८८ वर्षांची बहिण ८५ वर्षांच्या बहिणीला शिकवते बर्फी || How to make burfi ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • ८८ वर्षांची बहिण ८५ वर्षांच्या बहिणीला शिकवते बर्फी || How to make burfi ||
    #VaishaliDeshpande # burfi #coconutappleburfi #applecoconutburfi #vratrecipe #sweetrecipe #नारळसफरचंदबर्फी
    #Vaishalirecipe
    हा व्हिडिओ आहे दोन बहिणींचा. एक ८८ वर्षांची तर दुसरी ८५ वर्षांची. दोघी खूप दिवसांनी एकत्र भेटल्या. बालपण, सुना, नातवंडं, पतवंडं अशा विषयांवर त्यांच्या गप्पा सुरू होत्या.
    मोठी बहिण कुठल्याही प्रकारची बर्फी, लाडू, वड्या करण्यात सुगरण. मग छोट्या बहिणीला मोठीनी शिकवली नारळ सफरचंद बर्फी.
    तर ही बर्फी साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल.
    Please have a look at our other videos as well!
    चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
    / vaishalideshpande
    Please subscribe to our channel for more videos
    #VaishaliDeshpande #burfi #coconutappleburfi #applecoconutburfi #vratrecipe
    Topics Covered :
    sweet recipe
    नारळ सफरचंद बर्फी
    Vaishalis recipe
    How to make naral sarfarchand burfi
    How to make coconut apple burfi
    How to make burfi without ghee or oil
    Two sisters making sweets
    sweet burfi without trey
    नारळ सफरचंद बर्फी
    नारळ सफरचंद बर्फी कशी बनवायची

Комментарии • 1 тыс.

  • @jayalokhande3744
    @jayalokhande3744 3 года назад +37

    दोन्ही आज्या खुप खुप गोड आहे त्या ना चांगलं आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि बर्फी अप्रतिम धन्यवाद

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад +2

      dhanyavad

    • @vibhdasalkar1798
      @vibhdasalkar1798 3 года назад +3

      दोन्ही आज्जी खुप गोड, हौशी आणि उत्साही आहेत! ग्रेट! आजी वड्या पाडावयाची ट्रिक एकदम मस्तच.

  • @vidyalaghate1445
    @vidyalaghate1445 3 года назад +1

    किती सुंदर... दोन्ही बहिणी गोड... माझ्या आई आणि मावशीची आठवण झाली... वड्या करण्याचा आणि वड्या पाडण्याचा सोप्पा उपाय मस्तच खूप आवडला... शेअर केल्याबद्दल धन्यवाद 👍🙏🙏🙏

  • @neelambhogte7600
    @neelambhogte7600 3 года назад +5

    किती स्पष्ट आवाज आणि किती उत्साह या वयात खरोखर शंभरी पार करतील.साष्टांग नमस्कार.

  • @rutujasohani216
    @rutujasohani216 3 года назад +7

    काय सुंदर दाखवल्यात वड्या!!!
    किती वेळ ढवळत होत्या आजी!!
    वड्या थापल्या तर खूपच सुंदर👌👌
    सलाम आजींना👍

  • @snehakulkarni3436
    @snehakulkarni3436 3 года назад +7

    Beautiful bounding in sisters n very energetic in this age too......hats off

  • @PoonamPisat-p4s
    @PoonamPisat-p4s 6 месяцев назад

    खरच कमाल आहे दोघींची ह्या वयात त्यांचे स्वतः वरील control आणि confidence कमाल आहे

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 3 года назад +6

    वाव! बर्फी रेसिपी अप्रतिम 👍👌किती गोड नात आहे आजीच❤️ उत्साह, आत्मविश्वास, नव्याचे कौतुक वाखण्यासारखेआहे.खुप छान वाटलं😍 धन्यवाद वैशाली ताई 🙏

  • @shubhamwadapurkar7673
    @shubhamwadapurkar7673 3 года назад

    किती नशीबवान आहात तुम्ही सगळे आणि तुमची पुढची पिढी...कारण त्यांना इतक्या सगळ्या आज्यांच सुख लाभलय.. त्या काष्टाघोळ नऊवारीतल्या आजी बघून मला माझ्या माई आजीची आठवण आली...खरंच खूप thank you vaishali kaku tumhala❤️❤️

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      तुम्ही इतकं प्रेमानी बघताय. धन्यवाद.

