वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग १ | A documentary on Vasaicha Doodhwala part 1

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग १
    वसईची केळी, सुकेळी, भाजी आणि फुले खूप प्रसिद्ध आहेत मात्र खूप लोकांना सांगूनही विश्वास बसणार नाही की ह्या सर्व गोष्टींसोबत आम्ही वसईकर मुंबईला दूध देखील पुरवायचो. अनेक वर्षे बरेच वसईकर भल्या पहाटे उठून मुंबईकर उठण्याअगोदर त्यांच्या दारात दूध पोचवायचं काम करायचे. काही वसईकर दिवसाला दोनवेळा मुंबईला जाऊन दूधाचा रतीब घालायचे.
    आज आपण श्री. बेजमी रुमाव (अण्णा, वय वर्षे ७५) ह्यांच्याकडून ह्या व्यवसायाचा इतिहास व इतर रोचक माहिती जाणून घेणार आहोत. अण्णांनी वयाच्या २०व्या वर्षापासून मुंबईला दूध घेऊन जायचा व्यवसाय सुरू केला आणि ते अव्याहतपणे ४२ वर्षे रोज मुंबईला दूध घेऊन जात असत. आज जरी ते मुंबईला जात नसले तरी सायकलवर फिरून आजूबाजूच्या परिसरात तब्बल ७० लिटर दूध पुरवतात. वयाच्या ७५ व्या वर्षी हा व्यवसाय करणारे अण्णा आपणा सर्वांसाठी एक आदर्श आहेत.
    ह्यापुढील भागात आपण वसईकरांची पुढील पिढी कशाप्रकारे हा दुग्धव्यवसाय पुढे नेत आहे हे पाहणार आहोत.
    आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
    छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
    वसईवरील आमचे इतर व्हिडीओ
    वसईचा केळीवाला - एक माहितीपट
    • वसईचा केळीवाला - एक मा...
    वसईतील पानवेल - विड्याची पानं
    • वसईतील पानवेल/विड्याची...
    मातीच्या तव्यावरील तांदळाच्या भाकऱ्या
    • मातीच्या तव्यावरील तां...
    वसईच्या ऑर्किडची कहाणी
    • वसईच्या ऑर्किडची प्रेर...
    सफर वसई किल्ल्याची
    • सफर वसई किल्ल्याची | व...
    प्राचीन वसईचा इतिहास
    • प्राचीन वसईचा इतिहास |...
    वसईतील बैलगाडीवाले शेतकरी
    • २०२० मध्ये बैलगाडी वाप...
    #vasaiculture #vasaichadoodhwala #vasaidocumentary #sunildmello

Комментарии • 630