उन्हाळयातला Happiness || न्हय आमची आवय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 май 2023
  • एकीकडे जग उष्णतेच्या लाटांनी हैराण झालेले असताना आम्हावर सुखाचा अभिषेक करणारी ही नदी किती परोपकारी ना...इथली झाडे ...जंगल......याहून वेगळं काय पाहिजे आयुष्यात..... नदीने मासे दिले चूल लावायला दगड दिले... सुकलेली लाकडे दिली.....तिच्याच काठवरच्या नारळ दिले...
    नदीच्या काठावर जेवण बनवून आम्ही आधी मनसोक्त डुंबलो.... आजूबाजूच्या घनदाट हिरव्या जंगलाच नदितल प्रतिबिंब तुमच्या समोर जणू इंद्राची मयसभा उभी करत...नदीच्या बाजूची झाडे आणि नदी मिळून एक अनोखं जग बनलेले आहे....ह्या चित्रात उडी मारून नदीच्या अंतरंगातl विश्व उलगडायला जी मजा वाटते ना...ती खरच कोणत्याच भाषेत आणि शब्दात व्यक्त करून समजणार नाही...पैसे देऊन ते सुख कुठे मिळणारं नाही...
    Happiness ची प्रत्येकाची स्वतःची अशी एक defination असते... निसर्गाच्या प्रत्येक आणि प्रत्येक रुपाशी एकरूप होऊन जी ऊर्जा मी अनुभवतो.....जो निसटणरा क्षण मी नेमका पकडुन जगुन घेतो...तो माझा happiness
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 268

  • @sanketbendal7881
    @sanketbendal7881 6 месяцев назад +9

    मी चिपळूण चा सध्या पुण्यात जॉब करतो.पण एक दिवस कायमचा कोकणात येऊन कोकणातल साध सरळ जगण चालू करणार आहे.या साध्या सरळ जगण्यातच खरी मजा आहे.ती शहरामध्ये नाही मिळणार...

    • @mukesh.bhujbal121
      @mukesh.bhujbal121 3 месяца назад

      जाताना सांगा आपण सोबत जाऊया

  • @morerishabh345
    @morerishabh345 Год назад +19

    शहरात दोन करोड खर्च करून घेतलेला घरमालक तुझ्यापुढे दरिद्री आहे...... निसर्ग मेजवानी खूपचं छान......नितळ पारदर्शी पाणी पाहून इंद्रालोक फिका वाटला....इतके सुंदर निसर्ग सौंदर्य व्हिडिओ द्वारे पहायला मिळाले...... धन्यवाद

  • @bhausahebbomble3786
    @bhausahebbomble3786 5 месяцев назад +5

    😢रानवेड्या माणसा तुला माझा सप्रेम नमस्कार, धन्य दादा एक अभियंता असताना सर्व सोडून निसर्गाची सेवा करणारा अवलिया एखांदाच सापडतो त्यातला एक तू आहे दादा, तुझ्यामुळे तर आम्हआंलआ निसर्ग बघता येतो, डोळे तृप्त होता, आपल्या कार्याला सलाम

  • @atulraut6212
    @atulraut6212 Год назад +82

    भावा तू लोकांना त्यांच्या राहणीमान बद्दल निसर्ग बद्दल विचार करायला लावतो... You are the bringing revolution in life style 😊

  • @nileshgadekaradventure3072
    @nileshgadekaradventure3072 Год назад +7

    Refineries peksha jasta Maja nisaraga made ramnyat ahe 😂

  • @bhaveshkadam538
    @bhaveshkadam538 Год назад +44

    रिफायनरीला समर्थन देणाऱ्या बांडगुळाना एकदा आणून दाखवा निसर्ग कसा असतो आणि तो कसा टिकवायचा असतो...

    • @vishalbhoir33
      @vishalbhoir33 Год назад

      रिफायनरीला विरोध करणाऱ्या भडव्यांना सांगा मुंबईतल्या भुमीपुत्रांचा रोजगार नका खाऊ, काय निजवायची आहे ती कोकणात निसर्गातच निजवा
      मुंबईत नका जाऊ

    • @ravinikam990
      @ravinikam990 Год назад

      Best लिहिलंस यार

    • @mukesh.bhujbal121
      @mukesh.bhujbal121 3 месяца назад

      😂 सत्य

    • @lycopodium262
      @lycopodium262 3 месяца назад

      Brain eating amoeba cha nav ekla ahe ka tu?