  • @suchitakulkarni6467
    @suchitakulkarni6467 3 года назад +6

    आज्जीने केलेले असे अजून छान छान पदार्थ पहायला खूप आवडेल... तुम्ही पण व्हिडिओ चांगला केला आहे...
    🙏🙏

  • @geetanjalikarandikar9746
    @geetanjalikarandikar9746 3 года назад +1

    खूपच छान रेसिपी,
    आणि सर्वात महत्वाचा , आजींचा या वयातील
    काम करण्याचा आणि शिकवण्याचा उत्साह
    कौतूकास्पद आहे,वड्या थापयची पद्धत तर भन्नाट आहे
    👌👍👍👏👏👏🙏🙏

  • @vimalpatil7181
    @vimalpatil7181 3 года назад +7

    असे प्रेम पाहून डोळे भरून आले शताआयुष्यलाभो दोघींनाही ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • @sujatasharad7999
    @sujatasharad7999 3 года назад +1

    अहाहा दोन्ही बहिणीचं प्रेम अगदी सफरचंद-नारळाच्या वडीप्रमाणे मुरलेले मऊसूत मधाळ गोड वाटतंय.. love you आजी आणि माई.. तुम्हा तिघींनाही निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो ह्याचं अमृतमयी शुभेच्छा..💐

  • @anuradhathakur777
    @anuradhathakur777 3 года назад +5

    Ajjya are very cute. Hats off to the 88 year old, she is so energetic.

  • @scienceandtechnologybymrs.9345
    @scienceandtechnologybymrs.9345 3 года назад +1

    किती गोड 😘😘😘🥰🥰.... गोड आज्ज्या 👍🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 या वयात पण किती छान काम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @tushpraj
    @tushpraj 3 года назад +7

    Kitttttiiii goad ahet ya doghi bahini...farach sundar!! Recipe pan ek number!!

  • @shubhangijorwekar3235
    @shubhangijorwekar3235 3 года назад +1

    खूपच छान..... वाड्यांची पध्दत खूप आवडली

  • @kalpanaarnalkar3935
    @kalpanaarnalkar3935 3 года назад +3

    खूप सुंदर👌👌😍 आणि विशेष म्हणजे sharp memory आणि छान टीप्स 👍👍

  • @nilampansare4466
    @nilampansare4466 2 года назад

    दोघी बहिणींच हितगुज किती छान...ताईने छोट्या बहिणीला टिप्स पण दिल्या. खूपच छान सगळंच bonding.👍👌☺️

  • @anjalipimparwar1497
    @anjalipimparwar1497 3 года назад +5

    मस्त वड्या करायची पद्धत खूप आवडली आणि वडीचा नवीन प्रकारही आवडला खूप छान .

  • @RekhaPatel-vg6qe
    @RekhaPatel-vg6qe 3 года назад

    सुंदर बनवल्या दोन्ही आजी नी वड्या!!ह्या वयात बनवणे महन्जे काही सोपे नाही. त्या मोठ्या आजी तर भारी active आहेत.अजून पर्यंत त्यांच्या बोलण्यात confidence भारी आहे.👍👍🙏🙏 खूप खूप अभिनंदन!!

  • @drrao3705
    @drrao3705 3 года назад +8

    Beautiful video. Blessed to see two octagerian sister
    Wish them good health n thank you that we could learn from them

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      Thank you Doctor,
      I am very happy to share that both of them are healthy and happy

  • @priyag1869
    @priyag1869 3 года назад

    मावशींनी वड्या फारच सुरेख केल्या आहेत. वयाच्या ८८व्या वर्षीपण किती ऊत्साही आहेत त्याचे कौतुक वाटते.🙏🙏

  • @vishnusonawane
    @vishnusonawane 3 года назад +5

    Hats off to Mothi Aai and her skills and agility at this age. I remembered my grandmother today.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад +1

      धन्यवाद. मोठी आई पर्यंत तुमची प्रतिक्रिया नक्की कळवते.

