Navara Navari Fort, Nashik | किल्ले नवरा नवरी | An offbeat & Adventurous Trek near Trimbakeshwar |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • Navara Navari Fort, Nashik | किल्ले नवरा नवरी | An offbeat & Adventurous Trek near Trimbakeshwar |
    सह्याद्रीत भटकंती करत असताना गडकिल्ल्यांच्या अवती-भोवती असणाऱ्या सुळक्यांची कधी गमतीशीर तर कधी चित्रविचित्र अशी नावे आपल्या कानावर बऱ्याचदा पडत असतात. ह्या सुळक्यांच्या नावाचे बारसे आजकाल झालेले नसून काहींना पूर्वापार परंपरेने तर काही सुळक्यांना त्यांच्या आकारावरून संबोधले जाते. रतनगड कात्राबाई मार्गावरील अग्निबाण, मनमाड जवळील हडबीची शेंडी, कसे जाल ?इ. सुळक्यांची नावे त्यांच्या आकारावरून पडलेली आहेत. तर अनेक सुळके एकमेकाला खेटून समूहाने उभे असले की त्यांना हमखास वन्हाडीचा किंवा वरातीचा डोंगर म्हणायची पद्धत आपल्याकडे आहे. या वऱ्हाडात लग्न लावणारा भटजी अर्थात भटोबा, नवरा-नवरी, नवरीची करवली व वऱ्हाडी अशी नावे असतात. असा वन्हाडी नवरा-नवरीचा सुळके समूह आपणास नाणेघाटाजवळील घाटघर, माहुली किल्ल्यावर, कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड किल्ल्यावर तसेच कमळगडासमोर
    आजही आपणास पाहायला मिळतो. पण चक्क अशा सुळक्याच्या नावाने • ओळखला जाणारा एक किल्ला नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात कुशेगाव जवळ आहे, त्या किल्ल्याचे नावच आहे नवरा-नवरीचा किल्ला नाशिक-त्र्यंबकगड मार्गावर अंजनेरी पुढे डावीकडे खोडाळ्याचा रस्ता फुट येथूच जवळच पहिने गाव आहे. या पहिनेच्या पाठीमागे अंजनेरी किल्ला उजवीकडे सासरा डोंगर आणि त्यांच्यामध्ये खिंड आहे. या खिंडीतच पहिनेचा नवरा-नवरी सुळके आहेत. या सुळक्यावरूनच येथील किल्ल्याला नवरी नवरीचा किल्ला म्हणून ओळखले जाते.
    कसे जाल ?
    नवरा नवरीच्या किल्ल्यास भेट देण्यासाठी आपणास प्रथम नाशिकला पोहोचावे लागते, नाशिकहून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर वाडीव-हे हे गाव असून, येथून महामार्ग सोडून एक फाटा गड पायथ्याच्या कुशेगावला जाता (वाडीव-हे-कुशेगाव अंतर १३ कि.मी.) चारही बाजूंनी डोंगराच्या कुशीत वसलेले कुशेगाव आजही आपला ग्रामीण बाज जपून असून, गावच्या लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. या कुशेगावात लोकवस्तीच्या तीन वाड्या असून यातील तिसरी वस्ती पार केल्यानंतर लाल मातीची एक मळलेली पायवाद आपणास नवरा-नवरीच्या डोंगराकडे घेऊन जाते
    माहिती साभार: भगवान चिले (इतिहासकार) यांच्या गडकिल्ल्यांच्या पुस्तकातून
    #navaranavarifort #offbeattrek #trimbakeshwar #fortsofmaharashtra #nashikforts #offbeat #adventure
    #ytool #youtube #youtuber #subscribe #youtubelikes #youtubevide #youtubemarketing #youtubeviews #instavideo #instayoutube
    Follow me on Instagram: / pahadi__bapu
    Hi Friends, This is Aditya Ahirrao aka Pahadi Bapu. In this channel you will find me exploring, travelling and especially trekking in Sahyadri Mountain Regions. If you are someone who likes to watch travel & trekking related content then you are on right channel. and yes, if you like the videos, Don't forget to hit the Subscribe button.
    नमस्कार मित्रांनो, मी आदित्य अहिरराव उर्फ पहाडी बापू . या चॅनेलमध्ये तुम्हाला मी सह्याद्री पर्वत क्षेत्रातील गडकिल्ले , प्रवास आणि विशेषतः ट्रेकिंग करताना आढळेल. जर तुम्हाला ट्रेकिंग, ट्रॅव्हल आणि एक्सप्लोरिंग करायला व बघायला आवडते तर तुम्ही योग्य चॅनेलवर आहात. आणि हो जर तुम्हाला माझे व्हिडिओस आवडले असतील तर नक्कीच subscribe करायला विसरू नका.

Комментарии • 20