  • @amitjadhav1235
    @amitjadhav1235 Год назад +17

    प्रसाद दादा अरे तू जेव्हा कोकणातील या निसर्ग संपत्तीला काय इजा होऊ शकते हे सांगत असतोस तेव्हा ते ऐकून जीव तीळ तीळ तुटतो रे या निसर्गा साठी,,,,

    • @vishalbhoir33
      @vishalbhoir33 Год назад

      अच्छा मग का गेलाय कोकण सोडुन? इथेच राहायचं ना

  • @sunitawani129
    @sunitawani129 3 месяца назад +3

    इतकं सुंदर जगणं! स्वर्गसूख अजून ते काय असतं!👌🏼

  • @sayarpit
    @sayarpit Год назад +14

    नशीबवान ती लोक ज्यांची नातेवाईक कोकणात आहेत.

  • @mukesh.bhujbal121
    @mukesh.bhujbal121 3 месяца назад +3

    काश मी हे जीवन कायम जगू शकेल...आणि हा निसर्ग असाच रहावा!!

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 Год назад +3

    सुरेख खरा निसर्ग प्रत्यक्ष अनुभवत आहे

  • @ramhanuman1111
    @ramhanuman1111 Год назад +11

    100% बरोबर, खूपच भाग्यवान आहेत तुम्ही,
    आजच्या लोकांना झाडें नको पण शुद्ध हवा, पाणी, अन्न पाहिजे, आपल्या पूर्वजानी जंगल राखली ती पुढे राखायला हवीत, कोकणात वाळवंट व्हायला वेळ नाही लागणार, तशी तर काही ठिकाणी सुरवात झाली आहे

  • @jogeshthik9434
    @jogeshthik9434 6 месяцев назад +2

    खूपच सुंदर आहे विडयो

  • @shamkantvanave6929
    @shamkantvanave6929 Год назад +6

    कोकण म्हणजे स्वर्ग आहे जगाचा श्वास आहे

  • @coconutcasaalibaug2480
    @coconutcasaalibaug2480 Год назад +8

    Kharch kahi tari kel pahije aapli jangal Nadi nale he asech rahile pahijet

  • @rashminphadte1117
    @rashminphadte1117 Год назад +3

    Kharokhar khupach Nashibvan arhat. Dev bare karo❤❤

  • @sushilwalam664
    @sushilwalam664 Год назад +3

    खूप छान intiative घेत आहात
    .. मी ही ह्यात सहभागी होऊ इच्छितो

  • @aarya8364
    @aarya8364 Год назад +23

    Dada, mi Aarya Bhate
    Punyat rahte. Mala nisargachi ani pranyanchi prachand avad ahe ani tu je kaam koknat karat ahes tyatun mala khup inspiration ani manobal milta😊
    Mala veterinary karnyachi khup iccha ahe karan pranyansathi ani nisargasathi kahitari changla karaycha ahe.......
    Thank you for your immense efforts and dedication for our motherland❤
    Majhya aaji ajobancha ghar ani aaicha ajol koknatil devle ani salshi hya gavanmadhe ahe tyamule mi dar varshi koknat yet aste ani mala tula ekda bhetaycha ahe😀
    Salute to your work ani tula jevha kevha vel asel tyaveli ghari yeun ja devle/salshi la khup chan ahet donhi gava😊

  • @mamtachougule3442
    @mamtachougule3442 Год назад +10

    प्रसाद तुला भेटायचे असेल तर कसं आणि कुठे भेटायचं
    कारण घर बसल्या तुझ्या मुळे एवढं निसर्ग सुखअनुभवायला मिळतं सलाम तुझ्या कार्याला

  • @shitalmane7674
    @shitalmane7674 Год назад +22

    वडाच्या झाडाची पूजा करा, बैलपोळा साजरा करा, नदीला नमस्कार करा, वारूळाची पुजा करा आपले सण खरंच निसर्गाला जपा हाच संस्कार करतात.

