Rajdher, Koldher And Indrai Fort Part 1 | किल्ले राजधेर, कोळधेर आणि इंद्राई भाग १..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच माझ्या आनंदयात्री या माझ्या RUclips चॅनेल वर..!!
    किल्ले राजधेर आणि कोळधेर - नाशिक चांदवड मधील २ अल्पपरिचित किल्ले आणि आणि त्यांचा संपूर्ण इतिहास...
    इतिहास:
    कोळधेर: कोळधेर दुर्गाच एकंदरीत कातळकोरीव बांधकाम पद्धती पाहता हा दुर्ग शिवपूर्वकाळातील आहे हे सिद्ध होते.
    भाऊडबरीतुन सटाण्याला जाणारा मार्ग कोळधेरला वळसा घालून बागलाणात शिरतो, त्यामुळे या दुर्गाचे टेहळणीच्या दृष्टीने असणारे महत्व लक्षात येते. रवळ्या - जावळ्या सोबत जून-जुलै १६६३ मध्ये हा गड निजामशाहीच्या ताब्यातून मोगलाईत समाविष्ट झाला असा उल्लेख धोडप दुर्गावरील फारशी शिलालेखात मिळतो. शिवकाळात हा दुर्ग मोगलांच्या ताब्यात राहिला. शेवटी १५ एप्रिल १८१८ मध्ये याचा ताबा इंग्रजांकडे गेला.
    राजधेर: हा किल्ला यादव काळात बांधला गेला. १२१६-१७ मध्ये हा किल्ला यादवांच्या ताब्यात होता. हा किल्ला अलाउद्दीन खल्जी आणि नंतर फारुकीच्या ताब्यात होता.
    १६०१ मध्ये खान्देश सुबा मोगलांच्या ताब्यात होता, हा किल्ला भडगावच्या रामाजीपंतांना आशिरीगडावरील विजयाच्या बदल्यात देण्यात आला.
    बखर नोंदींमध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या ताब्यात असल्याचे नोंद आहे.
    १७५२ मध्ये भालकीच्या तहानुसार हा किल्ला निजामाने पेशव्याच्या स्वाधीन केला. १७६२ मध्ये माधवराव पेशव्यांनी हा किल्ला विठ्ठल शिवदेव यांच्याकडे सुपूर्द केला आणि किल्ल्याचा वार्षिक महसूल दहा हजार रुपये होता. १७६४ मध्ये चाळीसगावच्या पवार बंधूंनी पेशव्याविरुद्ध उठाव केला, ज्याला बाजीराव-द्वितीयने चिरडून विठ्ठलराव विंचूरकरांना चाळीसगाव काबीज करण्यासाठी पाठवले, राजधेर किल्लाही पेशव्यांच्या ताब्यात आला.
    १५ एप्रिल १८१८ रोजी निकम देशमुख यांच्याशी घनघोर लढाई करून हा किल्ला ब्रिटिश सैन्याच्या कर्नल प्रोथेरने जिंकला.
    कसे जाल: राजधेरवाडी हे राजधेर, कोळधेर आणि इंद्राई या तिन्ही किल्ल्यांच्या पायथ्याचे गाव आहे. मुंबई, नाशिक किंवा मनमाड मार्गे चांदवड गाठावे. नाशिक पासून चांदवड ६४ किमी वर आहे, तर मनमाड पासून चांदवड २४ किमी वर आहे. चांदवड मधून एसटी ने राजधेरवाडी गाठावी. खाजगी वाहनाने थेट राजधेरवाडी पर्यंत जाता येत.
    राहण्याची सोय: कोळधेर किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे त्यावर राहणे सोयीचे नाही. राजधेरवर राहण्यासाठी गुहा आहेत. त्यामध्ये १०-१५ लोक राहू शकतात.
    कोळधेर, राजधेर आणि इंद्राई असा २ दिवसाचा रेंज ट्रेक करायचा असेल तर राजधेरवाडीतील हनुमान मंदिरात राहता येते.
    जेवणाची सोय: दोन्ही किल्ल्यावर जेवणाची सोय नाही. राजधेरवाडीमध्ये आधी सांगितलं तर जेवणाची सोय होऊ शकते किंवा हनुमान मंदिरात आपण स्वतः जेवण करू शकतो. अजून पर्याय असा कि, जर खाजगी वाहन असेल तर मुख्य रोड वर येऊन जेवू शकतो (हे अंतर राजधेरवाडी पासून १५-२० मि. आहे). तिथे हॉटेल आहेत.
    पाण्याची सोय: कोळधेर वर पाणी नाही. राजधेर वर पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत.
    राजधेरवाडी गावात, ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बसवलेल्या आहेत.
    #########################
    Hello friends, welcome to my on my Anandayatri RUclips channel ..!!
    Forts Rajdher and Koldher - 2 lesser-known forts in Nashik Chandwad and their full history...
    History:
    Koldher: Looking at the overall carved construction method of Koldher Fort, it is proved that this fort belongs to the pre-Shivaji maharaj era.
    The road from Bhaudabari to Satana bypasses Koldher and enters Baglana, so the importance of this Durga in terms of surveillance can be seen. A Farsi inscription on Dhodap Durga mentions that this fort along with Rawala-Jawla was annexed to Moglai in June-July 1663 under the control of the Nizamshahi. This fort remained in the possession of the Mughals during Maratha period. Finally on April 15, 1818, it was handed over to the British.
    Rajdher: This fort was built during the Yadav period. In 1216-17 this fort was under the control of the Yadavas. The fort was under the control of Alauddin Khalji and later Farooqi. In 1601 Khandesh Suba was under Mughal control, the fort was given to Ramajipant of Bhadgaon in return for his victory over Asirigarh. Bakhar records record that this fort was in the possession of Shivaji Maharaj. According to the Treaty of Bhalki in 1752, this fort was handed over to the Peshwa by the Nizam. Madhavrao Peshwa handed over the fort to Vitthal Shivdev in 1762 and the annual revenue of the fort was ten thousand rupees. In 1764, the Pawar brothers of Chalisgaon revolted against the Peshwas, which was crushed by Bajirao-II and sent Vitthalrao Vinchurkar to capture Chalisgaon, the Rajdher fort also came under the control of the Peshwas. On April 15, 1818, this fort was won by Colonel Prother of the British army after a fierce battle with Nikam Deshmukh.
    How to reach: Rajdherwadi is a village at the foot of the three forts of Rajdher, Koldher and Indrai. Reach Chandwad via Mumbai, Nashik or Manmad. Chandwad is 64 km from Nashik, while Chandwad is 24 km from Manmad. One can reach Rajdherwadi by ST from Chandwad. One can go directly to Rajdherwadi by private vehicle.
    Accommodation: Koldher fort is not comfortable to stay due to lack of drinking water. There are caves for living on Rajdher. It can accommodate 10-15 people. If you want to do a 2-day range trek to Koldher, Rajdher and Indrai, you can stay at the Hanuman temple in Rajdherwadi.
    Rest info in comment...

Комментарии • 15