadre8672
    @hemchandragadre8672 2 года назад

    Melodious! बागेश्री रागातील नाट्यगीत ऐकावयास आवडले असते!

  • @pratibhadeshpande8372
    @pratibhadeshpande8372 3 года назад

    एका वेगळ्या दुनियेत नेतं तुमचं गाणं,सगळा ताण विसरायला लावत, ह्रुदय स्पर्शी 👌👌👌👌👌

  • @neodreams7492
    @neodreams7492 3 года назад +1

    अंतर्मन तृप्त करणार गाणं आणि गायकी

  • @chittaranjanmore2837
    @chittaranjanmore2837 3 года назад +5

    ही सगळी गाणी आधीपासून आवडत होतीच, पण तुम्ही सुरावट आणि रागदारी उलगडून दाखवल्यावर लक्षात येते की ती का आवडत होती....
    अप्रतीम गायन सर..... !!!!
    धन्यवाद !!!!

  • @gopikajahagirdar1760
    @gopikajahagirdar1760 3 года назад +1

    navin varshyachya hardik shubescha. Khup chan , maze avdate gane

  • @abhijitgarge6994
    @abhijitgarge6994 3 года назад

    अतिशय सुंदर राहुल जी असेच सुंदर गात राहा ऐकवत रहा👌👌👍

  • @dayaramkhandare2066
    @dayaramkhandare2066 2 года назад +2

    देवाचा स्वर 🙏🙏🙏🙏🙏 नि : शब्ध समाधी लावून जातो !अप्रतिम !

  • @mohandeshpande4478
    @mohandeshpande4478 Год назад

    वा, फार छान.बर्वेजी व राहुलजी दोघांचेही सूर व स्वर अप्रतिम आणि सतत मनात गुंजणारे.राहुलजींचे विश्लेषण उल्लेखनीय.👌👍

  • @milindb8339
    @milindb8339 3 года назад +2

    राहुल जी अप्रतिम !!!
    एक विनंती श्री ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान गावे अशी इच्छा आहे ,
    आपल्या सुरांमध्ये खूप सुंदर वाटेल अशी खात्री आहे , 👌👌👌

  • @maitreyacreations
    @maitreyacreations 3 года назад +2

    व्वा....
    हे मुळातच अतिशय सुंदर आणि अप्रतिम गाणं आहे आणि राहूलजी तुम्ही त्या गाण्याच्या सौदर्यात भरच घातली. एक वेगळा, सुंदर अनुभव दिला. खुप धन्यवाद...

  • @vandanakulkarni8400
    @vandanakulkarni8400 3 года назад +3

    सुमनताईंचा अतिशय गोड आवाज व हे गाणे खूप छान. तुम्ही पण अतिशय भावपूर्ण गायन केले मनापासून. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. अशीच छान छान गाणी ऐकवा.

  • @varshasinkar5045
    @varshasinkar5045 Год назад +1

    अप्रतिम, खूप छान गायलं आहे. गीता नंतर तुम्ही खूप छान राग व स्वरांची माहिती दिली ती अनमोल आहे. धन्यवाद राहुलजी 👌👌👏👏❤❤

  • @sonalkhedkar5445
    @sonalkhedkar5445 3 года назад +1

    Naveen varshachi surel survat ya ganyane zali...beautiful my favorite song..evergreen song...thanks for explaining Bageshree..khup chan gaylat..piano chi sath pan khup chan

  • @vitthaldesai8222
    @vitthaldesai8222 Год назад

    आपण गाणे गावून झालेवर त्यावर जे मराठी विवेचन करता ते कानाला खूप छान लागते .

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 3 года назад +2

    अशोक पत्कींची अजून एक किमया! किती सुंदर पद्धतीने गायिले तुम्ही! आनंद !

  • @amolmargaj
    @amolmargaj 3 года назад +1

    खुपच सुंदर ... आवडते गाणे कानी पडले सकाळी ...सुप्रभात

  • @kirankamble1582
    @kirankamble1582 3 года назад +4

    राहुल दा.... तू खरचं... एक जादूचां दिवा आहेस.... अखंडपणे तेवत राहावेस.....❤️❤️

  • @rupalishinde1140
    @rupalishinde1140 3 года назад +4

    राहुलजी जगातील सर्व पवित्र, मंगल तुमच्या गाण्यात. व्यक्तीमत्वामधे जाणवतं.

  • @shraddhakulkarni6477
    @shraddhakulkarni6477 3 года назад +1

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. कितीदा ऐकलं तरी परत परत ऐकावं वाटत एवढं नक्की .ड़ळे मिटून एकत होते मनात हळू हळू शांतता येत गेली. डोळ्यात अश्रू नव्हते पण तो feel नक्की होता.वयाच्या एका टप्प्यावर नेमकं काय हवं हे समजत नसताना आपल्याला अनाहूतपणे हेच हवं आहे हे कळत व अचानक सापडत तेव्हा मिळणारा अर्वणनीय अनुभव मिळाल्याचं समाधान तुमचं गाणं ऐकल्यावर मिळत एवढं नक्की. आनंद,अस्वस्थता तसेच वेगवेगळ्या भावना मनात जाणवत असताना त्यावर काय करावं हे समजत नसताना तुम्ही गायलेल तुम्हा ला गाव वाटलेल मला जे भावत ते मी या माध्यमातून निवडू शकते याबद्दल शतशः धन्यवाद.

  • @vitthaldesai8222
    @vitthaldesai8222 Год назад

    राहुल दादा , हा आपला स्तुत्य उपक्रम छान वाटला . दररोज नवीन नवीन गाणे जायचे , त्या बरोबरचे कमेंट्स सुंदर मनाला भावतात .