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Год назад +5

    आपल्या पेशवेकालीन विहीरी,बारव, नदी,तलाव असे पाण्याचे स्रोत गाळाने भरून बुजून चालले आहेत, लोकसहभागातून सर्वानी श्रमदान करून हे स्तोत स्वच्छ करून त्यांना नवजीवन द्यायला हवे.

  • @over-allfacts6567
    @over-allfacts6567 Год назад +2

    Aayushat itr kahi nasun nisrg hach dev aahe samadhan aahe

  • @vijaychavan3172
    @vijaychavan3172 Год назад +1

    हेच वेगळेपण आहे तळ कोकणच मे महिन्यात डोंगर हिरवेगार आहेत संपूर्ण महाराष्ट्रात या वेळेला असे हिरवे गार डोंगर कुठे आहेत

  • @vidyasakpal8499
    @vidyasakpal8499 Год назад +1

    Hi तू जे काम करत आहेस ते खूप मोठा आनंद देणार आहे असं वाटतं आहे की देवदूतच आहेस आणि ह्या निसर्ग देवतेला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेस ईश्वरी शक्ती सदैव तुझ्या पाठीशी असुदे

  • @rajashreehate8552
    @rajashreehate8552 Год назад +3

    बालपण आठवलं,सुट्टीतील कोकणातले दिवस😊

  • @dong17
    @dong17 Год назад +19

    You Are Leaving Life King Size In Natural Way.. That's True Happiness.. Great👍👍

    • @Aaditya.Gawade
      @Aaditya.Gawade Год назад

      Your are leaving a life in natural way Bhava..That's true happiness ❤

  • @aniketkambli9581
    @aniketkambli9581 Год назад +3

    असं जगणं अनुभवणं म्हणजे स्वर्गापेक्षा कमी नाही.

  • @P-dushyant
    @P-dushyant Год назад +7

    mitra tu real konani rammanus aahes.......aami ashe kahi yutuber hi pahle je kokan hart nav laun kokan ch vapr karun mothe celebrity banle

  • @giridharbhandare410
    @giridharbhandare410 Год назад +9

    फारच सुंदर, तुझ्या भाषेत स्वर्गीय आनंद आहे ईथे.

  • @deepikakondhalkar2225
    @deepikakondhalkar2225 Год назад +2

    Amchya gavala pan ahe Valan kondi, vardayani aai ch devsthan. Tithe masemari allowed nahi, Gaav valan, Tal - Mahad, Dist- Raigad

  • @rohitpitnaik9749
    @rohitpitnaik9749 Год назад +1

    हे सुंदर व्हिडिओ फक्त पुडच्या 3-4 वर्ष. त्यानंतर फक्त विनाश. बरसू च माती परीक्षण पूर्ण झालाय आणि आता तिकडे रिफायनरी होणार हे नक्की. कोकण आणि निसर्गा बद्दल प्रेम असणारे सगळेच शांत झालेत... किंबहुना त्यांना शांत केलंय....दुःख होतंय पण काही करू न शकण्याच जास्त.

  • @shamkantvanave6929
    @shamkantvanave6929 Год назад +2

    प्रसाद स्वर्गातील सुख घेतोयस.काय आहे हा निसर्ग खूपच छान

  • @ShrutiSakpal-gv7jg
    @ShrutiSakpal-gv7jg 20 дней назад +1

    1 number prasad.. Love u all.

  • @sairajpatole5779
    @sairajpatole5779 Год назад +1

    खरच खूप सुंदर व्हिडिओ..... कोकणातील आनंददायी जीवनाचे वर्णन करणारा व्हिडिओ ❤️❤️

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Год назад +3

    प्रस्थावना थोड्डीशी जास्त झाली आणि त्यात मूळ मुद्दा म्हणजेच कोणती नदी, कुठल्या कुठल्या गावातून कशी आणि कुठंवर वाहते त्याचं स्पष्टीकरण अपेक्षित होतं. बाकी सर्व स्वप्नवत पाहायला खूप मजा आली. आणि थोडा हेवाही वाटला.. 👌🌴🌴🌴♥️

  • @avinashvchavan1177
    @avinashvchavan1177 9 месяцев назад +1

    Save Konkan , live Konkan...!
    From the bottom of my heart..I really love Konkan and it's beauty..