  • @ashwinighatpande398
    @ashwinighatpande398 3 года назад

    प्लास्टिक पिशवीत वड्या खूपच छान दाखवल्या आपल्या आधीच्या पिढीतील बायका खरोखर सुगरण होत्या.थोड्या गोष्टीत मोठे काम कसे करायचे त्याचा परिपाठ मिळाला! धन्यवाद! दोघी बहिणींना शुभेच्छा! 🙏👍

  • @meera1521
    @meera1521 3 года назад +3

    So cute... both of them...the way she calls 'Krishna bai'...😍🤩

  • @sumatipainarkar4069
    @sumatipainarkar4069 3 года назад +1

    आजींचा दांडगा उत्साह खूप भावला .वड्या करण्याची पद्धत पण खूप छान.

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 3 года назад +5

    वड्यापेक्षा दोन्ही आज्याच जास्त छान गोड आहेत .

    • @rohinipande
      @rohinipande 3 года назад

      खरंच

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 3 года назад

      @@rohinipande मला आवडल्या दोन्ही आज्या.

  • @rekhabhalerao4712
    @rekhabhalerao4712 3 года назад +1

    आजींच्या सहवास मला खूप आनंद देऊन गेला मी अशा वड्या करून पाहील नक्की.

  • @pradnyachaugule7659
    @pradnyachaugule7659 3 года назад +3

    The love and affection experienced while watching the video is something which I will cherish in my heart. Will try this recipe for sure.

  • @anjalipurandare6709
    @anjalipurandare6709 3 года назад

    वड्यांपेक्षाही नात्यांची प्रेमळ गुंफण फार गोड वाटली. दोन्ही आज्जी आणि तुमची मावस बहीण फार सुगरण आहेत!
    वड्याही अर्थात भारीच झाल्या आहेत!

  • @alakapatwardhan7634
    @alakapatwardhan7634 3 года назад +3

    ह्या वयात गॅसवर ठेवल्या पासून पूर्ण वेळ वड्या घोटण म्हणजे कमाल आहे. किती गोड आहेत दोघी बहिणी! वड्या फारच मस्त.तुम्ही शेअर केल्याबद्दल धन्यवाद!🙏🙏

  • @pratibhabodake2983
    @pratibhabodake2983 3 года назад +1

    व्वा व्वा कित्ती सुंदर, सुबक, आकर्षक आणि गोड सुध्दा 😂😂😂 मस्त दोन्ही मावशी आणि वड्या 👍👍 वड्या पाडायची पद्धत खुप छान 👍👍 आवडली रेसिपी , मी नक्की करेन आणि दोन्हीं मावशींना मनपूर्वक धन्यवाद, आणि नमस्कार पण🙏🙏🙏 माझ्या आज्जीची आठवण आली

  • @shlokakulkarni9739
    @shlokakulkarni9739 3 года назад +5

    Both of them are so adorable!! Agdi mithi maravishi vattiye tyanna...💕💜

    • @kabeerkulkarni745
      @kabeerkulkarni745 3 года назад +1

      Ikr😊

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      धन्यवाद. तुमचा अभिप्राय दोघींना सांगते.

