कावनई किल्ला। कपिलधारा तीर्थ। Kavnai Fort। कावनई। सिंहस्थ कुंभमेळा तीर्थ मुळस्थान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • कावनई किल्ला। कपिलधारा तीर्थ। Kavnai Fort। कावनई। सिंहस्थ कुंभमेळा तीर्थ मुळस्थान #kapildhara
    👇NiranjanDeshmukhVlogs चॅनेलच्या इतर विडिओ👍
    👇कळसुबाई शिखर 👇महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर- • कळसूबाई शिखर। महाराष्ट...
    👇धोडप किल्ला 👇महाराष्ट्रातील दुसरा सर्वात उंच किल्ला- • धोडप किल्ला। महाराष्ट्...
    👇अंजनेरी पर्वत 👇पवनपुत्र हनुमानाचे जन्मस्थळ- • Anjaneri Hills | Nashi...
    👇हरिहर किल्ला 👇 Harihar Fort- • Video
    कपिलधारा तीर्थ कानवई, इगतपुरी, नाशिक येथे आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर नाशिकपासून चाळीस किलोमीटर अंतरावर घोटीच्या अलीकडे कावनई फाटा लागतो. तेथून आठ किलोमीटर अंतरावर कावनई हे गाव लागते.कपिलधारा हे सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळस्थान असून, पेशव्यांनी दिलेला ताम्रपट येथे उपलब्ध आहे. आजही येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. कपिलधारा तीर्थावर सत्ययुगामध्ये भगवान विष्णुच्या चोवीस अवतारांपैकी पाचवा अवतार हा कपिल मुनी यांचा आणि त्याच कपि मुनींनी आपल्या मातेस शांकशास्त्राचे उपदेश करून मोक्ष दिला, असे भगवद्गीतेत म्हटले आहे.कपिलधारा तीर्थावर साक्षात हनुमानाचे चरण लागले आहेत. राम-रावण युद्धादरम्यान लक्ष्मणावर शक्तीप्रहार झाला असता, तो शुद्धीवर यावा, यासाठी श्रीहनुमान संजीवनी बुटी आणण्यास या तीर्थावरून जात होते. तेव्हा त्यांना अडवणाऱ्या कालनेमी राक्षसाचा त्यांनी येथे वध केला. त्यामुळे या गावाचे नाव कावनई असे रूढ झाले.
    किल्ल्याचा इतिहास- कपिलधारा तीर्थाजवळ कावनई किल्ला आहे. कावनई गावाअगोदर कपिलधारा आश्रम असुन त्यापुढे २ कि.मी वर कावनई गाव आहे.
    कावनई गाव उंचावर असल्याने आपली काही चढाई गाडीने पार होते. गावात शिरल्यावर समोरच उजव्या हातालाच किल्ला दिसतो. गावाच्या उजव्या बाजुला कावनाई किल्ल्याची एक सोंड गावात उतरताना दिसते. या सोंडेवरुनच गडावर जाणारी रुळलेली वाट आहे. या सोंडेवरून चढत जायचे अर्ध्या तासाच्या चालीनंतर वाट उजवीकडे वळते आणि चिमणीपाशी येऊन थांबते. पुढचा चढाई चिमणीतूनच आहे. येथे सोपे प्रस्तरारोहण करून आपण किल्ल्याच्या दरवाजापाशी येऊन पोहचतो. गावापासून इथपर्यंत पोहचण्यास १:३० तास पुरतो.
    किल्ल्यावर राहण्यासाठी एक गुहा आहे. यात ४ ते ५ लोकांची राहण्याची सोय होते. जेवणाची सोय आपण स्वतः करावी लागते. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. यात एप्रिल पर्यंत पाणी असते. किल्ल्यावर जाण्यासाठी कावनई गावातून सरासरी एक तास लागतो.
    instagram id- / niranjandeshmukh_ndv
    Thanks For Watching Video
    Don't Forget Like, Share, Subscribe And Hit The Bell Icon.
    #NiranjanDeshmukhVlogs

Комментарии •