  • @Ravya0215
    @Ravya0215 2 месяца назад

    भाऊ तुमची भाषाशैली खुपच सुंदर आहे.आणि तुमचे कोकणचे विडियो खरच सुंदर आहेत.

  • @kavitatemkar2727
    @kavitatemkar2727 Год назад +1

    नदी खूपच सुंदर आहे. अप्रतिम व्हिडिओ.

  • @ppcreative....6517
    @ppcreative....6517 Год назад +3

    तुमचे व्हिडिओ पाहून मनाला एक वेगळीच शांतता भेटते,मन प्रसन्न होत अगदी ,लवकरच तुम्हाला भेटायला येऊ.....

  • @shubhamkale6856
    @shubhamkale6856 2 месяца назад +1

    Mazi pan khup khup khup echha ahe dada , mala nurture vidhay khup prem ahe khup avad ahe ani kalji pan ahe , dada mi aaaj paryant aaj 25 years maz vay ahe mi aaj paryant mi kontyach❤youtub video la commente keleli❤nagiye , pan dada aaj tuza ha video baghitl a mana pasun khup echha zali Tula bhetaychi ani he sarv jivan anibhavaychi, dada khup Chhan ani changl kam kartoy

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare7923 Год назад +2

    सुंदर कोकण

  • @kirandurge7382
    @kirandurge7382 Год назад +2

    दादा तुझे शब्द ऐकून मन सुखाने भारावून जाते
    आणी काय बोलावे तेच कळत नाही
    खरच आपल्या गावाबद्दल आपल्या राज्याबद्दल एवढं प्रेम मी आज पर्यंत कधीच नाही पाहिले
    निशब्द .........,

  • @sujatamungekar9447
    @sujatamungekar9447 Год назад +1

    Faarach chaan, malty, sproul, Madki ani nadichya kaathawar Mase. Ek surekh anubhuti ani paramsukh. Waah 50 tey 60 Vashapurvicha Konkan ubhe karoon ek alag Anand silas. Dhanyawad

  • @jagannathmunde2237
    @jagannathmunde2237 6 месяцев назад +1

    Nature's beauty 👌👌

  • @mamtachougule3442
    @mamtachougule3442 Год назад +2

    वेतोबाची आरवली

  • @ashwinikshirsagar4157
    @ashwinikshirsagar4157 Год назад +4

    mitra ek vinanti.....tuzya gavat....tal koknat... jamin viknare agent ghusu devu nakos....karan NISARG sampoon jaeel....karan me he khup anubhavle....mazya lahavpani mamachya gavi (pune) jya Naditun Pani anaycho ata tila pahavat nahi.... Aksharshah GATAR ZHALE tiche...yache khup dukh watate...mhanun ..tithalya thithe kaam dhandhe vadhvinyacha prayatna kar🙏

  • @shivnamaha6432
    @shivnamaha6432 Год назад

    Aani aapala hach sunder nisarg tula itak sunder bolayala shikavato👌❤

  • @muktvidhyapeethsuchnapatra
    @muktvidhyapeethsuchnapatra Год назад

    एक उत्तम अनुभव तुमच्या प्रयत्नांना हार्दिक शुभेच्छा

  • @Smalusare386
    @Smalusare386 Год назад +1

    Amcha mahad madhe valan kondi mhanun ek dhav ahe tithe ami konich mase mare nahi karat te devache mase ek prkare dev mase ahet video mast bhari