  • @sushmadbora
    @sushmadbora 3 года назад

    दोन्ही आज्जी एकदम गोड( बर्फी पेक्षाही जास्त)
    कढईचे कौतुक ....
    Easy इंग्लिश शब्द 👌👌👌
    सगळेच लय भारी

  • @Shadow_1695
    @Shadow_1695 3 года назад +8

    Absolutely adorable video😍 God bless them all, how easy & effortless way of cooking🙌W🙌O🙌W

  • @aparnadukle4393
    @aparnadukle4393 3 года назад

    फारच छान वाटलं.. दोन बहिणींचं प्रेम बघून.. रेसिपी पण सुटसुटीत आणि मस्त 👌👌

  • @suchitakulkarni6467
    @suchitakulkarni6467 3 года назад +6

    वा!!! ह्या वयात ही किती छान बोलून सांगतात...🥰🥰

  • @anitabanage7644
    @anitabanage7644 3 года назад

    खुपच छान झाल्या वड्या. दोघी आजी खुप छान सांगितले.वड्या करायची पद्दत छान

  • @yaminiasar
    @yaminiasar 3 года назад +3

    खूप छान पद्धत वड्या पाडण्याची, दोघी मावशी शतायुषी होवो 🎉🙏

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      धन्यवाद. तुमच्या शुभेच्छा आहेत दोघींबरोबर

    • @suchitralavakare2532
      @suchitralavakare2532 3 года назад

      वा झकास...

  • @anamikamodak797
    @anamikamodak797 3 года назад

    कित्ती छान..वड्या तर छान दिसतातचं आहेत पण दोन्ही आज्यांचा उत्साह बघून जीवनात किती गोडपणा आहे हे लक्षात आले..धन्यवाद हा video share केल्याबद्दल. माईंना पण धन्यवाद वड्या लाटायची झटपट technic दाखविल्या बद्दल...🙏

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад +1

      तुमचा अभिप्राय मावशी, आई आणि माई पर्यंत सांगते

  • @geetadesai7074
    @geetadesai7074 3 года назад +6

    खूपच छान ! रेसिपी आणि दोनही बहिणी

  • @nutankhadpekar381
    @nutankhadpekar381 3 года назад

    मावशी आजींना सा.नमस्कार ह्या वयात किती उत्साह . आवाज खणखणीत व जोर पण कुठेही कमी नाही. पण ह्या जुन्या लोकांचेच पदार्थ, अनुभव खूप घेण्यासारखे आहेत.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      खरंय. कायम इतकीच उत्साही आणि आनंदी.

  • @aishwaryamarathe370
    @aishwaryamarathe370 3 года назад +7

    दोन्ही आज्यांकडून आणखी पदार्थ शिकावे से वाटतात. धन्यवाद.. त्या दोघी आमच्या च वाटल्या.

  • @yashashriranadive4213
    @yashashriranadive4213 3 года назад

    कित्ती कित्ती सुंदर आहेत दोघी बहिणी. आणि वड्या तर एक नंबर. वड्या पाडण्याची आयडिया तर लई भारी बाबा. 👌👌👌😘😘दोघी आज्जी खूप खूप आवडल्या. 🤗💕😚✌️👍🏼

  • @ambiyesoham
    @ambiyesoham 4 года назад +3

    I love u Aaji....!!!

  • @TheVrinda12
    @TheVrinda12 3 года назад +1

    ह्या वयातला उत्साह...वड्या करायची पध्दत... खूप खूप छान.... अतिशय आवडला..त्या दोघांना खूप शुभेच्छा 🙏

  • @vijayaagashebhole4754
    @vijayaagashebhole4754 3 года назад +3

    Mala vadya aawadlyach pan tyahunhi jasta tya don god muli {aajya 😍😘❤️} aawdlya....---Vijaya Agashe-Bhole.🙏

  • @vidyajadhav8010
    @vidyajadhav8010 3 года назад

    खूप सुंदर आणि या वयातला त्यांचा उतासाह जास्त सुंदर.

  • @rashmichitre4737
    @rashmichitre4737 3 года назад +2

    कित्ती गोड आजी आहेत 😍😍 ह्या वयाला सुद्धा त्यांचं काम किती सफाईदार आहे. वड्या पडण्याची पद्धत तर भन्नाट आहे.