  • @milindkhapre5443
    @milindkhapre5443 3 года назад +1

    पहिलाच सुर सुंदर लागला. काय अप्रतिम काम करून ठेवल आहे ! गाण्याचा विस्तार करताना पहिले ह्रदयाचा विस्तार होतो नंतर विचार विस्तारतो आणि शेवटी स्वर होऊन प्रकटतो. आज माझ्या साठी हे learning. ज्याला आपण inclusiveness असे म्हणतो -"आज ह्रदय मम विशाल झाले" - संगीताकडे विशाल नजरेने बघायला आले पाहिजे - कोणत्येही लेबल न लावता. जय हो ।

  • @vandanaupase3521
    @vandanaupase3521 3 года назад +1

    Waaa sir....appratim...khuuup mast....!!!!

  • @nandu5431
    @nandu5431 3 года назад +1

    लहानपण ची दाटून आठवण झाली रे!
    खुप खुप छान।
    काय गाणी होती आपली मराठी,
    नाहितर आजची सैराट ऐका, सगळी पिशाच्य नाचतात।

  • @prasadtamhankar2789
    @prasadtamhankar2789 3 года назад

    Navin varshachya shubhechha. atishay sundar geetane suruvat zali navin varshachi

  • @sneha_sakarkar-bedarkar
    @sneha_sakarkar-bedarkar Год назад +1

    मस्तच...तुमच्या शास्त्रीय गायनाची मी फॅन आहेच पण आज हे गाणं तुमच्या आवाजात एकून छान वाटलं

  • @archanaathawale2045
    @archanaathawale2045 3 года назад +3

    भावपूर्ण गाणं,तितकंच तरल भावाने गायलात राहुलजी, सुमनताई च शब्द शब्द जपून ठेव हे पण गायलात तर बहार येईल

  • @rajeshsave7505
    @rajeshsave7505 2 месяца назад +1

    Excellent Rendition indeed. Just a suggestion, should have spoken about 'Sanchari' as well. I guess this is the only song in Marathi where Sanchari was experimented. Thanks to Ashokjee. Non Bengalis should know this terrific gift of Bengal to Music. 🙏

  • @madhavikulkarni4296
    @madhavikulkarni4296 3 года назад +1

    तुझ्या आवाजाने वेडे केले आहे जुन्या आठवणी येतात,धन्यवाद,मनापासून

  • @kavitamorey5018
    @kavitamorey5018 3 года назад

    तुझी सगळी गाणी अप्रतिम असतात....किंबहुना अप्रतिम शब्द कमी पडतोय.... मी तर सगळी गाणी डोळे बंदच करून ऐकते ....सुंदर....काही वेळा गाणी ऐकताना डोळे भरून येतात. .love u Rahul.....my all blessings!!

  • @shubhadapatankar3057
    @shubhadapatankar3057 3 года назад

    सुमनताईनी ऐकायला हव.
    खूप आनंद वाटेल त्याना.
    कानाला आणि मनाला आनंद देणारे स्वर.

  • @shobhamahajan7597
    @shobhamahajan7597 Год назад +1

    मी पण हे गाणे दररोज एकदातरी ऐकते.

  • @deepadipz5017
    @deepadipz5017 Год назад +1

    Mala khatri hoti he gana ithe aikayla nakkich milel :).... Apratim... Maza avadta gana....

  • @rajeshwaripatil2431
    @rajeshwaripatil2431 3 года назад +2

    राहुल दादा तू गाण्यातले एक एक पदर उलगडून सांगतोस ना ते नवीन गाणं शिकत आहेत त्यानां खूप उपयुक्त आहे तसेच स्वारसंगती ही सांगतो, खूपखूप आभार तुझे 👌

  • @snehapatil120
    @snehapatil120 3 года назад

    Navin varshachi sundar suruvaat 🙏. Let me keep it simple. Khup khup khup chaan. Mastta ❤️.

  • @vaishnaviyelegaonkar8929
    @vaishnaviyelegaonkar8929 3 года назад

    अप्रतिम गोडवा आहे आपल्या कंठात..!!!!👌🏻👌🏻👌🏻

  • @nampawar2846
    @nampawar2846 3 года назад +1

    क्या बात है। खूपच सुमधूर. प्रत्येकाच्या ह्रदयाच्या अत्यंत जवळच गीत. बहार आली. सुरेख आवाज लागला आहे. नवीन वर्षांची अत्यंत सुरेल सुरूवात.नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
    कृपया ‘ मुझे जा न कहो मेरी जान ‘ हे गाण पण ऐकवा ना प्लीज .

  • @nitinsapre1921
    @nitinsapre1921 3 года назад

    अप्रतिम...12.35..12.45 सोडला ग ची जागा तर केवळ.. खूप खूप धन्यवाद

  • @devendranathagarwadekar4457
    @devendranathagarwadekar4457 3 года назад +1

    RAHULJI KAALACH MI THE GREAT DR. VASANTRAOJI DESHPANDENI GAYILELI BHAIRAVI AIKALI APRATEEM ANI TUMCHEA GAANEY TAR MAJHYE AVADTEY AHYE MAG TYE APRATEEMACH AHYE VADACH NAHI ,KETKICHYA HEY GANEY MI SUMAN TAICHEA AWAAJANEY AIKLAI .THANK YOU VERY MUCH.

  • @shantadurga4857
    @shantadurga4857 3 года назад

    Navvarshabhinandan! Beta, nehemipramANech ateeshay utkrushta!! 👏🏼👏🏼👏🏼

  • @amitadeshmukh9200
    @amitadeshmukh9200 3 года назад +1

    मंत्रमुग्ध... शब्दातित...

  • @pramodsatbhai7777
    @pramodsatbhai7777 Год назад +1

    Simply great .
    Without music support sound 🎉, hats off