  • @shivtrekkers7093
    @shivtrekkers7093 Год назад +1

    कोकणातील शेतीतील संस्कृती, ग्रामीण जीवन व खाद्य संस्कृती, यावरील तुझे व्हिडिओ खूप अप्रतिम ज्या पद्धतीने तू कोकण टुरिझम डेव्हलप करतोय व कोकणातील संस्कृती, परंपरा व इतिहास जपण्याच्या प्रयत्न करतोय तो खूप अप्रतिम यशस्वी होत आहे या साठी तुला खूप शुभेच्छा
    आम्ही तुझ्या कोकण वाचवा ह्या मोहिमेत सहभागी राहु व तुला बळ देऊन तुझी व आपल्या कोकणवासीयांची ताकत नक्की वाढली
    मी व आमचे मित्र तसेच काही इतिहासकार व अभ्यासक जुन्नर तालुक्यातील गडकिल्ले, बुद्ध लेणी, मराठी भाषेचा उगम व सातवाहन काळातील मार्ग व जकात नाका पर्यटन स्थळे व होम स्टे खाद्य संस्कृती,शेती विकास व पर्यटन असे अनेक विषयांवर जुन्नर तालुक्यातील पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करतोय तसेच जुन्नर तालुक्यातील लोक प्रमुख आकर्षण बिबट सफारी साठी प्रयत्नशिल आहे
    यावर्षी मी तुझी भेट घेऊन कोकण व जुन्नर तालुक्यातील पर्यटन मी या विषयावर चर्चा करण्यासाठी येणार आहे लवकरच भेटू
    तुला सुद्धा महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन तालुका जुन्नर मधे येण्यासाठी आमंत्रित करत आहे व ती यावे ही विनंती
    जुन्नर तालुक्यातील गडकिल्ले व बुद्ध लेणी पर्यटन स्थळे , निसर्ग व जुन्नरची खाद्य संस्कृती मासवडी,थापटवडी, शेंगुळयाची भाजी , जुन्नर ची मिसळ,कढीवडा भेळ,असे अनेक पदार्थ तुझी वाट पाहत आहे लवकर रिप्लाय येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो

  • @manojghadi26
    @manojghadi26 Год назад +1

    मस्त दादा कोकणातील स्वर्ग सुख दाखवतोस

  • @sagargaikwad7058
    @sagargaikwad7058 6 месяцев назад +1

    Nature is love

  • @maheshbhagwat4
    @maheshbhagwat4 Год назад +1

    Khup khup sundar❤

  • @santoshakhade3404
    @santoshakhade3404 5 месяцев назад +1

    खूप छान.

  • @varshapanchal4779
    @varshapanchal4779 Год назад +1

    लय भारी भावा 👌👌👍

  • @yogitapawar6071
    @yogitapawar6071 Год назад +1

    खूपच सुंदर निसर्ग भाऊ

  • @bharatjadhav2341
    @bharatjadhav2341 Год назад +1

    फारच छान विडियो प्रसाद भाऊ

  • @rupalisupekar8301
    @rupalisupekar8301 Год назад +1

    तुझे videos पाहिल्यावर अंगावर काटा येतो. आम्ही शहरात काय जगतो? किती शांतता , चैतन्य आणि साधेपणा.त्यात तुझा आवाज म्हणजे स्वर्गीय निसर्गाचा आनंद. दादा documetry type videos तयार कर.भविष्यात नक्कीच ते कोणत्याही channel वर दाखवले जातील.

  • @yogeshkhandait5722
    @yogeshkhandait5722 Год назад +1

    अफलातून अप्रतिम सुंदर 🚩🙏🚩👌👌👌🥰🥰🥰🥰

  • @rantanmaljadhva375
    @rantanmaljadhva375 Год назад +1

    Bharicha chan chan bhaya saheb 👌👌

  • @sandeeppatil1281
    @sandeeppatil1281 3 месяца назад +2

    आमचा गावी सुद्धा असाच छान निसर्ग आहे, पण आता गावात धारण होतंय आणि माणसांना पैसा खुणावतोय. मातीचा घरांपेक्सा आता स्लॅब ची घर माणसांना दिसू लागली आहेत आणि चार चाकी गाडीतली ac ची हवा आवडू लागली आहे. पण हे क्षणभंगुर आहे हे कोण सांगणार त्यांना

  • @vikrantrane4320
    @vikrantrane4320 Год назад +1

    खरंच नशीब आहे आपला की आपण कोकणात जन्मलो ❤

  • @ajaykadam6360
    @ajaykadam6360 Год назад +1

    खूप सुंदर 🌴👌

  • @sureshmodake3446
    @sureshmodake3446 Год назад +1

    खूप सुंदर प्रसाद दादा निसर्गमय वातावरणाची माहिती आपण सांगत आहात.

  • @marutipawar5018
    @marutipawar5018 10 месяцев назад

    Amezing ahe Bhava tu Ani tuje vichar

  • @swapnilmarathe2289
    @swapnilmarathe2289 11 месяцев назад

    किती छान माहिती, निसर्गाची किमया

  • @sandeeptaras-ev9nc
    @sandeeptaras-ev9nc Год назад +1

    खुप छान आहे भाऊ आपले कोकण

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 Год назад +7

    नैसर्गिक,आत्मीक आनंद 🙏

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 Год назад +2

    किती सुंदर आणि नॅचरल जिवनशैली.