  • @atharvaj957
    @atharvaj957 3 года назад

    खूपच सुंदर व त्यांची पद्धत आणि वड्या पण खूप छान

  • @neelawalvekar4341
    @neelawalvekar4341 2 года назад

    दोघी आज्ज्या गोड आहेत.वड्या फार छान केल्या आहेत. प्लॅस्टिक कागदावर लाटण्याची पध्दत खूप आवडली. दोघी आज्जींना उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      धन्यवाद नीला ताई
      दोन्ही आजी छान आहेत. आजच माझ्या आईनी ८९ व्या वर्षात पदार्पण केले आहे आणि मावशी १ मे २०२२ मध्ये ९१ व्या वर्षात पदार्पण करेल. तुमच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोचवते 🙏

  • @silentgaming3774
    @silentgaming3774 2 года назад

    आजींचा आवाज या वयातही एकदम खणखणीत आहे 👌👌👌फार सुंदर केली recipe 🙏🙏🙏

  • @sujathar3826
    @sujathar3826 2 года назад

    मावशींचा आवाज खणखणीत आणि उच्चार स्पष्ट आहेत.. धाकट्या बहिणीला किती प्रेमाने, आत्मीयतेनी आणि समरसतेनी शिकवतेय.. बहिणींची इतकी गोड जोडगोळी आहे मग वड्यांची गोडी आणि चव खाचितच द्विगुणित झाली असेल...

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      धन्यवाद. आता मावशी ९० वर्षांची आहे. पण आवाज आणि सगळा स्वैपाक करण्यातला उत्साह तसाच आहे.

    • @sujathar3826
      @sujathar3826 2 года назад

      @@VaishaliDeshpande ह्या दोघीही बहिणींचा उत्साह असाच अखंड, अबाधित राहो आणि आम्हाला त्यांच्या कडून जगण्याचे धडे मिळत राहो ही प्रार्थना.. 🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      🙏

  • @omisgameing8930
    @omisgameing8930 3 года назад +1

    Doghin chi mast jodi aahe....mast cha recipe aahe he

  • @kashmirakailashi26
    @kashmirakailashi26 3 года назад

    वड्या आणि आज्या दोन्ही किती गोड आहेत. किती प्रेमाने आपल्या बहिणीला खाऊ घातल्या! तुम्ही नशिबवान आहात असं प्रेम तुम्हाला मिळतंय. मला तर
    बघूनच आनंद मिळतोय! ज्याच्याकडे हे नाही त्यालाच त्याची किंमत कळते. तुम्ही सुद्धा खूप गोड बोलता. अनुवंशिकच ते!. केवळ आजींमुळे Subscribe करते!

  • @madhavimarathe1050
    @madhavimarathe1050 3 года назад

    मी पण आजींनी केल्या तशाच सफरचंद नारळाच्या वड्या आज करुन पाहिल्या आणि सेम तशाच झाल्या मला खुप आनंद झाला ताई तुम्ही व्हिडिओ टाकलात त्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      अरे व्वा ! मस्त. धन्यवाद

  • @yoginikulkarni1626
    @yoginikulkarni1626 3 года назад

    ही माझी मामी आहे मला तिला पाहुन खुप आनंद झाला ती आजुन सगळ करते हे पाहुन खुप बर वाटलत्यामुळे मला तिला वतीची रेसीपी बघायला मीळाली

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      अरे व्वा ! सुमन मावशीला नक्की सांगते. योगिनी ताई, तुम्ही विमल आत्यांची मुलगी का ?

  • @mugdhadate594
    @mugdhadate594 3 года назад

    khupach chhan,, bahininch prem ani sahavas khupach mast

  • @pradnyashinde9154
    @pradnyashinde9154 3 года назад +1

    OMG!, मावशींचा आवाज अगदी खणखणीत!👌🏻आई ,मावशी, सासूबाई प्रत्येक जण एक स्वतंत्र इन्स्टिट्यूट आहे!!🙏🏻🙏🏻 आता मला खरंच तुमचा हेवा वाटतोय!!!😍😍😊😊
    सर्वांची अशीच तुम्हाला जास्तीत जास्त साथ लाभो!!👍🏻👍🏻👍🏻

  • @namrataprabhudesai1909
    @namrataprabhudesai1909 3 года назад +2

    वैशाली ताई, तुमचे खुप खुप आभार, ही पुंजी आणि भाग्य तुम्हाला लाभले आणि आम्हाला सुद्धा ह्या मध्ये सहभागी केलं 🙏

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад +1

      नम्रता ताई,
      तुम्हाला व्हिडिओ आवडला. खूप छान वाटलं. आता पुढचे व्हिडिओ करायला अजून उत्साह येईल.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      नम्रता ताई,
      तुम्हाला व्हिडिओ आवडला. खूप छान वाटलं. आता नवीन व्हिडिओ करायला अजून उत्साह येईल.

  • @poojanalawade2007
    @poojanalawade2007 3 года назад

    वड्या सुरेख झाल्यात 👌👌👌 पिशवीत थापायची कल्पना मस्तच

  • @gangadharbidgar5222
    @gangadharbidgar5222 3 года назад

    Burfi receipy khup sundar aani doghi bahininche prem he tar manala khup bhawle. chhan...

  • @chitrasaralkar5679
    @chitrasaralkar5679 3 года назад

    पदार्थ करण्याची पध्दत चांंगली आहेच .पदार्थ चविनं ही चांगला लागणारचं .पूर्वी पेक्षा आताच्या चांगल्या गोष्टींचं मावशींन केलेलं कौतुक लाजवाब आहे. सतत जुन्याच गोष्टीच चांगल्या हे आळवत नाहीत .नवीन गोष्टींच कौतुक आहे .ह्या पुरोगामी विचारास सलाम ! प्लास्टिक पिशवीत वड्या पाडण्याची पध्दत एकदम अफलातून.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      धन्यवाद चित्रा ताई,
      अगदी खरंय. या बहिणी नवं ते घेऊन पुढच्या पिढी सोबत खूप आनंदानी रहात आहेत.

  • @ketkijoshi396
    @ketkijoshi396 3 года назад

    वैशालीताई प्रथम तुमचं खूप कौतुक , तुमचे व्हिडीओ खूप छान असतात. तुमच्या मावशीच्या आणि आईच्या या वयातल्या उत्साहाला सलाम आहे, त्यांना दीर्घायुष्य लाभून आम्हाला त्यांच्याकडून नवीन नवीन रेसिपी शिकायला मिळोत हीच सदिच्छा 🙏

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      केतकी ताई धन्यवाद.
      सॉरी. नजरचुकीने तुमची कमेंट दिसली नाही. आत्ता पहात असताना दिसली. परत एकदा सॉरी.

  • @sadhanakundaikar8125
    @sadhanakundaikar8125 3 года назад

    आजी खुपचं छान आहेत....त्यांचे बोलणे तर अप्रतिम..... उत्साही झरा...हा विडीओ share केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏

  • @vinayasomsnsanesane129
    @vinayasomsnsanesane129 3 года назад

    खूप छान नवीन पद्धत समजली दोन्ही आजीचं कौतुक

  • @jennydsouza3509
    @jennydsouza3509 2 года назад +1

    God bless them always with good health. They really have patience and perseverance. A very good example for the younger generation.

  • @deeparatnaparkhi9790
    @deeparatnaparkhi9790 3 года назад +1

    Khup chan.vadya aani Aaji he

  • @anjalijain2182
    @anjalijain2182 2 года назад

    किती गोड आजी आहेत दोन्ही 🥰 आणि रेसीपी पण खूप छान सांगितली. अशाच साध्या सोप्या रेसिपी दाखवत जा.
    धन्यवाद!!

  • @anjalinaik2471
    @anjalinaik2471 2 года назад

    Khup chaan zalya vadya n pishvit ghalun lataychi idea pn chaan

  • @kavitatapase9164
    @kavitatapase9164 3 года назад

    खूप छान साधी आणि सोपी पद्धत आहे,मी नक्की करेन

  • @snehadarekar1607
    @snehadarekar1607 3 года назад

    खरच खूप छान वड्या बनवल्या आहेत. नक्की करून बघेन.