  • @user-cb8xg1wz3e
    @user-cb8xg1wz3e 3 месяца назад +1

    Dada kup chan 🎉🎉

  • @santoshhasabe6701
    @santoshhasabe6701 Год назад +2

    Khup chhan ❤❤🎉🎉 Really thanks dada.🙏🙏🙏 अप्रतिम कोकण🌱🌳🌲❤️❤️👍👍👍

  • @suchitapatil1304
    @suchitapatil1304 Год назад +2

    नशीबवान आहात.🎉😊

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 Год назад

    खुप सुंदर माहिती आणि प्रवास वर्णन दादा.....😊

  • @vilaskasrung6007
    @vilaskasrung6007 Год назад +1

    खूपच छान प्रसाद ❤

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 Год назад +2

    Hats off 👏👏

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 Год назад

    नशीबवान आहात!!! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Shivva19
    @Shivva19 Год назад

    Amazing brother 👌👌👌😃

  • @accdream11family76
    @accdream11family76 Год назад +3

    Sukh

  • @Way_to_Kokanvlogswithbhushan
    @Way_to_Kokanvlogswithbhushan Год назад +3

    ओम भट स्वा हा खूप मस्त yummy yummy 😋😋

  • @ganeshbandarkar7085
    @ganeshbandarkar7085 Год назад +1

    ❤ Your the Best we always with you 🙏

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 Год назад +1

    Sushegad kokan aani kokani manus,💞👍👍👍🙏

  • @rajeshridhamane5958
    @rajeshridhamane5958 Год назад +1

    खरच खूप छान

  • @villagecookingmasters8576
    @villagecookingmasters8576 Год назад +1

    Awesome video and the way you speaks, Apratim, Vachanatun ghadalela Konkani RanManus❤

  • @karneshambekar2182
    @karneshambekar2182 Год назад +4

    Superb ❤

  • @praptisharemarketvidyarthi6679
    @praptisharemarketvidyarthi6679 Год назад +1

    khup chan

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Год назад +1

    Khup bhari 🙏

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 Год назад +1

    Lay bhari 🎉🎉

  • @santoshsawant7559
    @santoshsawant7559 Год назад +1

    खूप छान प्रसाद

  • @sanjivwalawalkar2705
    @sanjivwalawalkar2705 Год назад

    Your definition of life and happiness is superb .. keep it up. Nice explanation....

  • @nikitadesai8524
    @nikitadesai8524 Год назад

    Sunder jeevanshaily utkrusht upakram nakki sahbhagi houya.

  • @swapnilgaonkar8065
    @swapnilgaonkar8065 Год назад +1

    छान व्हिडिओ भावा

  • @uttambarge2939
    @uttambarge2939 11 месяцев назад

    सुंदर माहिती दिली

  • @ganeshdalvi318
    @ganeshdalvi318 Год назад +1

    Khup sunder kokan

  • @vaishaliwarang4338
    @vaishaliwarang4338 Год назад +1

    बालपण आठवलं बाबांसोबत जायची भजी खायला खूप छान

  • @LataPawar-zv7pk
    @LataPawar-zv7pk Год назад +1

    Chhan vishleshan asa ye divas nisaga chya sanidhyat jaganta aal pahije thmi khup nashib van aahe thank you

  • @arungorhe7587
    @arungorhe7587 Год назад +1

    अप्रतिम खूपच सुंदर Hattsoff

  • @yogeshrshelar
    @yogeshrshelar Год назад

    खूप सुंदर जीवन आहे कोकणामधील

  • @kokanchananu
    @kokanchananu Год назад +2

    khup chan kokani ranmanus 😍🚩🙏aaple hitchintak aani shubechuk kokanchananu RUclips channel dapoli asud bandre wadi #kokanchananu

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 Год назад +1

    Thank you for reminding of my childhood days when we used to sweem in the river in village

  • @swatispande2479
    @swatispande2479 Год назад +1

    Love from Vidharbh...♥️✨🌎