  • @indiatouk29
    @indiatouk29 3 года назад

    Khupch chan vatal aajji ani recipy donhi 😊😊👌👌👌👌lay mast bolatat aaji👍

  • @shubhangishirode5712
    @shubhangishirode5712 3 года назад

    Khupach sundar v chhan vatle aaichi maya otprot bharli ahe

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 3 года назад

    *⚘⚘प्रथम वैशाली देशपांडे यांचे खूप अभिनंदन ! दोन्ही बहीणी आजांच्या ऐक्टिवपणामूळे सर्वाना एज आदर्श लाभला आहे !कगदाची आयडिया फारच आवडली ! त्यासाठी वैशाली ताई ! आपणास खूप खूप शुभेच्छा !⚘⚘*

    • @vishwasparadkar3457
      @vishwasparadkar3457 2 года назад

      खूप छान.... आणि किती छान प्रकारे दाखविल्या आहेत... दोन्ही आजींना नमस्कार... 🙏🙏🙏

  • @supriyavaivade9030
    @supriyavaivade9030 3 года назад

    Kiti chan ahet ajya ani tyanchi shikavanyachi padhat
    Ekdam cute

  • @sumedhakulkarni507
    @sumedhakulkarni507 3 года назад

    आपल्या मावशी आणि आई ह्यांना नमस्कार .आजीनी दाखविलेली वड्याची पाककृती अतिशय आवडली व आपल्या माईनी वड्या पाडण्याची पध्दत दाखविली ती मस्तच.मी त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करणार. धन्यवाद .

  • @urmilaanvekar8776
    @urmilaanvekar8776 3 года назад

    खरचं खुप छान व सहज बनवून दाखवले वड्या

  • @rashmibodas8492
    @rashmibodas8492 3 года назад

    आजी तुम्ही दोघी खूपच गोड आहात आणि अतिशय सोप्या पद्धतीने आम्हाला वडी शिकवली रेसिपी बघताना खूपच छान वाटलं व वडी पाडण्याची पद्धत आणि खूप आवडली

  • @sunilaparadkar2585
    @sunilaparadkar2585 3 года назад

    खूपच छान वाटलं बघताना मी नक्की करून बघेन

  • @rupalibobade5691
    @rupalibobade5691 3 года назад

    Khupa ch chaan 👌👌 aamhala hi lajvel ethki energy baghun fresh jhale 🙏

  • @jayashreenene3995
    @jayashreenene3995 3 года назад

    वड्या थापायची पध्दत खूप छान ,सोपी . नक्की करणार . माझ्या आई आणि मावशीची आठवण आली . माझी आईही खूप सुंदर वड्या करायची . बटाट्याच्या, टोमॅटोच्या. दोघींनाही नमस्कार.

  • @dreamchaser4765
    @dreamchaser4765 2 года назад

    Shoooo shoooo shoooo shweeeet. ❤❤
    "Krishnabai" kitteeee goad haak maarli aahe!!! Kitteeee premaane bharawli vadi!!! Gharat vayaskar maansa asna ha suddha ishwaraacha ek ashirwaad aahe.

  • @simaselukar1634
    @simaselukar1634 3 года назад +1

    आजी अजून ही तेवढ्याच उत्साही आहेत त्यांच्या कर्तुत्वाला सलाम🙏🙏🙏

  • @sheetaltelang35gmail
    @sheetaltelang35gmail 3 года назад +1

    Woww kitti chaan family ahe,masta vattai ,evdhya old ajjis ahet pn super active ahet,khupch chaan plastic chi idea dilit,love you both ajis and both tai's🥰🥰🥰

  • @geetamujumdar1548
    @geetamujumdar1548 3 года назад

    धन्य धन्य सहस्रदर्शनी भगिनी !
    साधली सहजपणे , नारळ-सफरचंद-साखर त्रिवेणी !
    गीता मुजुमदार.नागपूर.

  • @gayatrikarmarkar3138
    @gayatrikarmarkar3138 3 года назад +1

    खूप छान वाटले हा video पाहून,बहीणी बहीणींमधील tuning आणि या वयातही इतका उत्साह बघून प्रेरणा मिळाली, शेअर केल्याबद्दल धन्यवाद

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      धन्यवाद गायत्री ताई,
      खरंय. मी इतकी वर्षं बघतेय त्या दोघींचं प्रेम. खूप उत्साही आणि आनंदी असतात.

    • @gayatrikarmarkar3138
      @gayatrikarmarkar3138 3 года назад

      @@VaishaliDeshpande तुमचा आवाजही खूप छान आहे,अगदी एखाद्या निवेदिके इतका सुंदर आहे,शब्दफेक,उच्चार, योग्य त्या ठिकाणी pause यामुळे बोलणे खूप प्रभावी वाटते,ऐकतच रहावे असे वाटते

    • @gayatrikarmarkar3138
      @gayatrikarmarkar3138 3 года назад

      @@VaishaliDeshpande तुमचा आवाजही खूप छान आहे,अगदी एखाद्या निवेदिके इतका सुंदर आहे,शब्दफेक,उच्चार, योग्य त्या ठिकाणी pause यामुळे बोलणे खूप प्रभावी वाटते,ऐकतच रहावे असे वाटते

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      तुमची कमेंट वाचून खूप छान वाटलं. धन्यवाद.

  • @tanvigudhekar4308
    @tanvigudhekar4308 3 года назад

    खूपच सकारात्मक ऊर्जा आहे दोघींकडे!! पाहून खूप छान वाटले.

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 3 года назад

    Khup chhan god god vadya agadi aajjisarkhya

  • @ashwinijoshi5661
    @ashwinijoshi5661 3 года назад

    दोन्हीही आज्जी great. उत्साह दाद देण्यासारखा या वयात ही

  • @manjiritatkar894
    @manjiritatkar894 3 года назад +1

    खूप सुंदर आजी ... या वयात सुद्धा एवढा उत्साह .... Hats off .... खूप सोप्या पद्धतीने सांगितल्या म्हणून करून बघायचा मोह आवरता आला नाही .... करून बघितल्या आज .... एकदम मस्त झाल्या .... आजींना नमस्कार 🙏🏻 ...

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад +1

      धन्यवाद.
      मावशी पर्यंत तुमची कमेंट आणि नमस्कार सांगते.

  • @madhavipatil7410
    @madhavipatil7410 3 года назад

    वा वा मस्त च supurb idea वडया सारखं च आज्या पण गोड

  • @swatighaisas1874
    @swatighaisas1874 3 года назад

    सुंदर पध्दत 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @hongiranasun6274
    @hongiranasun6274 3 года назад +2

    Soooooo sweet
    Hats of amma👌👌👌❤

  • @rashmiwalanju1651
    @rashmiwalanju1651 3 года назад

    खूप छान वड्या .आणि दोन्ही मावश्या सुद्धा खूप गोड

  • @milindkalamkar9150
    @milindkalamkar9150 4 года назад +1

    mast khup chaan vatll donhi attyana baghun ani vadya pan mast.

  • @jyotipawar9028
    @jyotipawar9028 3 года назад +1

    Khoob pahchan

  • @YRB802
    @YRB802 3 года назад

    अप्रतिम.... please या दोन्ही आजीनं कडून जुन्या authentic सर्व recipes share kara..agdi रोजच्या जेणातले साधे पदार्थ पण त्यांच्या पद्धतीने share kara please... hat's off,👌🙏

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      धन्यवाद. नक्कीच करूयात असे व्हिडिओ. मेतकूट, मुळ्याचा पळवा, भाजणीची मोकळ असे ३ व्हिडिओ माझ्या आईचे आपल्या चॅनल वर आहेत.

  • @sangitagurav2211
    @sangitagurav2211 2 года назад

    खूपच सुंदर...
    आलेपाक वडी ही मस्त बनवत असतील 👍🙏🙏

  • @prajaktabhide6109
    @prajaktabhide6109 3 года назад

    वड्या थपण्या ची पद्धतीने एकदम नाविन्यपूर्ण हटके आणि उपयुक्त